Maharera : महारेराने 13 हजार 785 स्थावर संपदा एजन्टसची नावे वगळली आहे. या सर्व एजंटसची संकलित यादी महारेराने संकेतस्थळावर जाहीर केली आहे. स्थावर संपदा एजंटसनी 2017 साली मिळालेल्या परवान्याचे नुतनीकरण केले नाही, म्हणून महारेराने 13 हजार 785 एजंटसची नोंदणी रद्द केली आहे. या एजंटसना पुन्हा एजंटस म्हणून काम करायचे असल्यास विहित प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांच्या परवान्याचे नुतनीकरण होणार नाही. यात मुंबई आणि मुंबई उपनगराचे 6291 असे सर्वात जास्त एजंटस असून त्यानंतर ठाणे 3075 आणि पुणे 2349 येथील एजंटसचा क्रमांक लागतो.
एजंटससाठीच्या चौथ्या परीक्षेत 1527 उमेदवार उत्तीर्ण
एकीकडे नुतनीकरण अभावी अशी संख्या कमी होत असताना नवीन एजंटसही पात्र ठरले आहेत. एजंटससाठी विहित केलेली चौथी परीक्षा नुकतीच घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात 1767 उमेदवार परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1527 उमेदवार पात्र ठरले आहेत. 240 उमेदवार नापास झाले. या परीक्षेचा निकाल 86.41% टक्के लागला असून मुंबईतील श्रीमती आरोही चिराग भिमाजियानी या 100% गुण मिळवून सर्वोत्तम ठरल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या 4 परीक्षांमध्ये 100 टक्के गुण मिळविणाऱ्या त्या पहिल्या उमेदवार ठरल्या आहेत.
नोंदणी रद्द केलेल्या एजंटसची जिल्हानिहाय संख्या
मुंबई उपनगर 4353
ठाणे 3075
पुणे 2349
मुंबई शहर 1938
रायगड 770
पालघर 433
नागपूर 374
नाशिक 195
अमरावती 43
छ.संभाजीनगर 38
कोल्हापूर 30
अहमदनगर 21
रत्नागिरी 20
जळगाव ,सातारा 19
चंद्रपूर, सोलापूर 15
धुळे 12
सांगली 11
भंडारा 09
अकोला, सिंधुदुर्ग, वर्धा 7
जालना 6
गोंदिया 4
लातूर 3
बुलडाणा, दादरा नगर हवेली, नांदेड, यवतमाळ 2
हिंगोली,उस्मानाबाद, परभणी, वाशीम 1
एकूण 13,785
हेही वाचा>>>
NCP News : निलेश लंके गेले, भास्कर जाधव आले तर स्वागत करु, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आणखी एक पत्ता टाकला!