Maharashtra Minister Dhananjay Munde News Updates : राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना एका प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. 2018 साली धनंजय मुंडे यांच्यावर बर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. पूस इथल्या संत जगमित्र सहकारी साखर कारखान्याच्या वादाप्रकरणी धनंजय मुंडे यांना कोर्टाने वॉरंट बजावले होते. आज न्यायालयासमोर स्वतः हजर होत धनंजय मुंडे यांनी जामिनासाठी अर्ज केला. अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने धनंजय मुंडे यांना या प्रकरणामध्ये जामीन मंजूर केला आहे.
काय आहे प्रकरण ?
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा खाजगी मालकीच्या जगमित्र शुगर प्रायव्हेट लिमिटेड ही प्रस्तावित जागा आहे.
या साखर कारखान्यासाठी शेतकरी मुंजा गित्ते यांची आठ एकर जमीन कारखान्यासाठी घेण्यात आली होती.
जमिनीच्या व्यवहाराचे 40 लाख रुपये मुंजा गीते यांना या साखर कारखान्याकडून येणे होते. मात्र त्यासाठीचा चाळीस लाख रुपयांचा धनादेश गीते यांना देण्यात आला हा धनादेश वठवण्यासाठी तब्बल तीन वर्षे यांनी बँकेचे खेटे मारले.
मात्र तीन वर्षे पाठपुरावा करूनही त्यांना या धनादेशाची चाळीस लाख रुपयांची रक्कम मिळाली नाही.
यादरम्यान धनंजय मुंडे यांना पैसे देण्यासंदर्भात अनेक वेळा विनंती करूनही त्याचा काही उपयोग झाला नाही.
अखेर फसवणुकीप्रकरणी मुंजा गित्ते यांनी न्यायालयाचे दार ठोठावले.
आणि त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशावरून 18 मे 2018 ला धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि सूर्यभान मुंडे यांच्यावर बर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
या प्रकरणांमध्ये यापूर्वीच वाल्मिक कराड आणि सूर्यभान मुंडे यांना कोर्टाने जामीन मंजूर केला होता..धनंजय मुंडे यांना मात्र कोर्टाने समन्स पाठवले होते.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha
इतर महत्वाच्या बातम्या