Maharashtra Breaking News 29 July 2022 : पालघर - भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई नाका परिसरात दाखल, समर्थक आणि भाजप कडून जोरदार स्वागत
गोंदियात पुरवठा निरीक्षकाला ४ हजाराची लाच घेताना गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली असून यात आरोपी लोकसेवक पंकज शिंदे याचा समावेश आहे . तक्रार दार यांच्या वडिलांच्या नावाने लहिटोला गावात स्वस्त धान्य दुकान असून वडील वयोवृद्ध झल्याने हि दुकान स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी तक्रार दार यांनी गोंदिया अन्न पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक पंकज शिंदे याच्याशी संपर्क साधला असता दुकान नावावर करून घेण्यासानाठी पाच हजार रुपयाची मागणी केली असता तक्रार दार याना लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली असून आरोपी लोकसेवक शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रुपयांची मागणी केली असता तळजोळी अंती ४ हजार रुपयांचे देणे ठरले असता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकऱ्यानी सापळा रचत पंकज शिंदे यांना ४ हजार रुपयाची लाच घेताना अटक केली असून ऱ्यांच्या विरुद्ध गोंदिया शहर पोलिश ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्या अन्नवे गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
पालघर मनोर रोडवरील सेंट जॉन कॉलेज जवळ ट्रक बाईक आणि उभ्या असलेल्या कारचा भीषण अपघात,,दोघांचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी,,,मृतामध्ये एका चार वर्षीय चिमुकलीचा समावेश,,वडीलासह चिमुकलीचा मृत्यू,,,ट्रक चालकाने बाईकला जोरदार धडक दिल्याने झाला भीषण अपघात,,,पालघर पोलीस घटनास्थळी दाखल,,जखमींना उपचार करिता पालघर ग्रामीण रुग्णालयात हलविले,,ट्रक चालक दारूच्या नशेत असल्याची पोलिसांची माहिती.
मंकीपॅाक्सचे राज्यातील सर्व दहा संशयित निगेटिव आले आहेत. दहा संशयित रुग्णांची सँपल एन आय व्ही. पुणे यांना पाठविण्यात आली आहेत. हे सर्व नमुने निगेटिव्ह आले आहेत. एन. आय व्ही. पुण्यासह मंकी पॉक्स निदानाची सोय आता राज्यातील आणखी दोन प्रयोगशाळा मध्ये उपलब्ध होणरा आहे. यात मुंबईतील कस्तुरबा रुग्णालय मध्यवर्ती प्रयोगशाळा आणि नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचा समावेश आहे.
नागपूरः जिल्ह्यात दररोज दोनशेच्यावर रुग्णसंख्या आढळून येण्याची मालिका शुक्रवारीही कायम असून प्राप्त अहवालानुसार 215 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. तसेच 217 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. त्यासोबतच एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात 76 कोरोना बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 1586 बाधित गृहविलगीकरणात आहेत. शुक्रवारी जिल्ह्यात 1768 आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या.
येरमाळा जवळील मलकापूरचे स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ सुभाष लोमटे महाराज यांच्यावर विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला मलकापूर येथील मठात दर्शनासाठी गेली असता महाराजांनी विनयभंग केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेला प्रसादाच्या पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला असून त्याची क्लिप माझ्याकडे असल्याचे धमकावत विनयभंग केल्याचा पीडित महिलेचा आरोप आहे. महिलेच्या तक्रारीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराजवर या अगोदर ही अनेक फसवणूकीच्या , भोंदूगिरीच्या तक्रारी आहेत. राजकिय वरदहस्त असल्याने महाराज अनेकदा चर्चेत आले आहेत.
जालना येथे शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांच आगमन झाले यावेळी समर्थकांनी त्यांच्या घरी मोठी करत आतिषबाजी करून त्यांचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी आपण सर्व आपले कार्यकर्ते आणि आणि कुटुंबाशी बोलून अंतिम निर्णय घेणार असल्याच स्पष्ट करत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
माझ्यासारख्या चाळीस वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यावरती अशा पद्धतीने बोलण्याची पाळी येते हीच माझ्यासाठी अत्यंत दुःख देणारी बाब आहे ही माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी बाब आहे गेली पाच दिवस मी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा आहे.. काय होणार काय नाही होणारय सारखे प्रश्न मला या ठिकाणी विचारले जात आहेत या सर्व प्रश्नाचे उत्तर मी एकच दिले असून मी माझ्या गावात जाऊन आपल्याशी परिवाराशी बोलून हा निर्णय करेल.
सप्टेंबर 2020 चा अध्यादेश हायकोर्टाकडून रद्द करण्यात आल्यामुळे मराठा समाजाच्या तरूणांची हायकोर्टाकडून निराशा करण्यात आल्याच्या भावना तरूणांमधून व्यक्त होत आहेत.
सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर उमेदवारांना इडब्ल्यूएस प्रवर्गाच्या दहा टक्के आरक्षणात सामावून घेत महावितरणच्या नोकर भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची मुभा दिली होती. मात्र याला इडब्ल्यूएस प्रवर्गातील अनेक उमेदवारांनी याचिकांद्वारे आव्हान दिलं होतं.
या याचिका मान्य करत हायकोर्टानं हा जीआर रद्द ठरवल्यानं मराठा तरूणांच्या पदरी पुन्हा निराशाच आली आहे.
रेल्वेची सुमारे 45 एकर जागा हस्तांतरित न झाल्याने रखडलेल्या धारावी पुनर्विकासाला आता गती मिळणार आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी दिलेल्या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत, महिन्याभरात रेल्वेची जागा राज्य सरकारला हस्तांतरित करण्याची ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावतीने देण्यात आली आहे. या प्रकरणी पाठपुरावा करणाऱ्या खासदार शेवाळे यांनी ही माहिती दिली आहे.
बीड जिल्ह्यात अवैध गर्भपात प्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाने आता ठोस पावलं उचलली आहेत. आरोग्य विभागाचे संचालक यांनी राज्यातील सर्वच गर्भपात केंद्र आणि सोनोग्राफी सेंटर यांच्या तपासण्या करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता बीड जिल्ह्यात देखील अवैध गर्भपात रोखण्यासाठी सर्वच गर्भपात केंद्र आणि सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यात येणार आहे. बीड आणि परळीमध्ये उघडकीस आलेल्या गर्भपात प्रकरणांमध्ये पोर्टेबल गर्भलिंग निदान मशीनचा वापर करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली होती. त्यामुळे असं गैर कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बीडचे जिल्हा शालेय चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातून तिरुपती येथे बालाजीला दर्शनासाठी गेलेल्या भक्तांच्या गाडीमधील शिवाजी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती हटवण्याची सक्ती तिरुपती येथे मंदिर संस्थांमधील काही कर्मचारी आणि खाजगी व्यक्तींनी केली होती, हे लक्षात येताच आमदार बांगर चांगले संतापले. मतदार संघातील एका कार्यकर्त्यांनी फोन करून या संबंधित माहिती विचारायचा प्रयत्न केला असता बांगर चांगलेच संतापले जर त्यांनी ती सक्ती लागू केली असेल तर आंध्र प्रदेश मधील ज्या गाड्या महाराष्ट्रातून जातात त्या गाड्यांचा चुराडा करू, असे आमदार बांगर बोलले आहेत.
या संदर्भात तेथील मुख्यमंत्र्यांशी साहेब बोलतील जर त्यांनी ऐकलं नाही तर पुढील आठ दिवसांमध्ये तिकडच्या ज्या गाड्या महाराष्ट्रात येतील त्या गाड्यांचा चुराडा करून आणि मंग पाहू की अंगार कशी लागते, अशा शब्दांमध्ये बांगर भडकल्याचे दिसून येते .
निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिला आहे. निहार ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे पुतणे आणि हर्षवर्धन पाटील यांचे जावई आहेत. निहार ठाकरे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजकीय कारकीर्द सुरु करणार आहेत.
Andheri Fire : मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागातील चित्रकुट मैदानात तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या चित्रपटाच्या सेटवरील सामानाला आग लागली आहे.
पिंपरी-चिंचवडच्या वाकडमध्ये किरकोळ कारणावरुन नऊ जणांनी मिळून एकाचा खून केला आहे. अल्पवयीन मुलासह नऊ जणांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दीपक खंडू गायकवाड असं खून झालेल्या तरुणाचं नाव असून लखन लगस हा गंभीर जखमी आहे. लगस याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आरोपी आणि मयत यांचे दोन्ही वेगवेगळे गट मुठा नदी लगत मद्यपान करत होते. तेव्हा दुसऱ्या गटातील अल्पवयीन मुलाला त्यांच्यातील एकाने सिगारेट आणि दारू आणायला सांगितली. त्यावेळी मयत दीपक याने त्याला कानशिलात लगावत दारू पिऊ नकोस तू माझ्या मित्राचा भाऊ आहे, लहान आहेस असं म्हटलं, याच कारणावरून इतर मित्रांच्या मदतीने चाकू, दगड, विटांनी मारहाण करून दीपकचा खून केला. यात लखन नावाचा तरुण गंभीर जखमी झालाय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे औरंगाबाद शहरात येताच त्यांना काळे झेंडे दाखवून विरोध दर्शवला जाणार आहे. नामांतराच्या मद्द्यासह विविध विकासाचे मुद्दे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याकडे लक्ष दिले जात नसल्याने काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत. एमआयएमचे कार्यकर्ते आणि खासदार जलील या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
मुंबईतील अंधेरी येथील फन रिपब्लिक थेटरच्या पाठीमागे असलेला चित्रकूट सेटवर मोठी आग लागलेली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
Sharad Pawar In Nashik : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार (Sharad Pawar) हे आज (दि. 29) व उद्या (30जुलै) रोजी नाशिक व धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर (Nashik and Dhule Tour) आहेत. आज त्यांचे दुपारी ओझर विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी राज्याचे माजी उपुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष माजी आमदार हेमंत टकले, आमदार दिलीप बनकर, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, अर्जुन टिळे, मनोहर बोराडे आदी उपस्थित होते.
Indapur News : इंदापूर तालुक्यातील काटी गावात ट्रक आणि बुलेटचा अपघात झाला. या अपघातात 12 वर्षीय तृप्ती कदमचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सकाळी 11 च्या दरम्यान घडली आहे.. नानासाहेब कदम हे मुलगी तृप्ती आणि मुलगा कृष्णा याला शाळेत सोडण्यासाठी रस्त्यावरून जात होते.. त्यावेळी रस्ते बांधकामासाठी वाहतूक करत असणारा खडीने भरलेला ट्रकने कदम यांच्या बुलेटला मागून धडक दिली. त्यामुळे तृप्ती कदम ही ट्रकच्या चाकाखाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांनंतर संतप्त गावकऱ्यांनी खडी वाहतूक करणारा ट्रक पेटवून दिला आहे. अपघातात कृष्णा आणि नानासाहेब कदम हे किरकोळ जखमी झाले आहेत. आरोपी विनोद महादेव जवरे वय 40 यास इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अग्निसुरक्षा समिती तीन आठवड्यांत स्थापन करा, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश, उंच रहिवासी इमारतीतील आगीच्या वाढत्या घटनांबाबत गंभीरतेनं उपाय करण्याची गरज - हायकोर्ट, समाजिक कार्यकर्ता आभा सिंह यांच्या जनहित याचिकेवर हायकोर्टाचे निर्देश
साल 2009 मध्ये जारी केलेल्या अधीसूचनेवर अद्याप अध्यादेश नसल्याबद्दल हायकोर्टाची नाराजी
मुंबई विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विदयार्थी वसतिगृहाला सावरकर यांचे नाव देण्याचे प्रकरण, छात्रभारतीनंतर आता राष्ट्रवादीदेखील नामकरणाच्या विरोधात रस्त्यावर उतरणार, उद्या सकाळी 11 वाजता मुंबई विद्यापीठात राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात येणार, ,राज्यपालांच्या सुचनेनुसार विद्यापीठाला सावकारांचे नाव दिल्याचा राष्ट्रवादीचा आरोप, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा आणि राज्यपालांचा राष्ट्रवादीकडून काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार
मुंबई विमानतळानजीक उंचीची मर्यादा न पाळणाऱ्या 48 इमारतींवर कारवाईचे हायकोर्टाकडून आदेश, गंभीर मुद्यावर राज्य सरकारच्या ढिलाईवर कोर्टाची नाराजी, 19 ऑगस्टपर्यंत कारवाईचा अहवाल सादर करा, उपनगर जिल्हाधि-यांना निर्देश यशवंत शेणॉय यांच्या याचिकेवर 22 ऑगस्टला पुन्हा होणार सुनावणी
Nashik Mahapalika Election : नाशिक महापालिकेच्या ओबीसी आरक्षण जाहीर झाले असून ओबीसी महिलासाठी अठरा जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.
महिला आरक्षण (ना.मा.प्र ओबीसी)
ओबीसी आरक्षण सोडतीतील पुढील आठ जागा महिलासाठी थेट आरक्षित करण्यात आल्या आहेत. प्रभाग 8अ, प्रभाग 15ब, प्रभाग 20ब, प्रभाग 23ब, प्रभाग 24ब, प्रभाग 25ब, प्रभाग 39ब, प्रभाग 42ब. तर उर्वरित दहा जागा या सोडतीद्वारे काढण्यात आल्या. दरम्यान प्रभाग क्र. अनुक्रमे 5, 6, 9, 10, 13, 16, 17, 18, 19, 21, 29, 30, 31, 32, 33, 36, 37, 38, 40 या 19 प्रभागांमधून दहा जागा सोडतीद्वारे काढण्यात आल्या. त्या पुढीलप्रमाणे 9अ, 33अ, 30अ, 10अ, 18अ, 19अ, 29अ, 38अ, 32अ, 21अ या प्रभागांवर महिला ओबीसी आरक्षित करण्यात आल्या आहेत.
नवी मुंबई - नवी मुंबई मनपा निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणाची सोडत जाहीर. एकूण 25 प्रभागात महिला व पुरुषांसाठी ओबीसी आरक्षण जाहीर. प्रभागातील लोकसंख्येच्या तुलनेत २०.५९ टक्के जागा ओबीसींसाठी राखीव ठेवण्यात आल्या. मात्र ओबीसी आरक्षण सोडतीला इच्छुक उमेदवारांचा अल्प प्रतिसाद. सोडत जाहीर होत असलेलले विष्णुदास भावे नाट्यगृह संपूर्ण रिकामे. वारंवार निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्याने शिंदे गटासह सर्व प्रमुख पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी आरक्षण सोडतीकडे फिरवली पाठ.
Nashik Mahapalika Election : सर्वांचे लक्ष लागून असलेल्या तसेच तब्बल दीड वर्षांपासून घोळत असलेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकांसाठी यापूर्वीच्या सोडतीत बदल करून आता ओबीसी आरक्षण सोडतसह सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.
असे आहे ओबीसी आरक्षण
नियम 6 नुसार 8अ ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी नेमून देण्यात आली आहे. तर 5 अ 6 अ, 8 अ ब, 9 अ, 10 अ, 16 अ, 17अ, 18अ, 19अ, 21अ, 29अ, 30अ, 31अ, 32अ, 33अ, 36 अ, 37अ 38 अ 40 अ या जागा थेट नेमून दिल्या आहेत. तर उर्वरित जागांमधून १४ जागांसाठी सोडत काढण्यात आली. यामध्ये 04 ब, 39 ब, 24 ब, 25 ब, 23 ब, 42 ब, 15 ब, 22 ब, 41 ब, 20 ब, 35 ब, 14 ब, 43 ब, हे प्रभाग ओबीसी जागांसाठी राखीव आरक्षित करण्यात आले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरिकांचा ओबीसी आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज मुंबई महापालिकेकरता ओबीसी आरक्षण सोडत काढण्यात येत आहे. आता एससी व एसटी प्रवर्गाचे आरक्षण वगळता यापूर्वी जाहीर करण्यात आलेले सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण रद्द करून नव्याने ओबीसी व महिला सर्वसाधारण वर्गांसाठी आरक्षण काढले जाणार आहे
मुंबई महापालिका आरक्षण सोडतीपूर्वीच भाजपचा आक्षेप, आमदार मिहीर कोटेचांचे महापालिका आयुक्तांना पत्र, गेल्या 3 निवडणुकांमधे ओबीसी आरक्षण नसलेल्या वॉर्डला नियमानुसार ओबीसी आरक्षित म्हणून घोषित करावे लागते. मात्र, या नियमाते उल्लंघन होत असल्याचा आरोप मिहीर कोटेचांनी केलाय. ओबीसी आरक्षण सोडतीत नियमांचं उल्लंघन होत असल्यास मुंबई हायकोर्टात जाण्याचा इशारा भाजपनं दिलाय
डीसी मोटर्सचे मालक दिलीप छाब्रिया यांच्या विरोधात ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधी ईडीने काल मुंबई आणि पुण्यातील सुमारे सहा ठिकाणी छापे टाकले. मुंबई पोलिसांच्या CIU युनिट आणि EOWने छाब्रिया यांच्यावर नोंदवलेल्या खटल्यांच्या आधारे मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पार्श्वभूमी
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
29th July 2022 Important Events : जून महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. आज 29 जुलै. म्हणजेच भारतीय हिंदू पंचांगानुसार वर्षातला पाचवा महिना. आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. विविध सण, व्रतवैकल्ये आणि उत्सवाच्या या महिन्यात सगळीकडे आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 29 जुलैचे दिनविशेष.
29 जुलै : श्रावण मासारंभ
भारतीय हिंदू पंचांगानुसार वर्षातला पाचव्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाल्याचे सांगितले जाते. शुक्रवार, 29 जुलै 2022 रोजी श्रावण मासारंभ आहे. श्रावणामध्ये दिवसभर हा ऊन-पावसाचा खेळ चालू असतो. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा, सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे.
29 जुलै : International Tiger Day
जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी 29 जुलै रोजी जगभर साजरा केला जातो. 29 जुलै 2010 रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला. दरवर्षी 29 जुलै रोजी वाघ संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. वाघांच्या नैसर्गिक निवासस्थानाचे संरक्षण करण्यासाठी जागतिक यंत्रणेला चालना देणे आणि व्याघ्र संवर्धनासाठी जनजागृती करणे हे प्राथमिक लक्ष्य आहे. शिकार आणि बेकायदेशीर व्यापार तसेच अधिवास गमावल्यामुळे वाघांची संख्या सातत्याने कमी होत आहे. मानवी गरजांसाठी जंगलांची तोडणी कमीत कमी केल्यास जंगलांची बचत होईल ज्यामुळे वाघांच्या नैसर्गिक अधिवासात बचत होईल. म्हणूनच जागरूकता वाढवून आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय व्याघ्रदिन साजरा केला जातो.
1987 : भारताचे पंतप्रधान राजीव गांधी व श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जे. आर. जयवर्धने यांनी भारत-श्रीलंका शांतता करारावर सह्या केल्या.
1904 : साली भारतातील सर्वोच्च पदक भारतरत्न पुरस्कार विजेता आणि पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय उद्योगपती व वैमानिक,तसचं, भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा उर्फ जे. आर. डी. टाटा यांचा जन्मदिन.
2002 : साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित महाराष्ट्रीयन मराठी सुगम संगीताचे प्रतिक म्हणून आपली ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट गायक-संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचे निधन.
महत्वाच्या बातम्या :
- 28th July 2022 Important Events : 28 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
- Important Days in July : जुलै महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
- Important Days in August : ऑगस्ट महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -