Maharashtra Minister Bungalow : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. या मंत्र्यांचं खातेवाटपही झालं. आता या मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयलस्टोन बंगला मिळालाय तर अब्दुल सत्तार यांना पन्हाळगड बंगला मिळाला आहे. मुनगंटीवार यांना पर्णकुटी बंगला मिळाला आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे सरकारचं पहिलं अधिवेशन सुरु आहे. विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांची खडाजंगी पाहायला मिळतेय. अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना गुवाहटी ट्रीप व गद्दारी या मुद्द्यावरुन लक्ष्य केलं जातेय. विधानसभा अधिवेशन सुरु असतानाच सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची लढाईही सुरु आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाकडून खंडपीठ नेमण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता ही लढाई आणखी काही दिवस कोर्टात चालणार आहे. त्यातच मंगळवारी मंत्र्यांना बंगल्याचं वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार उदय सामंत यांना मुक्तागिरी बंगला मिळाला आहे तर वादग्रस्त ठरलेले मंत्री संजय राठोड यांना शिवनेरी बंगला मिळाला आहे.
पाहूयात कोणत्या मंत्र्यांना कोणता बंगला मिळाला? पाहा संपूर्ण यादी
अ. क्रमांक | मंत्र्यांचं नाव | बंगला/ निवासस्थान |
1 | राधाकृष्ण एकनाथराव विखे-पाटील | रॉयलस्टोन |
2 | सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार | पर्णकुटी |
3 | चंद्रकांत बच्चू पाटील | ब-1 सिंहगड |
4 | विजयकुमार कृष्णराव गावित | चित्रकुट |
5 | गिरीश दत्रात्रय महाजन | सेवासदन |
6 | गुलाबराव रघुनाथ पाटील | जेतवन |
7 | संजय दुलीचंद राठोड | शिवनेरी |
8 | सुरेश दगडू खाडे | ज्ञानेश्वरी |
9 | संदिपानराव आसाराम भुमरे | ब- रत्नसिंधु |
10 | उदय रविंद्र सामंत | मुक्तागिरी |
11 | रविंद्र दत्तात्र्य चव्हाण | अ-6 रायगड |
12 | अब्दुल सत्तार | ब -7 पन्हाळगड |
13 | दीपक वसंतराव केसरकर | रामटेक |
14 | अतुल मोरेश्वर सावे | अ-3 शिवगड |
15 | शंभूराज शिवाजीराव देसाई | ब-4 पावनगड |
16 | मंगल प्रभात लोढा | ब-5 विजयदुर्ग |
उपमुख्यमंत्र्यांसाठी असलेला 'देवगिरी' बंगला अजित पवारांकडे कायम
सत्ता गेल्यानंतर सर्व अधिकार जातात तसेच शासकीय घर सुद्धा सोडावं लागत. पण महाराष्ट्राचे विरोध पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना मात्र त्यांचे शासकीय घर सोडावे लागले नाही. कारण मलबार हिल येथील देवगिरी बंगला (Devgiri Bungalow) अजित पवार यांनाच देण्यात निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. अजित पवार यांनी देवगिरी बंगला कायम राहवा यासाठी देवेंद्र फडणवीस यांना दोन वेळा पत्र लिहून विनंती केली. त्यानंतर राज्य सरकारनकडीन देवगिरी बंगला हा अजित पवार यांना मिळणार असल्याचे शासकिय परीपत्रक काढले. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यानंतर देवगिरी बंगला हा भव्य मानला जातो. फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवत हा बंगला अजित पवार यांच्याकडे काम ठेवला आहे. अजित पवार आणि देवगिरी बंगल्याचे नाते अतूट आहे कारण अजित पवारांनी या बंगल्यात जवळपास 16 वर्षाहून अधिक काळ वास्तव्य केले आहे. अजित पवार हे 1999 ते 2014 या काळात देवगिरी बंगल्यावरच राहत होते. त्यांनंतर 2014 ला भाजपची सत्ता आल्यानंतर हा बंगला सुधीर मुनगंटीवार यांना मिळाला. महाविकासआघाडीचे सरकार 2019 साली आल्यानंतर अजित पवारांना पुन्हा हा बंगला मिळाला होता.