Maharashtra Breaking News LIVE Updates : नितेश राणेंना दिलेला दिलासा कायम, सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत अटक नाही

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 12 Jan 2022 03:05 PM
काही जिल्ह्यांमधील कोरोनाबाधितांची आकडेवारी

बुलढाणा- 105 नवीन कोरोनाबाधित


नांदेड - 474  नवीन कोरोनाबाधित


परभणी - 73 नवीन कोरोनाबाधित


धुळे - 145  नवीन कोरोनाबाधित


हिंगोली - 22  नवीन कोरोनाबाधित


जालना -  97  नवीन कोरोनाबाधित 

पंतप्रधानांच्या ताफ्याला रोखण्यात आले, त्याची चौकशी व्हावी- फडणवीस

पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेल्या घोळानंतर काँग्रेस पक्षाच्या प्रतिक्रिया पाहता त्यांचा सहभाग हे स्पष्ट होते, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसंच या सर्व प्रकरणाची चौकशी व्हायला हवी असंही फडणवीस म्हणाले आहेत.

उत्तरप्रदेशमध्ये आम्ही एकजुटीने लढणार - प्रफुल्ल पटेल

भंडारा येथील सालई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारार्थ असताना अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात उत्तर प्रदेश मध्ये युती झाली असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रफुल पटेल यांनी सांगितले.

कालीचरण महाराज यांच्या जामीन अर्जावर 14 जानेवारी रोजी सुनावणी

महात्मा गांधी यांच्या संदर्भात अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराज यांच्या जामीन अर्जावर वर्धा जिल्हा व सत्र न्यायालयात आता 14 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे 


आज सकाळीच कालीचरण महाराज यांना वर्धा जिल्हा व सत्र न्यायालयात उपस्थित करण्यात आलं होतं, तेव्हा न्यायालयाने त्यांच्या पोलिस कोठडीची पोलिसांची मागणी फेटाळून लावत न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी केली होती...



त्यानंतर महाराजांच्या वकिलांनी वर्धा च्या प्रकरणात कालीचरण महाराज यांना जामीन देण्यात यावा असे अर्ज न्यायालया समोर लावले होते... त्यावर दुपारनंतर सुनावणी करताना न्यायालयाने पुढील सुनावणी 14 तारखेला केली जाईल असं म्हटलं आहे...


दरम्यान न्यायालयाने कालीचरण महाराज यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे त्यांना आज सकाळी ज्या रायपूर सेंट्रल जेल वरून वर्ध्यात ट्रान्झिट रिमांडवर आणण्यात आले होते... त्याच रायपूर सेंट्रल जिल्हा पुन्हा रवानगी करण्यात आली आहे...

नितेश राणेंना दिलेला दिलासा कायम, सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत अटक नाही

आमदार नितेश राणेंना दिलासा मिळाला असून अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत अटक करणार नाही अशी राज्य सरकारने हायकोर्टात ग्वाही दिली आहे. या प्रकरणी गुरूवारी दुपारी 1 वाजता पुन्हा  सुनावणी होणार आहे.

पिंपळाच्या पानावर कलाकृती साकारत राजमाता जिजाऊ यांना अभिवादन

राजमाता जिजाऊ माता यांच्या जयंती चे औचित्य साधत भारती विद्यापीठ प्रशाला नवी मुंबईच्या ज्युनिअर कॉलेज चे कला शिक्षक नरेश लोहार यांनी जिजाऊ माँ साहेब यांची पिंपळाच्या पानावर कलाकृती साकारत त्यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करत कलाकृती सादर केली.



ओमायक्रॉनवर मात केलेल्या रुग्णांमध्ये 'ब्रेन फॉग'चा धोका

ओमायक्रॉनवर मात केलेल्या रुग्णांमध्ये 'ब्रेन फॉग'चा धोका, ब्रेन फॉगमुळे तीव्र डोकेदुखी आणि विसरभोळेपणाचा धोका, ओमायक्रॉनमुळे रक्तात प्रथिनांच्या प्रमाणात वाढ, हृदयावर ताण येण्याची भीती


 





होम क्वॉरंटाईनचा नियम मोडला तर मुंबई महापालिका तातडीनं कारवाई करणार

होम क्वॉरंटाईनचा नियम मोडला तर मुंबई महापालिका तातडीनं कारवाई करणार; नियम मोडल्यावर हातावर स्टँप, तक्रार असल्यास क्वॉरंटाईन सेंटरमध्ये रवानगी





रत्नागिरी : विमानतळसाठी 18 एकर जागेचे होणार भुसंपादन, जिल्हा प्रशासनाकडून अधिसूचना जारी

रत्नागिरी येथील विमानतळसाठी लागणाऱ्या जमिनीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. कारण 18 एकर जागा संपादित करण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासन यांनी मंजुरी दिली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून मिरजोळे गावातील तिवंडेवाडीतील 18 एकर जागा संपादित केली जाणार आहे. डिरेकशनला रेडिओ रेंज ही यंत्रणा बसवली जाणार असल्याने हवाई स्थान निश्चित करणे, मार्गक्रमण आणि लँडिंग करण्यासाठी होणार मोठी मदत होणार आहे. याचा फायदा सैन्य दलाच्या विमानासह प्रवाशी विमान वाहतुकीला देखील होणार आहे. विमानतळाचे विस्तारिकरण झाल्याने प्रवाशी वाहतुकी, पर्यटन, उद्योगासह सागरी सुरक्षेकरता होणार मोठा फायदा होणार आहे.


 

अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहू, मात्र जिल्ह्याची बदनामी सहन करणार नाही : धनंजय मुंडे
बीड : जिल्हाभर चर्चिला गेलेल्या कार्यकारी अभियंता यांनी रिव्हॉल्वरची मागणी करणाऱ्या विषयाचे पडसाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही उमटले. एखाद्या अधिकाऱ्याने शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अंबाजोगाई शहराची आणि पर्यायाने बीड जिल्ह्याची बदनामी करणे योग्य नसल्याचे सांगत खासदार रजनीताई पाटील यांच्यासह सर्वच सदस्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली, असं धनंजय मुंडे म्हणाले. 

 

आपल्या पदाचा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी वापर करून प्रामाणिक काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांच्या बीड जिल्हा नियोजन समिती आणि सर्व लोकप्रतिनिधी पाठीशी राहतील, मात्र जिल्ह्याची बदनामी होईल, असे वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे यावेळी बोलताना धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. काल ही ऑनलाईन बैठक झाली. 
पंतप्रधान मोदी करणार 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन

PM Modi : आज (12 जानेवारी) महान तत्त्वज्ञ आणि विचारवंत स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. दरवर्षी 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. यासोबतच पंतप्रधान मोदी येथे कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी आज सकाळी 11 वाजता पुद्दुचेरीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करतील. भारतातील तरुणांच्या मनाला आकार देणे आणि त्यांना राष्ट्र उभारणीसाठी एकसंघ शक्तीमध्ये रूपांतरित करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. 


राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदी 'माझ्या स्वप्नांचा भारत' आणि 'भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे अज्ञात नायक' या विषयावरील निवडक निबंधांचे अनावरण करतील. दोन विषयांवर एक लाखाहून अधिक तरुणांनी सादर केलेल्या निबंधांमधून या निबंधांची निवड करण्यात आली आहे. तसेच समिट दरम्यान, तरुणांना पर्यावरण, हवामान बदल, शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) नेतृत्वाखालील विकास, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि नाविन्य, स्वदेशी आणि प्राचीन ज्ञान, राष्ट्रीय चारित्र्य, राष्ट्र उभारणी या विषयांवर त्यांचे मत व्यक्त करण्याची संधी मिळेल.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रताप सरनाईकांवर राज्य सरकार मेहेरबान?

Pratap Sarnaik : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर राज्य सरकार मेहरबान झालंय का? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. कारण त्यांच्या ठाण्यातील छाबय्या विहंग गार्डन इमारतीचा दंड माफ करण्याचा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत येणार आहे. तर, यावेळी महापालिकेला भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा आदेशही दिला जाणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या या अजब निर्णयाची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा आहे. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


कोरोनाच्या उपचारात 'मोलनुपिरावीर' औषधाचा समावेश नाही : ICMR


Molnupiravir Drug : कोरोनाच्या उपचारात 'मोलनुपिरावीर' या औषधाचा समावेश न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना उपचारात 'मोलनुपिरावीर' जास्त फायदेशीर नसल्याचं ICMR ने म्हटलं आहे. ICMR च्या तज्ज्ञांनी सुरक्षेच्या चिंतेचा हवाला देत मोलनुपिरावीर जास्त फायदेशीर नसल्याचं सांगितलं आहे. 


इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या  (Indian Council of Medical Research) नॅशनल टास्क फोर्स ऑन कोरोना व्हायरस (Coronavirus) ने कोरोना व्हायरस संसर्गाच्या वैद्यकीय व्यवस्थापन प्रोटोकॉलमध्ये अँटीव्हायरल औषध मोलनुपिरावीरचा समावेश न करण्याचा निर्णय घेतला आहे. 


"आम्हाला हे लक्षात ठेवावं लागणार आहे की, या औषधासंदर्भात मुख्य सुरक्षा समस्या आहेत. यामुळे गर्भाची विकृती होऊ शकते आणि अनुवांशिक भिन्नतेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे स्नायूंनाही नुकसान पोहोचू शकते. त्याशिवाय औषध घेतल्यानंतर तीन महिने स्त्री आणि पुरुष दोघांनीही गर्भनिरोधक उपायांचा अवलंब करावा", असा सल्ला आयसीएमआरचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव (Dr. Balram Bhargava) यांनी दिला होता. तसेच जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि ब्रिटननेही कोरोना उपचारांमध्ये याचा समावेश केला नसल्याची माहिती भार्गव यांनी दिली होती. 


प्रताप सरनाईकांवर सरकार मेहेरबान? इमारतीचा दंड माफ करण्यासाठी मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडला जाण्याची चर्चा


Pratap Sarnaik : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर राज्य सरकार मेहरबान झालंय का? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. कारण त्यांच्या ठाण्यातील छाबय्या विहंग गार्डन इमारतीचा दंड माफ करण्याचा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत येणार आहे. तर, यावेळी महापालिकेला भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा आदेशही दिला जाणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या या अजब निर्णयाची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा आहे. 


राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मांडल्या जाणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील इमारतीचा दंड माफ करण्याच्या प्रस्तावाची चर्चा सध्या सुरू आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील छाबय्या विहंग गार्डन इमारतीचा दंड माफ करण्याचा प्रस्ताव आज मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. केवळ दंड माफ करण्याचा प्रस्ताव नाही, तर या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा आदेशही मंत्रिमंडळ बैठकीतून महापालिकेला देण्यात येणार असल्याचं कळतंय. तसं झालं तर एका आमदारासाठी मंत्रिमंडळात, असा निर्णय घेण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. त्यामुळे या निर्णयावर राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यताही आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.