Maharashtra Breaking News LIVE Updates : आमदार नितेश राणे यांचा नियमित जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज 

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 01 Feb 2022 05:48 PM
सर्वात जास्त दारू पिणारे लोक भाजपमध्ये ; अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा भाजपवर हल्लाबोल 

सर्वात जास्त दारू पिणारे लोक भाजपमध्ये ; अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा भाजपवर हल्लाबोल.
 किराणा दुकानातून वाईन विक्री करण्याच्या निर्याला विरोध करणाऱ्या विरोधकांना नवाब मलिक यांचा टोला 

धुळे: मुंबई-आग्रा महामार्गावर केमिकलने भरलेल्या टँकरचा स्फोट
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर केमिकलयुक्त पदार्थ वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात होऊन भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.यात संपूर्ण टँकरने पेट घेतला टँकर जळून खाक झाला असून यात टँकर चालक अडकल्याने आगीत होरपळून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर गावाजवळ आज दि 1 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास मध्यप्रदेश कडून शिरपूरच्या दिशेने भरधाव टँकरने ट्रकला जोरदार धडक दिल्याची घटना घडली.या धडके नंतर टँकर पलटी होऊन टँकरचा स्फोट झाला यावेळी टँकरने आगीचे रौद्ररूप धारण केले. आगीत संपूर्ण टँकर जळून खाक झाले आहे.प्राथमिक माहिती नुसार या टँकरमधील चालक टँकरमध्ये अडकला असून या आगीत त्याचा होरपळून मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. सदर टँकर मध्ये केमिकलयुक्त पदार्थ असल्या कारणाने टँकरचा स्फोट झाला या स्फोटाचा मोठमोठ्याने आवाज आल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.या आगीने रौद्ररूप धारण केले असून यात संपूर्ण टँकर जळून खाक झाले आहे.गेल्या एक तासापासून आग सुरुच आहे.घटनास्थळी नागरिकांसह पोलीस प्रशासन दाखल झाले आहे.

 
72 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक, कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या 3 दिवस राहणार कॅन्सल 

72 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक, कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या 3 दिवस राहणार कॅन्सल 
 
फेब्रुवारीच्या 5, 6 आणि तारखेला म्हणजे, शनिवार, रविवार आणि सोमवारी असेल हा ब्लॉक 


तब्बल 100 पेक्षा जास्त लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि मेल गाड्या राहणार कॅन्सल,


तर 350 लोकल ट्रेन देखील धावणार नाहीत, 

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत नवीन ११ वार्ड

उल्हासनगर महापालिकेत यापूर्वी एकून ७८ वॉर्ड तर २० प्रभाग होते. लोकसंख्येच्या प्रमाणात ११ नवीन वॉर्ड वाढल्याने एकून वॉर्डची संख्या ८९  झाले आहे. त्यामुळे इच्छुकांच्या संख्येत वाढ झाली असून नवीन वॉर्डही वाढले आहे, आज प्रारूप प्रभागाचे भौगोलिक सीमा प्रसिद्ध  झाल्या असून हरकती व सूचना मागविण्यात येणार आहे. मार्च ते एप्रिल महिन्यात उल्हासनगर महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या प्रियंका राजपूत यांनी सांगितले आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याच्या विधेयकावर राज्यपालांनी सही केली : : छगन भुजबळ


ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याच्या विधेयकावर राज्यपालांनी सही केली आहे. त्याबद्दल राज्यपालांचे आभार मानण्यासाठी राजभवनावर गेलो होतो ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याच्या विधेयकावर राज्यपालांनी सही केली : छगन भुजबळ

आमदार नितेश राणे यांचा नियमित जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज 

आमदार नितेश राणे यांच्याकडून नियमित जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने नियमित जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आमदार नितेश राणेंच्या वकिलांनी आता उच्च न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज केला आहे. तूर्तासतरी सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून दहा दिवसांचं संरक्षण नितेश राणेंना दिलं आहे.

गडचिरोली - महिला पोलिस शिपायाने विष प्राशन करुन केली आत्महत्या

कौटुंबिक वादातून गडचिरोली जिल्हा पोलिस मुख्यालयात कार्यरत महिला पोलिस शिपायाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना उजेडात आली आहे. प्रणाली काटकर (३५) असे मृत शिपाई महिलेचे नाव आहे. प्रणाली चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही येथील मूळ रहिवासी असून, मागील सात-आठ वर्षांपासून ती गडचिरोली पोलिस दलात कार्यरत होती. दोन वर्षांपूर्वी संदीप पराते या पोलिस शिपायाशी तिचा विवाह झाला. संदीपचा हा दुसरा विवाह होता. दोघेही पोलिस मुख्यालयानजीकच्या पोलिस कर्मचारी वसाहतीतील एका इमारतीत वास्तव्य करीत होते.  दोघांमध्ये घरगुती कारणावरून वारंवार खटके उडायचे. काल रात्री वाद विकोपाला गेल्याने प्रणालीने विष प्राशन केले. लगेच पती संदीप पराते याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला असून गडचिरोली पोलीस अधिक तपास करत आहे. 

राज्यपालांनी ओबीसी आरक्षण विधेयकावर त्यावर सही केली - अजित पवार

आनंदाची बातमी आहे आता राज्यपालांनी ओबीसी आरक्षण विधेयकावर त्यावर सही केलेली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. महविकास आघाडीचं शिष्टमंडळाने राज्यपाल भगत सिंह कोशियारी यांची भेट घेतली.  

महविकास आघाडीचं शिष्टमंडळ राज्यपाल भगत सिंह कोशियारी यांची 6 वाजता भेट घेणार

महविकास आघाडीचं शिष्टमंडळ राज्यपाल भगत सिंह कोशियारी यांची 6 वाजता भेट घेणार आहे. छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शिषटमंडळ राज्यपालांच्या भेटीला जाणार आहे. ओबीसींना आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका न घेण्याचा विधेयकावर सही करण्याची विनंती करणार आहे. 

भाजप आमदार नितेश राणे यांचा जमीन अर्ज सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने फेटाळला, नितेश राणे यांना मोठा धक्का, कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

#BREAKING : भाजप आमदार नितेश राणे यांचा जमीन अर्ज सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने फेटाळला, नितेश राणे यांना मोठा धक्का, कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA

कोयना परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का,

कोयना परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का, सकाळी 9.50 वाजता भूकंपाचा धक्का, 3.2 रिष्टर स्केलचा धक्का

आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी

आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी, आज सकाळी कणकवली दिवाणी न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 फेब्रुवारी पर्यंतची व्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली, दुसरीकडे आज जिल्हा सत्र न्यायालयात आमदार नितेश राणे न्यायालयाला शरण गेल्यानंतर त्यांच्या नियमित जामिनावर दुपारी 3 वाजता निर्णय येणार आहे

ओबीसी आरक्षणावरून राज्यपाल आणि ठाकरे सरकारमध्ये संघर्ष टोकाला; ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक न घेण्याच्या निर्णयावर सही करण्यास राज्यपालांचा नकार



विक्रीस आणलेल्या आठ इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक; कोल्हापूरच्या नागाळा पार्क येथील घटना

कोल्हापूरच्या नागाळा पार्क येथील काल संध्याकाळची घटना घडली.  विक्रीस आणलेल्या आठ इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात आग विझवली. आगीमध्ये सहा ते सात लाखाच्या दुचाकींचे नुकसान


आगामी 15 महानगरपालिकांचा प्रारूप आराखडा अर्थात वॉर्ड रचना आज जाहीर होणार

आगामी 15 महानगरपालिकांचा प्रारूप आराखडा अर्थात वॉर्ड रचना आज जाहीर होणार आहे. साधारण एक वर्षांपूर्वी मुदत संपलेल्या पाच आणि येत्या काही दिवसात मुदत संपणाऱ्या दहा महानगर पालिकांची वॉर्ड रचना आज जाहीर होणार आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह एकूण 15 महापालिकांचा प्रारूप आराखडा जाहीर होणार आहे. हरकती आणि सूचनांसाठी 14 फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आलीय. हा आराखडा ओबीसी आरक्षणाशिवाय तयार करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यात निवडणुका होणारचं हे जवळपास निश्चित झालंय.

पार्श्वभूमी

मोठी बातमी : हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकला अटक 


हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकला (Hindusthani Bhau Vikas Phatak) अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणी विकास फाटकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज त्याला 11 वाजता कोर्टात हजर केलं जाणार आहे.


न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न करणाऱ्यांची यापुढे खैर नाही! मुंबई उच्च न्यायालयाचे खडेबोल


खारफुटीची जमीन राज्याच्या वन विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) आणि शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको), मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), च्या ताब्यात घेण्याचे आदेश हायकोर्टानं साल 2018 मध्ये दिले होते. मात्र, त्या आदेशाला केराची टोपली दाखवत संबंधित प्राधिकरणाचे अधिकारी न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत आहेत. मात्र यापुढे असं आढळल्यास चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा शब्दात सोमवारी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरल.


मुंबईसह आसपासच्या परिसरात खारफुटी जमिनींचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर करण्यात येत आहे. विविध प्राधिकरणाकडून त्याकडे जाणीवपूर्वक निष्काळजीपणा करण्यात येत असल्याचा दावा करणारी जनहित याचिका `वनशक्ती’या सेवाभावी संस्थेच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यावर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती व्ही. जी. बिश्त यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी पार पडली. तेव्हा, साल 2018 मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं राज्यातील सर्व खारफुटी क्षेत्रांना वन विभाग म्हणून घोषित करत ही जाग वन विभागाकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले होते. मात्र अद्याप त्या आदेशांचे पालन करण्यात आले नसून 15 हजार 311.7 हेक्टर पैकी 13 हजार 716.73 हेक्टर जमीन वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. मात्र, उर्वरित 1 हजार 594.97 हेक्टर जमीन अद्यापही हस्तांतरित करण्यात आली नसल्याचं याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाच्या निर्दशानास आणून दिलं. 


BMC : मुंबईचे महापालिकेचे वॉर्ड आता 'असे' असतील; नवीन वॉर्ड पुनर्रचना प्रारूप अधिसूचना जाहीर 


 मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका 2022 साठी बीएमसीने पाठवलेला वॉर्ड पुनर्रचना आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाने प्राथमिक मंजुरी दिल्यानंतर आता  नवीन वॉर्ड पुनर्रचना प्रारूप अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये 227 ऐवजी आता 236 वॉर्ड असणार आहेत.  या संदर्भातील प्रारुप आराखडा बीएमसीकडून जारी करण्यात आला आहे. आरक्षण कशा पद्धतीने असेल याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून दिली आहे.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.