Maharashtra Breaking News LIVE Updates : मनी लाँड्रिंग प्रकरणात सचिन वाझे माफीचा साक्षीदार होण्यास तयार

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 09 Feb 2022 05:36 PM
मनी लाँड्रिंग प्रकरणात सचिन वाझे माफीचा साक्षीदार होण्यास तयार

मनी लाँड्रिंग प्रकरणात सचिन वाझे माफीचा साक्षीदार होण्यास तयार झाले आहेत.


 
Mumbai News : मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमणार, मंत्री नवाब मलिक यांची माहिती

 मुंबई महापालिकेची (Mumbai Muncipal Corporation)  मुदत संपत असून  कायद्यात बदल करुन प्रशासक नेमला जाणार आहे.  राज्यपाल यांच्या चर्चेनंतर हा निर्णय होईल, अशी माहिती मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली आहे.

Pune News : विद्यापीठाच्या आवारात 14 फेब्रुवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण

Pune University : पुणे विद्यापीठाच्या (Pune University) आवारात उभा करण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच अनावरण 14 फेब्रुवारी रोजी करण्यात येईल. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थितीत राहणार आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार ऑनलाईन उपस्थितीत राहणार आहेत.  

Nashik Breaking: नाशिकच्या सराफ बाजारात महिला चोरांचा सुळसुळाट 

नाशिकच्या सराफ बाजारात महिलांचा सुळसुळाट झाल्याचं दिसून येतंय. आज सकाळी भागीरथी ज्वेलर्सच्या दुकानात लहान मुलीसोबत आलेल्या महिलेने सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स लांबविला. काही मिनिटात साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास करत दोघींनी काढला पळ काढला. चोरीची संपूर्ण घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Government Employees Strike : 23 आणि 24 फेब्रुवारीला सरकारी कर्मचाऱ्यांची संपाची हाक

 Government Employees Strike  :  सरकारी कर्मचाऱ्यांनी ( Government employees)  23 आणि 24 फेब्रुवारीला  संपाची  हाक दिली आहे.  मुख्यमंत्री ठाकरे (cm uddhav thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Paear) कर्मचाऱ्यांनी पत्र लिहिले आहे. निवृत्तीचं वय 60 वर्षे करावं आणि जुनी पेंशन योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

Akola News : प्रभागरचनेवरून महापालिकेत गोंधळ घातल्याने काँग्रेस नेत्यासह पाच जणांना अटक

Akola Municipal Corporation : सरकारी कामात हस्तक्षेप, तोडफोड केल्याप्रकरणी महानगरपालिकेतील काँग्रेसचे (Congress) विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांच्यासह 5 जणांना पोलिसांनी केली अटक. पाच दिवसांपुर्वी प्रभागरचनेवरून पठाण यांनी महापालिकेत (Municipal Corporation) गोंधळ घातला होता . नगररचना विभागाचे प्रमुख संदीप गावंडे यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की देखील यावेळी करण्यात आली होती.

Maharashtra News : भीमा कोरेगाव प्रकरणाची चौकशी करणा-या आयोगासमोर शरद पवार उपस्थित राहणार

Bhima Koregaon Case :  भीमा कोरेगाव (Bhima Koregaon)  प्रकरणाची चौकशी करणा-या आयोगासमोर शरद पवार (Sharad Pawar)  उपस्थित राहणार आहे. 23 आणि 25 फेब्रुवारीला शरद पवार आपली साक्ष नोंदवण्यासाठी आयोगापुढे हजर राहणार आहे. 21 ते 23 फेब्रुवारी या दरम्यान आयोगाचं कामकाज पुण्याऐवजी मुंबईत होणार आहे. 

मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाईफेक

मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर फेकली शाही आणि केला निषेध. राजापेठ उड्डाणपूल याठिकाणी पुतळा बसविला तो काढल्यामुळे त्याचा निषेध म्हणून स्वतःला शिवप्रेमी म्हणवणार्यांनी मनपा आयुक्त यांच्या अंगावर शाई फेकली. शाई फेकणारे नेमकं कोण होते याची माहिती अद्याप कळाली नाही

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोपी विकेश नगराळे दोषी

काँग्रेस कार्यकर्ते भाजप कार्यालयावर आल्यास झोडून काढू, अनिल बोंडेंची ऑडिओ क्लिप व्हायरल

भाजपने माफी मागावी म्हणून, महाराष्ट्रात सगळ्या भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. यावर भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खरे तर छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची या काँग्रेसवाल्यानीच माफी मागायला पाहिजे. कारण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या काळात ते कोणाच्याच कामाला आले नाही. मुख्यमंत्री आले नाही, नाना पटोले फिरकले नाही. लोकांना वाऱ्यावर सोडून दिलं असल्याचे बोंडे म्हणाले. दरम्यान, काँग्रेसचे काळे कुत्रे जरी भाजपच्या कार्यालयावर फिरकले तर त्याला झोडल्याशिवाय भाजपचे कार्यकर्ते राहणार नाहीत, अशी धमकी भाजपचे नेते व माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी दिली आहे. याबाबतची त्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल होतेय.

पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेसचे राज्यभरात आंदोलन सुरू

देशात कोरोना प्रसारासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेसने राज्यभरात आंदोलन सुरू केले आहे. 

कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचे सोलापुरात पडसाद


कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचे सोलापुरात पडसाद. प्रहार संघटनेने सोलापूर - विजापूर महामार्ग अडवला.  सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर केले रास्तारोको आंदोलन करण्यात आले.कर्नाटकातील भाजप सरकारच्या निषेधार्थ केला रास्तारोको महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील टाकळी येथे सुरु आंदोलन

Wardha HinganGhat Case : हिंगणघाट जळीतकांड, मारेकऱ्याला फाशी?

Wardha HinganGhat Case Update : एकतर्फी प्रेमातून एका शिक्षिकेला जिवंत जाळण्यात आलं आहे. त्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी न्यायालय आज निकाल देणार आहे. 3 फेब्रुवारी 2020 रोजी आरोपी विकेश नगराळेनं एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवलं होतं. 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यृ झाला होता. या गुन्ह्यात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. या प्रकरणी 426 पानांचं दोषारोपपत्र, 64 सुनावणी, 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे, पीडित तरुणीच्या मृत्यूला 2 वर्ष पूर्ण होताना आज हा निकाल दिला जाणार आहे. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत सरकारनं विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वल निकमांची नियुक्ती केली होती.


विशेष म्हणजे 29 साक्षीदारांपैकी एकही साक्षीदार फितूर झालेला नाही. त्यामुळे आरोपीचा दोष सिद्ध करण्याइतपत भक्कम पुरावे असून ते सरकारी पक्षाने न्यायालयापुढे सादर केल्याचे दीपक वैद्य म्हणाले. 


दरम्यान या प्रकरणाचा आरोपी विकेश उर्फ विकी नगराळे यानं न्यायालयात त्याची सुनावणी झाली त्यावेळी आपल्यावरील आरोप खोटे असल्याचं आणि त्यांनी असं कोणतंही जळीत हत्याकांडाचं कृत्य केलं नसल्याचे सांगत आरोप फेटाळले होते. मात्र सरकारी पक्षानं सादर केलेले भक्कम पुरावे लक्षात घेऊन या प्रकरणात न्यायालय योग्य शिक्षा सुनावेल अशी अपेक्षाही दीपक वैद्य यांनी व्यक्त केली आहे. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


ठाकरे सरकार पाडण्यास मदत करा नाहीतर...; उपराष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात संजय राऊतांचा ईडीवर खळबळजनक आरोप


Sanjay Raut Wrote letter to Vice President : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. सरकार पाडण्यासाठी आलेली ऑफर नाकारल्याने ईडी मार्फत कुटुंबीय आणि निकटवर्तीयांवर कारवाई सुरू झाली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून त्यांनी हा दावा केला आहे. ईडी आणि अन्य तपास यंत्रणांचे अधिकारी आपल्या राजकीय नेत्यांच्या हातातील कळसूत्री बाहुले झाले असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले. 


सरकार पाडण्यास मदत करा नाहीतर...


संजय राऊत यांनी खळबळजनक दावा करताना म्हटले की, राज्यात मध्यावधी निवडणूक करण्यास मदत करण्यास नाकारले तर तुरुंगात डांबण्याची धमकी देण्यात आली. सरकार पाडण्यासाठी मी महत्त्वाची भूमिका पार पाडावी जेणेकरून मध्यावधी निवडणूका पार पाडल्या जातील. मात्र, मी याला नकार दिला. माझ्या या नकाराची मोठी किंमत चुकवावी लागेल अशी धमकी देखील देण्यात आली होती, असेही संजय राऊत यांनी पत्रात म्हटले. माझ्यासह महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील दोन मंत्री आणि राज्यातील दोन मोठ्या नेत्यांनादेखील पीएमएलए कायद्यानुसार तुरुंगात डांबण्यात येईल अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका लागू होऊ शकतात असेही राऊत यांनी म्हटले. 




Wardha HinganGhat Case : हिंगणघाट जळीतकांड, मारेकऱ्याला फाशी? आज न्यायालय फैसला सुनावणार


Wardha HinganGhat Case Update : एकतर्फी प्रेमातून एका शिक्षिकेला जिवंत जाळण्यात आलं आहे. त्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी न्यायालय आज निकाल देणार आहे. 3 फेब्रुवारी 2020 रोजी आरोपी विकेश नगराळेनं एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवलं होतं. 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यृ झाला होता. या गुन्ह्यात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. या प्रकरणी 426 पानांचं दोषारोपपत्र, 64 सुनावणी, 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे, पीडित तरुणीच्या मृत्यूला 2 वर्ष पूर्ण होताना आज हा निकाल दिला जाणार आहे. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत सरकारनं विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वल निकमांची नियुक्ती केली होती.


विशेष म्हणजे 29 साक्षीदारांपैकी एकही साक्षीदार फितूर झालेला नाही. त्यामुळे आरोपीचा दोष सिद्ध करण्याइतपत भक्कम पुरावे असून ते सरकारी पक्षाने न्यायालयापुढे सादर केल्याचे दीपक वैद्य म्हणाले. 


दरम्यान या प्रकरणाचा आरोपी विकेश उर्फ विकी नगराळे यानं न्यायालयात त्याची सुनावणी झाली त्यावेळी आपल्यावरील आरोप खोटे असल्याचं आणि त्यांनी असं कोणतंही जळीत हत्याकांडाचं कृत्य केलं नसल्याचे सांगत आरोप फेटाळले होते. मात्र सरकारी पक्षानं सादर केलेले भक्कम पुरावे लक्षात घेऊन या प्रकरणात न्यायालय योग्य शिक्षा सुनावेल अशी अपेक्षाही दीपक वैद्य यांनी व्यक्त केली आहे. 



3 फेब्रुवारी 2020 रोजी हिंगणघाट येथे आरोपी विकेश नगराळेनं एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिका तरुणीवर पेट्रोल टाकून पेटवलं होतं. यांत गंभीररित्या जखमी झालेल्या पीडित प्राध्यापिका तरुणीचा उपचारादरम्यान 10 फेब्रुवारी 2020 रोजी मृत्यू झाला होता. या जळीतकांड प्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. आरोपी विकेश नगराळेविरोधात तब्बल 426 पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केलं होतं. या प्रकरणात आतापर्यंत 29 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. या प्रकरणी दोन्ही बाजूचा युक्तीवाद संपला असून आता निकालाची प्रतीक्षा आहे.



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.