Maharashtra News : शासकीय सेवेत काम करणाऱ्या राज्यातील 1 लाखावर कर्मचाऱ्यांनी गरिबांना मिळणाऱ्या स्वस्त धान्याची उचल केल्याची माहिती समोर आली आहे. रेशन कार्ड वरील व्यक्तीचे आधार कार्ड लिंक करण्यात आले असल्याने त्यावरून हा गंभीर प्रकार उघडकीस आला. यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने या संदर्भात पाठपुरावा केल्यानंतर ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात तालुका पुरवठा अधिकाऱ्याच्या माध्यमातून चौकशी करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा विभागाला मिळाल्या आहे. आतापर्यंत या नोकरदार वर्गाने रेशनकार्डवर 35 किलो धान्य, तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला प्रतिव्यक्ती 5 किलो धान्यची उचल केल्याचे उघड झाले आहे. 


अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार या जिल्ह्यात शासकीय नोकरदारांनी केली सर्वाधीक धान्याची उचल केल्याचे समोर आले.


नाशिक- 5 हजार 895
अहमदनगर- 4 हजार 914
संभाजीनगर- 4 हजार 438
यवतमाळ- 3 हजार 187
अमरावती- 4 हजार 376 
नांदेड- 4 हजार 428
पुणे - 4 हजार 439
नागपूर- 3 हजार 589
लातूर  - तीन हजार 520