Maharashtra Breaking News LIVE Updates : मुंबईत दोघांच्या भांडणात उकळलेले तेल अंगावर सांडून लहान मुलगी आणि वृद्ध भाजले

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Mar 2022 01:37 PM
अकोला पोलिसांनी लुटला धुळवडीचा आनंद

नागरिकांना आपले कर्तव्य बजावून अकोला पोलिसांनी धुलीवंदनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज पोलिस बांधवांसोबत धुळवडीचा आनंद लुटला. या दरम्यान जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यातील पोलीस अधिकारी तसेच पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या शासकीय निवासस्थानी रंगपंचमीचा आनंद पोलिसांनी एन्जाय केला. सोबतचं ढोल-तशाच्या तालावर ठेकाही धरलाय.

नागपूरचे माजी महापौर पांडुरंग हिवरकर यांच्यासह दोघांना नागपूर पोलिसांनी अटक केली

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नागपूरचे माजी महापौर पांडुरंग हिवरकर यांच्यासह दोघांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे...


काल (होळीच्या दिवशी) रामेश्वरी चौक परिसरात कार आणि दुचाकी मध्ये झालेल्या एका अपघातात दुचाकीस्वारावर त्वरित कारवाई करा असा दबाव माजी महापौर पांडुरंग हिवरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांवर आणला होता...


त्याच मुद्द्यावरून त्यांची पोलिसांसोबत वादावादी झाली होती... हिवरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा कालच अजनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता.... 


त्या प्रकरणी पांडुरंग शिवरकर यांना आज अटक करण्यात आली आहे....

मुंडे बहीण भावात रंगले शाब्दिक युद्ध

बीडमधील मुंडे बहिण भावात आज पुन्हा आरोप प्रत्यारोप पहायला मिळाला. धनंजय मुंडे यांनी दुपारी जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण केले तर सायंकाळी बीड तालुक्यातील बेलेश्र्वर याठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान याच निमित्ताने या बहिण भावात शाब्दिक युद्ध रंगले. पाच वर्ष आम्ही सत्तेत होतो प्रत्येक कोन शिला आणि निमंत्रण पत्रिकेवर त्यांचं नाव असायचे आज त्यांनी मोठे पणा दाखवला नाही. मात्र आम्ही नक्की दाखवू, मी बीड जिल्ह्याची बदनामी नाही तर काळजी केली. ते विरोधी पक्षात असताना वेठीस धरायचे असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडे यांच्या वर निशाणा साधला आहे.

35 of 22,405 सांगली जिल्ह्यातील वातावरणात बदल

उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना अवकाळी पावसाने दिलासा दिला आहे. आज अचानक सांगली शहरासह मिरज आणि आसपास गावात अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली.. रिमझिम आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस याठिकाणी कोसळला.  गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला आहे.. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक उकाड्याने हैराण केले आहे.. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असताना शनिवारी सायंकाळच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला.... त्यानंतर सांगली आणि मिरज शहरामध्ये अवकाळी पाऊस चांगलाच बरसला आहे...काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी रिमझिम असा पाऊस पडला आहे...या पावसामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण होऊन, उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे....

प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज

तेजस मोरेचा वकिलामार्फत विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज- 
विषेश सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी त्यांचे स्टिंग ऑपरेशन त्यांच्याकडे अशील म्हणून येणाऱ्या तेजस मोरेने केल्याचा केल्याचा आरोप केला होता. प्रवीण चव्हाण यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तेजस मोरेच्या विरोधात तक्रार देखील दाखल केलीय. आज तेजस मोरेनेही त्याच्या वकिलामार्फत वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कट रचल्याची तक्रार दाखल केलीय.  प्रवीण चव्हाण हे आपल्या विरोधात कट रचून आपल्यावर खोटे आरोप करत असल्याच तेजस मोरेच्या वकिलांनी दिलेल्या या तक्रार अर्जात म्हटलय. स्वतः तेजस मोरे अद्याप गायब आहे.

शिवसेनेने केंद्रीय मंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

बदलापुरात प्रस्तावित जिमखान्याच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील येत असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा सगळा प्रकार कपिल पाटील येण्यापूर्वी घडल्यानंतर पोलिसांनी शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलिस ठाण्याला नेला आहे. बदलापूर हेंद्रे पाडा परिसरात जिमखण्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रस्तावित कामाचे भूमिपूजन आज केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पार पडले. मात्र कोणतीही निविदा प्रक्रिया न काढता या कामाचे भूमिपूजन केले जात असल्याने शिवसेनेने याचा निषेध करत शिवसेना कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमस्थळी येऊन कपिल पाटील यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Solapur: सोलापूरातील कोंडी अपघातात जखमी झालेल्या आणखी दोघा वारकऱ्यांचा मृत्यू

सोलापूरातील कोंडी येथे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या आणखी दोघा वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. सत्यभामा दिलीप मिसाळ (वय 50) आणि जनाबाई घाडगे (वय 64) या दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं समजतं आहे. दरम्यान, 13 मार्च रोजी तुळजापूर येथील कदमवाडी येथून वारकरी पंढरपूरला निघाले होते. यावेळी ट्रकची धडक बसल्याने ट्रॅक्टर मधील 4 वारकऱ्यांचा जागीच झाला होता. तर 6 वारकरी गंभीर जखमी झाले होते. जखमी असलेल्या दोघा महिलांचा 6 दिवसांनी उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

पावसात सभा शरद पवारांनी घेतली आणि निमोनिया भाजपला झाला - भाजप नेते पडळकराना राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर 

गत विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पावसातल्या भाषणावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली .साताऱ्यात पावसात भिजून तुम्हाला 54 च्या वर जाता आलं नाही ,ती संख्या कायम ठेवण्यासाठी वारंवार  तुम्ही घाबरू नका काळजी करू नका अस सांगावं लागतंय अस सांगत पडळकर यांनी पवारांना लक्ष केलं होतं .या बाबत महेश तपासे यांनी पडळकर यांच्यावर पलटवार केला आहे ,राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भर पावसात सभा घेतली,  मात्र या सभेमुळे भाजपाला खऱ्या अर्थाने निमोनिआ झाला. भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी पुन्हा येईन हे स्वप्न भंगले. राज्यातील तरुणांनी पवार साहेबाना भरघोस पाठींबा दिला. यामुळेच भाजपच्या अनेक नेत्यांना दुख झाले आहे. याच  दुखातून भाजपचे नेते वारंवार पवार साहेबावर वेगवेगळी निमित्त शोधून टीका करत आहेत. मात्र पवार हे मजबूत राष्ट्रीय नेते असल्याने त्यांच्यावर बोलून भाजपाच्या नेत्यांना केवळ प्रसिद्धी मिळेल यापलीकडे काहीही होणार नाही कारण संपूर्ण महाराष्ट्र पवार साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. 

Kolhapur Election Updates : कोल्हापूर उत्तर विधानसभेची जागा काँग्रेसला सोडल्याने शिवसैनिक नाराज,  इच्छुक उमेदवार राजेश क्षीरसागरही कालपासून नॉट रीचेबल

Kolhapur Election Updates : कोल्हापूर उत्तर विधानसभेची जागा काँग्रेसला सोडल्याने शिवसैनिक नाराज , अनेक शिवसैनिकांनी सोशल मीडियावर उघड नाराजी व्यक्त केली , इच्छुक उमेदवार राजेश क्षीरसागरही काल पासून नॉट रीचेबल , मैत्रीपूर्ण लढतीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी राजेश क्षीरसागर यांनी केली होती...

Thane News Updates : मद्यपी वाहनचालकाने वीट फेकून मारल्याने ट्रॅफिक हवालदार जखमी

Thane News Updates :  रंगपंचमीच्या दिवशी ड्रिंक अँड ड्राइव्हची कारवाई केल्याने ट्राफिक हवालदाराच्या डोक्यात वीट टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न ठाण्यात झाला आहे. ठाण्यातील माजीवडा जंक्शन इथे संध्याकाळी 6 च्या सुमारास ही घटना घडली. त्यात हवालदार नवनाथ कांदे जबर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर परम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. होळीच्या पार्श्वभूमीवर मद्यपी आणि वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचे आदेश असल्यामुळे या मोहीमअंतर्गत कांदे चालकांवर कारवाई करीत होते. यावेळी एका दुचाकीवरून भगीरथ चव्हाण आणि अनिल गुप्ता या दोघांना अडवून कांदे यांनी त्यांची तपासणी केली. यावेळी दोघांनी मद्यप्राशन केल्याचे आढळून आले. त्यानंतर कांदे यांनी त्यांच्यावर रितसर कारवाई केली. ही कारवाई करण्यात येऊ नये म्हणून दोघांनी कांदे यांच्यासोबत वाद घातला. याच वादाच्या रागातून अनिल गुप्ता (38) याने पुलाखाली पडलेली वीट उचलून कांदे यांच्या डोक्यावर मारली. या हल्ल्यात कांदे जबर जखमी झाले. दरम्यान, या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर राबोडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबईत दोघांच्या भांडणात उकळलेले तेल अंगावर सांडून लहान मुलगी आणि वृद्ध भाजले

मुंबई : कुर्ल्यातील कसाई वाडा इथे पुरी भाजी विकणाऱ्या विक्रेत्याच्या दुकानावर त्याचे आणि त्याच्या नातेवाईकाचे झालेले भांडण एका 7 वर्षीय मुलगी आणि 75 वर्षीय वृद्धाच्या जीवावर बेतले. पुरी भाजी विक्रेता मुस्तकिम अन्सारी आणि त्याचा पुतण्या वसीम अन्सारी या दोघांचं मुस्तकिम यांच्या दुकानावर घरगुती कारणावरुन भांडण झालं. यावेळी तिथे उकळत्या तेलाची कढई होती. त्यांच्या भांडणात उकळत्या तेलाच्या कढईला धक्का लागला आणि त्यातील तेल या ठिकाणी पुरी भाजी नेण्यास आलेल्या अफसीन शेख या सात वर्षीय मुलीच्या आणि मुनावर अली सय्यद या 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर उडालं. स्थानिकांनी त्यांना तात्काळ भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. यातील मुनावर यांच्यावर उपचार करुन घरी सोडण्यात आलं तर अफसीन जास्त भाजल्याने तिला सायन इथल्या टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी भांडण करणाऱ्या मुस्तकिम अन्सारी आणि वसीम अन्सारी यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. दरम्यान या मुलीची तब्येत स्थिर असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Beed Maharashtra News : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात तरुणाची व्हॉट्सअॅप वर स्टेटस ठेवून आत्महत्या



Beed Maharashtra News : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात तरुणाची व्हॉट्सअॅप वर स्टेटस ठेवून आत्महत्या. नितीन निर्मळ वय वर्ष 23 असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव  आहे . त्याने ठेवलेल स्टेटस त्याच्या काही मित्रांनी पाहिलं आणि त्यानंतर त्याचा शोध सुरु असताना गावाजवळच एका लिंबाच्या झाडाला नितीनने गळफास घेतल्याचे निदर्शनास आलं


 

 



 
स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना सांगली जिल्हा बँकेकडून चर्चेचे निमंत्रण

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रमक आंदोलनानंतर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळ नरमले आहे. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना जिल्हा बँकेकडून चर्चेचे निमंत्रण देण्यात आले आहे. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी चर्चेचा प्रस्ताव स्वीकारत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक आणि काही संचालकासोबत बैठक सुरु झाली आहे. 

Accident : कर्नाटकमधल्या तुमकुर जिल्ह्यात भीषण अपघात, अपघातात 8 जणांचा मृत्यू

Sangli News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गेटवर आंदोलन सुरू

Sangli News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गेटवर आंदोलन सुरू, बँकेच्या बंद केलेल्या गेटवर चढून गेट उघडण्यासाठी बोंबाबोब आंदोलन केले सुरू, गेटवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

वरळी-शिवडी-न्हावाशेवा सी-लिंक प्रकल्पात रहिवाश्यांची घरं आणि दुकानं बाधित होत असल्यानं प्रकल्पग्रस्त राज ठाकरेंच्या भेटीला 

वरळी-शिवडी-न्हावाशेवा सी-लिंक प्रकल्पाचे काम सुरु असल्यानं प्रकल्पात वरळी, प्रभादेवी, एल्फिन्स्टन, परळ, शिवडी भागातील रहिवाश्यांची घरं आणि दुकानं बाधित होत असल्यानं प्रकल्पग्रस्त राज ठाकरेंच्या भेटीला 


स्थानिक प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची नोटीस किंवा पूर्वकल्पना दिली गेली नसल्याचा रहिवाश्यांचा आरोप


गेल्या १०० वर्षांपासून त्याच ठिकाणी राहात असल्याचा आरोप, प्रकल्पग्रस्तांना जवळच घरं देण्यात यावी अशी स्थानकांची मागणी 


थोड्याच वेळात रहिवाशी राज ठाकरेंना भेटणार

Sanjay Raut : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षाचं सरकार राहणार;  शिवसेना नेते संजय राऊत यांनी एमआयएमसोबतची युतीची शक्यता फेटाळली

Sanjay Raut : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षाचं सरकार राहणार;  शिवसेना नेते संजय राऊत यांनी एमआयएमसोबतची युतीची शक्यता फेटाळली

Buldhana News : खामगाव शहरानजीक असलेल्या MIDC परिसरातील BSNL कार्यालय परिसराला आग

Buldhana News : खामगाव शहरानजीक असलेल्या MIDC परिसरातील BSNL कार्यालय परिसराला आग .  खामगाव येथील एमआयडीसी भागात आज सकाळच्या सुमारास भारत संचार निगम लिमिटेड कार्यालय परिसरात आग लागली , आगीची माहिती मिळताच खामगाव अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या शर्तीच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलं .या कार्यालय परिसरातील केबलच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून ही आग कशामुळे लागली याचा शोध सुरू आहे.

धुळे विमानतळाच्या धावपट्टीलगत गवताला आग लागल्याची घटना

धुळे विमानतळाच्या धावपट्टी लगत गवताला आग लागल्याची घटना  


विमानतळ शेजारी असलेल्या शेताकडून विमानतळाच्या दिशेने ही आग पसरली 


मनपा अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली


सुदैवाने कुठलेही आर्थिक नुकसान झाले नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून रंगपंचमीनिमित्त सुट्टी असल्याने अनर्थ टळला आहे...

अहमदनगरमध्ये शॉर्टसर्किटमुळे दोन एकरातील गहू जळून खाक

अहमदनगर तालुक्यातील अकोळनेर येथील शेतकरी गणेश बेरड यांचा दोन एकरातील गहू शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला. आग लागल्याचे समजताच गावातील ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीचा जोर जास्त असल्यामुळे आग आटोक्यात येऊ शकली नाही. या घटनेत गव्हाच्या शेतातील स्प्रिंकलर ठिबक देखील जळून खाक झाले. आगीमुळे बेरड यांचे तीन लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

तळकोकणातील तिलारी खोऱ्यातील भातशेतीत हत्तींचा धुडगूस, शेतकऱ्यांचे नुकसान

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात पुन्हा एकदा हत्तींनी आपला मोर्चा वळवला आहे. तिलारी खोऱ्यातील सोनावल गावातील वायंगणी भातशेती पायदळी तुडवत मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तिलारी परिसरात हत्तीचे संकट दिवसेंदिवस गडदच होत चालले आहे. विजघर, घाटीवडे, बांबर्डे, तेरवण-मेढे आणि त्यापाठोपाठ सोनावलमध्येही हत्ती दाखल झाले आहेत. त्यामुळे फळबागा, भात, नाचणी तसेच इतर पिके पिकलेली असतानाच हत्ती या भागात आल्याने शेतकरी चिंतातूर आहेत. वायंगणी भातशेतीत एका हत्तींसह दोन पिल्ले असा तीन हत्तींचा कळप दाखल झाला. त्यांनी पिकवलेली भातशेती पायदळी तुडवत मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले. हातातोंडाशी आलेली भातशेतीची नासाडी केल्याने शेतकरी चिंतेत पडला असून हत्तींचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

वैद्यकीय शिक्षक संघटनेला आश्वासन देण्यात आल्याने आंदोलनाला स्थगिती

अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांची सरकारकडून दखल घेत जात नसल्याने वैद्यकीय शिक्षक संघटनेने 14मार्चपासून रुग्णसेवेसहित सर्व कामकाज बंद केले होते. दरम्यान 15 मार्च रोजी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याशी झालेल्या बैठक आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक आयोजित करून पुढील मार्ग काढण्याबाबत आश्वासन देण्यात आल्याने अखेर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली आहे.

Aurangabad Vaijapur Accident News : ट्रक व्हॅन अपघातात तीन तरुणांचा मृत्यू; एक गंभीर, गंगापूर-वैजापूर रोडवरील घटना

Aurangabad Vaijapur Accident News : ट्रक व्हॅन अपघातात तीन तरुणांचा मृत्यू; एक गंभीर, गंगापूर-वैजापूर रोडवरील घटना


वैजापूरकडे निघालेला ऊसाने भरलेला ट्रक  आणि गंगापूरकडे येणारी पिकअप व्हॅन  या दोन्ही वाहनांची गंगापूर-वैजापूर रोडवरील 'नामका'च्या पाटाजवळील हॉटेल नर्मदाजवळ शुक्रवारी दहा वाजेच्या दरम्यान समोरासमोर जोरदार टक्कर झाली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात पिकअप व्हॅनचा चुराडा झाला.

Nagpur News Updates : होळी साजरी झाल्यानंतर नदीवर आंघोळीला गेलेल्या दोन तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू, नागपूर जिल्ह्यातील शिवा(सावंगा) येथील घटना

Nagpur News Updates : होळी साजरी झाल्यानंतर नदीवर आंघोळीला गेलेल्या दोन तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू, नागपूर जिल्ह्यातील शिवा(सावंगा) येथील घटना, मंगेश इंगळे व देवानंद पवार अशी मृत तरुणांची नावं

पार्श्वभूमी

1.महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी, पवारांपर्यंत निरोप पोहोचवा, इम्तियाज जलील यांची राजेश टोपेंना विनंती, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष


2.पंचवीस सत्ताधारी आमदार अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, रावसाहेब दानवेंचा दावा, निवडणुका लागताच इनकमिंग वाढेल, दानवेंना विश्वास


3. स्टील, सिमेंट आणि इतर साहित्यांचे दर वाढल्यानं बांधकाम बंद ठेवण्याचा क्रेडाईचा इशारा, मेट्रो सेसला विरोध, तर साठेबाजांवर कारवाई करण्याचं सरकारला साकडं


4. नाशिक निर्बंधमुक्त होणार, पालकमंत्री छगन भुजबळ यांची घोषणा, मात्र ग्रामीण भागात निर्बंध कायम राहणार
 
5. मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पामुळं पूरस्थिती ओढवण्याची पर्यावरणप्रेमींना भीती, जलसंपदा विभागाकडूनही प्रकल्पाला स्थगिती,


6. मविआला रामराम ठोकण्याच्या तयारीत असणाऱ्या राजू शेट्टींना चंद्रकांत पाटलांचं आमंत्रण, कोल्हापुरातील भाजप नेते शेट्टींच्या भेटीला, भाजप काय ऑफर देणार याची उत्सुकता 



धुलिवंदनाच्या दिवशी पत्नीनं मुलीला व्हिडिओ कॉलवर न दाखवल्यानं पतीनं संपवलं जीवन 


Badlapur Crime News : धुलिवंदनाच्या दिवशी बदलापुरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. सणाच्या दिवशी माहेरी गेलेल्या पत्नीने मुलीला घरी न आणल्याने आणि व्हिडीओ कॉल वर मुलीचा चेहरा न दाखवल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.नैराश्येच्या भरात हे पाऊल उचलल्याने अख्खं कुटुंब उध्वस्त झालं आहे. बदलापूरच्या वडवली परिसरात शंकर जाधव, वडील ,आई, पत्नी, आणि 2 महिन्याच्या लहान मुलीसह राहत होता. मात्र पतीने आई वडिलांसोबत न राहता वेगळे राहावे अशी शंकरच्या पत्नीचे म्हणणे होते. त्यावरून त्याच्यात वारंवार वाद होत होते. असे मयत शंकरच्या नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान काही दिवसांपूर्वी यावरूनच वाद झाले आणि शंकरची पत्नी 2 महिन्याच्या मुलीला घेऊन माहेरी गेली. आज सणानिमित्त पत्नी मुलीला घेऊन घरी येईल असे शंकरला वाटले होते, मात्र पत्नी आली नाही. तसेच तिने व्हिडिओ कॉलवर मुलीचा चेहरा दाखवायला नकार दिला.शंकरने पत्नीला फोन करून मुलीला घरी घेऊन ये असे सांगितले, मात्र पत्नीने तुम्ही घ्यायला या म्हणत स्वतः यायला नकार दिला. यानंतर शंकरने पत्नीला आत्महत्या करत असल्याचा फोन करत रागाच्या भरात शंकरने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ऐन धुलिवंदनाच्या दिवशी बदलापुरात हा प्रकार घडल्याने वडवली भागात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.