Maharashtra Breaking News : किल्ले सिंहगडावर शेकडो पर्यटक अडकून, बस उपलब्ध नसल्याने पर्यटकांना मोठा मनस्ताप
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेणाऱ्या सोलापूरच्या राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचे पद स्थगित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुहास कदम यांचे पद स्थगित केल्याची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी पत्रद्वारे दिली आहे. पवार विरोधी बोलणाऱ्यांना 'शोधा आणि तोडा' मोहीम करा असे जिल्हा अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना कदम यांनी पत्र दिले होते. कदम यांची ही भूमिका पक्षाच्या ध्येय धोरणा विरोधात असल्याचे मत व्यक्त करत खुलासा येईपर्यत सुहास कदम यांचे पद स्थगित करण्यात येत असल्याचे गव्हाणे यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांच्याविषयी खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या विरोधात आक्रमक पवित्रा घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचे पद स्थगित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुहास कदम यांचे पद स्थगित करण्यात आले आहे.
किल्ले सिंहगडावर शेकडो पर्यटक अडकून पडले आहेत. गडावरुन खाली जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याने पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. रविवार असल्याने पर्यटकांची आज मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे. अपुरी बस संख्या आणि त्यातच चार्जिंग संपल्याने हजारो पर्यटक अजूनही गडावर आहे. वन विभाग आणि पीएमपी विभागाचा ढिसाळ कारभार पाहायला मिळणार आहे. चार्जिंग स्टेशन्स कमी असल्याने बसेस चार्ज होण्यासाठी मोठा कालावधी लागतोय. आज दुपारी सिंहगडावर गेलेले पर्यटक अद्यापही गडावरच आहे.
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer mukkam post thane) हा चित्रपट पाहिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ''धर्मवीर चित्रपटात प्रसाद ओक यांची भूमिका अप्रतिम आहे. प्रत्येक शहरात एक आनंद दिघे हवेत, हे वाक्य खूप आवडलं.'' उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, शिवसेनाप्रमुख आणि आनंद दिघे यांचं नातं घट्ट होतं, असं म्हणत त्यांनी सर्वानी चित्रपट नक्की पाहा असं आवाहन केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी वर्षा निवास्थानी पोहोचले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये राज्यसभा निवडणुकी संदर्भात चर्चा होत असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.
Central Government: केंद्र सरकारने काश्मिरी पंडितांना संरक्षण देण्याची गरज असून सध्या आम जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातायत, ही परिस्थिती निंदनीय असल्याचं मत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष जगन्नाथ अभ्यंकर यांनी व्यक्त केलंय. अभ्यंकर हे आज डोंबिवलीत शिक्षक पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने आले होते.
स्वताच्या मालकी शेतात एकत्र करून ठेवलेला तीन एकरातील धानाचा अज्ञात इसमाने जाळल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील जाणवा येथे घडली आहे. शेतकरी विलास मेश्राम यांचा तिन एकराचा धान पिकाचा पुजना आपल्या शेतात ठेवला होता. सकाळी शेतकरी आपल्या शेतात पाहणी करण्या करीता गेला असता अज्ञात इसमाने तीन एकरातिल धानाचा पुंजना पेटवला दिसला. यात शेतकऱ्यांचे जवळपास लाख रूपयांचे आर्थिक नुकसान झाले. घटनेची माहिती तलाठी यांना देण्यात आली असून पंचनामा सुरु आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांला आर्थिक मदतीची मागणी होत आहे.
नगर मनमाड महामार्गावर भिषण अपघात झालाय. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला आणि एका पुरूषाचा मृतांमध्ये समावेश आहे. तर या अपघातात एक महिला आणि एक मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. राहुरी तालुक्यातील गुहा गावाजवळ हा अपघात झाला आहे.
शिर्डीहून शिंगणापूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला बसने उडवले. त्यामुळे मध्यप्रदेशातील भाविकांच्या गाडीचा चक्काचूर झालाय.
महत्वाच्या विषयांवर पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी पॉलिटिकल अफेअर्स कमिटीची नियुक्ती
जी-२३ ची ही महत्त्वाची मागणी मंजूर..
केवळ एक-दोन लोकांनी निर्णय न घेता कोअर कमिटीच्या माध्यमातून निर्णय व्हावेत यासाठी अशी कमिटी
बालार्ड पिअर जवळ काल एक नाव बुडाली, मालवाहू नाव बु़डाली, जीवितहानी नाही
मात्र नाव बुडण्याआधीच आत मधील तीन लोकांना तातडीने बाहेर काढण्यात आलं
बालार्ड पिअर जवळ काल एक नाव बुडाली, मालवाहू नाव बु़डाली, जीवितहानी नाही
मात्र नाव बुडण्याआधीच आत मधील तीन लोकांना तातडीने बाहेर काढण्यात आलं
चंद्रभागा वाळवंटात पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या निषेधार्थ त्यांच्या नावाचा म्हसोबची उजनी संघर्ष समितीने केली स्थापना, सोलापूरचे उजनीचं पाणी इंदापूर बारामतीला नेल्याच्या निषेधार्थ सर्व पक्षीय नेत्यांचे आंदोलन , पोलिसांनी आंदोलकांना केली अटक
पुणे शहर मनसेचा आज मेळावा आहे. साईनाथ बाबर शहराध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच पक्षाचा पदाधिकारी बैठक मे॓ळावा होतोय. या मेळाव्याला वसंत मोरे गैरहजर आहेत. माझ्या हातात रात्री १२.३० वाजता कार्यक्रम पत्रिका आली. त्या कार्यक्रम पत्रिकेत ११ जणांची कोर कमिटी आहे पण पत्रिकेत १० जणांचीच नावं आहेत माझं नाव त्यात नाही असं वसंत मोरे म्हणाले. आजचा विषय मुद्दाम केला गेला आहे. असा दावा मोरे करत असताना शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी आरोप खोडून काढलेत.
Pune News : पुण्यात आज सिंहगड किल्ला बंद आंदोलन सुरु, पीएमपीएमएल आणि वनविभागाच्या ई बसच्या भोंगळ कारभाराविरुद्ध सिंहगड किल्ला बंद ठेवण्याचा इशारा
राजे शिवराय प्रतिष्ठानकडून आज आंदोलन सुरु....
मोठ्या संख्येने नागरिक आंदोलनात सहभागी...
सिंहगड पायथा येथे सुरु आहे आंदोलन...
पर्यटकांसाठी होत असलेली गैरसौय आणि घाटात होत असलेले बसचे अपघात...
यावर राजे शिवराय प्रतिष्ठान आक्रमक झाली असून आज सिंहगडावर बस न सोडण्याच्या तयारीत
आज रविवार असल्याने गडावर जाणाऱ्यांची संख्या जास्त
आंदोलनामुळे पर्यटकांना बसतोय फटका....
भिवंडी शहरातील बंदर मोहल्ला येथील अरहम मोमिन यांच्या तबेल्यात अज्ञात इसमांनी तबेल्यातील तब्बल 22 म्हशीं वर सूऱ्याने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे त्यापैकी 7 म्हशींचा मृत्यू झालं आहे . या हल्ल्यात 22 म्हशीचे गळा व पायांचा नसा सुऱ्याने कापण्यात आल्या असून या घटनेने मुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे
या हल्ल्यात 7 म्हशीचा मृत्यू झाला आहे तर 15 म्हशी गंभीर जखमी झाल्या असून त्यामधील काही म्हशी अंत्यवस्थेत असून त्यांच्या वर उपचार सुरू आहे . याबाबत अरहम मोमीन यांच्या तक्रारी वरून निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास सुरु केला आहे...
Palghar news : पालघरमधील ऐना येथे शिवसेना आणि केसरी फाउंडेशनच्या माध्यमातून 125 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आज आयोजन करण्यात आलं होतं लग्नसोहळ्याचा विधी सुरू असतानाच अचानक जोरदार वावटळ आलं आणि लग्नमंडपात शिरल्याने काही सेकंदांमध्ये संपूर्ण लग्नमंडप उध्वस्त केला यावेळी लग्नमंडपात बसलेले सर्व वधू-वर आणि वऱ्हाडी यांची धावपळ सुरू झाली. यामध्ये चार जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
Pune News : पुणे - पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांची आज साडे अकरा वाजता बैठक,पुणे महापालिकेच्या घुले रोड क्षेत्रीय कार्यलय येथील सभागृहात होणार बैठक
- मनसे नेते अनिल शिदोरी,मनसे नेते बाबू वागस्कर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह वॉर्ड अध्यक्ष अन इतर पदाधिकारी राहणार उपस्थितीत
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आयोध्या दौरा,शहर संघटनात्मक बांधणी,महापालिका निवडणुका पार्श्वभूमीवर शहराची बैठक
- शहरातील सर्व मनसेचे प्रमुख पदाधिकारी राहणार उपस्थितीत
केतकी चितळे प्रकरण, केतकीला घेऊन पोलीस कोर्टात दाखल, ठाणे कोर्टाच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या तसेच इतर पदाधिकारी जमायला सुरुवात, साडेदहा वाजता न्यायालयाचे कामकाज सुरू होणार असल्याची माहिती
केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल नाशिकच्या सायबर पोलिसात गुन्हा दाखल
-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट करून बदनामी, मानहानी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर फेसबुक पोस्टद्वारे टीका करणारी केतकी चितळेवर अमरावती राष्ट्रवादी महिला अध्यक्ष संगीता ठाकरे यांच्या तक्रारीवरून पोलीसांनी केला गुन्हा दाखल...
Konkan Railway Update : तीन तासापासून ठप्प झालेली कोकण रेल्वे लवकरच पूर्वपदावर, रत्नागिरी- कोकण कन्या एक्सप्रेसच्या बंद पडलेल्या इंजिनला नवीन इंजिन जोडलं, बंद पडलेली कोकण कन्या एक्सप्रेस निवसर स्थानकात आणली
नवीन इंजिनच्या माध्यमातून कोकण कन्या एक्सप्रेस पुन्हा मार्गस्थ
इंजिन बंद पडल्यामुळे अनेक रेल्वेगाड्या विविध स्टेशनमध्ये अडकुन
तुतारी मंगला एक्सप्रेस गाड्या खोळंबल्या
पाकिस्तानच्या जेकोबाबाद शहरात कालचं कमाल तापमान 51 अंश सेल्सिअस, 2022 सालातील जगातील सर्वोच्च तापमानाची नोंद
ऑस्ट्रेलियात ५०.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद याआधी झाली होती त्यानंतरचं सर्वौच्च तापमान
पाकिस्तानसोबतच भारतात देखील अनेक ठिकाणी तापमान सर्वौच्च, पश्चिम राजस्थानात तापमान ४८ अंशांच्या पार, काल पश्चिम राजस्थानात एका ठिकाणावरील कमाल तापमान ४८.२ अंशांवर
१३ मे रोजी पिलानी येथील तापमान ४७.७ अंश सेल्सिअस
तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे कमाल तापमानाची तीव्रता वाढली
रत्नागिरी- कोकण कन्या एक्सप्रेस इंजिनमध्ये बिघाड, दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प, कोकण रेल्वे मार्गावरील विलवडे स्टेशन जवळची घटना, दोन तासापासून कोकणकन्या एक्सप्रेस एकाच ठिकाणी, कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या खोळंबल्या, अनेक चाकरमान्यांचे हाल
औरंगाबाद पाणी टंचाईवर औरंगाबाद पालिका आयुक्त यांचा आणखी एक निर्णय, बल्क युजर्सच्या म्हणजे विद्यापीठ, शाळा, कॉलेज आणि काही कंपन्यांच्या पाणीपुरवठ्यात 15 जूनपर्यंत कपात.
50 टक्के कॉलेज कपात केली जाणार आहे. यामुळे पंधरा लाख लिटर पाणी वाचेल . शहरातील पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी मनपा प्रशासन 41 कलमांवर मनपाकडून काम सुरू . हर्सल तलावातून वाढीव पाणी उपसा वाढवणे, एमआयडीसीचे पाणी घेणे, गळती थांबवणे आदींचा समावेश. सध्या बहुतांश शैक्षणिक संस्थाना सुट्ट्या सुरू आहेत. मोजकेच कर्मचारी, शिक्षक काम करत आहेत. त्यामुळे त्यांची पाण्याची मागणी कमी .
आज आयपीएलच्या मैदानात डबल धमाका आहे. दुपारी चेन्नई आणि गुजरातचा संघ समोरा समोर येणार आहे.. तर संध्याकाळी साडेसात वाजता लखनौ आणि राजस्थान यांच्यातील सामना होणार आहे. राहुल आणि संजू यांच्यात ब्रेबॉनच्या मैदानावर लढत होणार आहे. तर धोनी आणि हार्दिक यांची लढत वानखेडेच्या मैदानावर असेल.
भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार (Rajiv Kumar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार हे आज (15 मे) रोजी आपला पदाचा कार्यभार हाती घेणार आहे
गुजरातमध्ये आम आदमी पक्षाची परिवर्तन सभा होणार आहे. 182 विधानसभा मतदार संघात 20 दिवस ही सभा सुरू राहणार आहे
शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय सभा होतं आहेत. 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत भाजपने बुस्टर सभा घेतली होती. आता पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार आहे. उद्या ( 15 मे) भाजपने सभेचे आयोजन केले आहे. ही सभा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.
त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदावर माणिक साहा यांची वर्णी लागलीय. बिप्लब देव यांनी काल त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत प्रतिमा भौमिक, माणिक साहा आणि जिष्णू देव वर्मा यांची नावं आघाडीवर होती..अखेर माणिक साहा यांच्या नावावर भाजप पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर माणिक साहा आज सकाळी 11.30 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे.
शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांकडून केतकी चितळेला अटक करण्यात आली आहे. कळवा पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.
पार्श्वभूमी
मुंबई : आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी.. पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
ठाणे पोलिसांकडून केतकी चितळेला अटक
शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांकडून केतकी चितळेला अटक करण्यात आली आहे. कळवा पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांचा शपथविधी
त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदावर माणिक साहा यांची वर्णी लागलीय. बिप्लब देव यांनी आज त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत प्रतिमा भौमिक, माणिक साहा आणि जिष्णू देव वर्मा यांची नावं आघाडीवर होती..अखेर माणिक साहा यांच्या नावावर भाजप पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर माणिक साहा उद्या सकाळी 11.30 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे.
देवेंद्र फडणवीसांची सभा
शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय सभा होतं आहेत. 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत भाजपने बुस्टर सभा घेतली होती. आता पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार आहे. उद्या ( 15 मे) भाजपने सभेचे आयोजन केले आहे. ही सभा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.
गुजरातमध्ये आम आदमीची परिवर्तन सभा
गुजरातमध्ये आम आदमी पक्षाची परिवर्तन सभा होणार आहे. 182 विधानसभा मतदार संघात 20 दिवस ही सभा सुरू राहणार आहे
भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार पदभार स्वीकारणार
भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार (Rajiv Kumar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार हे आज (15 मे) रोजी आपला पदाचा कार्यभार हाती घेणार आहे
फास्टफूडमधील लोकप्रिय ब्रँड असलेल्या मॅकडॉनल्डची सुरूवात
फास्टफूडमध्ये लोकप्रीय ब्रँड असलेल्या मॅकडॉनल्ड या फूड जॉईंटचे देखील कोट्यवधी ग्राहक चाहते आहेत. मॅकडॉन्लडची सुरूवात 15 मे ला झाली होती. रिचर्ड आणि मॉरिस मॅकडॉन्लड या दोन भावंडानी कॅलिफोर्नियाच्या सॅन बर्नार्डीनो येथे 15 मे 1940 सुरूवात केली. आज 100 पेक्षा अधिक देशात 35,000 पेक्षा जास्त आउटलेट आहे.
आयपीएलमध्ये आज डबल डोस
आज आयपीएलच्या मैदानात डबल धमाका आहे. दुपारी चेन्नई आणि गुजरातचा संघ समोरा समोर येणार आहे.. तर संध्याकाळी साडेसात वाजता लखनौ आणि राजस्थान यांच्यातील सामना होणार आहे. राहुल आणि संजू यांच्यात ब्रेबॉनच्या मैदानावर लढत होणार आहे. तर धोनी आणि हार्दिक यांची लढत वानखेडेच्या मैदानावर असेल.
आज इतिहासात
1817 - देवेंद्र नाथ टागोर यांचा जन्म
1923 - भारतीय विनोदी अभिनेता जॉनी वॉकरचा जन्म
1967 - बॉलीवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितचा जन्म
1993 - देशाचे पहिले आर्मी कमांडर इन चीफ फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांचे निधन
1995 - एलीसन गारग्रीब्स एव्हरेस्टवर विना ऑक्सिजन जाणारी पहिली महिला
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -