Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Continues below advertisement

Background

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

पाकव्याप्त काश्मीर 2024 पर्यंत भारतामध्ये येईल; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचं वक्तव्य

गेल्या अनेक वर्षांपासून भिजत घोंगडे असणाऱ्या पाकव्याप्त काश्मीरबाबत देशाच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कदाचित 2024 पर्यंत काही तरी होईल आणि पाकव्याप्त काश्मिर भारतामध्ये येईल अशी अपेक्षा करण्यास काहीही हरकत नाही. कारण या सगळ्या गोष्टी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात असे विधान केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले आहे. तर आता आपण वाट बघूया कदाचित 2024 पर्यंत काही तरी होईल आणि पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये येईल अशी अपेक्षा करायला काहीही हरकत नाही. या सगळ्या गोष्टी केवळ मोदी करू शकतात केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले. कल्याणामध्ये सुभेदार वाडा कट्ट्यातर्फे आयोजित रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत हे मत व्यक्त केले आहे. 

काश्मिरमधील 370 आणि 35 ए कलम हटवल्यानंतर विरोधकांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी. व्ही.नरसिंह राव यांचे उदाहरण दिले होते अशी आठवण पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितली. तसेच नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांनी पार्लमेंटचे संयुक्त अधिवेशन घेत त्यांनी कायदा पारित करून घेतला. ज्यामध्ये असे नमूद केले होते की काश्मिर ही देशाची फार मोठी समस्या आहे. पाकव्याप्त काश्मीर त्यांच्या ताब्यात असून हा भाग भारताने घेतल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही, असे तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांनी म्हटले होते. त्याचा दाखला देत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना उत्तर दिले की हे तुमचेच काम आहे, तुमच्याकडून झाले नाही म्हणून आम्ही करतोय अशी आठवण कपिल पाटील यांनी सांगितले.  

साहेब... कांद्यापासून वाईन बनवा; शेतकऱ्यानं काढलेलं व्यंगचित्र व्हायरल

राज्य सरकारने द्राक्षापासून तयार होणारी वाईन मॉल आणि किराणा दुकानात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असं असताना त्यावरुन चांगलाच गदारोळ उठविला जात आहे. अनेकजण शेतकऱ्यांना या निर्णयामुळे फायदा होईल, असं सांगत आहेत. तर विरोधी पक्ष याला कडाडून विरोध करत आहेत. सध्या हे राजकीय द्वंद्व सुरु झाल्याचं चित्र दिसत आहे. 

राज्यात अनेक फळांचे ज्युस आणि त्यापासून वाईन तयार केली जाते. असं असलं तरी त्याला सरकारी अधिकृत मान्यता नाही. केवळ द्राक्षापासून तयार होणाऱ्याच वाईनला पारवानगी आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर द्राक्षाचं उत्पादन घेतलं जातं. त्यातच वाईनसाठी लागणाऱ्या द्राक्षांचं उत्पादनसुध्दा अनेक शेतकरी घेत असतात. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात वाईन तयार करणाऱ्या फॅक्टरीसुध्दा मोठ्या संख्येनं आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे, निफाड तालुक्यातील विंचूर येथिल असलेले वाईन पार्क. वाईन ही दारु की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

आता एक वेगळीच मागणी एका कांदा उत्पादक शेतकऱ्यानं कार्टुनच्या माध्यमातून केली जात आहे. ज्यात त्यानं कांदा हा आयुर्वेदिक असून त्याची पण वाईन करा आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यालासुध्दा न्याय द्या, अशी मागणी केली आहे. त्यांनी कार्टुनच्या माध्यमातून राज्याच्या कृषीमंत्र्याकडे कवितेच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. नाशिकच्या सटाणा येथील शेतकरी आणि कार्टुनिस्ट संजय मोरे यांनी ही कविता केली आहे. ज्यात त्यांनी कांद्यापासून वाईन तयार केली. तर कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल, अशी व्यंगत्मातक मागणीही केली आहे.

Continues below advertisement
20:18 PM (IST)  •  30 Jan 2022

जालना जिल्ह्यात शॉर्टसर्किटमुळे 4 एकर ऊस जळून खाक

जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील दैठणा गावात शॉर्टसर्किटमुळे 4 एकर ऊस जळून खाक झाला आहे. गट क्रमांक 20 आणि 87 मधील 4 एकर शेतात ऊसाची लागवड करण्यात आली होती, दरम्यान उसाच्या पिकात लोंबकाळनाऱ्या तारां मध्ये घर्षन होऊन आज सायंकाळच्या सुमारास आग लागली ही आग विझवण्याचा गावकऱ्यांनी आटोकाटपर्यंत केला मात्र तो पर्यंत ऊस जळून नष्ट झाला.

19:38 PM (IST)  •  30 Jan 2022

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी साईदर्शनासाठी साई दरबारी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी साईदर्शनासाठी साई दरबारी ...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सायं.७.१० मिनिटांनी घेतले साई समाधीचे दर्शन...
साई समाधीवर अर्पण केली गुलाबी रंगाची शॉल....
साईबाबा संस्थानच्या वतीने शाल आणि साई मुर्ती देवून केला सत्कार....
प्रसारमाध्यमांशी संवाद नाही....

19:38 PM (IST)  •  30 Jan 2022

मादळमोही येथील उद्योजकाचे अपहरण करुन 2 कोटींची मागणी, चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मादळमोही येथील एका व्यवसायिकाचे अज्ञात पाच जणांनी दोन दिवसांपूर्वी साठेवाडी फाटा येथून अपहरण केले होते. यावेळी अपहरणकर्त्यांची एक स्कार्पिओ बंद पडल्याने ती तेथील पाटात ढकलून देवून अन्य एका स्कार्पिओमधून पोबारा केला होता. तीन दिवसापूर्वी घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान या घटनेचा चकलांबा पोलिसांनी दोन दिवसांत छडा लावला असून चार आरोपींच्या अहमदनगर येथे मुसक्या आवळल्या. तर या घटनेचा मुख्य सुत्रधार आरोपी अद्याप फरार आहे.

18:29 PM (IST)  •  30 Jan 2022

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गोवा दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गोवा दौऱ्यावर आहेत. वास्को येथे रेल्वे हॉल येथे ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता काही मोजक्याच लोकांना याठिकाणी प्रवेश दिला जात आहे. सध्या वास्को येथे चोख पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. 

18:11 PM (IST)  •  30 Jan 2022

गडचिरोली पोलीस मुख्यालयातील महिला पोलीस शिपायाची आत्महत्या

गडचिरोली पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपायाने आत्महत्या केली आहे. प्रणाली काटकर (वय 35) असे आत्महत्या केलेल्या महिला शिपायाचे नाव आहे. गडचिरोली पोलीस अधिक तपास करत आहेत.  

18:05 PM (IST)  •  30 Jan 2022

वर्ध्याच्या सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घरी दरोडा

वर्ध्याच्या कारंजा येथ तीन चोरट्यांनी शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास सेवानिवृत्त प्राध्यापक मुरलीधर भोयर यांच्या निवासस्थानी दरोडा घातला. यावेळी मंगळसूत्र, सोन्याच्या अंगठ्या आणि 20 हजारांची रोखरक्कम पळविली आहे.

17:36 PM (IST)  •  30 Jan 2022

प्रकाश आंबेडकरांनी पातोंडा गावात दिली भेट

5 जानेवारी ला हिंगोली जिल्ह्यातील पातोंडा गावातील नियमबाह्य पद्धतीने अतिक्रमण वन्य जमिनीवरील काढण्यात आले या वेळी दगडफेक आणि लाठीचार्ज करण्यात आला.

गावातली एका नागरिकाला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विश पाजून मारून टाकल्याचा आरोप मयाताच्य नातेवाईकांनी केला आहे. 

या प्रकरणी आज प्रकाश आंबेडकर यांनी या गावाला भेट दिली आणि मयताच्या नातेवाईकांची विचारपूस केली आणि या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्यासाठी मी राज्यपालांना भेटून दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे .
15:59 PM (IST)  •  30 Jan 2022

किरीट सोमय्या कोण आहेत? - संजय राऊत

किरीट सोमय्या कोण आहेत? मी आत्तापर्यंत कुणाच्याही कुटुंबावरती बोललो न्हवतो. पण यांनी खूप मोठी चूक केली आहे. याची किंमत यांना चुकवावी लागेल. मी यांच्या घरात घुसल्यास धरणी दुभंगेल. आणि यांना सर्व नकोस होईल. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. हे ह्यांनी ध्यानात ठेवावे. व्ययसाय करणं चुकीच आहे का? यांची मुले काही चणे फुटाणे विकतात का? असा सवाल संजय राऊत यांनी किरीट सोमय्यानी केलेल्या आरोपांना उत्तर देताना केला आहे.

15:58 PM (IST)  •  30 Jan 2022

नाना पटोले यांनी मानसिक  उपचार करून घ्यावेत - बावनकुळे

नाना पटोले यांनी मानसिक  उपचार करून घ्यावेत... यापूर्वीही राज्यात वध आणि हत्या या मुद्द्यावर मोठा गदारोळ झाला.. त्याने असे वक्तव्य करू नये... मी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिणार आहे... त्यांनी असे बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या आणि रोज काँग्रेसची प्रतिमा मलिन करणाऱ्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष ठेवू नये अशी विनंती त्या पत्रातून करणार आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

13:21 PM (IST)  •  30 Jan 2022

पंजाब टिकवण्याची जबाबदारी काँग्रेसकडून मराठी शिलेदारांवर

पंजाब टिकवण्याची जबाबदारी काँग्रेसकडून मराठी शिलेदारांवर,


काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ पंजाबचे सहप्रभारी म्हणून काम करतायत 

10:45 AM (IST)  •  30 Jan 2022

15 फेब्रुवारीपर्यंत परीक्षा पुढे ढकलण्याबाबतच्या निर्णयासंदर्भात वेट ॲंड वाॅचची भूमिका, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे वक्तव्य

15 फेब्रुवारीपर्यंत परीक्षा पुढे ढकलण्याबाबतच्या निर्णयासंदर्भात वेट ॲंड वाॅचची भूमिका, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे वक्तव्य

10:02 AM (IST)  •  30 Jan 2022

निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे; औरंगाबाद शहरातील गुलमंडी येथे अनोखं बॅनर

औरंगाबाद शहरातील गुलमंडी अनोख बॅनर. निवडणूक लढवण्यासाठी बायको हवी असल्याचं बॅनर. तीन आपत्य असल्यानं निवडणूक लढवता येत नाही, त्यासाठी निवडणूक लढवण्यासाठी बायको हवी असल्याचा बॅनर लावण्यात आला आहे. रमेश पाटील असं 35 वर्षीय व्यक्तीनं हे बॅनर लावला आहे आणि हे बॅनर शहरात सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

09:57 AM (IST)  •  30 Jan 2022

सिंधुदुर्गातील बांद्यात 89 जिवंत गावठी बॉम्ब जप्त, बंदुकीच्या नळ्या, रिकामी काडतुसेही सापडली; एकाला अटक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा सटमटवाडी याठिकाणी शिकारीच्या उद्देशाने ठेवलेले तब्बल 89 जिवंत गावठी बॉम्ब, बंदुकीच्या दोन नळ्या आणि रिकामी 4 काडतुसे बाळगल्याप्रकरणी अक्षर सादिक खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बांदा पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाकडून संयुक्तपणे करण्यात आली. या प्रकरणी संशयितावर बांदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात बॉम्बचा साठा नेमका हा साठा कशासाठी ठेवण्यात आला होता याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी दहशतवादविरोधी पथक, बॉम्बशोधक व नाशक पथक व डॉग स्कॉडला पाचारण केले 'शेरा' श्वानला बॉम्बचा वास देण्यात आला. शेराने घराशेजारी रचण्यात आलेल्या लाकडाच्या माचाखाली ठेवण्यात आलेला गावठी बॉम्बचा साठा शोधून काढला. पोलिसांनी तेथून गावठी बॉम्ब जप्त केले. तर वाळत ठेवलेले काही बॉम्ब त्यांना आढळून आले. यात तब्बल 89 गावठी बॉम्बसह राहत्या घरातून दोन बंदुकीच्या नळ्या, चार रिकामी काडतुसे व बंदुकीसाठी वापरण्यात येणारी लाकडी बट असा मुद्देमाल जप्त केला. सध्या शेजारील गोवा राज्यात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असल्याने सीमाभागात सिंधुदुर्ग पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

08:15 AM (IST)  •  30 Jan 2022

शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाची मोठी कारवाई

शिक्षक भरती घोटाळ्यात आता राज्याच्या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याला अटक करण्यात आलीय. शिक्षण विभागाचे उपसचिव असलेल्या सुशील खोडवेकर असं त्यांचं नाव आहे. पुणे सायबर पोलिसांनी ही कारवाई केलीय.  प्रशासकीय सेवेतील एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याचा शिक्षक भरती घोटाळ्यात सहभाग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सुशील खोडवेकर यांना  शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयानं खोडवेकर यांना 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

08:14 AM (IST)  •  30 Jan 2022

नथुरामच्या भूमिकेबद्दल खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा आळंदीत आत्मक्लेश

'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटातील नथुराम गोडसेच्या भूमिकेमुळे वाद निर्माण झाल्यानंतर खासदार अमोल कोल्हेंनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. पुण्यातील आळंदीत महात्मा गांधींच्या रक्षा विसर्जन स्तंभाला काल कोल्हेंनी अभिवादन केलं. यावेळी आत्मक्लेश करतानाच नथुराम गोडसेची भूमिका केल्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्यात त्यांच्याप्रती दिलगिरीही कोल्हे यांनी व्यक्त केलीय. दरम्यान व्हाय आय किल्ड गांधी चित्रपट आज ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार आहे..

Sponsored Links by Taboola