Maharashtra Breaking News LIVE Updates : वाळवा तालुक्याचे माजी आमदार  विश्वासराव पाटील  यांचे निधन

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 07 Feb 2022 09:33 PM
वाळवा तालुक्याचे माजी आमदार  विश्वासराव पाटील  यांचे निधन

वाळवा तालुक्याचे माजी आमदार  विश्वासराव पाटील  यांचे निधन झाले आहे. लोकनेते राजारामबापू पाटील  यांचे अनुयायी म्हणुन विश्वासराव पाटील अशी  त्यांची  ओळख होती. 

किरीट सोमय्यांना शर्ट काढून मारहाण करणारा शिवसैनिक गजाआड

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासोबत शनिवारी सायंकाळी पुणे महानगरपालिकेत धक्काबुक्की करण्यात आली. या झटापटीत किरीट सोमय्या खाली कोसळले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी किरीट सोमय्या यांना शर्ट करणाऱ्या शिवसैनिकाला अखेर अटक करण्यात आली.  सनी गवते असे अटक करण्यात आलेल्या शिवसैनिकाचे नाव आहे. आज दुपारी या अटक करण्यात आलेल्या शिवसैनिकाला शिवाजीनगर कोर्ट मध्ये हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याची जामिनावर सुटका केली आहे.


 

वैभववाडीतील गगनबावडा घाट रस्ता दुरुस्तीच्या कामाची आमदार वैभव नाईक यांच्याकडून पाहणी

तळकोकणातुन कोल्हापूरला जोडणाऱ्या गगनबावडा घाट रस्त्याच्या दुरुस्तीच काम सध्या घाटात सुरू आहे. या कामाचे आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. हा रस्ता सुस्थितीत झाल्यास कोकणातील ऊस उत्पादक शेतकऱ्याचा ऊस वाहतूकीचा प्रश्न सुटणार आहे. गगनबावडा घाट आणि करूळ घाट पूर्णपणे खड्डेमय असल्याने कोकणातील ऊस तोडणी लांबणीवर गेली त्यामुळे गगनबावडा घाट रस्ता सुस्थितीत होत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि कोकणातुन घाटमाथ्यावर जाणाऱ्या चालकांना दिलासादायक बाब आहे.

मोदींनी घेतलेल्या मोठमोठ्या रॅलीमुळे कोरोना पसरला नाही का? प्रियंका गांधींचा सवाल

मोदींनी घेतलेल्या मोठमोठ्या रॅलीमुळे कोरोना पसरला नाही का? प्रियंका गांधींचा सवाल

पंतप्रधान मोदी यांच्या टीकेनंतर नाना पटोलेंकडून पलटवार

देशात कोरोना पसरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत बोलताना केली. यावर नाना पटोले यांनी पलटवार करत, 'स्वत:चं अपयश झाकण्याकरता काँग्रेसवर खापर फोडत आहेत. तसंच काँग्रेसनं माणूसकीचं नातं जपलं, लोकांकडे पैसे नव्हते. उलट काँग्रेसनं मदत केली म्हणून शाबासकी दिली पाहिजे. असंही ते म्हणाले आहेत. 

स्वयंपाक बनवण्यास उशीर झाला म्हणून पत्नीला डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न; महिला 40 टक्के भाजली

पत्नीकडून स्वयंपाक बनवण्यासाठी उशीर झाला म्हणून पतीने तिच्या अंगावर डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पिंपरी चिंचवडमधील ही धक्कादायक घटना समोर आली. नेहरूनगरमध्ये हा प्रकार 5 फेब्रुवारीच्या दुपारी घडली. या प्रकरणी पती बाळू उर्फ राहुल पारधे विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. राहुल पारधे हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असे. त्यातच 5 फेब्रुवारी ला राहुलच्या पत्नीने स्वयंपाक करण्यास उशीर केल्याचं कारण मिळालं. यातूनच त्याने डिझेल ओतून स्वतःच्या पत्नीला पेटवून दिले. यातत पीडित महिला ही 35 ते 40 टक्के भाजली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राहुल पारधे याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

देशभरात कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार – पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

देशभरात कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार – पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

भारताने कोरोनाच्या संकटावर मात केली - नरेंद्र मोदी

भारताने कोरोनाच्या संकटावर मात केली आहे. पण कोरोना महामारीमध्येही विरोधकांनी राजकारण केलं. - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

पराभवानंतरही काँग्रेसचा अहंकार जात नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 पराभवानंतरही काँग्रेसचा अहंकार जात नाही, यूपी, बिहारमध्ये काँग्रेसला मत नाहीत. गोव्यात पुन्हा सत्ता मिळाली नाही. मतदार काँग्रेसला नाकारत आहेत. विरोधक 2014 च्या मानसिकतेतून बाहेर आलेले नाहीत. उपदेश देताना काँग्रेस सत्तेतील 50 वर्ष विसरते.  - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह

गरीबदेखील लखपती झाला आहे.  - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पीएम आवास योजनेमुळे गरीबांना घरं मिळाली. घरं मिळाल्यामुळे गरीबदेखील लखपती झाला आहे.  - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पीएम आवास योजनेमुळे गरीबांना घरे मिळाली - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पीएम आवास योजनेमुळे गरीबांना घरे मिळाली - पंतप्रधान नरेंद्र मोदी

गेल्या काही वर्षात पायाभूत सुविधेत भारतानं वेगाने प्रगती केली - पंतप्रधान नरेंद्र मोदी

गेल्या काही वर्षात पायाभूत सुविधेत भारतानं वेगाने प्रगती केली - पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवे संकल्प घेऊन देश पुढे जातोय - पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवे संकल्प घेऊन देश पुढे जातोय - पंतप्रधान नरेंद्र मोदी

लतादीदींच्या आवाजाने देशाला प्रेरणा मिळाली - पंतप्रधान नरेंद्र मोदी

लतादीदींच्या आवाजाने देशाला प्रेरणा मिळाली - पंतप्रधान नरेंद्र मोदी

मृत वानरावर अंत्यसंस्कार.. मंदिरासमोर भजन कीर्तन त्यानंतर पार पडले अंत्यसंस्कार 

अंबाजोगाईच्या ऐतिहासिक काळा हनुमान मंदिरासमोर दोन वानरे वडाच्या झाडावर खेळत होती.  झाडावरून एक इमारतीवर उडी घेऊन जाताना इमारती लागत ११ केव्ही च्या लाईन ला चुकन पाय लागल्याने त्याला जोरात विजेचे करंट लागले व ते खाली पडून मृत्यू पावले. दुसरे मादी वानर मृत वानराच्या मदतीला आले. एका हाताने अपंग असलेले ते वानर मृत वानराला उचलण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात लोक जमा झाले. मग भाविक जमा झाले. मृत वानराला समाधी देऊन त्यावर तुळश लावण्याचा निर्णय झाला.

कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात आमदार नितेश राणे दाखल

कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात आमदार नितेश राणे दाखल


मानेचा आणि पाठीच्या दुखण्याचा त्रास वाढल्याने सीपीआर रुग्णालयात केलं दाखल

पनवेल तालुक्यातील आपटा गावानजीक आढळला पती आणि पत्नीचा मृतदेह

पनवेल तालुक्यातील आपटा गावानजीक आढळला पती आणि पत्नीचा मृतदेह...  आपटा रेल्वे स्थानकाच्या नदीपात्रात आढळले मृतदेह.. योगेश जगताप  आणि पत्नी रचना यांचे मृतदेह सापडले. 

संतोष परब हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणेंचे जवळचे सहकारी संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला

सिंधुदुर्ग : संतोष परब हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणेंचे जवळचे सहकारी आणि संतोष परब प्रकरणातील संशयीत आरोपी संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा सुप्रीम कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला. ट्रायल कोर्टात जाण्यासाठी 10 दिवसांची मुदत

शिवाजी पार्कवरुन लता मंगेशकर यांच्या अस्थी घेऊन आदिनाथ मंगेशकर प्रभूकुंजवर दाखल

#BREAKING : शिवाजी पार्कवरुन लता मंगेशकर यांच्या अस्थी घेऊन आदिनाथ मंगेशकर प्रभूकुंजवर दाखल; परिवाराशी चर्चा केल्यानंतर अस्थीविसर्जनाचा निर्णय होणार https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-marathi-news-breaking-news-live-updates-7-february-2022-today-marathi-headlines-maharashtra-political-news-mumbai-news-national-politics-news-1031216

पुण्यात निर्घृण खून; शीर, हात, पाय छाटलेला मृतदेह भीमा नदीच्या किनाऱ्यावर सापडला
पुण्यातील लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीत निर्घृण खुनाचा हा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात पिंपरी सांडस येथील भीमा नदीच्या किनाऱ्यावर दोन्ही हात कोपरापासून, दोन्ही पाय गुडघ्यापासून आणि शील कापलेला मृतदेह सापडला आहे. या संपूर्ण प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. संतोष उर्फ पोपट तुकाराम गायकवाड (वय 45) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मासेमारीचा व्यवसाय करणारे संतोष हे मंगळवारी भवरपूर येथून बहिणीला भेटण्यासाठी निघाला होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला. मागील अनेक वर्षापासून संतोष हे भीमा व मुळा मुठा नदीवर मासेमारीचा व्यवसाय करत होते. दरम्यान अशाप्रकारे निर्घृण खून करण्यात आल्यानंतर संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अद्यापही संपूर्ण मृतदेह सापडला नाही. मृतदेहाचे दोन्ही पाय आणि एक हात गायब असल्याने पोलीसही चांगलीच चक्रावले आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. या गुन्ह्याचा तपास आता पुणे गुन्हे शाखा पोलीस देखील करत आहे. मात्र आतापर्यंत पोलिसांच्या हाती काहीही लागलेलं नाही.
औरंगाबाद शहरात लावण्यात आलेल्या बॅनरवरून राजकीय वातावरण चांगलेच पेटण्याची शक्यता

एमआयआयकडून औरंगाबाद शहरात लावण्यात आलेल्या बॅनरवरून राजकीय वातावरण चांगलेच पेटण्याची शक्यता आहे, कारण एमआयएमकडून पंतप्रधान मोदींच्या घरकुल योजनेच्याबाबत लावण्यात आलेले बॅनर मध्यरात्रीच्या सुमारास महानगरपालिकेने काढून घेतले आहेत, त्यामुळे आता एमआयएम यावरून आणखीच आक्रमक होण्याची शक्यता आहे

गावंडाला गावच्या महिला सरपंच व त्यांच्या पतीचा MSRDC कार्यालयावर चढून आत्मदहनाचा प्रयत्न

 गावंडाला गावच्या महिला सरपंच व त्यांच्या पतीचा MSRDC कार्यालयावर चढून आत्मदहनाचा प्रयत्न.  पंढरपूर शेगाव मार्गावर येणाऱ्या गावंढाला गावाची पाण्याची पाईपलाईन ठेकेदाराने रस्ता कामा दरम्यान फोडल्याने आंदोलन. गेल्या दोन वर्षांपासून या गावची फुटलेली पाईपलाईन ठेकेदाराने दुरुस्त न केल्याने गावात निर्माण झाला पाणी प्रश्न. पाणी प्रश्न निर्माण झाल्याने सरपंच पती पत्नीने घेतला आत्मदहनाचा निर्णय.  सध्याही पती पत्नी MSRDC मेहकर येथील कार्यालयाच्या टेरेसवर पेट्रोल घेऊन आहेत.पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.


लतादीदी देशाचा अनमोल ठेवा, जागतिक स्तरावर नोंद घेतली जाईल असं स्मारक करु : संजय राऊत

लतादीदी या देशाचा अनमोल ठेवा होत्या. त्यांच्या स्मारकावरुन राजकारण करु नका. दीदी आपल्या आहेत, देशाच्या, जगाच्या आहेत. जागतिक स्तरावर नोंद घेतली जाईल अशा प्रकारचे त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे स्मारक महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार करेल असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

गुहागर-विजापूर हायवेवरील विटा शहराजवळ रास्ता रोको आंदोलन, हायवेरील दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प

सांगली : गुहागर-विजापूर हायवेवरील विटा शहराजवळ रास्ता रोको आंदोलन, हायवेरील दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प, तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा , हायवेवरील शाळा,  रहदारीच्या ठिकाणी रुलिंग पट्टे मारावेत आणि काही ठिकाणी गतिरोधक बसवावेत या मागणीसाठी रास्ता रोको केला , विटा शहरातील काही सामाजिक संघटनांनी केला रास्ता रोको

सेन्सेक्समध्ये 200 अंकांची घसरण, तर निफ्टी 62 अंकांनी खाली, बाजारात मोठी अस्थिरता

सेन्सेक्समध्ये २०० अंकांची घसरण, तर निफ्टी ६२ अंकांनी खाली, बाजारात मोठी अस्थिरता, बाजार उघडल्यावर एकवेळ सेन्सेक्समध्ये ३०० अंकांची घसरगुंडी


मेटल क्षेत्रात तेजी, मात्र आॅटो आणि फाॅर्माच्या स्टाॅक्समध्ये घसरण


*डाॅ रेड्डीज लेबाॅरटरीजच्या स्पुटनिक लाइट लसीला डीजीसीआयनं मंजुरी दिल्यानंतरही गुंतवणूकरादांकडून सुरुवातीला फार्मा कंपन्यांच्या स्टाॅकमध्ये गुंतवणूक करण्यासंबंधी निरुत्साह *


*आरबीआय धोरण निर्णय आणि कंपन्यांचे तिमाही निकाल, रुपयात होत असलेले चढ-उतार, ब्रेंट क्रूड आॅइलच्या किंमतीत होत असलेली वाढ आणि परदेशी गुंतवणूकदार यासारख्या देशांतर्गत घटकांमुळे भारतीय बाजार या आठवड्यात मोठे चढ-उतार होण्याची शक्यता *


जागतिक बाजाराचेही भारतीय बाजारपेठेवर परिणाम, आशियाई बाजारपेठ ‘लाल’फितीत, तर कच्च्या तेलाच्या भावातही सातत्यानं वाढ

मुंबईतील सततच्या हवा गुणवत्ता निर्देशांक खालावण्याचं कारण वातावरणीय बदल?

  • पश्चिम भारतातील एअर क्वालिटीची गुणवत्ता ही या हिवाळ्यात असामान्य परिस्थितीत

  • मागील 15 दिवसात दुसऱ्यांदा थार वाळवंट म्हणजे राजस्थान, अफगानिस्तान आणि पाकिस्तान सीमेवरुन धुळीच्या वादळाची निर्मिती

  • हिवाळा आहे, थंडीची परिस्थिती आणि पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे एक ट्रफ तयार होतोय आणि त्यामुळे हे धुळीचे वादळ गुजरात आणि मुंबईच्या वातावरणात बघायला मिळत आहे 

  • 4 फेब्रुवारीपासून मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील एअर क्वालिटी अति खराब श्रेणीत, आज देखील एअर क्वालिटी अति खराब स्थितीत मात्र 8 फेब्रुवारीपासून हवेची गुणवत्ता सुधारणार 

  • हिवाळ्यात साधारण अशी परिस्थिती बघायला मिळत नसते. एअर क्वालिटी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील साधारण माॅडरेट राहात असते, मात्र आता ती ‘अति खराब’ श्रेणीत 

  • शास्त्रज्ञांकडून मुंबईतील हिवाळ्यातील वातावरणीय बदलांसंदर्भात अभ्यास सुरु

  • एक्सट्रीम प्रदूषण इव्हेंट्स असतात, हिवाळ्यात येत असलेले हे धुळीच्या कणांचे वादळ म्हणजे असामान्य परिस्थिती आहे. त्यामुळे क्लायमेट चेंजचा हा प्रभाव असल्याचं शास्रज्ञांचं मत आहे. 

  • मुंबईचा एकूण एक्यूआय - 316, माझगाव - 426, कुलाबा - 348, मालाड - 346

शेअर बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये 300 अंकांनी घसरण, तर निफ्टी 76 अंकांनी खाली

के के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचं निधन..

नाशिकच्या के.के.वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देवराम वाघ ऊर्फ भाऊ यांचे रविवार दि. 6 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वयाच्या 90  व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार असून अंत्यदर्शन दुपारी 12 ते 3 या वेळेत घेता येणार आहे. भाऊ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.


बाळासाहेब वाघ यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मेंढी ह्या छोट्याशा गावी झाला होता. त्यांना लहानपणापासून कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ.पंजाबराव देशमुख, कर्मवीर रावसाहेब थोरात,  कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, क्रांतिसिंह नाना पाटील, कुसुमाग्रज व आजोबा सयाजीबाबा वाघ अशा थोर व्यक्तींचा सहवास लाभला.

सिंधुदुर्ग : कोकणातील दशावतारातील लोकराजा सुधीर कलिंगण यांचे आज पहाटे निधन, दशावतार लोककलेवर शोककळा

सिंधुदुर्ग : कोकणातील दशावतारातील लोकराजा सुधीर कलिंगण यांचे आज पहाटे निधन


दशावतार लोककलेवर शोककळा
 
गोवा येथे खाजगी रुग्णालयात घेत होते उपचार


पहाटे दोनच्या सुमारास झाले निधन


सुधीर कलिंगण यांच्या जाण्याने दशावतार लोककलेची मोठी हानी


सुप्रसिद्ध दशावतार बाबी कलिंगण यांचे सुपुत्र सुधीर कलिंगण काळाच्या पडद्याआड

शेगाव शहर पोलीस स्टेशनवर अज्ञात समाजकंटकांचा हल्ला

शेगाव शहर पोलीस स्टेशनवर अज्ञात समाजकंटकांचा हल्ला


हल्ल्यात शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात सामानाची व फर्निचरची तोडफोड.


मध्यरात्री पोलीस स्टेशनच्या हद्दीत विश्वनाथ नगरमध्ये डीजे सुरू असताना पोलिसांनी मज्जाव केल्यानंतर हल्ला.


अज्ञात 8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल, पोलीस सध्या माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.


पोलीस स्टेशनमधील फर्निचर व काचांची तोडफोड.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


आज राज्यात सार्वजनिक सुट्टी मात्र शेअर मार्केट सुरु राहणार
 
मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे रविवारी निधन झाले. काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. अर्थात सार्वजनिक सुट्टी असली तरी  आज बीएससी म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सुरु राहणार आहे अशी माहिती BSCकडून देण्यात आली आहे. 


भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार सात फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की,  रविवार 6 फेब्रुवारी 2022 रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 ( सन 1981चाअधिनियम 26 ) च्या कलम 25 खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक सात फेब्रुवारी  रोजी राज्यात  दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, असं शासनानं म्हटलं आहे.


आज राज्यात सार्वजनिक सुट्टी; म्हाडा सरळसेवा भरती परीक्षा होणार, वेळापत्रकात बदल नाही


Mhada Exam : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) सरळसेवा भरतीअंतर्गत  अतांत्रिक पदासाठी सोमवार, दि. ०७ फेब्रुवारी, २०२२ रोजी आयोजित परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे. 'म्हाडा'चे सचिव राजकुमार सागर यांनी ही दिली. 


म्हाडा सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत अतांत्रिक संवर्गातील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या पदांसाठी सरळसेवा भरती परीक्षा सुरू आहे. याआधी नियोजित केलेल्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा पार पडणार आहे. म्हाडा भरती परीक्षा सोमवार ७ फेब्रुवारी, २०२२ रोजी सकाळी ०९.०० वाजेपासून ते ११.०० वाजेपर्यंत, दुपारी १२.३० वाजेपासून ते २.३० वाजेपर्यंत तर दुपारी ४ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अशा तीन सत्रांत परीक्षा होणार आहे. परीक्षा वेळापत्रकात कोणताही बदल झाला नसल्याची माहिती म्हाडाने दिली असून परीक्षार्थींनी याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


म्हाडातील विविध 14 संवर्गातील 565 रिक्त पदांसाठी ही भरती परीक्षा घेण्यात येत आहे. म्हाडाच्या परीक्षेची जबाबदारी टीसीएस कंपनीवर सोपवण्यात आली आहे.  टीसीएस कंपनीला विविध परीक्षा घेण्याचा अनुभव आहे. याआधी जीए सॉफ्टवेअर कंपनीकडे परीक्षेची जबाबदारी होती. पण या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं गोपनीयतेचा भंग करून पेपर फोडण्याचा कट रचल्याचं उघडकीस आलं होतं. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.