Maharashtra Breaking News 22 June 2022 : नारायण राणेंना हायकोर्टाचा दणका, जुहू येथील 'अधीश' बंगल्यावरील कारवाईविरोधातील याचिका फेटाळली

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Jun 2022 05:00 PM
Aurangabad Rain Update: सिल्लोड,कन्नड तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस

Aurangabad: औरंगाबादच्या सिल्लोड शहरात साडेचार वाजेच्या दरम्यान जोरदार पावसाने हजेरी लावली.तर कन्नड शहरासह अंधानेर परिसरात सुद्धा मुसळधार पावसाने हजेरी लावल्याचं पाहायला मिळाले. असे असले तरीही जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांचे लक्ष पावसाकडे लागले आहे.

Narayan rane News: नारायण राणेंना हायकोर्टाचा दणका, जुहू येथील 'अधीश' बंगल्यावरील कारवाईविरोधातील याचिका फेटाळली

Narayan rane News: नारायण राणेंना हायकोर्टाचा दणका, जुहू येथील 'अधीश' बंगल्यावरील कारवाईविरोधातील याचिका फेटाळली

सर्वोच्च न्यायासयात दाद मागण्यासाठी 6 आठवड्यांची मुदत

तूर्तास पालिकेच्या कारवाईला स्थगिती

Maharashtra News : तळकोकणातील आंबोलीत तस्कर हत्तीचं रस्त्यावर दर्शन

Maharashtra News : सावंतवाडी कोल्हापूर राज्य महामार्गावर आंबोलीत तस्कर हत्तीचं दर्शन. रात्री आंबोलीत वाहनचालकांना तस्कर हत्ती रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना वाहनांच्या लाइटमुळे माघारी परतला. गेले काही दिवस दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात हैदोस घालून आता तस्कर हत्ती आंबोलीत दाखल झाला आहे. वाहनचालकांच्या मोबाईल मध्ये कैद झाला आहे. 

पणदरे येथील छायाचित्रकार प्रवीण जगताप यांनी सातव्या इंटरनॅशनल वाइल्डलाइफ फोटोग्राफी स्पर्धेत दुसरा क्रमांक

बारामती तालुक्यातील पणदरे येथील छायाचित्रकार प्रवीण जगताप यांनी सातव्या इंटरनॅशनल वाइल्डलाइफ फोटोग्राफी स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. प्रविण जगताप यांचे या यशाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील कौतुक केले आहे. 174 देशांमधील चार लाख 70 हजार छायाचित्रे या स्पर्धेत सहभागी झाली होती अशी माहिती प्रवीण जगताप यांनी दिली..तसेच या स्पर्धेत जगभरातून जवळपास सव्वा लाख स्पर्धक सहभागी झाले होते अशीही माहिती प्रवीण जगताप यांनी दिली. सव्वा लाख स्पर्धकांमध्ये प्रवीण जगताप यांच्या छायाचित्रास दुसरा क्रमांक मिळाला. माळेगावच्या शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतलेल्या प्रविण जगताप यांनी वन्यप्राण्यांची हजारोच्या चित्रे काढली आहेत. प्रविण जगताप यांनी मिळवलेल्या यशाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट करत प्रविण जगताप यांचे कौतुक केले आहे.

Bishkek : आशियाई स्पर्धेमध्ये महिला कुस्ती गटात भारताच्या अहिल्या शिंदेने 17 वर्षाखालील 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक

Bishkek : बिश्केक येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेमध्ये महिला कुस्ती गटात भारताच्या अहिल्या शिंदेने 17 वर्षाखालील 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले. अहिल्या ही इंदापूर तालुक्यातील शिरसोडी येथील असल्याने इंदापूर तालुक्‍यात या सुवर्ण पदकाचे कौतुक केले जात आहे.

अहिल्याने अंतिम लढतीत जपानच्या नात्सून मसुदा या महिला कुस्तीगीराचा तब्बल 10 -0 अशा फरकाने पराभव करत सुवर्ण पदक पटकावले. अहिल्याने हरियाणातील हिस्सार येथील गुरु हवासिंग आखाड्यात प्रशिक्षण घेतले आहे. कुस्ती स्पर्धा सुरू झाल्यानंतर तिने पहिल्या फेरीत संस्थांच्या कुमुशाय झुदान बॅकोओवा हिला 10-0 तर तिसऱ्या फेरीत कोरियाच्या जीन जू कांग हिला पण दहा शून्य फरकाने हरवले. इंदापूर तालुक्यात मिळाल्यानंतर अहिल्याच्या कुटुंबाचे सर्वांनी कौतुक केले. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आदींनी अहिल्याचे अभिनंदन केले.

सावंतवाडी-कोल्हापूर राज्य महामार्गावर आंबोलीत तस्कर हत्तीचं दर्शन

Sindhudurg News : सावंतवाडी-कोल्हापूर राज्य महामार्गावर आंबोलीत तस्कर हत्तीचं दर्शन झालं. रात्री आंबोलीत वाहनचालकांना तस्कर हत्ती रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना वाहनांच्या लाईटमुळे माघारी परतला. गेले काही दिवस दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात हैदोस घालून आता तस्कर हत्ती आंबोलीत दाखल झाला आहे. वाहनचालकांच्या मोबाईलमध्ये कैद झाला आहे. 

रिफायनरीसाठी चोख पोलीस बंदोबस्तात राजापूरमधील गोवळ, शिवणे खुर्द परिसरात पुन्हा ड्रोन सर्वेक्षण सुरु
Ratnagiri News : रिफायनरीसाठी पुन्हा चोख पोलीस बंदोबस्तात ड्रोन सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे. रिफायनरी प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्यातील गोवळ, शिवणे खुर्द परिसरात स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या विरोधानंतर बंद पडलेले सर्वेक्षणाचे काम पुन्हा सुरु करण्यात आलं आहे. 
पंतप्रधान मोदी आजपासून ब्रिक्सच्या दोन दिवसीय बैठकीत सामिल होणार

ब्रिक्स (ब्राझिल, रशिया, ब्राझिल, चीन आणि दक्षिण आफ्रिका) देशांचे दोन दिवसीय परिषद आजपासून चीनमध्ये होणार आहे. या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हर्च्युअली उपस्थित राहणार आहे. ही परिषद भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता सुरू होणार आहे. 

नारायण राणेंच्या याचिकेवर आज तातडीने सुनावणी

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पुन्हा हायकोर्टात धाव घेतली आहे. जुहू येथील अधीश बंगल्यावरील कारवाईविरोधात केलेलं अपील प्राधिकरणानं फेटाळलं. 24 जूनपर्यंत बंगल्यातील बेकायदेशीर बांधकामावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नारायण राणे आता या कारवाईवर दिलेली स्थगिती वाढवण्याची मागणी करणार आहेत. यावर आज तातडीची सुनावणी होणार आहे.

राष्ट्रवादीची महत्वाची बैठक

आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वाय बी चव्हाण सेंटरवर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक होणार आहे. सध्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष वेट अँण्ड वॉच च्या भूमिकेत आहेत. एकनाथ शिंदेच्या भूमिकेनंतर शिवसेना पुढचं पाऊल काय उचलणार याकडे राष्ट्रवादीचे लक्ष आहे. या बैठकीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्व नेते आणि मंत्री सुद्धा सहभागी होणार आहेत.

अनिल परब यांची तिसऱ्या दिवशीही चौकशी होणार

मागील दोन दिवसांपासून शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. मंगळवारी तब्बल 11 तास आणि बुधवारी जवळपास आठ तास ईडीने अनिल परब यांची चौकशी केली. त्यानंतरही त्यांची अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही. अनिल परब यांना ईडीने पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. गुरुवारी पुन्हा एकदा त्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. अनिल परब यांना ईडीने गुरुवारी सकाळी 11 वाजता पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवले आहे. ईडीने त्यांना काही कागदपत्रांची यादी दिली असून त्याची गुरुवारी पूर्तता करण्यास सांगितलेय.  दापोलीतील कथित बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणात ईडीकडून अनिल परब यांची चौकशी सुरु आहे. 

राज्यातील राजकीय नाट्य सुरू, आजचा दिवस महत्त्वाचा

महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला असून आज तिसऱ्या दिवशी नाराजी नाट्य सुरू रहाणार असल्याचं स्पष्ट आहे.  शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर राज्य निर्माण झालेला पेच कसा सुटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरेंनी भावनिक साद घालत समोर या मी राजीनामा तयार ठेवतो असं म्हंटलं. 

या बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील गुवाहाटीला पोहोचले असून उदय सामंतही गुवाहाटीला पोहचत आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी काय घडामोडी घडणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.  
 
पार्श्वभूमी

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

राज्यातील राजकीय नाट्य सुरू, आजचा दिवस महत्त्वाचा
महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला असून आज तिसऱ्या दिवशी नाराजी नाट्य सुरू रहाणार असल्याचं स्पष्ट आहे.  शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर राज्य निर्माण झालेला पेच कसा सुटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरेंनी भावनिक साद घालत समोर या मी राजीनामा तयार ठेवतो असं म्हंटलं. 

या बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील गुवाहाटीला पोहोचले असून उदय सामंतही गुवाहाटीला पोहचत आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी काय घडामोडी घडणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.  
 
अनिल परब यांची तिसऱ्या दिवशीही चौकशी होणार
मागील दोन दिवसांपासून शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. मंगळवारी तब्बल 11 तास आणि बुधवारी जवळपास आठ तास ईडीने अनिल परब यांची चौकशी केली. त्यानंतरही त्यांची अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही. अनिल परब यांना ईडीने पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. गुरुवारी पुन्हा एकदा त्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. अनिल परब यांना ईडीने गुरुवारी सकाळी 11 वाजता पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवले आहे. ईडीने त्यांना काही कागदपत्रांची यादी दिली असून त्याची गुरुवारी पूर्तता करण्यास सांगितलेय.  दापोलीतील कथित बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणात ईडीकडून अनिल परब यांची चौकशी सुरु आहे. 

राष्ट्रवादीची महत्वाची बैठक
आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वाय बी चव्हाण सेंटरवर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक होणार आहे. सध्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष वेट अँण्ड वॉच च्या भूमिकेत आहेत. एकनाथ शिंदेच्या भूमिकेनंतर शिवसेना पुढचं पाऊल काय उचलणार याकडे राष्ट्रवादीचे लक्ष आहे. या बैठकीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्व नेते आणि मंत्री सुद्धा सहभागी होणार आहेत.

नारायण राणेंच्या याचिकेवर आज तातडीने सुनावणी
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पुन्हा हायकोर्टात धाव घेतली आहे. जुहू येथील अधीश बंगल्यावरील कारवाईविरोधात केलेलं अपील प्राधिकरणानं फेटाळलं. 24 जूनपर्यंत बंगल्यातील बेकायदेशीर बांधकामावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नारायण राणे आता या कारवाईवर दिलेली स्थगिती वाढवण्याची मागणी करणार आहेत. यावर आज तातडीची सुनावणी होणार आहे.

पंतप्रधान मोदी आजपासून ब्रिक्सच्या दोन दिवसीय बैठकीत सामिल होणार
ब्रिक्स (ब्राझिल, रशिया, ब्राझिल, चीन आणि दक्षिण आफ्रिका) देशांचे दोन दिवसीय परिषद आजपासून चीनमध्ये होणार आहे. या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हर्च्युअली उपस्थित राहणार आहे. ही परिषद भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता सुरू होणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.