Maharashtra Breaking News 27 August 2022 : देशासह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Aug 2022 10:13 PM
Wardha : फुगे भरणाऱ्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने अडीच वर्षाच्या मुलीचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी

Wardha : फुगे भरणाऱ्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने अडीच वर्षाच्या मुलीचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अचलपूर तालुक्यातील शिंदी येथील आज रात्रीची वाजताची घटना घडली आहे. पोळ्यानिमित्ताने शिंदी गावात एक छोटीशी यात्रा भरते. याच यात्रेत गॅस भरणारा सिलेंडर फुटल्याने एकच खळबळ उडाली. 

बांदा येथून कणकवलीच्या दिशेने फटाके घेऊन जात असलेल्या झायलो कारला नेमळे येथे अपघात, दोन जणांचा मृत्यू

बांदा येथून कणकवलीच्या दिशेने फटाके घेऊन जात असलेल्या झायलो कारला नेमळे येथे अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.  टायर फुटल्याने गाडी दुभाजकाच्या पलीकडे पलटी झाली.  स्थानिकांनी बांदा येथील 108 रुग्णवाहिकेतून अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेत असताना काही अंतरावर रुग्णवाहिकेने पेट घेतला.  सुदैवाने आतील रुग्ण चालक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

बीडच्या एका पतसंस्थेकडून ग्राहकांची फसवणूक

बीडमध्ये एका खासगी बँकेने ग्राहकांची दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बँकेच्या संचालक मंडळावर बीडच्या शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

 दसरा मेळावा शिवसेनेचा असतो आणि शिवसेनेचाच राहणार : आदित्य ठाकरे  

दसरा मेळावा शिवसेनेचा असतो आणि शिवसेनेचाच राहणार. जनता देखील हे बघत आहे. मेळाव्याच्या परवानगीसाठी आम्ही सतत प्रयत्न करतोय, पण तुम्हाला माहित आहे जे गद्दार सरकार आलंय, ते दडपशाहीचं सरकार आहे.  त्यांनी परवानगी दिलेली नाही, तरी देखील शिवतीर्थावर शिवसेनेताच दसरा मेळावा आहे, जनता देखील हे बघत आलीय असा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांन लगावला आहे.  

Jalna: शेतकरी कुटुंबाला टोळक्याची बेदम मारहाण

जालना जिल्ह्यातील बावने पांगरी येथील एका शेतकरी कुटूंबाला दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. शिवाय शेतात ट्रॅक्टर घालून उभ्या पिकावर नांगर फिरवण्यात आलाय.  पीडित शेतकरी आणि मारहाण करणाऱ्या व्यक्ती मध्ये 3 एकर शेतीचा वाद आहे. या शेती वर पीडित शेतकरी विश्वनाथ राठोड यांचा ताबा असून त्या शेतीवर हक्क सांगणाऱ्या 10 ते 15 जणांकडून मारहाण झाल्याचा आरोप या पीडित शेतकऱ्याने केलाय.

Hingoli: महामार्गाच्या कामावरून ग्रामस्थ आक्रमक , हिंगोली नांदेड महामार्गाचे काम रोखले

हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दोन तीन वर्षापासून सुरू आहे परंतु हा रस्ता वारंगा गावात 30 मीटर रुंद ठेवण्यात आला आहे. तर इतर ठिकाणी हा रस्ता 60 मीटर रुंद आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकरी कंत्राटदाराच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत.

पुण्यातील पाषाण तलावच्या गेट वर लावलेला "Couple not allowed" चा फलक महापालिकेने उतरवला

पुण्यातील पाषाण तलावाच्या गेट वर लावलेला "Couple not allowed" चा फलक महापालिकेने उतरवला, पुणे महानगरपालिकेने अविवाहित जोडप्यांना या परिसरात येण्यास मनाई केली होती आणि त्यासाठी 'Couple not allowed' असा बोर्ड लावला होता. या निर्णयाला कालच "राईट टू लव्ह" संघटनेच्या च्या वतीने विरोध करण्यात आला होता. पुणे पालिकेने घेतलेला हा निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा अशा मागणीचे निवेदन पालिका आयुक्तांना आणि उद्यान विभाग अधिक्षक अशोक घोरपडे यांना दिले होते. आज मात्र पाषाण तलावाच्या गेट वर लावण्यात आलेला फलक काढण्यात आला आहे

Kirit Somaiya Dapoli: साई रिसॉर्टमधील महत्त्वाच्या वस्तू हटवण्यास सुरुवात, रिसॉर्ट मालकाला तोडक कारवाईची नोटीस सोपवल्याची चर्चा
Kirit Somaiya Dapoli:  रिसॉट तोडण्याची ऑर्डर रिसॉर्ट मालकाला आली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शुक्रवारपासून या रिसॉर्ट मधील महत्वाच्या वस्तू जेसीबीच्या साहाय्याने उचलण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून किरीट सोमय्या थोड्या वेळेत या ठिकाणी कार्यकर्त्यांसह दाखल होणार आहेत.  

 
Nashik CBI Raid : लाचखोर जीएसटी अधीक्षक चव्हाणकेला 30 ऑगस्ट पर्यंत सीबीआय कोठडी

Nashik CBI Raid : लाचखोर जीएसटी अधीक्षक चव्हाणकेला आज न्यायालयात हजर केले असता 30 ऑगस्ट पर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. नाशिकमध्ये (Nashik) जीएसटी विभागातील (GST Departement) अधीक्षक आठ हजारांची लाच घेताना सीबीआय एसीबीने (CBI) रंगेहाथ पकडल्याची घटना काल घडली. त्यांनतर या जीएसटीच्या लाचखोर अधिक्षकाला आज न्यालायात हजर केल्यानंतर 30 ऑगस्ट पर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. नाशिकच्या सिडको कार्यालयामधून चंद्रकांत चव्हाणके (Chandrakant Chavhanke) यांना अटक करण्यात आली होती. 

शिर्डीतील फुल विक्रेत्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल.

शिर्डीतील फुल विक्रेत्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी केली चर्चा.. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी विश्वस्त  आणि फुल विक्रेत्या सोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे दिले आदेश..!

Kirit Somaiya: किरीट सोमय्या दापोलीत; वादग्रस्त साई रिसॉर्टभोवती पोलीस बंदोबस्तात वाढ

Kirit Somaiya:  किरीट सोमय्या दापोलीत दाखल झाले आहेत. वादग्रस्त साई रिसॉर्टभोवती पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. 

Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या खेडमध्ये पोहचले; दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्टची करणार पाहणी

Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या खेडमध्ये पोहचले आहेत. दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्टची करणार पाहणी करणार असून तोडक कारवाईबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. 

Kirit Somaiya LIVE : भाजप नेते किरीट सोमय्या खेड रेल्वे स्थानकावर दाखल, प्रतिकात्मक टिकाव घेऊन अनिल परबांच्या रिसॉर्टकडे जाणार

अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे विशेष फेरीसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर

अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे विशेष फेरीसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 25 ते 29 ऑगस्ट दरम्यान  विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग एक आणि अर्जाचा भाग दोन भरून कॉलेजेसचे पसंती क्रमांक ज्या विशेष फेरीसाठी द्यायचे आहेत तर 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंती क्रमांक नुसार विशेष फेरीतील गुणवत्ता यादी जाहीर होऊन विद्यार्थ्यांना कॉलेज प्राप्त होतील. ज्या विद्यार्थ्यांना विशेष फेरीमध्ये कॉलेज प्राप्त होतील त्या विद्यार्थ्यांनी  01 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर दरम्यान कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे



Aurangabad News : 'मला जीवनाचा कंटाळा आलाय' म्हणत औरंगाबादमध्ये बीकाॅमच्या विद्यार्थीनीनं संपवलं जीवन

Aurangabad News : मला जीवनाचा कंटाळा आलाय.  अशी चिट्ठी लिहीत औरंगाबाद मध्ये बीकाॅमच्या विद्यार्थीनीचा वसतिगृहातच शुक्रवारी संध्याकाळी गळफास घेतला, बी.काॅम प्रथम वर्षात शिकत असलेल्या 20 वर्षीय आरती सर्जेराव कोल्हे असे मयत विद्यार्थीनीचे नाव आहे. आरती शांत स्वभावाची होती. फारशी बोलत नव्हती. तीला नैराश्य का आले. या घटनेच्या मागील कारणाचा शोध वेदांतनगर पोलीस घेत आहेत. मुलीने गळफास घेतला, अशी प्राथमिक माहिती आहे, नातेवाईकांच्या भावना तीव्र आहे त्यांचा अर्ज घेतला आहे, पोस्टमार्टेम नंतर खरं करण पुढं येईल अस पोलीस सांगताय.. तर आमची मुलगी फाशी घेऊ शकत नाही, कुणीतरी काहीतरी केलं अस पालक सांगताय.  घातपात असल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. याचा तपास करण्याची मागणी पालकांनी केली. आत्महत्या करण्याच्या काहीदिवस अगोदर आरतीने त्याचा भाऊ गणेशला वसतिगृहात त्रास होता असल्याची माहिती दिली होती. शिवाय या संदर्भात वसतिगृहात लेखी तक्रार देखील केली होती.  असेही तिच्या भावाने सांगितलं आहे

राधाकृष्ण विखे पाटील यांची शिर्डी साई संस्थान, विश्वस्तांसोबत बैठक सुरू

राधाकृष्ण विखे पाटील यांची शिर्डी साई संस्थान, विश्वस्तांसोबत बैठक सुरू, बैठकीला विश्वस्त मंडळ,  संस्थान अधिकारी, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांसह अधिकारी उपस्थित

सोलापुरात सलग तिसऱ्या दिवशी देखील आयकर विभागाचा तपास सुरूच 

सोलापुरात सलग तिसऱ्या दिवशी देखील आयकर विभागाचा तपास सुरूच, गुरुवारी सकाळी 7 वाजता सुरु झालेली तपासणी अद्यापही सुरूच, 52 तासाहून अधिक वेळापासून आयकर विभागाचे अधिकारी तळ ठोकून, डॉ. परळे यांचे स्पंदन हार्ट केअर, डॉ. अनुपम शाह यांचे हार्ट क्लिनिक तसेच रघोजी किडनी आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अद्याप ही तपासणी सुरूच

विद्यार्थ्यामध्ये झालेल्या भांडणातून शिक्षकाने केली एका विद्यार्थ्याला काठीने मारहाण, टिटवाळा येथील धक्कादायक घटना

विद्यार्थ्यामध्ये झालेल्या भांडणातून शिक्षकाने केली एका विद्यार्थ्याला काठीने मारहाण, टिटवाळा येथील धक्कादायक घटना , शाळेत धक्का लागल्याच्या कारणावरून दोन विद्यार्थ्यांमध्ये झाले होते भांडण  विद्यार्थ्याच्या हाताला गंभीर दुखापत ,हात फ्रॅक्चर , टिटवाळा पोलिस ठाण्यात मारकुट्या शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल, पोलीस तपास सुरू

गेल्या 140 वर्षांची परंपरा असलेला मारबत मिरवणूक सोहळा नागपुरात सुरु, मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी

गेल्या १४० वर्षांची परंपरा असलेला मारबत मिरवणूक सोहळा नागपुरात सुरु आहे... दोन वर्षांच्या कोरोनाच्या निर्बंधांनंतर निघणारी मिरवणूक पाहण्यासाठी नागपूरकरांनी गर्दी केलीय... सामाजिक आणि राजकीय विषयावर भाष्य करणाऱ्या काळ्या आणि पिवळ्या मारबत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतात.. यंदाही नागपूरच्या छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव मंडळाचे बडगे लक्ष वेधून घेतायत... सध्याच्या राजकीय विषयावर भाष्य करणारा बडगे नागपुरात चर्चेचा विषय ठरलेत.... 

Parbhani News : परभणीत पोळ्याच्या बैल मिरवणुकीत वाद-8 जण जखमी

Parbhani News : पोळ्याच्या बैल मिरवणुकीत बैल मागे घेण्याच्या वादातून परभणीत दोन ठिकाणी लाठ्याकाठ्यांनी हाणामारी झाल्याची घटना घडली असून यात 8 जण जखमी झाले आहेत. दोन्ही ठिकाणी पोलिसांनी तब्बल 53 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.


काल पोळा सर्वत्र साजरा केला जात असताना धुमधडाक्यात बैलांची मिरवणूक काढली जात होती. मात्र परभणीच्या पाथरी शहरातील पामे गल्लीजवळ दोन मिरवणुका समोरासमोर आल्या यात बैल मागे घेण्यावरून वाद झाला आणि या वादाचे रूपांतर क्षणार्धात थेट लाठ्याकाठ्यांनी मारहाणीत झालं. यात दोन्ही कडचे 5 ते 6 जण जखमी झाले. यावेळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत वाद मिटवला. दोन्ही गटातील फिर्यादीवरून एकूण 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशीच दुसरी घटना जिंतूर तालुक्यातील चांदज येथे घडली गावात पोळ्याची मिरवणुक सुरू असताना मंदिर परिसरात गावातीलच दोन गटातील अनेकजण एकमेकांवर तुटुन पडले. दगडफेक, काठ्या आणि लाठ्यांनी एकमेकांना मारहाण सुरू झाली जवळपास अर्धा तास गावात हे दोन्ही गट एकमेकां विरोधात आमने सामने आलेले होते. यात 2 जखमी झाले असुन बोरी पोलिसांना घटना कळताच त्यांनी तात्काळ गाव गाठत गावातील वातावरण शांत केलं. बोरी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून देण्यात आलेल्या फिर्यादीवरून इथेही 23 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोन्ही ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असून वातावरण शांत आहे.
LIVE : उदय लळीत भारताचे नवे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ

LIVE : उदय लळीत भारताचे नवे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ



US News : फेएटविले येथील वॉशिंग्टन काउंटी फेअरमध्ये काही लोकांनी गोळीबार केल्याची माहिती समोर

US News : फेएटविले येथील वॉशिंग्टन काउंटी फेअरमध्ये काही लोकांनी गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. यात एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. 

Traffic Updates : मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर बोरघाटात वाहतूक कोंडी, अमृतांजन पुलाजवळ सुमारे एक ते दीड किलोमीटर वाहनाच्या रांगा

Traffic Updates : मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर बोरघाटात वाहतूक कोंडी झाली आहे. अमृतांजन पुलाजवळ सुमारे एक ते दीड किलोमीटर वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. विकेंड आणि गणेशोत्सवामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे.  

जालना- समर्थांचे देव चोरणारे सहाव्या दिवशीही मोकाट, भाविक आक्रमक, चोरीच्या निषेधार्थ दैठणा गावच्या वारकऱ्यांची पायी दिंडी

जालना इथल्या जांबसमर्थ मधल्या श्रीराम मंदिरातील मूर्ती चोरीच्या घटनेचा सहाव्या दिवशीही छडा लागलेला नाही.. दरम्यान आता ग्रामस्थांबरोबर भाविक वारकऱ्यांची चलबिचल वाढलीय..  जालन्यातील दैठणा इथल्या वारकऱ्यांनी या चोरीच्या घटनेचा निषेध व्यक्त करत मूर्ती चोरांचा तात्काळ तपास लावावा अशी मागणी केलीय...यासाठी श्रीराम मंदिरापर्यत पायी दिंडी काढलीय... भाविकांच्या संतापाचा आता कडेलोट झालेला पाहायला मिळत आहे.

Nashik News: नाशिक मुंबई महामार्गावर कंटेनरचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू

Nashik News: नाशिक मुंबई महामार्गावर कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.

Maharashtra Politics : शिंदे गटाकडून दसरा मेळावा हायजॅक करण्याचा प्रयत्न?

Maharashtra Politics : शिंदे गटाकडून दसरा मेळावा हायजॅक करण्याचा प्रयत्न?? 


शिवसेनेतल्या बंडखोरीनंतर खरी शिवसेना कुणाची यावर रस्सीखेच सुरुय 


या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचंही शिवतीर्थावर होणा-या दसरा मेळाव्याकडे लक्ष लागलंय 


शिवसेनेनं दसरा मेळाव्याकरता शिवादी पार्कच्या परवानगीचा अर्ज दाखल केलाय 


महापालिकेला ठरावीक वर्षभरातील कार्यक्रमांना शिवाजी पार्कवर परवानगी देता येते... यात दसरा मेळावाला परवानगी दिली जाते


यंदा मात्र, राजकिय रस्सीखेच सुरु असल्यानं महापालिकेकडून दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही

Maharashtra Rain : राज्यात पावसाची उघडीप, विदर्भात यलो अलर्ट





Maharashtra Rain : राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. राज्यातल्या बहुतांश ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे. काही ठिकाणी मात्र, हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मुंबईसह (Mumbai) ठाणे (Thane) परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. अन्य ठिकाणी मात्र, पावसानं उघडीप दिली आहे. दरम्यान, येत्या  चार ते पाच  दिवसात महाराष्ट्रत पावसाचा जोर कमी असण्याची शक्यता असून, हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर 1 सप्टेंबपासून राज्यात पावासाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 






Asia Cup 2022 : आजपासून आशिया कपला सुरुवात

Asia Cup 2022 : आशिया कप 2022 स्पर्धेला आजपासून यूएईमध्ये  सुरुवात होत आहे. भारत आपला पहिला सामना रविवारी (28 ऑगस्ट) पाकिस्तानविरुद्ध दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात खेळणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. आज पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका असा असणार असून जवळपास 4 वर्षानंतर ही भव्य स्पर्धा पार पडत आहे.

Tanha Pola 2022 : आज तान्हा पोळा

Tanha Pola 2022 : पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी विदर्भात तान्हा पोळा म्हणजेच लहान मुलांचा पोळा साजरा केला जातो. विदर्भातील सर्वात आगळावेगळा आणि प्रसिद्ध असा पोळा वर्ध्यातील सिंदी रेल्वेचा आहे. सिंदी रेल्वे येथे गेल्या अनेक वर्षांपासून भव्य तान्हा पोळा साजरा होतो. कोरोनाच्या दोन वर्षांत अतिशय साध्या पद्धतीने पोळा भरला. मात्र यावर्षी दोन वर्षांची कसर भरून काढली जाईल.

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

Aaditya Thackeray : शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी 2 वाजता ते नागपूर विमानतळावर पोहचतील. विमानतळावर ते प्रसारमाध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे. यावेळी शिवसैनिकांकडून त्यांचं जोरदार स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर ते शिवसेनेचे आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या घरी जाणार आहेत. त्याचवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत.

किरीट सोमय्यांची अनिल परबांच्या दापोलीतील रिसॉर्टपर्यंत पायी यात्रा

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते अनिल परब यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. किरीट सोमया आज खेड रेल्वे स्थानकापासून दापोलीतील साई रिसॉर्टपर्यंत 28 किमी अंतर पायी जाणार आहेत. दापोली मुरुड समुद्र किनारी बांधलेले साई रिसॉर्ट हे अनिल परब यांनी बेकायदेशीर बांधल्याचा सोमय्यांचा आरोप आहे.  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असनाना किरीट सोमय्यांनी मुलुंडपासून हातोडा यात्रा काढून दापोलीत प्रवेश केला होता. आता राज्यात शिवसेना - भाजप सरकार आल्यानंतर किरीट सोमय्या पुन्हा एकदा दापोलीत जाणार आहेत. 

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...


किरीट सोमय्यांची अनिल परबांच्या दापोलीतील रिसॉर्टपर्यंत पायी यात्रा
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते अनिल परब यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. किरीट सोमया आज खेड रेल्वे स्थानकापासून दापोलीतील साई रिसॉर्टपर्यंत 28 किमी अंतर पायी जाणार आहेत. दापोली मुरुड समुद्र किनारी बांधलेले साई रिसॉर्ट हे अनिल परब यांनी बेकायदेशीर बांधल्याचा सोमय्यांचा आरोप आहे.  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असनाना किरीट सोमय्यांनी मुलुंडपासून हातोडा यात्रा काढून दापोलीत प्रवेश केला होता. आता राज्यात शिवसेना - भाजप सरकार आल्यानंतर किरीट सोमय्या पुन्हा एकदा दापोलीत जाणार आहेत.


आदित्य ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर
शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी 2 वाजता ते नागपूर विमानतळावर पोहचतील. विमानतळावर ते प्रसारमाध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे. यावेळी शिवसैनिकांकडून त्यांचं जोरदार स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर ते शिवसेनेचे आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या घरी जाणार आहेत. त्याचवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत.
 
आज तान्हा पोळा
पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी विदर्भात तान्हा पोळा म्हणजेच लहान मुलांचा पोळा साजरा केला जातो. विदर्भातील सर्वात आगळावेगळा आणि प्रसिद्ध असा पोळा वर्ध्यातील सिंदी रेल्वेचा आहे. सिंदी रेल्वे येथे गेल्या अनेक वर्षांपासून भव्य तान्हा पोळा साजरा होतो. कॊरोनाच्या दोन वर्षांत अतिशय साध्या पद्धतीने पोळा भरला. मात्र यावर्षी दोन वर्षांची कसर भरून काढली जाईल.


आजपासून आशिया कपला सुरुवात
आशिया कप 2022 स्पर्धेला आजपासून यूएईमध्ये  सुरुवात होत आहे. भारत आपला पहिला सामना रविवारी (28 ऑगस्ट) पाकिस्तानविरुद्ध दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात खेळणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. आज पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका असा असणार असून जवळपास 4 वर्षानंतर ही भव्य स्पर्धा पार पडत आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.