Maharashtra Breaking News 25 August 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
नागपूर : 27 ऑगस्ट रोजी तान्हा पोळा आहे. या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागपूर जिल्ह्यात सर्व ठिकाणी किरकोळ देशी-विदेशी दारू विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिला आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाच्याविरुद्ध सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशारा याबाबतच्या सूचनेत देण्यात आला आहे.
नागपूर : कृषी विभागांतर्गत येत असलेल्या जिल्ह्यातील सर्व तालुका बीज गुणन केंद्र, फळरोप वाटिकात काम करणाऱ्या रोजंदारी मजुरांची एकत्रित ज्येष्ठता सूची तयार करण्यात आलेली आहे. एकत्रित ज्येष्ठता सूची जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आली आहे. रोजंदारी मजुरांना यादीबाबत आक्षेप नोंदवायचा असल्यास पाच दिवसात लेखी पुराव्यासह संपर्क करावा, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी कळवले आहे.
नागपूर: 'पोळा' या सनानिमित्त शुक्रवार, 26 ऑगस्ट रोजी शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद असणार आहे. या संदर्भात नागपूर महानगरपालिकेने आदेश जारी केले आहे. त्यानुसार शुक्रवारी नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. या संदर्भातील आदेश उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ.गजेन्द्र महल्ले यांनी निर्गमीत केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर महानगरपालिके व्दारे कार्यवाही करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.
Pune Express Way : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ITMS प्रकल्प राबवण्यास सुरुवात होत आहे. यासाठी उद्या द्रुतगतीवर दोन तासांचा ब्लॉक घेतला जातोय. ITMS प्रकल्पाचा एक भाग म्हणजे ओव्हरहेड ग्रॅंटी, तीच उभारण्यासाठी उद्या दुपारी 12 ते 2 दरम्यान हा ब्लॉक घेतला जातोय. किवळे ते सोमटने दरम्यान हे काम सुरू होतंय. या दोन तासासाठी जुन्या पुणे मुंबई महामार्गाकडे वाहतूक वळवली जाणार आहे.
शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात लावण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ही मागणी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मान्य केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी करावाई
आदिवासी विकास बांधकाम विभागाच्या कार्यक्रारी अभियंत्याला अटक
दिनेशकुमार बागुल अभियंता ACB च्या जाळ्यात
तब्बल 28 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक
सेंट्रल किचनच्या कामासाठी 12 टक्के दराने लाच मागितल्या प्रकरणी करावाई
साधारणपणे अडीच कोटींचे काम मंजूर करण्यासाठी मागितली लाच.
बीडच्या गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथे सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडीदरम्यान दोन गटात तुफान राडा झाला असून दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. राष्ट्रवादीकडून निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंचाने उपसरपंच पदासाठी भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यात वाद झाला. दोन्ही गटातील सदस्यांनी दगडफेक करत एकमेकांना मारहाण केली आहे. या घटनेमुळे सिरसमार्ग गावात ततणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
Mumbai Crime : मुंबईचा कांदिवली पश्चिमत मुस्लिम बांधवांना बनावट कागदपत्रांद्वारे हिंदू आधार कार्ड तयार करुन देणारा आरोपीला कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. कांदिवली पोलिसांनी रंगेहाथ एकाला याप्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत.अवघ्या दोन हजार रुपयांमध्ये बनावट कागदपत्र देऊन मुस्लिमांचं हिंदू धर्मांतर करुन दिलं जात होतं. त्यानंतर मुस्लिमांना हिंदू नावाने आधार कार्ड बनवून दिलं जातंय
विधानसभेचे विरोधी पक्षनेते, तत्कालिन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोरोनाकाळात केलेल्या कार्याचं तसंच त्यांच्या आर्थिक शिस्तीचं 'कॅग' रिपोर्टमध्ये कौतुक करण्यात आलं आहे. तत्कालिन वित्तमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याला 2020-2021 मध्ये राजकोषीय तूट तीन टक्यांखाली म्हणजे 2.69 टक्क्यांपर्यंत आणण्यात राज्याला यश मिळाल्याचे अहवाल नमूद करण्यात आलं आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प २ मधील गोल मैदान परिसरात कोमल पार्क नावाची इमारत आहे. ही इमारत महापालिकेनं २०२१ साली धोकादायक घोषित केली होती. धोकादायक इमारतींच्या सी 2 बी वर्गवारीत या इमारतीचा समावेश करत दुरुस्ती करून वापर करण्याच्या सूचना महापालिकेनं दिल्या होत्या. मात्र आज दुपारी ५ व्या मजल्यावरील घरात दुरुस्तीचं काम सुरू असताना ६ व्या मजल्याचा स्लॅब दुरुस्ती करणाऱ्या मजुरांच्या अंगावर येऊन पडला. या दुर्घटनेत खलीलूर रेहमान या ४२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. तर गणेश सणस हा २८ वर्षीय कामगार जखमी झाला. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोल्हापूरहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कारचा मुंबई गोवा महामार्गांवर बांदा - सटमटवाडी येथे भीषण अपघात झालाय. गोव्याला पर्यटनाला जात असताना अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय.
सोलापुरातील प्रसिद्ध रघोजी किडनी अँड मल्टीस्टेट हॉस्पिटलमध्ये देखील आयकर विभागाच्या वतीने तपासणी सुरू आहे. आज सकाळपासून रघोजी हॉस्पिटल येथे आयकर विभागाचे पथक तपासणी करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. रघोजी हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये आयकर विभागाच्या उभी असल्याचे चित्र पाहायला मिळालं. सोलापुरात आयकर विभागाच्या वतीने प्रामुख्याने वेगवेगळ्या रुग्णालयांची तपासणी सुरू असल्याचे दिसतंय.
मालेगाव ब्लास्ट 2008 खटला, आणखीन एक सरकारी साक्षीदार फितूर, या खटल्यात फितूर साक्षीदारांची संख्या 25 झाली, एका माजी लष्करी अधिकाऱ्यानं कोर्टापुढे आपली जबानी बदलल्यानं कोर्टानं त्याला फितूर घोषित केलं
मुंबई महानगरपालिकेला लवकरच मिळणार नवे आयुक्त
इक्बाल सिंह चहल यांच्या कार्यपद्धतीवर शिंदे फडणवीस सरकार नाराज
मुंबई पालिका आयुक्तपदासाठी अनेक अधिकाऱ्यांची लॅाबिंग सुरु
इक्बाल चहल यांनी गेल्या दोन दिवसांत दोन वेळा घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट
इक्बाल चहल यांना महाविकास आघाडी सराकरनं दिली होती पालिकेची जबाबदारी
येत्या मुंबई पालिकेच्या निवडणुकींच्या अनुषंगाने पालिकेत होणार मोठे फेरबदल
Breaking News Live Updates: बिल्किस बानो प्रकरणी सुप्रीम कोर्टाची गुजरात सरकारला नोटीस, 11 आरोपींच्या मुक्ततेबाबत 2 आठवड्यात उत्तर देण्यास सांगितलं
कासेगाव शिक्षण संस्थेच्या राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी या स्वायत्त महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक) नवी दिल्ली यांचेकडून "ए प्लस" चा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. यासाठी नॅकच्या त्रिसदसीय समितीने आरआयटी महाविद्यालयास भेट देऊन नॅकच्या निकषानुसार सर्वंकष मूल्यमापन केले होते. कासेगाव शिक्षण संस्थेच्या राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी या स्वायत्त महाविद्यालयास मागील पाच वर्षासाठी 'नॅक' कडून “ए” हा दर्जा मिळाला होता. त्याच्यात आता सुधारणा होऊन “ए प्लस" हा दर्जा नॅक कडून मिळाला असून तो 2022 ते 2027 या पाच वर्षाच्या कालावधी साठी आहे.
आमदार हसन मुश्रीफांना समरजित घाटगे यांचा मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या कागलच्या नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश, समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादीला पाडलं खिंडार, विद्यमान नगराध्यक्षा माणिक माळी आणि माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी हे पती-पत्नी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये दाखल, उपनगराध्यक्ष आनंदा पसारे यांचीही राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी, जिल्हाध्यक्ष समरजितराजे घाटगे यांच्या उपस्थितीत प्रवेश
'मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक'; मनसेच्या ऑनलाईन सदस्यता नोंदणीला सुरुवात, राज ठाकरे पहिले सदस्य
पंढरपूरचे मूळ रहिवासी असलेल्या अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यावर आयकर विभागाच्या धाडी, चार साखर कारखान्यांची सकाळी साडेसहा वाजल्यापासून तपासणी सुरू, अभिजीत पाटील हे पंढरपूरमधले बडे प्रस्थ, त्यांनी एकापाठोपाठ एक चार साखर कारखाने विकत घेतले आहेत. या ठिकाणी आज सकाळीच साडेसहा वाजता आयकर विभागाची पथकं दाखल झाली. आताही पथकं तिथेच आहेत. अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्याचे तपासणी सुरू आहे.
कृषीमंत्री ‘एक दिवस शेतकऱ्यांच्या घरी‘ ही मोहीम राबवणार
आज सभागृहात करणार घोषणा
शेतकरी यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी राज्यभर ही मोहीम राबवणार
कृषीमंत्र्यांपासून सचिव, कृषी अधिकारी आणि या विभागातील सर्व अधिकारी एक दिवस शेतकरी यांच्या घरी मुक्काम करणार
90 दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांत हा मुक्काम असणार
दिवसभरात शेतकरी काम करत असताना काय अडचणी येतात, बॅंकेच कर्ज घेण्यासाठी काय अडचणी आहेत, शेतकरी का आत्महत्या करतोय याचा आढावा घेणार
हा आढावा घेतल्यानंतर अहवाल तयार करणार
त्यानंतर शेतकऱ्यांसाठी नवीन योजना राबवल्या जाणार
Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस गव्यांच्या कळपाने अक्षरशः उच्छाद मांडला आहे. भात, नाचणी, भुईमूग यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे वनविभागाच्या वतीने केले जात आहेत. मात्र नुकसान भरपाई मिळत नाही. पावसाळा सुरु झाल्यापासून गवे भात, नाचणी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. गव्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून काही शेतकन्यांनी जमीन पडीक ठेवली आहे. तर काहींनी पडीक जमिनीत काजू, आंबा कलमांची लागवड केली केली आहे. मात्र गव्यांनी या कलमांचीही नासधूस करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी दिवसाढवळ्या लोक वस्तीतील भातशेतीतही गव्यांचे दर्शन होत आहे. गव्यांचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी करुनही वनविभाग दुर्लक्ष करत आहे.
Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत दोन बस समोरासमोर धडकून सुमारे 25 प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये एक बस चालक गंभीर जखमी असून सर्व जखमींवर दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. या जखमीमध्ये विद्यार्थी आणि महिलांचा समावेश आहे. बोरिवली-दापोली बस दापोलीकडे येत असताना दापोलीकडून मुरतपूरकडे जाणाऱ्या दोन बसचा मौजे दापोली वळणावर समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. दोन्ही बस समोरासमोर धडकल्यामुळे बसचे स्टेअरिंग लॉक होऊन बोरिवली दापोली बसमधील ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत दोन बस समोरासमोर धडकून सुमारे 25 प्रवासी जखमी झाले आहेत यामध्ये एक बस चालक गंभीर जखमी असून सर्व जखमेवर दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या जखमीमध्ये विद्यार्थी व महिलांचा समावेश आहे
बोरवली दापोली बस दापोलीकडे येत असताना दापोलीकडून मुरतपूरकडे जाणाऱ्या दोन बसचा मौजे दापोली वळणावर समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे दोन्ही बस समोरासमोर धडकल्यामुळे बसचे स्टेरिंग लॉक होऊन बोरवली दापोली बस मधील ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे
Sameer Wankhede vs Nawab Malik : समीर वानखेडेचा भाऊ संजय वानखेडे यानं वाशिमच्या कोर्टात नवाब मलिकच्या विरोधात अर्ज केला असून, नवाब मलिकने समीर वानखेडेंच्या बाबत जे काही म्हटलं त्यामुळे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी कोर्टासमोर केली आहे. मात्र संजय वानखेडे यांना अशा पद्धतीचा अर्ज करण्याचा अधिकार आहे का? हा मुद्दा आल्यामुळे स्वतः समीर वानखेडे आज वाशिमला कोर्टात जाऊन संजय वानखेडे हे कोणी दूरचे नसून, आपलाच सख्खा चुलत भाऊ असल्याचे प्रतिज्ञापत्र देऊन नवाब मलिक यांच्या विरोधातल्या ॲट्रॉसिटी केस मध्ये ते दाखल करणार आहेत अशी माहिती एबीपी माझाच्या हाती. गोरेगावला आधीच अट्रोसिटी दाखल आहे. आता हा दुसरा ठरू शकतो.
Sameer Wankhede vs Nawab Malik : समीर वानखेडेचा भाऊ संजय वानखेडे यानं वाशिमच्या कोर्टात नवाब मलिकच्या विरोधात अर्ज केला असून, नवाब मलिकने समीर वानखेडेंच्या बाबत जे काही म्हटलं त्यामुळे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी कोर्टासमोर केली आहे. मात्र संजय वानखेडे यांना अशा पद्धतीचा अर्ज करण्याचा अधिकार आहे का? हा मुद्दा आल्यामुळे स्वतः समीर वानखेडे आज वाशिमला कोर्टात जाऊन संजय वानखेडे हे कोणी दूरचे नसून, आपलाच सख्खा चुलत भाऊ असल्याचे प्रतिज्ञापत्र देऊन नवाब मलिक यांच्या विरोधातल्या ॲट्रॉसिटी केस मध्ये ते दाखल करणार आहेत अशी माहिती एबीपी माझाच्या हाती. गोरेगावला आधीच अट्रोसिटी दाखल आहे. आता हा दुसरा ठरू शकतो.
Petrol-Diesel Price Today 25th August 2022 : संपूर्ण देशभरात सर्वोच्च पातळीवर असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. अशातच सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की, पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol-Diesel Price) कमी कधी होणार? तब्बल 95 दिवसांपासून महाराष्ट्र वगळता देशातील पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या (Diesel) किमती स्थिर आहेत. तर राज्यात गेल्या 42 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ अथवा घट करण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आभाळाला भिडल्या होत्या. तेव्हापासून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्यानं चढ-उतार पाहायला मिळत आहे. पण तरिही देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घट पाहायला मिळाली होती. ब्रेंट क्रूड ऑईल 100 डॉलर्सच्या खाली आलं होतं. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये दिलासा मिळण्याची अपेक्षा सर्वसामान्यांना होती. पण तेव्हाही दर स्थिर होते. आता कच्च्या तेलानं पुन्हा 100 डॉलर प्रति बॅरल पार केलं आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती स्वस्त होण्याच्या आशा मावळल्या आहेत.
Palghar Accident Update : मनोर विक्रमगड रोडवर पालघर अमळनेर एसटी बसचा आणि आयशर टेंपोचा भीषण अपघात
अपघातात पाच प्रवाशी जखमी
जखमींवर मनोर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
पालघर हून अमळनेर कडे जाणाऱ्या बसला आयशर टेम्पो ने समोर समोर धडक दिल्याने घडला अपघात
मध्य रेल्वेची कसारा ते आसनगाव पर्यंत वाहतूक विस्कळीत, दुरंतो एक्सप्रेसचे इंजिन तासाभरापूर्वी खर्डी जवळ झाले फेल, दुसरे इंजिन युद्ध पातळीवर जोडण्याचा रेल्वेचा प्रयत्न, यामुळे कसारा ते आसनगाव पर्यंतच्या लोकल वाहतुकीला फटका
युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनालाच रशियाचा हल्ला. रेल्वे स्थानकावर स्फोट, 22 जणांचा मृत्यू 50 जखमी; युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता
Bilkis Bano Case : बिलकिस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेविरोधातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश एनव्ही रमना, न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि विक्रम नाथ यांच्या खंडपीठासमोर होणार आहे.
Amravati News : अमरावती जिल्ह्यात बच्चू कडू यांच्या पक्षातील दर्यापूर युवा तालुका प्रमुख शिवसेनेत.
प्रहारचे युवा तालुकाप्रमुख किरण होले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनाप्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश.
अमरावती शिवसेना जिल्हाप्रमुख खराटे यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश.
माजी जिल्हा परिषदचे अपक्ष असलेले सदस्य सुनील डिके यांचा सुद्धा शिवसेनेत प्रवेश.
दर्यापूर तालुक्यातील खल्लार येथील काँग्रेसचे सरपंच योगेश मापारी यांचा सुद्धा शिवसेनेत प्रवेश.
दर्यापूर तालुक्यात शिवसेना पुन्हा सक्रिय. कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून जाहीर प्रवेश.
पार्श्वभूमी
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष पाच सदस्यीय घटनापीठापुढे....आजच्या सुनावणी अनिश्चितता कायम
23 ऑगस्टला सुप्रिम कोर्टात झालेल्या सुनावणीत महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाचे प्रकरण खंडपीठीकडे पाठवण्यात आलाय. आज पाच सदस्यांच्या खंडपीठापुढे महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची पहिली सुनावणी होणार आहे. या खंडपीठात कोण कोण न्यायमुर्ती असणार? खंडपीठ कोण कोणत्या विषयावर सुनावणी करणार? ही सुनावणी कालबद्ध असणार का? या सर्व गोष्टींवर आज स्पष्टता येण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेना कोणाची या बाबात निवडणुक आयोगात सुरू असलेल्या याचिकेचं काय होणार यात स्पष्टता येण्याची शक्यता.
राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस
शिदें सरकारचे पहिले अधिवेशन 17 ते 25 ऑगस्ट दरम्यान झाले आहे. अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत. विरोधी पक्षाने मोठ्या प्रमाणावर टीका केली आहे, याला मुख्यमंत्री उत्तर देतील. हे उत्तर देताना सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे अँक्शन मोडवर
राज ठाकरे अँक्शन मोडमध्ये आले आहे. शस्त्रक्रिया आणि विश्रांती अशा दोन महिन्याच्या कालावधीनंतर राज ठाकरे अँक्शन मोडमध्ये आलेत. मुंबईत दोन दिवस पदाधिकारी बैठक आणि मेळव्यानंतर आज ते पुण्यात असणार आहेत. पुण्यातून आज मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी शुभारंभाला राज ठाकरे उपस्थित रहाणार आहेत. पुण्यातल्या मध्यवर्ती कार्यालयात सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
बिल्कीस बानोने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी
सन 2002 सालच्या गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय हिंसाचारात गर्भवती असलेल्या बिल्कीस बानोवर सामूहिक बलात्कार झाला झाला होता बिल्किस बानो बलात्कार प्रकरणी जन्मठेप भोगत असलेल्या 11 जणांची सुटका करण्यात आली आहेत. या सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाविरोधात बिल्कीस बानोने याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर गुरूवारी सुनावणी होणार आहे
पीएमएलए कायद्यातील तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी
Prevention of Money Laundering Act (PMLA) कायद्यातील तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे
पेगॅसीस प्रकरणी आज सर्वोच्च न्यायलयात
देशभरातील 40 हून अधिक पत्रकार आणि महत्वाच्या नेत्यांवर पाळत ठेवल्या प्रकरणी चर्चेत आले. पेगॅसस स्पायवेअरसंबंधी स्थापन केलेल्या स्वतंत्र समितीने त्याचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. आज या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे.
आज गुरु पुष्यामृत योग
आज गुरु पुष्यामृत योग आहे. या दिवशी सोने खरेदी ही शुभ आणि बरकत देणारी असल्याची अनेक ग्राहकांची श्रद्धा असल्याने या निमित्ताने सोने खरेदी साठी ग्राहक सोन्याच्या दुकानात गर्दी करीत असतात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -