Maharashtra Breaking News 23 August 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Aug 2022 11:50 PM
Soniya Gandhi : सोनिया गांधी उपचारासाठी परदेशात जाणार

Soniya Gandhi : सोनिया गांधी उपचारासाठी परदेशात जाणार आहेत.  राहुल आणि प्रियांका गांधी वाड्रा देखील सोबत जाणार आहेत. राहुल गांधी 4 सप्टेंबरला दिल्लीत काँग्रेसची महागाई रॅली संबोधित करणार आहे.  7 सप्टेंबर पासून भारत जोडो यात्रा आहे.



बीड जिल्ह्यातल्या एकुरका गावात विहिरीत बुडून बापलेकाचा मृत्यू

बीडच्या केज तालुक्यातील एकुरका गावामध्ये विहिरीत बुडून बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 13 वर्षाचा रोहन नटराज धस हा सायंकाळच्या वेळी विहिरीत पाणी पिण्यासाठी उतरला असता तो पाय घसरून विहिरीत पडला. त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडत असताना त्याला बाहेर काढण्यासाठी त्याचे वडील नटराज धस यांनी देखील विहिरीत उडी घेतली. मात्र दुर्दैवाने या दोघा बापलेकांचा बुडून मृत्यू झाला.

MP Flood : एमआय-17 व्ही-5 हेलिकॉप्टरद्वारे 25 जणांना सुरक्षितस्थळी हलविले

नागपूरः मध्य प्रदेशातील पूरग्रस्तांच्या मदतीला मंगळवारी सकाळी नागपुरातून दोन एमआय-17 व्ही-5 हेलिकॉप्टर पाठविण्यात आले होते. या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मंगळवारी रात्रीपर्यंत 25 जणांचा रेस्क्यू करण्यात आला असून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. ऑपरेशन्समध्ये विंचिंग आणि लो होवर ऑपरेशन दोन्ही समाविष्ट होते. सध्या हे हेलिकॉप्टर मध्य प्रदेश येथील विदीशा येथे बचाव कार्यासाठी तैनात आहेत.

MP Flood : एमआय-17 व्ही-5 हेलिकॉप्टरद्वारे 25 जणांना सुरक्षितस्थळी हलविले

नागपूरः मध्य प्रदेशातील पूरग्रस्तांच्या मदतीला मंगळवारी सकाळी नागपुरातून दोन एमआय-17 व्ही-5 हेलिकॉप्टर पाठविण्यात आले होते. या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मंगळवारी रात्रीपर्यंत 25 जणांचा रेस्क्यू करण्यात आला असून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. ऑपरेशन्समध्ये विंचिंग आणि लो होवर ऑपरेशन दोन्ही समाविष्ट होते. सध्या हे हेलिकॉप्टर मध्य प्रधेश येथील विदीशा येथे बचाव कार्यासाठी तैनात आहेत.

Dombivali : डोंबिवली पश्चिम गायकवाडवाडी परिसरातील घटना, पारसनाथ इमारतीमध्ये एका तळमजल्यावरील घरात स्फोट

Dombivali : डोंबिवली पश्चिम गायकवाड वाडी परिसरातील पारसनाथ इमारतीमध्ये एका तळमजल्यावरील घरात स्फोट झाला आहे. या स्फोटात महिलेसह तीन जण जखमी आणि आठ वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे.  मनीषा मोरवेकर, उर्सुला लोढाया, चार वर्षाचा मुलगा रियांश, मनीषा मोर्वेकर यांच्या घरात स्फोट झाला आहे. उर्सुला लोधाया व तिचा चार वर्षाचा मुलगा पहिल्या माळ्यावर जात असताना अचानक झालेल्या स्फोटात जखमी झाले 

पुण्यातून अटक करण्यात आलेला संशयित दहशतवादी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील तीन प्रमुख लोकांवर करणार होते हल्ले, तपासातून माहिती समोर 

पुण्यातून अटक करण्यात आलेला संशयित दहशतवादी जुनैद मोहम्मद आणि त्याचे साथीदार दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील तीन प्रमुख लोकांवर हल्ले   करणार होते अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. नरसिंहानंद सरस्वती, गायक संदीप आचार्य आणि जितेंद्र नारायण उर्फ वसीम रिजवी या तिघांना अटक करण्यात आली होती.  

 Swapna Patkar  : स्वप्ना पाटकर यांची ईडी कार्यालयातील चौकशी संपली

 Swapna Patkar  : स्वप्ना पाटकर यांची ईडी कार्यालयातील आजची  चौकशी संपली आहे. जवळपास चार तास सुरू चौकशी होती. संजय राऊतांशी संबंधित पत्रावाला चाळ प्रकरण आणि अलिबाग जमीन व्यवहार प्रकरणात चौकशी झाली. 


 

Beed Crime : पतीच्या आत्महत्याप्रकरणी पत्नीवर गुन्हा दाखल
Beed Crime : बीडच्या माजलगाव शहरांमध्ये एका 25 वर्षीय तरुणाने बायकोच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी आता मयत तरुणाच्या पत्नी वर्गात माजलगावात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश सुरेश मुळे वय वर्ष 25 असं या तरुणाचा नाव आहे. त्यांने उजव्या कालव्यात एका लोखंडी अँगल लागल गळफास घेऊन आत्महत्या केली.  विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांने एक व्हिडिओ तयार केला आणि मी माझ्या पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहे असं त्यांने या व्हिडिओमधून सांगितले. 
थोड्याच वेळात विधान भवनात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बैठकीसाठी दाखल

थोड्याच वेळात विधान भवनात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधानभवनात पोहोचले आहेत. 

मंत्रालयात एकाचा आत्महत्येचा प्रयत्न, अग्निशमदलाचे अधिकारी घटनस्थळी दाखल

मंत्रालयात एकाने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. अग्निशमदलाचे अधिकारी घटनस्थळी दाखल झाले असून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याला इमारतीवरून खाली उतरवण्यात आले आहे.  

गोविंदापथकातील मृत पावलेल्या संदेश दळवी या तरूणाला सरकारकडून 10 लाखांची मदत

गोविंदापथकातील मृत पावलेल्या संदेश दळवी या तरूणाला सरकारकडून 10 लाखांची मदत देण्यात येणार आहे. आमदार दिलीप मामा लांडे चेक घेऊन दळवी कुटुंबियांना देणार आहे. अशा प्रकरची मदत देणारे एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री असल्याची प्रतिक्रिया दिलीप मामा लांडे यांनी दिली आहे. या मृत्यू बाबात राजकारण करणं दुर्दैवी असल्याची खंत देखील त्यांनी या वेळी व्यक्त केली

गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयितांवरील आरोप निश्चितबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर

गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयितांवरील आरोप निश्चितबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. 6 सप्टेंबर रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. सुनावणी वेळी एटीएस आणि एसआयटी या दोन्ही यंत्रणांच्या तपास अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

...म्हणून संजय राठोड यांना आमंत्रण नाही - भावना गवळी

आजच्या मेळाव्यात मंत्री संजय राठोड आणि वाशिम जिल्ह्याचे भाजप आमदार राजेंद्र पाटणी हे दोघे हजर नसल्याने चर्चा सुरू होत्या त्यावर भावना गवळी म्हणाल्या की, मंत्री संजय राठोड यांना मी निमंत्रण दिलं नाही, कारण अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे अधिवेशनात मंत्र्यांना तिथंच राहावं लागतं अशी प्रतिक्रिया खासदार भावना गवळी यांनी दिली... तर मी भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांना निमंत्रण दिलं होतं पण ते अधिवेशनात असल्याने त्यांचं येणं झालं नाही..

मर्सिडीजमध्ये बसून शिवसेना वाढली नसती; खासदार श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला 

महाराष्ट्र दौरे काढून कोणाला टॉवेल वाला, कोणाला टपरीवाला असे संबोधत आहात. मात्र बाळासाहेबांनी अशाच टॉवेल वाल्यासोबत, रिक्षा वाल्यासोबत शिवसेना वाढविली. शिवसेना ऑटो वालाच वाढवू शकतो, मर्सिडीजमध्ये बसून शिवसेना वाढली नसती, असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. 

Swapna Patker :  डॉ. स्वप्ना पाटकर चौकशीसाठी ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल

Swapna Patker :   डॉ. स्वप्ना पाटकर चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या घोटाळा प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात स्वप्ना पाटकर या साक्षीदार आहेत. यापूर्वीही ईडीनं स्वप्ना पाटकर यांचा जबाब नोंदवला होता.

Raj Thackeray LIVE : शस्त्रक्रियेचा अनुभव भयंकर होता : राज ठाकरे

Raj Thackeray LIVE : शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे यांची पहिलीच सभा आहे. कोरोनामुळे हाडांचा त्रास बळावला, माझ्या शस्त्रक्रियेला 2 महिने पूर्ण झाले आहेत. शस्त्रक्रियेचा अनुभव भयंकर होता, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. उद्या पुणे दौऱ्यावर जातोय. प्रवास करताना त्रास होतोय का? ते बघतो, असं ते म्हणाले. 

Raj Thackeray LIVE : मनसे आंदोलन अर्धवट सोडते हा आरोप चुकीचा : राज ठाकरे

Raj Thackeray LIVE : मनसे आंदोलन अर्धवट सोडते हा आरोप चुकीचा. टोलबाबत भाजपला प्रश्न विचारला पाहिजे, असं म्हणत टोल वसुलीबाबत राज ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आपल्या हिप बोनच्या शस्त्रक्रियेनंतर ॲक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. मुंबईत आज मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. यावेळी राज्यभरातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल झाले आहेत. 

विधानसभेत विरोधकांचा गदारोळ, मंत्र्यांच्या अनुपस्थितीवर विरोधकांचा आक्षेप

आज विधानसभेत विरोधकांनी चांगलाच गदारोळ केला. मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन विरोधक आक्रमक झाले होते. मंत्र्यांच्या अनुपस्थितीवर विरोधकांनी आक्षेप घेतला.    


 


 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आज साडेबारा वाजता सुनावणी

कोकणातील चिपी विमानतळावर उतरले दुसरे विमान मात्र प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद

Sindhudurg News : गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुंबई ते चिपी अस दुसरं विमान नियोजित तारखेनंतर चौथ्या दिवशी सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळावर दाखल झाले. मुंबई विमानतळावरुन टेक ऑफ घेतलेले एअर अलायन्स कंपनीचे विमान सिंधुदुर्ग चिपी विमानतळावर दाखल तर झालं. मात्र केवळ तीन प्रवासी घेऊन हे विमान आले आणि जाताना 12 प्रवाशांना घेऊन आकाशात झेपावलं. पहिल्या फेरीतील विमानाला सध्या चांगला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे मात्र दुसऱ्या फेरीतील विमानाला पहिल्याच दिवशी अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर आला असून चाकरमान्यांना दुसऱ्या विमानाचा कोकणात गणेशोत्सव येण्यासाठी उपयोग होईल.

मुंबई-गोवा हायवेवर चिपळूणमध्ये खड्डे चुकवताना दुचाकीस्वाराचा मृत्यू, आज महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
Ratnagiri News : मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे चुकवताना चिपळूणमध्ये एका मोटारसायकल चालकाचा अपघात होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर आज महामार्गावरील पडलेले खड्डे बुजवण्यासाठी सुरुवात केली आहे. अपघातात युवकाचा बळी गेल्यानंतर आता महामार्गावरील खड्डे भरताना कंत्राटदार कंपनीकडून दोन्ही बाजूंनी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
उस्मानाबादमधील नायगाव गावात पती-पतीची आत्महत्या

Osmanabad News : उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील नायगाव गावातील पोतदार कुटुंबातील पती-पत्नीने रात्री राहत्या घरातील पत्र्याखालील लोखंडी अडूला एकाच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल उघडकीस आली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. दोघांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्रकाश वसंत दीक्षित (वय 30 वर्षे)  तर अश्विनी प्रकाश दीक्षित (वय 27 वर्षे)  अशी आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचं नाव आहे. यांच्या पश्चात आई, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान या घटनेचा सोमवारी दुपारपर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. तपासानंतर या दाम्पत्याने कुठल्या कारणामुळे आत्महत्या केली हे स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं.


 

 
महाविकास आघाडीची आज बैठक, उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार

Maha Vikas Aghadi Meeting : महाविकास आघाडीची आज बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी साडे पाच ते सहाच्या सुमारास ही बैठक पार पडेल. महाविकास आघाडीचं भविष्य आणि विधीमंडळातील रणनीती याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.

पुरामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, त्यांना तातडीने मदत पुरवा : अजित पवार

Maharashtra Monsoon Assembly Session : पुरामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, त्यांना तातडीने मदत पुरवा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. पूरग्रस्तांच्या मागण्या सभागृहात मांडणार असं अजिक पवार म्हणाले 

मराठा आरक्षण प्रश्नी 25 ऑगस्टला सह्याद्री अतिथी गृहावर संध्याकाळी सात वाजता बैठक होणार

Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रश्नी 25 ऑगस्टला पार पडणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे 25 तारखेला संध्याकाळी 7 वाजता बैठक होणार आहे. बैठकीसाठी राज्यभरातील समन्वयक आणि नेते उपस्थित राहणार आहेत. विनायक मेटे यांच्या निधनानंतर आरक्षण प्रश्न मार्गी कधी लागणार यावर सरकाराला मराठा नेते धारेवर धरण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण प्रश्नी 14 ऑगस्टला सह्याद्री अतिथी गृह बैठक होणार होती. परंतु शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती. मराठा आरक्षण प्रश्नी आयोजित बैठकीला येताना विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघाती मृत्यू झाला.  

निवडणूक आयोगात आज शिवसेना पुन्हा मुदतवाढीचीच मागणी करणार, आयोगात उत्तर देण्यासाठी आज अंतिम दिवस

निवडणूक आयोगात आज शिवसेना पुन्हा मुदतवाढीचीच मागणी करणार


आज आयोगात उत्तर देण्यासाठीचा अंतिम दिवस आहे


पण शिवसेना उद्धव ठाकरे गट आज कुठली कागदपत्र न देता आयोगाला आणखी मुदत वाढीची विनंती करणार


आजच सुप्रीम कोर्टामध्ये देखील हालचाली करणार


 प्रकरण सुनावणीस येत नसल्याने वकील त्याबाबत मेन्शनिंग करणार

Patra Chawl Scam Case : पत्राचाळ प्रकरणात ईडीकडून स्वप्ना पाटकर यांना समन्स

Patra Chawl Scam Case : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याशी संबंधित पत्राचाळ घोटाळा (Patra chawl scam) प्रकरणात ईडीनं (ED) आज स्वप्ना पाटकर (Swapna Patker) यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. याच प्रकरणात संजय राऊत यांना ईडीनं अटक केली आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. कोर्टानं त्यांची न्यायालयीन कोठडी 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली असताना ईडीनं स्वप्ना पाटकर यांना चौकशीसाठी समन्स पाठवलं. राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) आणि स्वप्ना पाटकर यांच्या नावावर रायगड जिल्ह्यात जमीन खरेदी करण्यात आली आहे. या प्रकरणात स्वप्ना पाटकर यांनी राऊत यांच्यावर काही आरोपही केले आहेत. 



अंबरनाथ-बदलापूर दरम्यान चक्क मार्बलचा रस्ता, देव्हारे उत्पादकांनी खड्ड्यात टाकले मार्बलचे तुकडे, मार्बलच्या टोकदारपणामुळे गाड्यांच्या टायर्सचं नुकसान

Ambarnath News : अंबरनाथ आणि बदलापूर शहरांना जोडणाऱ्या काटई बदलापूर पाईपलाईन रोडवर हा मार्बलचा रस्ता तयार झाला आहे. या रस्त्यावरील चिखलोली डी मार्ट समोर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवण्यासाठी याच रस्त्याला लागून असलेल्या मार्बलचे देव्हारे तयार करणाऱ्या दुकानदारांनी खड्ड्यात मार्बलचे तुकडे आणि चुरा टाकला आहे. यामागचा या दुकानदारांचा हेतू जरी चांगला असला, तरी त्यामुळे फायदा कमी अन् त्रासच जास्त होत आहे. कारण हे मार्बलचे तुकडे टोकदार असल्याने गाड्यांच्या टायर्सचं मोठं नुकसान होतं आहे. त्यामुळे गाड्या मार्बल टाकलेला भाग सोडून बाजूजे चालवण्याची वेळ आली आहे्. परिणामी रस्त्याची एक बाजू वापराविना पडून असल्याने अर्ध्या रस्त्यावरुन सगळी वाहतूक होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान, या रस्त्याच्या डागडुजीची जबाबदारी ठरवण्यावरुन शासकीय यंत्रणांमध्येच संभ्रम असून त्यामुळे रस्त्याच्या दुरवस्थेकडे साफ दुर्लक्ष केलं जात आहे.

मराठा क्रांती ठोक मोर्चाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावरील आंदोलन मागे

Maratha Reservation : मराठा समाजाचे आरक्षण, सारथीचा प्रश्न, नोकरभरती, वसतिगृहाचे प्रश्न अशा विविध मागण्या घेऊन मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र काल मध्यरात्रीपर्यंत या प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबा पाटील आणि इतर कार्यकर्त्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीत हे मुद्दे मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्रीनी मराठा नेत्यांना दिल्याने हे आंदोलन मागे घेत असल्याचे आबा पाटील यांनी सांगितले.

Mumbai Dahi Handi 2022 : गोविंदाची मृत्यूशी झुंज अपयशी, मुंबईच्या विलेपार्ल्यात दहीहंडी खेळताना जखमी झालेला गोविंदा संदेश दळवीचा मृत्यू

Mumbai Dahi Handi 2022 : दोन दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या गोविंदाचा अखेर मृत्यू झाला. संदेश दळवी असं या गोविंदाचं नाव आहे. मुंबईतील नानावटी रुग्णालयात संदेशन अखेरचा श्वास घेतला. संदेश दळवी असं या गोविंदाचं नाव आहे. संदेश दळवी हा शिव शंभो गोविंदा पथकाचा गोविंदा होता. दहीहंडीला तो जखमी झाला होता. त्याला नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती शिवसेनेचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावळे यांनी दिली आहे.

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...


औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावं बदलण्याच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी


औरंगाबाद  आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावं बदलण्याच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर आज सुनवणी होणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने निव्वळ आपल्या राजकीय फायद्यासाठी बेकायदेशीररित्या आपल्या शेवटच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा प्रश्न घाईघाईत मार्गी लावला होता. त्यानंतर 16 जुलै रोजी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं याला स्थगिती देत काही तासांतच औरंगाबादचं नाव पुन्हा बदलून संभाजीनगर करत असल्याचं जाहीर केलं. या सर्वबाबींकडे या याचिकेतून न्यायालयाचं लक्ष वेधण्यात आलेलं आहे. 


खासदार भावना गवळी यांचं वाशिममध्ये मोठं शक्तीप्रदर्शन


खासदार भावना गवळी (Bhavna Gawali) वाशिममध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहेत. वाशिमच्या वाटणे लॉन इथे मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार. भाजप आणि शिंदे गटाचे नेते मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. भाजपचे प्रवीण दरेकर, खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार शहाजी बापू पाटील उपस्थित राहणार आहेत. 


राज ठाकरे अॅक्टिव्ह मोडमध्ये!


मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आपल्या हिप बोनच्या शस्त्रक्रियेनंतर ॲक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. आज  मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने या बैठकांना विशेष महत्त्व आहे. आज राज ठाकरे यांनी सदस्य नोंदणी संदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश दिले. 


आज इतिहासात 


1892 :  ब्राझीलचे पहिले अध्यक्ष डियोडोरो डा फोन्सेका यांचे निधन


1918  : श्रेष्ठ कवी, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विंदा करंदीकर  यांचा जन्म 


1944 : चित्रपट अभिनेत्री सायरा बानू यांचा जन्म


1971 :  मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्री  रतन साळगावकर यांचे निधन


1971 : मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री हंसा वाडकर यांचे निधन


1974 : मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचे निधन 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.