Maharashtra Breaking News LIVE Updates : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Feb 2022 05:01 PM
Russia Ukraine : रायगडमधील 30 विद्यार्थी अडकले युक्रेनमध्ये

रायगड जिल्ह्यातील कर्जत, नागोठणे, खोपोली, महाड, माणगाव, पनवेल, खालापूर,पेण, तळा, अलिबाग येथील 30 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. तेथील प्रशासनाने याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान त्यांना देशात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

Third Gender: सार्वजनिक रुग्णालय, मेडिकल कॉलेजमध्ये तृतीयपंथीयांच्या उपचारासाठी स्वतंत्र बेड्स आणि वार्ड आरक्षित होणार

तृतीयपंथी नागरिकांना उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी यापुढे हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र बेड्स आणि वार्ड आरक्षित असावेत यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने एक निर्णय घेण्यात येणार आहे. त्या संबंधीचा आराखडा तयार करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत. यासाठी मेडिकल कॉलेज आणि सार्वजनिक रुग्णालयांना कायद्यानुसार या बाबतीत  धोरण ठरवण्याच्या देखील सूचना करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.

Jalna News : जालना सार्वजनिक रुग्णालयात तृतीयपंथीयांच्या स्पेशल वार्ड

जालना सार्वजनिक रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजमध्ये तृतीयपंथीयांच्या उपचारासाठी स्वतंत्र बेड्स आणि वार्ड आरक्षित होणार आहे. तृतीयपंथीयांच्या विनंती वरून आरोग्यमंत्री टोपे यांच्याकडून आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Nawab Malik : नवाब मलिक जे. जे. रुग्णालयात भरती

Nawab Malik :  नवाब मलिक यांना जे जे रुग्णालयातील Urology वार्ड मध्ये अॅडमिट केले आहे

Mumbai : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा

Maharashtra News :  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील कोर्टापुढे हजर राहण्याच्या निर्देशांना स्थगिती दिली. 2 मार्चच्या सुनावणीत हजेरी लावण्यासाठी माझगाव दंडाधिकारी कोर्टाकडनं जारी झालेल्या समन्सला स्थगिती दिली असून पुढील सुनावणी 25 मार्चला होणार आहे

Nanded : नांदेड जिल्ह्यातील 20 विद्यार्थी युक्रेनमध्ये, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

नांदेड जिल्ह्यातील 20 विद्यार्थी युक्रेनमध्ये असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे. हे सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली आहेत. रशिया आणि युक्रेन या देशात युद्ध सुरू झाले असून या परिस्थितीत युक्रेनमध्ये व्यवसायानिमित्त गेलेल्या आणि अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थी आणि नागरिकांची माहिती घेतली जात आहे. त्यात नातेवाईक,पालकांनी प्रशासनाशी संपर्क साधून ही माहिती दिली आहे.

Mumbai School : मार्चपासून मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळा या पूर्वीच्या वेळेनुसार

Mumbai School : मार्चपासून मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळा या पूर्वीच्या वेळेनुसार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भरवण्याचा विचार, लवकरच या संदर्भात परिपत्रक काढले जाणार आहे. कोरोनापूर्वी ज्याप्रमाणे शाळांचे वेळापत्रक, विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. शिवाय अतिरिक्त अभ्यासक्रम-उपक्रम हे शाळांमध्ये घेतला जाणार  आहे

ST Strike: एसटी संपाचा तिढा कायम, सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलली

राज्यात सुरू असलेल्या एसटी संपाचा तिढा कायम असून त्यासंबंधीची सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलली आहे. राज्य सरकारने विलिनीकरणासंबंधीचा उच्चस्तरिय समितीचा अहवाल कोर्टात सादर केला असून तो जाहीर करता येणार नाही अशी भूमिका घेतली आहे.  

एसटीच्या विलीनाकरणाचा अहवाल जाहीर करता येणार नाही.  राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात माहिती  

ST news : एसटीच्या विलीनाकरणाचा अहवाल जाहीर करता येणार नाही.  राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात माहिती  

Russia-Ukraine War : युक्रेनमध्ये अडकले अकोला शहरातील चार विद्यार्थी

Russia-Ukraine War : युक्रेनमध्ये अकोला शहरातील चार विद्यार्थी अडकलेत. अडकलेले चारही विद्यार्थी एमबीबीएसचं शिक्षण घेत अहेत. शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मोहित मालेकर, हुसेन खान, प्राप्ती भालेराव आणि जॅक निक्सन यांचा समावेश. एक विद्यार्थी लव्हीह शहरात तर दोघेजण बोकोव्हिल्लम येथे आहेत. तर एक विद्यार्थी भारतीय दुतावासात अडकला आहे. विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी जिल्हा प्रशासन भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात.


 

Nashik News : नाशिकमध्ये शिवसेनेकडून भाजपला दणका, 4 ते 5 नगरसेवक शिवसेनेत करणार प्रवेश

Nashik News : ईडीच्या कारवाईमुळे शिवसेना भाजप मधील तणाव वाढत असतानाच शिवसेनेकडून भाजपला दणका बसणार आहे. भाजपाचे 4 ते 5 नगरसेवक आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मळत आहे. संजय राऊत यांना घेरण्याचा प्रयत्न सूरु असतानाच राऊताकडून भाजपाला खिंडार पाडण्याचे प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. माजी उपमहापौर प्रथमेश गीते, यांच्यासह इतर नगरसेवक संध्याकाळी 5 वाजता प्रवेश करणार आहेत. 
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर फोडा फोडीला सुरूवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Nanded News : नांदेडला केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत महाविकास आघाडी सरकारची निदर्शने
 

Nanded News : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्याचे महाविकास आघाडीत तीव्र पडसाद उमटले आहेत. आज महाविकास आघाडीकडून नांदेड शहरातील आय टी आय इथे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून सुरू असलेल्या भाजपच्या दडपशाही केल्याचा आरोप करीत एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. त्यासाठी आज नांदेड मध्ये महाविकास आघाडीमधील आमदार , पदाधिकारी केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात निदर्शने करत आहेत. दरम्यान महाविकास आघाडीने केलेल्या या निदर्शनात शिवसेनेचे फक्त झेंडे दिसून आले, मात्र शिवसेनेच्या आमदार व पदाधिकाऱ्यांनी मात्र याकडे पाठ फिरवलीय. यावेळी आंदोलकांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केलीय. महाविकास आघाडीच्या निदर्शनात शिवसेनेचे फक्त झेंडे, आमदार व पदाधिकाऱ्यांचा सहभाग नाही.
Neil Somaiya : नील सोमय्या यांची अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका, आज सुनावणीची शक्यता

Mumbai: मुंबई: महापौर किशोरी पेडणेकर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घराजवळ पोहचल्या

Mumbai:  मुंबई: महापौर किशोरी पेडणेकर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घराजवळ पोहचल्या. जाधव यांच्या घरावर आयकर विभागाची धाड

Nashik News नाशिक : नवाब मलिक यांच्या समर्थनात द्वारका चौकात राष्ट्रवादी-शिवसेनेची निदर्शने

Nawab Malik : नवाब मलिक यांच्या समर्थनात ईडीच्या कारवाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक,  मुंबई-आग्रा महामार्गावर द्वारका चौकात राष्ट्रवादीचे आंदोलन शिवसैनिक ही उपस्थित


 

Beed News : बीड: जिल्हाधिकारी कचेरी परिसरातील मुद्रांक विभागासमोर गोळीबार. गोळीबारात दोन जण जखमी

Beed News : बीड: जिल्हाधिकारी कचेरी परिसरातील मुद्रांक विभागासमोर गोळीबार. गोळीबारात दोन जण जखमी; पोलीस घटनास्थळी दाखल

Beed : जिल्हाधिकारी कचेरी कार्यालय परिसरात गोळीबार; दोन जण जखमी

Beed : जिल्हाधिकारी कचेरी कार्यालय परिसरात गोळीबार झाला. गोळीबारात दोन जण जखमी झाले आहेत.  जिल्हाधिकारी कचेरी  परिसरातील मुद्रांक विभागासमोर गोळीबार करण्यात आला.पैशाच्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.गोळीबार करणारे फरार आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. गोळीबारातील जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. सतीश क्षीरसागर आणि फारूक सिद्दीकी गोळीबारातील जखमीचे नावं आहेत. 

Pune News : पुणे महापालिका निवडणुका आधी आज महापालिकेची शेवटची सभा; सत्ताधारी भाजपकडून हजार कोटीहून अधिक रक्कमेच्या कामांना मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न

Pune News : पुणे महापालिका निवडणुका आधी आज महापालिकेची शेवटची सभा होणार आहे.यामध्ये सत्ताधारी भाजपकडून हजार कोटीहून अधिक रक्कमेच्या कामांना मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न

Maharashtra Student in Ukraine : रायगड जिल्ह्यातील 22 विद्यार्थी अडकले युक्रेनमध्ये अडकले

Russia Ukraine War :  रायगड जिल्ह्यातील 22 विद्यार्थी अडकले युक्रेनमध्ये अडकले, जिल्हा प्रशासनाच्या हेल्पलाईन नंबरवर पालकांनी साधला संपर्क. पेण, पनवेल, खारघर येथील आहेत विद्यार्थी

2018 मध्ये झालेल्या TET परीक्षेतही अपात्र परीक्षार्थी झाले पात्र 

2018 मध्ये झालेल्या TET परीक्षेतही मोठ्या संख्येने अपात्र परीक्षार्थी पात्र झाले आहेत. सायबर पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या तपासात तब्बल 1 हजार 778 परीक्षार्थी पात्र झाल्याचे समोर आले आहे. 
2019 प्रमाणेच 2018 लाही मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी बोगस शिक्षक झाले आहेत. 2018 च्या TET परीक्षेच्या घोटाळ्यात आत्तापर्यंत 12 आरोपींना अटक केली आहे. तर यात आणखी 12 जण असल्याची नावे निष्पन्न झाली आहेत. सायबर पोलिसांकडून त्या 12 जणांचा शोध सुरु आहे. 2019 प्रमाणेच 2018 च्या TET परीक्षेच्या घोटाळ्याची व्याप्ती वाढली आहे. 

पार्श्वभूमी

Mahesh Landge : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने गुरुवारी ठिकठिकाणी आंदोलने केली. यावेळी पिंपरी-चिंचवडमध्ये देखील भाजपने आंदोलन केले. यावेळी नवाब मलिक यांच्यावर टीका करताना भाजपचे आमदार महेश लांडगे यांची जीभ घसरली. देशद्रोही मलिकला अटक नाही, तर भरचौकात फाशी दिली पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य लांडगे यांनी केले आहे. मलिक यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा लगावला.


Beed: बीड जिल्ह्यात कत्तलखान्यांवर महिनाभरात चार कारवाया, 32 लाखांचा मुद्देमाल जप्त


बीड: कत्तल करण्यास बंदी असलेल्या गोवंशीय जनावराच्या कत्तलखान्यावरती कारवाई करण्याच्या घटना बीडमध्ये वाढताना पाहायला मिळत आहेत. एका महिन्यामध्ये चार मोठ्या कारवाया बीड जिल्ह्यामध्ये झाल्या आहेत. ज्यामध्ये 32 लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थळावरुन हस्तगत केला आहे. तर जिल्ह्यातील 118 जनावरांच्या कत्तलखान्यातून पोलिसांनी सुटका केली आहे.


Udayanraje: 'मावळ्यांची शाळा' जागवणार मराठ्यांचा धगधगता इतिहास; उदयनराजेंच्या प्रेरणेतून राबवली जाणार संकल्पना


सातारा: लहान मुलांना भावी आयुष्यात वाटचाल करत असताना त्यांना इतिहासाचा विसर होऊनये म्हणून मावळ्यांच्या शाळेच्या माध्यमातून जागृती केली पाहिजे असं खासदार उदयनराजे म्हणाले. उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त ते नेमकी कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्यावर आता उत्तर मिळालं असून त्यांच्या प्रेरणेतून “मावळ्यांची शाळा” अशी एक संकल्पना राबवली जाणार आहे.


काय आहे मावळ्यांची शाळा? 
छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि त्यांच्याबरोबर लढलेले मावळे यांची माहिती पाठ्यपुस्तकात खूप कमी प्रमाणात असल्याचं सांगितलं जातं. त्याचबरोबर त्यांचा इतिहास फक्त चौथी आणि सातवीच्या पुस्तकातच शिकवला जातो. त्यामुळे हा इतिहास सर्व विद्यार्थांपर्यंत यावा आणि तो त्यांच्या स्मरणात दीर्घकाल राहावा या उद्देशातून 'मावळ्यांची शाळा' म्हणून ही कल्पना उभी केली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक मावळ्याची माहिती व्हिडीओ कॅसेट तयार करून प्रत्येक शाळेत त्याचे वाटप केले जाणार आहे. प्रत्येक शाळा आणि शिक्षकांनी ही मावळ्यांची माहिती व्हिडीओद्वारे वर्गातील विद्यार्थ्यांना वेळोवेळी दाखवावी. जेणेकरून छत्रपती शिवराय आणि शिवरायांच्या काळातील मावळे यांचा इतिहास हा त्याच्यासमोर कायम स्मरणात राहावा हा या कार्यक्रमाच्या मागचा एक उद्देश आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.