Maharashtra Breaking News LIVE Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
रेल्वे पुन्हा सामान्य वेळापत्रकानुसार सुरू होणार आहे. तब्बल वीस महिन्यांच्या गॅपनंतर रेल्वे पुन्हा सुरळीत वेळापत्रकाप्रमाणे सुरू होणार आहे
त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. सध्या या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलिस प्रशासनाने दक्ष राहावे असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा असे कळकळीचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.
ऋषिकेश देशमुख यांना तूर्तास दिलासा नाही
ऋषिकेश यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी 20 नोव्हेंबरपर्यंत तहकूब
ऋषिकेश माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा
मनी लााँड्रिंग प्रकरणी ऋषिकेश यांनाही ईडीतर्फे चौकशीसाठी सम्मन्स
मात्र हजर होण्याऐवजी ऋषिकेशतर्फे मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज
अनिल देशमुखांच्या ईडी कोठडीत वाढ, 15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचे निर्देश
ईडीनं पुढील चौकशीसाठी देशमुखांची कस्टडी वाढवून मागितली, ईडी कस्टडीला विरोध करत अनिल देशमुखांच्यावतीनं युक्तिवाद सुरु
वर्धा - आजपासून काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रीय संघटन प्रशिक्षण शिबीरास प्रारंभ
- सेवाग्राम येथील शिबीरात देशभरातील 200 पदाधिकाऱ्यांचा सहभाग
- पालकमंत्री सुनील केदार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती
भाजपा आमदार नितेश राणे आज दुपारी 2 वाजता आझाद मैदान येथे एसटी कामगार आंदोलन स्थळी भेट देणार आहेत.
सुप्रिया सुळे मुंबई सत्र न्यायालयात हजर
अनिल देशमुखांच्या सुनावणीसाठी उपस्थिती
थोड्याचवेळात अनिल देशमुखांना रिमांडसाठी विशेष पीएमएलए कोर्टात हजर केलं जाणार
सुप्रिया सुळे अॅड. अनिकेत निकम, विक्रिम चौधरी, आणि अॅड. इंद्रपाल सिंह यांच्यासोबत चर्चा करत आहेत
सुप्रिया सुळे सध्या कोर्ट रूम नंबर 29 जिथं देशमुखांची रिमांड होणार आहे त्या कोर्टरूम बाहेर वकिलांशी चर्चा करत आहेत
- साहित्य संमेलन गीतात स्वातंत्रवीर सावरकरांचे नाव नसल्याने मनसेने घेतली होती हरकत
- तीव्र आंदोलनाचा दिला होता इशारा
- मनसेच्या भूमिकेनंतर सावरकरांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख
- स्वातंत्र्याचे सूर्य उगविले अनंत क्षितिजा वरती असा उल्लेख आधी करण्यात आला होता
- स्वातंत्रवीर सावरकर उजळे अनंत क्षितिजावरती असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. मानेच्या दुखण्यामुळे दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री HN रिलायन्स रग्णालयात दाखल झाले होते. आज, शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया सुरु झाली होती. वरिष्ठ आँर्थो सर्जन डॉक्टरांच्या पथकानं सुमारे तासभर ही शस्त्रक्रिया केली. सकाळी पाऊने नऊ वाजता ऑपरेशन यशश्वी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑपरेशन थिएटरमध्येच आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील काही वेळ ते भूल दिल्यामुळे विश्रांती घेतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑपरेशनची माहीती त्यांच्या कुटुंबीयांनाही देण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन आता वृद्धांना घेता येणार
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला महत्वपूर्ण निर्णय
दोन डोस झालेल्या गर्भवती महिला आणि ६५ वर्षावरील नागरिकांना घेता येणार दर्शन
या नागरिकांना देखील ऑनलाईन नोंदणी राहणार बंधनकारक
देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांची माहिती.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल-मुरगुड रस्त्यावर गाडीचा स्फोट झालाय. चारचाकी गाडीतील चालकाचा होरपळून मृत्यू झाला. वाघजाई घाटात गाडीत दोन स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींची माहिती. आज सकाळी सहा वाजता फिरायला गेलेल्या नागरिकांना घटना समजली
पार्श्वभूमी
महाराष्ट्रातले काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची पंजाबमध्ये सह प्रभारी म्हणून नियुक्ती
महाराष्ट्रातले काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची पंजाबमध्ये सह प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानचे मंत्री हरीश चौधरी यांची पंजाबचे प्रभारी नेमले गेले आहेत. त्यांच्या सोबतीला दोन सहप्रभारी पंजाबमधली सत्ता राखणं काँग्रेससमोरचं मोठे आव्हान असणार आहे
परमबीर सिंह यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी करण्याची प्रक्रिया सुरु
गेल्या काही दिवसांपासून गायब असलेल्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तसा पत्रव्यवहार सीआयडीने केंद्रीय गृहमंत्रालयासोबत सुरु केला आहे. ते देशाबाहेर जाऊ नयेत यासाठी ही नोटिस बजावण्यात येणार आहे.
सावंतवाडी नगरपरीषदेची सभेत सेना-भाजप नगरसेवकां मध्ये बाचाबाची
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगरपरिषदेच्या बैठकीत राडा पाहायला मिळाला. या बैठकीदरम्यान शिवसेना आणि भाजप नगरसेवक भिडले. बरं एवढ्यावरच ते शांत झाले नाहीत, तर एकमेकांच्या अंगावर धावून गेले. राज्यात शिवसेना भाजपचा सध्या जोरदार संघर्ष सुरु आहे. पण हा संघर्ष आता अगदी तालुका पातळीवर जाऊन पोहोचलाय. जिओ केबल टाकण्यासाठी शहरात खोदलेले खड्डे, काही वार्डात कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा आणि सांडपाण्याचा प्रश्न आदी अनेक विषयावर नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या सावंतवाडी नगरपरिषदेच्या सभेत शिवसेना आणि सत्ताधारी भाजप नगरसेवकांमधे बाचाबाची होऊन नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.
तुळजापूरात रोज सव्वा लाख भाविक
नवरात्रीशिवाय होणार्यी गर्दीचे तुळजाभवानी मंदिरात सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. मागील आठ दिवसांपासून दररोज सव्वालाख भाविकांचे दर्शन घेत आहेत. कोरोना आपत्कालीन परिस्थिती निवळल्यानंतर महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे. मागील आठ दहा दिवसांपासून दीपावलीच्या सुट्ट्या आणि कोरोना नंतरचे दर्शन घेण्याची भाविकांची आतुरता या दोन्ही बाबीमुळे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. दररोज दर्शनासाठी सव्वा लाख भाविकांची गर्दी होत आहे. भाविकांच्या चारचाकी वाहनांना पार्किंग करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याचे चित्र सर्वत्र आहे. तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी आणि पारंपारिक कुलधर्म कुलाचार करण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमधून दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -