Maharashtra Breaking News LIVE Updates : गौणखनिजाचं अवैध उत्खनन केल्याप्रकरणी पुण्याच्या कंपनीला 10 कोटी 80 लाखांचा दंड
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Bhandara News Update : भंडाराऱ्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना पवनी पोलिसांनी अटक केली आहे. उमरेड तालुक्याच्या दि मर्सी हॉटेलमधून या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात गौणखनिजाचं अवैध उत्खनन केल्याप्रकरणी पुण्याच्या पाटील कंस्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला 10 कोटी 80 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कोरपना तहसीलदारांनी भाजप पदाधिकारी असलेल्या मनोज पोतराजे यांच्या तक्रारीवर ही कारवाई केली आहे. पडोली ते वनसडी या रस्त्याच्या बांधकामासाठी कंपनीला 1 हजार ब्रास दगड आणि मुरूम उत्खनन करण्याची परवानगी मिळाली होती. मात्र, कंपनीने कोरपना तालुक्यातील वनोजा परिसरात मोठ्या प्रमाणात चुनखडीचे उत्खनन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. तहसीलदारांनी मौका चौकशी करून कंपनीला हा दंड ठोठावला आहे.
मुख्यमंत्र्यांनी नेहमीच योग्य निर्णय घेतले आहेत, असे मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे. मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानतंर बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
Samruddhi Mahamarg : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर घडलेल्या दुर्घटनेमुळे 2 मे ला होणारं उद्घाटन पुढे ढकलण्यात आलं आहे. परिस्थितीचा आढावा घेता आणखी दीड महिना तरी हा महामार्ग सुरु करता येणार नाही.
महामार्ग पॅकेज क्रमांक सात मध्ये क्रेनच्या साहाय्याने काँक्रीट गर्डर पुलालावर ठेवण्याचं काम सुरू होतं. क्रेनच्या साहाय्याने गरड वर उचलताना साधारणपणे दहा फूट उंच उचलल्यानंतर जॅक स्लिप झाल्यामुळे गरड खाली जमिनीवर कोसळलं. तर दोन दिवसांपूर्वी वन्यजीव उन्नत मार्गाचे काम सुरू असताना येथील काम 30 एप्रिलपर्यंत अंतिम टप्प्यात असताना एकशे पाच पैकी काही ट्रीपला अपघात झाला. त्यामुळे सुपरस्ट्रक्चर बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम दीड महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होईल. त्यामुळे दीड महिना तरी वाहतुकीसाठी हा मार्ग खुला करता येणार नाही.
Raj Thackeray : उत्तर प्रदेशमधील धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे. याआधीही यूपीतील कामांबद्दल राज यांच्याकडून योगींचं कौतुक करण्यात आलं होतं.
Buldhana News Update : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विध्यार्थ्याचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला आहे. तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. शैलेश राठोड असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे तर नवनाथ जमडे असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. शैलेश आणि नवनाथ हे पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर ट्रकने दोघांना उडवले. यात शैलेशचा मृत्यू झाला.
राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत मशिंदींवरील भोंगे खाली उतरवण्याचा अल्टिमेटम दिल्यानंतर आता पोलिसांकडून मनसेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नोटीसा पाठण्यात येत आहेत.
शरद पवारांच्यावतीनं कोरेगाव भीमा चौकशी आयोगापुढे अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर
ब्रिटीशकालीन कायद्यातील आयपीसी कलम 124 (अ) चा पुनर्विचारा व्हायला हवा, शरद पवार यांच्यावतीनं जे.एन. पटेल आयोगाला विनंती
राजद्रोहाच्या कलमाचा वापर सरकारविरोधात बोलणा-या लोकांवर करण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढू लागलाय
मुळात देशहितासाठी आयपीसी आणि युएपीए कायद्यातील अन्य तरतूदी पुरेश्या असताना 124(अ) च्या गरजेची गरज आहे का?, याचा विचार करायला हवा
त्याचसोबत सीआरपीसी आणि आयटी कायद्यातील काही तरतूदींमध्येही सुधारणेची गरज - शरद पवार
आयटीचा कायदाही दोन दशकांपूर्वी तयार केलाय, त्यातही सुधारणेची गरज - शरद पवार
देशातील जागरूक मीडियानंही दंगलसदृश्य परिस्थिती टाळण्यासाठी आपल्या अधिकारांचा योग्य वापर करायला हवा - शरद पवार
विदर्भात ३० एप्रिल ते २ मे पर्यंत तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता, ऑरेंज अलर्ट जारी, भारतीय हवामान विभागाची माहिती
आज आणि उद्या देखील विदर्भात उष्णतेची लाट
विदर्भातील अनेक ठिकाणांवरील तापमान सरासरी ४३ ते ४५ अंश सेल्सिअसवर
नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन
Nagpur Fire News : नागपुरातील हुडकेश्वर परिसरातील घटना., भीषण आगीत प्लास्टिक वस्तूचे दुकान जळून खाक.. शेजाऱ्याचे पाच एअर कंडीशनरही जळाले...
हुडकेशवर परिसरात दोन घरांच्या मध्ये असलेल्या रिकाम्या प्लॉट वर लावलेल्या घर संसार या प्लास्टिक वस्तूच्या दुकानाला आग लागून सर्व साहित्य जळून खाक झालंय...
विशेष म्हणजे रिकाम्या प्लॉटवर अस्थाई शेड उभारून हे दुकान सुरू होते...
या आगीमध्ये घर संसार या दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झालं असून शेजारील घराचे पाच एअरकंडिशनर ही जळून खाक झाले आहेत...
सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही... अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविले आहे....
Pune News Updates : एसटीचा ब्रेक फेल , पाच ते सात गाड्यांना दिली धडक, अपघातात तीन जण जखमी,जखमींना भारती हॉस्पिटलमध्ये केलं भरती, सातारा रस्त्यावर हॉटेल रविकांत जवळ अपघात. घटनास्थळी वाहतूक पोलीस व भारती विद्यापीठ पोलीस दाखल.
अनेक दिवसांपासून बंद असलेली पोलीसांची घर बांधणी अग्रिम योजना पुन्हा सुरू होणार?
त्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय महाविकास आघाडी सरकार बदलणार
आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत होणार निर्णय
मागील सरकारने २०१७ मध्ये ही योजना बंद करून खाजगी एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक कडे ही कर्ज योजना दिली होती
ही योजना बदलल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना बँकेकडे जाण्याची गरज पडणार नाही तर राज्य सरकार घर बांधणी अग्रिम योजनेतून थेट पैसे देणार
या योजनेमुळे राज्य सरकारचे वर्षाला 36 कोटी रुपये वाचणार
दरवर्षी राज्य सरकारला 36 कोटी रुपये अधिकचे बँकांना मोजावे लागत होते
बँकाच्या हितासाठी निर्णय घेत असल्याची टीका त्यावेळी फडणविस सरकार वरती करण्यात आली होती
किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांना हायकोर्टाचा दिलासा कायम
दोघांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी 14 जूनपर्यंत तहकूब
तोपर्यंत अटकेपासूनचा दिलासा कायम
पावसाळ्यात निवडणुका घेणे अवघड असल्याचं राज्य निवडणूक आयोगाचं प्रतिज्ञापत्र
सुप्रीम कोर्टात राज्य निवडणूक आयोगाने सादर केलं प्रतिज्ञापत्र
4 मेच्या सुनावणी मध्ये निर्णय होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील वादळी वारा आणि पाऊस पाहाता कोणतीच निवडणूक यावेळी योग्य नसल्याची निवडणूक आयोगाची भूमिका
त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता
Beed News Updates : परळी तालुक्यातील एका गावात विवाहितेवर सामूहिक बलात्कार
परळी तालुक्यातील एका गावामध्ये, शेतात काम करत असणाऱ्या २२ वर्षीय विवाहितेवर, २ नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेने एकचं खळबळ उडाली आहे. पीडित महिला ही शेतात आपल्या कुटुंबासोबत राहत होती.
काल पीडिता आपल्या शेतातील घराजवळ असलेल्या शेतात काम करत होती. यादरम्यान अंगद केशव भदाडे (वय-४०) रा. मिरवट व साजन तिडके (वय-३०) रा. भोगलवाडी, या नराधम आरोपींनी पीडिता एकटी असल्याचा फायदा घेत, तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तर याविषयी कोणाला सांगितलं तर तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे मारू अशी धमकी देखील दिली.याप्रकरणी २२ वर्षीय पीडितेच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपिंविरोधात ३७६ (ड), ३२३, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना परळी ग्रामीण पोलिसांनी अटक केली.
पुणे : अद्याप मनसेच्या औरंगाबाद सभेला परवानगी मिळाली नसली तरी सुद्धा मनसेच्या कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी सुरु
औरंगाबाद सभेसाठी राज ठाकरेंचे हिंदूजननायक नावाचे बँनर पुण्यात पाहायला मिळतायत
पुण्यातील नीलायम टॉकीज जवळ मनसे ने लावलेल्या चलो छ्त्रपती संभाजीनगर फ्लकेस ची शहरात सर्वत्र चर्चा
हिंदू की बात करेगा वही देश पे राज करेगा अशा घोषणा लिहलेला फ्लेक्स उभा
औरंगाबाद सभेसाठी पुण्यातून हजारो मनसे चे कार्यकर्ते जाणार असल्याची चर्चा
मनसे अध्यक्ष औरंगाबाद कडे जाण्यापूर्वी पुणे दौरा करणार असल्याची शक्यता मनसे नेते यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे
मध्यप्रदेशातील कान्हा नॅशनल पार्क मध्ये घडलेल्या दोन वाघांच्या द्वंद्वाचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.. कान्हा नॅशनल पार्कच्या "मुक्की" झोनमध्ये दोन वाघांच्या लढाईचा हा व्हिडिओ आहे.. नीलानाला आणि बॉईनदाबारा असे लढाई करत असलेल्या दोन नर वाघांचे नाव आहे.. आता या भीषण लढाईचे कारण ही तेवढेच खास आहे.. कान्हा नॅशनल पार्क मधील एका युवा वाघिणीचे मन जिंकण्यासाठी नीलानाला आणि बॉईनदाबारा हे नर वाघ एकमेकाशी भिडले होते.. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेच्या वेळेला काही पर्यटक तिथे होते... त्यांनी सर्व घटनाक्रम चित्रीत केले असून तोच व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे... दरम्यान, दोन्ही वाघांमध्ये युद्ध सुरू असताना ज्या वाघिणीसाठी ही लढाई झाली ती जिलालाईन वाघीण ही तिथेच फिरत होती... दोघांमध्ये सुरू असलेले भीषण युद्ध पाहून ती हळूच तिथून निघून गेली...
भाजप नेते किरीट सोमय्या हायकोर्टात दाखल
किरीट आणि नील सोमय्यांच्या अटकपूर्व जामीनावर थोड्याच वेळात सुनावणी अपेक्षित
विक्रांत बचाव मदतनिधीत घोटाळा केल्याचा सोमय्यांवर आरोप
रत्नागिरी जिल्हातील दापोली तालुक्यातील पाळंदे किनारी तटरक्षक दलाची हावर क्राफ्ट दाखल झाली आहे. पाणी आणि जमीन अर्थात किनाऱ्यावर देखील चालणारी ही बोट तांत्रिक बिघाडामुळे ही बोट समुद्रकिनाऱ्यावर आणण्यात आली असल्याचे प्राथमिक माहिती आहे. मात्र अचानक वेगळीच बोट समुद्र किनाऱ्यावर आल्याने लोकांमध्ये कुतूहल देखील निर्माण झाले आहे. यावेळी अनेकांनी फोटो आणि व्हिडीओ काढण्याचा मोह देखील आवरला नाही.
Nashik News : माजी पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांचा भोंग्याबाबतचा मनाई आदेश नवे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी रद्द केला. भोंग्याबाबत शहरातील सर्व परिस्थिती विचारात घेता स्वतंत्र आदेशाची गरज नसल्याचं नव्या पोलिस आयुक्तांचं मत आहे. भोंग्याबाबत महाराष्ट्र शासन जो निर्णय घेईल त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. 17 एप्रिलला दीपक पांडेय यांनी भोंग्याबाबत मनाई आदेश केला होता जारी
औरंगाबाद : कृषी अधीक्षक कार्यालयाला आग, शहरातील कृषी कार्यालयाला आज सकाळी अचानक लागली आग...
आगीचे कारण अस्पष्ट..
अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे काम सुरू...
पोलीस घटनास्थळी दाखल....
राष्ट्रवादी काँग्रेसचा "लाव रे तो ऑडिओ" अभिनव आंदोलन... पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरासंदर्भात नागपूरच्या शंकर नगर चौकावर भोंगे लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या भाषणातले "पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले की नाही झाले" असे ऑडिओ लाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत... कालच पंतप्रधानांनी राज्यसरकारने व्हॅट कमी केल्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचे दर जास्त असल्याचा आरोप केला होता...त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस ने पंतप्रधानांचे जुने ऑडिओ लावत नागपुरात आगळे वेगळे आंदोलन सुरू केले आहे...
चंद्रपूर : घरात घुसून वाघाने केलेल्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू ... सिंदेवाही तालुक्यातील चिकमारा गावातील घटना, तुळसाबाई परसराम पेंदाम (89) असं मृतक महिलेचं नाव, मृतक महिला काल रात्री घरात झोपली असतांना वाघाने घरात शिरून केला हल्ला, घटनास्थळी पोलीस आणि वनविभागाचे कर्मचारी दाखल, घटनेमुळे परिसरात दहशत
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत डमी विद्यार्थ्यांचा सुळसुळाट
- राज्यभरातील अडीच हजार विद्यार्थ्यांचे चेहरे मिसमॅच
-
फेस रिडींगसाठी प्रॉक्टर टेक्नॉलॉजीचा करण्यात आला वापर
- डमी विदयार्थ्यांनी परिक्षा दिल्याचा संशय
- 56 शिक्षणक्रमाच्या 8 ते 25 फेब्रुवारी दरम्यान हिवाळी सत्राच्या परीक्षा संपन्न झाल्यात
या परीक्षेत डमी विद्यार्थीनी ऑनलाइन परीक्षा दिल्याचा संशय
5 सदस्यांची प्रसाद समिती घेतेय डमी विद्यार्थ्यांचा शोध
Pune News : लोणी काळभोर टोलनाक्याजवळ दोन कारमध्ये भीषण अपघात, 2जण जागीच ठार तर 3 गंभीर जखमी, जखमींवर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे..
Nagpur News : नागपूरसह चंद्रपूर आणि विदर्भातील इतर काही जिल्ह्यात आजवर 30 पेक्षा जास्त घरफोड्या करुन पोलिसांची झोप उडवणाऱ्या निलेश पुरुषोत्तम या अट्टल चोराला मानकापूर पोलीस स्टेशन अंतर्गत अटक करण्यात आली आहे. मानकापूर परिसरात घरफोडीच्या उद्देशान संशयास्पदरित्या फिरत असताना पोलिसांनी त्याला पकडलं. त्याच्याकडून लाखो रुपयांचे दागिने आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Nashik News : नाशिक जिल्ह्यात बिबट्याचे हल्ले सुरुच आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षीय गायत्री लिलके या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. नाशिक तालुक्यातील धोंडेगावमध्ये ही घटना घडली. गायत्री रात्री घराजवळ शौचास बसलेली असताना बिबट्याने तिच्यावर झडप मारली. परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर मुलीला टाकून बिबट्याने धूम ठोकली. परंतु या घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण असून पिंजरा बसवण्याची मागणी नागरिक करत आहेत.
Aurangabad Raj Thackeray Sabha : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या औरंगाबादमध्ये 1 मे रोजी होणाऱ्या सभेला पोलिसांची परवानगी मिळणार असल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. अटी आणि शर्तींसह राज ठाकरेंना सभेसाठी परवानगी दिली जाणार असून आज दुपारी 12 वाजेपर्यंत परवानगीचा आदेश निघण्याची शक्यता आहे. मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मनसेनं सभेची जय्यत तयारी केली आहे. तसेच, पोलिसांनीही सभेसाठी बंदोबस्ताचा प्लॅन तयार केला आहे. राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण करू नये, अशी अट घालण्यात येणार असून सभेआधी राज ठाकरेंना तशी नोटीस दिली जाणार आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या मनसेच्या सभेबाबत पोलिसांचा प्लॅन एबीपी माझाच्या हाती लागला आहे.
Beed News : मराठा आरक्षणाबाबत समाज बांधवांच्या मोर्चाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर 17 एप्रिल रोजी बीडमध्ये गुन्हा दाखल झाला होता. मात्र सदावर्ते यांचे कथित वक्तव्याचं ठिकाण मुंबईतील असून तिथे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. आता हा गुन्हा आता मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती बीड पोलिसांनी न्यायालयात दिली. यामुळे सदावर्ते यांनी अटकपूर्व जामीनासाठी दाखल केलेला अर्जही मागे घेण्यात आला आहे. सदावर्ते आता जामिनासाठी मुंबई न्यायालयात अर्ज करु शकतील.
Sammruddhi Mahamarg : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामात पुन्हा एकदा विघ्न निर्माण झालंय. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गावरील निर्माणाधीन पुलाचे काही गर्डर काल संध्याकाळी कोसळले. सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा या गावाजवळ ही दुर्घटना घडलीय. कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली येऊन ट्रेलरचं मोठं नुकसान झालंय. नशीब बलवत्तर म्हणून या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हा निर्माणाधीन पूल जवळपास 500 मीटर लांबीचा असून 80 फूट उंच आहे. गेल्या तीन दिवसात समृद्धी महामार्गावरील अपघाताची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे लोकार्पणाच्या घाईत अशा दुर्घटना होत असल्याचा आरोप होतोय.
DC vs KKR : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) दिल्ली कॅपिटल्सचा (DC) संघ मैदानात उतरणार असून त्यांच्यासमोर कोलकाता नाईट रायडर्स संघाचं आव्हान असेल. दोन्ही संघ गुणतालिकेत खास स्थानी नसले तरी त्यांची यंदाच्या हंगामातील कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी काही सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला असून काही सामने अगदी थोडक्यात त्यांच्या हातातून सुटले आहेत. यामुळे आजच्या त्यांच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष्य लागून राहिले आहे. यंदाच्या गुणतालिकेचा विचार करता दिल्ली कॅपिटल्सने 7 पैकी 3 सामने जिंकत 6 गुणांसह सातवं स्थान मिळवलं आहे. तर आठव्या स्थानावर असणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने 8 पैकी 3 सामने जिंकत सहाच गुण मिळवले आहेत. आज होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) या सामन्यात दोन्ही संघाकडून दमदार खेळाडूंची फौज मैदानात उतरणार यात शंका नाही. दोन्ही संघाकडून विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले जाणार.
Maharashtra Political News : शिवसेनेचे नेते रोज खिशात राजीनामे आणि तोंडात जहर अशी त्रास देण्याची भूमिका होती. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी आणि भाजपा असं सरकार करावं, अशी चर्चा झाली. पालकमंत्री देखील ठरले. त्यानंतर पुन्हा भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वानं ठरवलं की आपण तीन पक्षांचं सरकार करू. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी असं सरकार करू. पण तेव्हा राष्ट्रवादीनं याला नकार दिला. आमचं शिवसेनेशी जमूच शकत नाही. राष्ट्रवादी भाजपासोबत येत असताना भाजपानं शिवसेनेला सोडायला नकार दिला. लोकसत्ताच्या दृष्टी आणि कोन या कार्यक्रमात आशीष शेलार यांनी यांनी हा गौप्यस्फोट केला.
Mumbai News : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप केले. राऊतांच्या आरोपानंतर आर्थिक गुन्हे शाखा नवनीत राणा यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. अंडरवर्ल्ड प्रकरणी खार पोलीस ठाण्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तक्रार दाखल करण्याची शक्यता आहे. युसूफ लकडावालाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्याचा जबाब होणार नाही आणि न्यायालयात केस टिकणार नाही. त्यामुळे नवनीत राणा विरोधात गुन्हा कसा नोंद करायचा यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडून बैठकांना सुरुवात झाली आहे.
पार्श्वभूमी
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
मंत्रिमंडळ कॅबीनेट बैठक, मास्क आणि पेट्रोल दराविषयी बैठकीत चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यावर टीका केल्यांनातर पेट्रोल डिझेलच्या दराबाबत सरकार दर कमी करण्याचा विचार करत आहे. पेट्रोलचे दर कमी करता येईल का यासंदर्भांत आजच्या कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. डिझेलचे दर 1 रुपयांनी कमी करता येतील का हे ही तपासलं जाणर अशी माहित सूत्रांनी दिली आहे. पेट्रोल- डिझेलवरील कर, कराची केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या तिजोरीत किती रक्कम? कर रचनेतील बदलाची सविस्तर माहिती दिलेली आहे.
मंत्रीमंडळ बैठकीत मास्क वापरासंदर्भात काही निर्णय होण्याची शक्यता आहे. कारण पंतप्रधानांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांच्या सोबतच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क घालणं गरजेच आहे अशा प्रकारची मागणी केली. आज विषय चर्चेला येऊ शकतो.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक
राज्य सरकारने खासदार संभाजीराजे छत्रपती यांना दिलेल्या आश्वासनांचा पाठपुरावा करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचं मंत्रालयात ठिय्या आंदोलन केले मराठा समाजाचे प्रश्न अद्याप न सुटल्याने मराठा तरुण आणि मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांचे पाच जणांचे शिष्टमंडळ अजित पवारांसोबच्या बैठकीला हजर असणार आहे. 28 फेब्रुवारी रोजी मान्य केलेल्या मागण्यांसंदर्भात मराठा समन्वयकांचे प्रश्न बैठकीत मांडले जाणार
सात महत्त्वाच्या मागण्यांबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही, त्यामुळे मराठा समाजात नाराजी आहे.
नवनीत राणांविरोधात गुन्हा नोंद करण्यासंदर्भात पोलिसांकडून आढावा बैठका
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप केले. राऊतांच्या आरोपानंतर आर्थिक गुन्हे शाखा नवनीत राणा यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. अंडरवर्ल्ड प्रकरणी खार पोलीस ठाण्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तक्रार दाखल करण्याची शक्यता आहे. युसूफ लकडावालाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्याचा जबाब होणार नाही आणि न्यायालयात केस टिकणार नाही. त्यामुळे नवनीत राणा विरोधात गुन्हा कसा नोंद करायचा यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडून बैठकांना सुरुवात झाली आहे.
राष्ट्रवादी आणि भाजपत मंत्रीपदं वाटपाचंही ठरलेलं, आशिष शेलारांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचे नेते रोज खिशात राजीनामे आणि तोंडात जहर अशी त्रास देण्याची भूमिका होती. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी आणि भाजपा असं सरकार करावं, अशी चर्चा झाली. पालकमंत्री देखील ठरले. त्यानंतर पुन्हा भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वानं ठरवलं की आपण तीन पक्षांचं सरकार करू. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी असं सरकार करू. पण तेव्हा राष्ट्रवादीनं याला नकार दिला. आमचं शिवसेनेशी जमूच शकत नाही. राष्ट्रवादी भाजपासोबत येत असताना भाजपानं शिवसेनेला सोडायला नकार दिला. लोकसत्ताच्या दृष्टी आणि कोन या कार्यक्रमात आशीष शेलार यांनी यांनी हा गौप्यस्फोट केला.
गणेश नाईक डीएनए टेस्टसाठी तयार, भवितव्याचा निर्णय आज होणार
ठाणे सत्र न्यायालयाने बुधवारी देखील जामीन न देता निकाल राखून ठेवला. मात्र गणेश नाईक हे डी एन ए टेस्ट करण्यासाठी तयार असल्याचे सांगून वकिलांनी मोठा धक्का दिला. या संदर्भात आजच्या सुनावणीला मोठे महत्त्व आहे. नेरूळ आणि बेलापूर पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यात गणेश नाईक यांची कस्टडी मागितल्याने गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
DC vs KKR : आज रंगणार दिल्ली विरुद्ध कोलकाता लढत
DC vs KKR : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) दिल्ली कॅपिटल्सचा (DC) संघ मैदानात उतरणार असून त्यांच्यासमोर कोलकाता नाईट रायडर्स संघाचं आव्हान असेल. दोन्ही संघ गुणतालिकेत खास स्थानी नसले तरी त्यांची यंदाच्या हंगामातील कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी काही सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला असून काही सामने अगदी थोडक्यात त्यांच्या हातातून सुटले आहेत. यामुळे आजच्या त्यांच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष्य लागून राहिले आहे. यंदाच्या गुणतालिकेचा विचार करता दिल्ली कॅपिटल्सने 7 पैकी 3 सामने जिंकत 6 गुणांसह सातवं स्थान मिळवलं आहे. तर आठव्या स्थानावर असणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने 8 पैकी 3 सामने जिंकत सहाच गुण मिळवले आहेत. आज होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) या सामन्यात दोन्ही संघाकडून दमदार खेळाडूंची फौज मैदानात उतरणार यात शंका नाही. दोन्ही संघाकडून विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले जाणार.
आज इतिहासात
1740 - पहिले बाजीराव पेशवे यांचे निधन
2008 - भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने ‘पीएसएलव्ही-सी 9’ या उपग्रहाचे प्रक्षेपण करून नवीन इतिहास रचला
1998 - माजी भारतीय क्रिकेटपटू व वेगवान गोलंदाज, तसचं, राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष रमाकांत देसाई यांचे निधन.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -