Maharashtra Breaking News LIVE Updates: मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 12 Dec 2021 07:33 AM
नांदेड जिल्ह्यातील पहिली ते सातवीच्या शाळा उद्या सुरू होणार
नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिली ते चौथी व महापालिका हद्दीतील इयत्ता पहिली ते सातवी च्या शाळा उद्या पासून सुरू होणार आहेत.कोरोना काळात सुरू होणाऱ्या ह्या शाळांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियमावली जाहीर करण्यात आलीय.कोरोना प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथी व महापालिका क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग गेल्या दोन वर्षा पासून सुरू करण्यात आले नव्हते.परंतु उद्या 13 डिसेंबर 2021 पासून सुरू करण्या बाबत जिल्हा प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे.त्यानुसार ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथी व शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग असणाऱ्या सर्व शाळा सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

 
खासदार सांस्कृतिक महोत्सव यंदा 17 ते 26  डिसेंबरदरम्यान होणार

नागपूरसह संपूर्ण विदर्भाचे सांस्कृतिक वैभव ठरलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सव यंदा 17 ते 26  डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे... बॉलीवूड स्टार संजय दत्त यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे... स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या मध्यवर्ती संकल्पनेवर यंदा खासदार सांस्कृतिक महोत्सवाची आखणी करण्यात आली आहे... देशातील आघाडीचे कलाकार यांना नागपुरातील खासदार महोत्सवात आपली कला सादर करणार असून नागपूरकरांना 17 ते 26 डिसेंबर दरम्यान संगीत, नाट्य यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी मेजवानी राहणार आहे....

तुळजापूर एसटीवर अज्ञात व्यक्तीने केली दगडफेक

तुळजापूर एसटीवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली आहे. दगडफेकीत चालक रामदास इंगळे जखमी झाले आहेत. सोलापूर जवळील तळेहीप्परगा येथे ही घटना घडली आहे. चालकावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एम एच 20 पी एल 4114 क्रमांकाच्या एसटी बस मधून साधारण चाळीस प्रवासी  तुळजापूरहून सोलापूरसाठी प्रवास करत होते. 

प्रेमी युगूलातील मुलाला जमावाकडून अमानुष मारहाण

प्रेमी युगूलातील मुलाला जमावाकडून अमानुष मारहाण. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालूक्यातल्या गायगाव ऑईल डेपोसमोरील घटना. मुलीने बुरखा घातला म्हणून तिच्या प्रियकराला मारहाण. प्रियकराला मारू नका म्हणत मुलीचा टाहो. रस्त्यावरच मुलीने घातलेला बुरखा उतरवायला लावला. मारहाण करणा-या दोन युवकांना उरळ पोलीसांकडून अटक, गुन्हे दाखल. मारहाणीच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिलेत कारवाईचे आदेश.

राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे रविवारी संध्याकाळी नाशिकमध्ये दाखल झाले असून ते दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. उद्या सकाळी उंटवाडी परिसरात मनसेच्या जनहित कक्ष व विधी विभाग कार्यालयाचे ते उदघाटन करणार असून या ठिकाणी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राज ठाकरेंचा हा दौरा महत्वाचा मानला जातोय.

म्हाडा पेपर फुटी प्रकरणी 3 आरोपींना शिवाजीनगर कोर्टासमोर करण्यात आले हजर

म्हाडा पेपर फुटी प्रकरणी 3 आरोपींना आज शिवाजीनगर कोर्टासमोर हजर करण्यात आले. या तिन्ही आरोपींना कोर्टाने 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील चौघांचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील चौघांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात घडली आहे. या घटनेत तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्या जळगाव  जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत

भुसावळ शहरातील वांजोला रस्त्याजवळ राहत असलेले  विलास भोळे  हे रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. मागील काही महिन्यांपासून कोरोना काळात झालेले लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसाय ही बंद राहिल्याने त्यांचावर मोठा आर्थिक ताण पडल्यानं संपूर्ण कुटुंब तणावात आहे
Gopichand Padalkar: म्हाडा परीक्षा प्रकरणावरुन गोपीचंद पडळकर यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका

Gopichand Padalkar: म्हाडा परीक्षा प्रकरणावरुन गोपीचंद पडळकर यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका 


MHADA Exam: प्रत्येकवेळी किती मनस्ताप सहन करायचा? विद्यार्थ्यांचा आव्हाडांना सवाल ABP Majha

MHADA Exam: प्रत्येकवेळी किती मनस्ताप सहन करायचा? विद्यार्थ्यांचा आव्हाडांना सवाल ABP Majha



कोर्ट कचेरीच्या माध्यमातून आरक्षण संपवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे- छगन भुजबळ

ओबीसी प्रश्न गाजतो आहे ओबीसी आराक्षण दिलं कोणी तर हे जाणून घ्यायला हवं. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी जाहीर केलं होतं मंडल आयोग लागू केलं होत. त्यांनी ओबीसींना आरक्षण दिलं. त्यावेळी देखील भाजपचं याला विरोध करत होते आणि आता देखील हेच विरोध करत आहेत. भाजपचं सध्या एक दाखवतात आणि करतात दुसरं. आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही लढत आहोत. माझी जनतेला विनंती आहे ज्यानी आरक्षणाला विरोध केला त्यांना दारात उभं करू नका. कोर्ट कचेरीच्या माध्यमातून आरक्षण संपवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे

अनेकजण राष्ट्रीय, राज्य स्तरावरील राजकारण करतात परंतु त्या गावचा सरपंच त्यांच्या विचारांचा नसतो-अजित पवार

प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितलं आहे की प्रत्येक शनिवारी प्रत्येक गावाला तुम्ही जाणार आहात परंतु त्या गावचा सरपंच आपल्या विचाराचा असावा याची काळजी घ्या. कारण अनेकजण राष्ट्रीय, राज्य स्तरावरील राजकारण करतात परंतु त्या गावचा सरपंच त्यांच्या विचारांचा नसतो-अजित पवार

भाजप ओबीसींच्या आरक्षणाविरोधात; छगन भुजबळ यांची घणाघाती टीका

भाजपने मंडल आयोगाच्या शिफारसींना विरोध केला होता आणि आतादेखील ओबीसींच्या आरक्षणाला विरोध करत आहे, अशी टीका राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केली. 

सांगली: भाजप आमदार सदाभाऊ खोत यांची राजेश टोपे यांच्यावर टीका

सदाभाऊ खोत यांनी आरोग्य भरतीचा घोटाळा आणि म्हाडाच्या पुढे ढकलेल्या परीक्षा यावरून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर टीका केली. पुन्हा परीक्षा नाही घेतल्या तर येत्या अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचा दिला इशारा 

 गोपीनाथ मुंडेंची जयंती, गोपीनाथ गडावर  सामाजिक उपक्रम 

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्ताने राज्यभरातील मुंडे समर्थक गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांनी गडावर गर्दी न करण्याचे आवाहन यापूर्वीच केले होते. त्यामुळे कोणताही कार्यक्रम गडावर ठेवण्यात आलेला नाही. रक्तदान शिबिर कोरोना लसीकरण यासोबतच आज संकल्प दिन पळून ऊसतोड कामगारांसोबत पंकजा मुंडे काही काळ घालवणार आहेत. 

नाशिकमध्ये दोन दिवसात दोन एसटी बसेसवर दगडफेकीच्या घटना समोर

नाशिकमध्ये दोन दिवसात दोन एसटी बसेसवर दगडफेकीच्या घटना समोर आली असून पोलिस ठाण्यात याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य शासनात विलगीकरन करा या मागणीसाठी राज्यभर गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सरकारने कारवाईचा बडगा उगारताच नाशिकमध्ये अनेक कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले असून 3 ते 4 मार्गांवर फेऱ्याही सुरू झाल्या आहेत मात्र या बसेसवर होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालीय. काल नाशिकहून कसाराकडे जाणाऱ्या एसटी बसवर इंदिरानगर परिसरात उड्डाणपुलाखाली दगडफेक करण्यात आलीय तर आज सकाळी येवला आगारातून नाशिकला येणाऱ्या बसवर औरंगाबाद नाक्याजवळ दगड भिरकवण्यात येऊन नुकसान करण्यात आले.

किल्ले रायगडावरील समाधीनजीक आढळून आलेल्या राख मिश्रित लेप  प्रकरणी गुन्हा दाखल..

रायगड...  किल्ले रायगडावरील समाधीनजीक आढळून आलेल्या राख मिश्रित लेप  प्रकरणी गुन्हा दाखल..


 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीजवळ राख मिश्रित लेप लावण्याचा प्रयत्न,8 डिसेंबर रोजीची घटना...


महाड येथील तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,  चौघांविरोधात विरोधात गुन्हा दाखल... 

मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर बसचा अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर बसचा अपघात, तिघांचा मृत्यू.. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर खासगी बसची सिमेंट बल्करला धडक...


बोरघाटात रस्त्याचे काम करणाऱ्या तीन कामगारांचा मृत्यू .. 


खासगी बसचा चालक गंभीर जखमी, १० ते १५ प्रवासी किरकोळ जखमी..


खासगी बसला अज्ञात वाहनाची मागून धडक..


अपघातात तिघांचा मृत्यू.. रस्त्याचे काम करणाऱ्या तीन कामगारांचा मृत्यू...

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


MHADA Exam: म्हाडाची आज होणारी परीक्षा पुढे ढकलली, मंत्री जितेंद्र आव्हाडांचं मध्यरात्री ट्वीट, विद्यार्थ्यांचा संताप
 
MHADA Exam Latest Update : जे विद्यार्थी म्हाडाच्या विविध पदांच्या परीक्षेसाठी निघाले असतील किंवा निघणार असतील त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. म्हाडाची आज रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाडांची मध्यरात्री ट्वीट करत ही माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांची क्षमा मागत त्यांनी ही माहिती दिली असून याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.  


मंत्री जितेंद्र आव्हाडांनी काय म्हटलंय


'सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळं आणि तांत्रिक अडचणीमुळं म्हाडाची आज होणारी परीक्षा आणि यापुढे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा जानेवारी महिन्यात होतील. ही माहिती एवढ्या रात्री यासाठी देतोय की विद्यार्थ्यांनी सेंटरवर जाऊ नये, त्यांना त्रास होऊ नये. परत एकदा क्षमा मागतो'
 
आव्हाड यांच्या या ट्विटनंतर त्यावर विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. बंद असताना विद्यार्थी आधीच शेकडो रुपये खर्चून नियोजन करून बसले होते. सरकारने प्रत्येक परीक्षार्थीच्या खात्यात नुकसानभरपाई म्हणून 2000 रु. जमा करावेत, असं एका विद्यार्थ्यानं म्हटलं आहे. आरोग्य विभागमध्ये पण तेच म्हाडामध्ये पण तेच. सरकारचा नियोजन शून्य कारभार आहे, असं एका विद्यार्थ्यानं म्हटलं आहे.






PM Modi Twitter account Hack : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटर अकाउंटवरून पहाटेच्या सुमारास मोठी घोषणा करण्यात आली होती. बिटकॉइनला अधिकृतपणे मान्यता देत असल्याचे म्हटले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेमुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र, काही वेळेत त्यांचे ट्वीटर अकाउंट हॅक झाले असल्याचे समोर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकाउंटवरून बिटकॉइनबाबत मोठी घोषणा करण्यात आल्याने खळबळ उडाली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटर अकाउंटवर लक्ष्य करण्यात आले. अकाउंट हॅक केल्यानंतर त्यावरून काही ट्वीट करण्यात आले. यामध्ये बिटकॉइनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता देण्याबाबतची घोषणा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीटर अकाउंट 12 डिसेंबर रोजी सकाळी दोन वाजण्याच्या सुमारास हॅक करण्यात आले होते. 



 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.