Maharashtra Breaking News 24 June 2022 : जिंतूरमधील वाघी धानोरा परिसरात मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांचे नुकसान

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Jun 2022 09:14 PM
Solapur : पोलीस उपनिरीक्षकास 12 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सोलापुरात पोलीस उपनिरीक्षकास 12 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

रेल्वे स्टेशन पोलीस चौकीत कार्यरत असणारे प्रशांत क्षीरसागर लाचलूचपत विभागाच्या जाळ्यात

खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडी चालकांकडून मासिक हप्ताची केली होती मागणी

हप्त्याची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले

Solapur News Update :  सोलापुरात पोलीस उपनिरीक्षकास 12 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सोलापुरात पोलीस उपनिरीक्षकाला 12 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहेत.  प्रशांत क्षीरसागर असं या उपनिरीक्षकाचं नाव आहे.  खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडी चालकांकडून मासिक हप्ताची  मागणी केली होती.  हप्त्याची रक्कम घेताना क्षीरसागर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. 

Arjun Khotkar : शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीची मोठी कारवाई, जालन्यातील कारखान्याची जमीन जप्त

शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीची मोठी कारवाई, खोतकरांच्या जालन्यातील कारखान्याची जमीन ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.  

Shirdi: शिर्डी विमानतळाची संरक्षक भिंत खचली; शेतकऱ्यांचे नुकसान

शुक्रवारी पहाटे शिर्डी परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने शिर्डी विमानतळाची संरक्षक भिंत ठिकठिकाणी कोसळल्याची घटना घडली आहे. संरक्षक भिंतीच्या निकृष्ठ कामाचे पितळ यामुळे उघडे पडले असून रन वे वरील वाहून जाणारे पाणी आजूबाजूच्या शेतात घुसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच शेतातील विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात माती गेल्याने विहिरी बुजण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील उभी पिके वाहून गेली असून शेती पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. विमानतळ प्राधिकरणाने याची जबाबदारी घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

जुग जुग जियो आज प्रदर्शित होणार

दिग्दर्शक करण जोहरचा  जुग जुग जियो  हा चित्रपट आज  प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  जुग जुग जियो या चित्रपटामध्ये कियारा आडवाणी, वरुण धवन, अनिल कपूर आणि नितू कपूर  हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा विनोदी असणार आहे, ट्रेलरवरून याचा अंदाज येतो. 

अग्निपथ योजनेविरुद्ध संयुक्त किसान मोर्चाचे देशव्यापी आंदोलन

केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी घोषीत केलेल्या अग्निपथ योजनेविरुद्ध संयुक्त किसान मोर्चा देशव्यापी आंदोलन करणार आहे.

द्रौपदी मुर्मू आज उमेदवारी अर्ज भरणार

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी  एनडीएने   द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. मुर्मू आज दुपारी 12.30 वाजता  आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. भाजप संसदीय मंडळाने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी 20 नावांवर चर्चा केली. त्यानंतर पूर्व भारतातील आदिवासी महिलेची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. द्रौपदी मुर्मू भाजपच्या उमेदवार आहेत. 

एकनाथ शिंदेंचे पुन्हा एकदा विधानसभा उपाध्यक्षांना पत्र

एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहिलंय.  भरत गोगावलेच शिवसेनेचे मुख्य प्रतोद आहेत, असं पत्र एकनाथ शिंदेंनी लिहिलंय. 12 आमदारांना कारवाई करण्याचं पत्र ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी दिलं होतं. त्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी पुन्हा पत्र लिहित भरत गोगावलेच आमचे प्रतोद आहेत असं म्हटलंय. त्यामुळे एकनाथ  शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे वाद शिगेला पोहोचल्याचं दिसून येतंय.

Anil Parab ED Inquiry : सलग चौथ्या दिवशी अनिल परबांची ईडी चौकशी

Anil Parab ED Inquiry : राज्यात सत्तासंघर्षाचा पेच दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याचे ढग गडद होत चालले आहेत. अशातच शिंदे गटात जाणाऱ्या शिवसेना आमदारांचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाही. अनेक आमदार ईडी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या भितीमुळे शिंदे गटात सामील होत असल्याचं बोललं जात आहेत. तसेच, सत्ताधाऱ्यांकडूनही असेच आरोप केले जात आहे. एकिकडे शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय, तर दुसरीकडे शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब गेले तीन दिवस ईडी चौकशीला सामोरे जात आहेत. काल (गुरुवारी) अनिल परबांची सलग तिसऱ्या दिवशी सहा तास ईडीकडून चौकशी करण्यात आली. तर परबांना आज 11 वाजता पुन्हा चौकशीला बोलवण्यात आलं आहे. आज सलग चौथ्या दिवशी दापोली रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांची ईडी चौकशी होणार आहे. 

ईडीनं अनिल परब यांना आज, शुक्रवारी पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. मागील तीन दिवसांपासून शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. मंगळवारी तब्बल 11 तास, बुधवारी जवळपास आठ तास, तर गुरुवारी सहा तास ईडीनं अनिल परब यांची चौकशी केली. त्यानंतरही त्यांची अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही. आज अनिल परब यांना ईडीनं पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावलं आहे.

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..

एकनाथ शिंदेंचे पुन्हा एकदा विधानसभा उपाध्यक्षांना पत्र 

एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहिलंय.  भरत गोगावलेच शिवसेनेचे मुख्य प्रतोद आहेत, असं पत्र एकनाथ शिंदेंनी लिहिलंय. 12 आमदारांना कारवाई करण्याचं पत्र ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी दिलं होतं. त्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी पुन्हा पत्र लिहित भरत गोगावलेच आमचे प्रतोद आहेत असं म्हटलंय. त्यामुळे एकनाथ  शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे वाद शिगेला पोहोचल्याचं दिसून येतंय.

अनिल परबांची सलग चौथ्या दिवशी ईडीकडून चौकशी

दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परबांची सलग चौथ्या दिवशी ईडीकडून चौकशी होणार आहे. परबांना आज ११ वाजता पुन्हा चौकशीला बोलावलंय. दापोलीतील कथित बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणात ईडीकडून अनिल परब यांची चौकशी सुरु आहे.

द्रौपदी मुर्मू  आज उमेदवारी अर्ज भरणार

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी  एनडीएने   द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. मुर्मू आज दुपारी 12.30 वाजता  आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. भाजप संसदीय मंडळाने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी 20 नावांवर चर्चा केली. त्यानंतर पूर्व भारतातील आदिवासी महिलेची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. द्रौपदी मुर्मू भाजपच्या उमेदवार आहेत. 

अग्निपथ योजनेविरुद्ध संयुक्त किसान मोर्चाचे देशव्यापी आंदोलन

केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी घोषीत केलेल्या अग्निपथ योजनेविरुद्ध संयुक्त किसान मोर्चा देशव्यापी आंदोलन करणार आहे.

 जुग जुग जियो आज प्रदर्शित होणार

दिग्दर्शक करण जोहरचा  जुग जुग जियो  हा चित्रपट आज  प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  जुग जुग जियो या चित्रपटामध्ये कियारा आडवाणी, वरुण धवन, अनिल कपूर आणि नितू कपूर  हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा विनोदी असणार आहे, ट्रेलरवरून याचा अंदाज येतो. 

आज शमशेराचा ट्रेलर लॉन्च होणार

 बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर  सध्या 'शमशेरा'  सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात संजय दत्त  आणि वाणी कपूरदेखील दिसणार आहे. आज शमशेराचा आज ट्रेलर लॉन्च होणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.