Maharashtra Breaking News 14 September 2022 : महाविकास आघाडी सरकारने नियुक्त केलेल्या नियुक्त्या रद्द

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Sep 2022 10:05 PM
महाविकास आघाडी सरकारने नियुक्त केलेल्या नियुक्त्या रद्द

महाविकास आघाडी सरकारने नियुक्त केलेल्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यातील ग्राम, तालुका, नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हास्ततावर स्थापन करण्यात आलेल्या दक्षता समित्यावरील अशासकिय सदस्याच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.
जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणावर देखरेख रहावा यासाठी या दक्षता समित्या नेमल्या जातात. सत्तांतर झाल्यानंतर या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.

 Mumbai Metro :  घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो सेवा विस्कळीत

 Mumbai Metro :  घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो सेवा विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे मेट्रोला 15 मिनिटे विलंब झाला आहे.


 





Raigad : नागोठणे ते रोहा दरम्यान गुरे चोरणाऱ्या टोळीचा पाठलाग; आरोपी फरार

 Raigad : नागोठणे ते रोहा दरम्यान गुरे चोरणाऱ्या टोळीचा पाठलाग करण्यात आला आहे. पण आरोपी फरार झाले आहेत. आरोपींच्या गाडीने पोलीसांच्या गाडीला ठोकर दिली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपींचा पाठलाग करण्यात आला होता. 

लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे वयाच्या 90व्या वर्षी पुणे येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन

मूळच्या संगमनेरच्या असलेल्या ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे वयाच्या 90व्या वर्षी पुणे येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. 

Aaditya Thackeray : फॉक्सकॉनबाबत व्हॉटसअॅपवर खोटे मेसेज : आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray : फॉक्सकॉनबाबत व्हॉटसअॅपवर खोटे मेसेज पसरवले जात आहे. 40 गद्दारांनी सरकार पाडलं म्हणून प्रकल्प मागे राहिला. जेव्हा हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला तेव्हा मुख्यमंत्री देवदर्शनात व्यस्त होते असं आदित्य ठाकरे म्हणाले. 

अंबरनाथमध्ये लम्पी लसीकरणला सुरुवात

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये लम्पी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. गावागावात जाऊन जनावरांना ही लस दिली जात आहे. अंबरनाथ तालुक्यात दोन गुरांना लम्पी आजाराची लागण झाली होती. तर वेळेत निदान होऊ शकलं नसल्यानं इतर दोन गुरांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे खडबडून जाग्या झालेल्या पशुसंवर्धन विभागाने जनावरांचं लसीकरण सुरू केलं आहे. यासाठी अंबरनाथ तालुक्याला 1500 लसींचा पुरवठा शासनाकडून करण्यात आला आहे. त्यामुळं गावागावात जाऊन जनावरांना लस देण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.

Aaditya Thackeray : रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्प राज्याबाहेर गेला; शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप

Aaditya Thackeray : रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्प राज्याबाहेर गेला; शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप

Amravati : भिम बिग्रेडचं आंदोलन पोलिसांच्या मध्यस्तीने स्थगित

Amravati : भिम बिग्रेडचं आंदोलन पोलिसांच्या मध्यस्तीने स्थगित करण्यात आलं आहे. भिम बिग्रेड कडून राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून घेणार आहेत. 
'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेच्या आगामी भागात नेहा अविनाशला त्याच्या जाळ्यात अडकवताना दिसणार आहे. 

कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आणि राष्ट्रवादीचा महापौर असलेल्या सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदीच्या निवडीत भाजपचा विजय

Sangli Municipal Corporation Standing Committee : सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदीच्या निवडीवरुन कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाभारत 


कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आणि राष्ट्रवादीचा महापौर असलेल्या सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदीच्या निवडीत भाजपचा विजय


काँग्रेसला राष्ट्रवादीकडून धोका; राष्ट्रवादीचे तीन पैकी दोन सदस्य गैरहजर


राष्ट्रवादीची दोन मते फुटल्याचा आणि राष्ट्रवादीकडून दगाफटका झाल्याचा काँग्रेसचा आरोप


भाजपचे धीरज सूर्यवंशी यांना 9 तर कॉंग्रेसचे उमेदवार संतोष पाटील यांना मिळाली 5 मते

Gujrat Lift Accident : गुजरातच्या अहमदाबादमध्ये सातव्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली, 6 जणांचा मृत्यू

Gujrat Lift Accident : गुजरातच्या अहमदाबादमध्ये सातव्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली असून लिफ्ट कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू झाला आहे. एस्पायर-2 नावाच्या इमारतीमध्ये लिफ्ट कोसळल्याने दुर्घटना घडल्याचं बोललं जाता आहे. 

Shivsena : दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचे एमएमआरडीएला पत्र; बीकेसीतील मैदानाची केली मागणी

Shivsena : शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने परवानगी न दिल्यास शिवसेनेने पर्यायांचा शोध सुरू केला आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी एमएमआरडीएला पत्र लिहीत बीकेसीतील मैदानाची मागणी केली आहे.

अंतर्गत वादाला कंटाळून मंदिरातील सेविकाराची मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्र लिहित आत्महत्या

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील घोटा (देवी) येथील तुळजा देवी संस्थानमधील पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत जाचाला कंटाळून मंदिरातील सेवेकरी गजानन जगताप यांनी मुख्यमंत्र्याच्या नावे पत्र लिहीत आत्महत्या केली. मंदिर संस्थांमधील कार्याध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे पदाचा गैरवापर करुन मंदिरात कामे करतात आणि केवळ जातीय त्रास देतात या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत असल्याचे पत्र जगताप यांनी लिहिलं आहे. मंदिर संस्थांमधील कार्याध्यक्ष आणि काही सदस्य हेच माझ्या आत्महत्येला जबाबदार असतील, अशा आशयाचे पत्र थेट मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहीत गजानन जगताप यांनी आत्महत्या केली. नेहमीप्रमाणे आज गजानन जगताप आणि त्यांची पत्नी सकाळी लवकरच पाच वाजताच्या सुमारास मंदिराची साफसफाई करण्यासाठी गेले असता मंदिरातील भोजन कक्षामध्ये जगताप यांनी आत्महत्या केली. मुख्यमंत्रीसाहेब माझ्यानंतर माझ्या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी सुद्धा आत्महत्या केलेल्या व्यक्तीने पत्रामध्ये केली आहे.

मराठवाडा, तेलंगाणा, कर्नाटकातील विद्यापीठांनी, महाविद्यालयांनी 'मराठवाडा (हैदराबाद) मुक्ती संग्राम दिन' साजरा करावा, यूजीसीच्या सूचना
Hyderabad Mukti Sangram : 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा (हैदराबाद) मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो. हा दिवस आता मराठवाडा, तेलंगाणा, कर्नाटकातील विद्यापीठांमध्ये सुद्धा साजरा केला जावा, या संदर्भातील सूचना युजीसीने संबंधित विद्यापीठांना, महाविद्यालयांना काल (13 सप्टेंबर) दिल्या. यूजीसी अध्यक्षांनी तेलंगाणा राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंना आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांना आणि मराठवाडा आणि कर्नाटकातील जिल्ह्यांना संबंधित शैक्षणिक संस्थेवर राष्ट्रध्वज फडकवण्याची विनंती केली आहे. या भागातील विद्यापीठ महाविद्यालय 17 सप्टेंबरच्या सकाळी ‘प्रभात फेरी’ देखील काढू शकता. या दिवशी उपक्रमांच्या सूचक यादीमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम संदर्भात प्रतिष्ठित लोकांचे भाषण, पथनाट्य, प्रदर्शन, सोशल मीडिया जागृती मोहीम, प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रपट प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा इत्यादींचा समावेश असावा, असं यूजीसीकडून सांगण्यात आलं आहे.

 

 
सोलापुरात डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगच्या 319 विद्यार्थ्यांवर कॉपीचा ठपका, सर्व विद्यार्थी एक वर्षासाठी डी बार, MSBTE च्या निर्णयाला प्रहारचा विरोध

Solapur News : सोलापुरातील मौलाना आझाद पॉलिटेक्निकल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली आहे. या महाविद्यालयातील डिप्लोमा आणि अभियांत्रिकीच्या 319 विद्यार्थ्यांना पेपरमध्ये कॉपी केल्याचा ठपका ठेवून सर्वांना एक वर्षासाठी डीबार करण्यात आले आहे. तसेच झालेली परीक्षा रद्द करून पुन्हा एकदा परीक्षा देण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळच्या वतीने देण्यात आले आहेत. मात्र मंडळाच्या निर्णयाला विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला आहे. आम्ही कोणत्याही प्रकारची कॉपी केलेली नाही असा दावा संबंधित विद्यार्थ्यांचा आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला सोलापूर प्रहार संघटनेने देखील पाठिंबा दिला आहे. अशा पद्धतीची कारवाई ही विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्ष वाया जाईल. त्यामुळे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा. अन्यथा सर्व 319 विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्राचे तंत्र शिक्षण मंडळाच्या मुंबईतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. असा इशारा प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आला. 

BMC News : मुंबई महापालिकेत बदली सत्र सुरूच, तीन पदांच्या बदल्या

BMC News : मुंबई महापालिकेत बदली सत्र सुरूच असून तीन पदाच्या बदल्या करण्यात आल्या आहेत
 
नाशिक पालिका आयुक्त पदी गेलेले रमेश पवार याना पुन्हा पालिकेत सह आयुक्त पदी आणण्यात आलं आहे. 


निवडणूक विभागाचा कारभार विजय बालमवार यांच्याकडे देण्यात आलाय 


आदल्या दिवशी सुधार विभागाचा कार्यभार सांभाळणारे केशव उबाळे यांची दक्षता विभागाच्या उपमहापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. 


दक्षता विभाग तसेच शिक्षण विभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे अजित कुंभार यांच्याकडे शिक्षण विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. 


मात्र, काही तासांतच कुंभार यांना पुन्हा दक्षता विभागात हलवण्यात आले, तर उबाळे यांच्याकडे प्रशासनाने स्वतंत्र आदेश देऊन शिक्षण विभागाचा कार्यभार सोपवला.

लम्पीचा वाढता प्रादुर्भाव पाहता पालघर जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडमध्ये, गुजरातसह उत्तरेकडून येणाऱ्या राज्यांतील जनावरांना महाराष्ट्रात नो एंट्री

लम्पीचा वाढता प्रादुर्भाव पाहता पालघर जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडमध्ये


गुजरातसह उत्तरेकडून येणाऱ्या राज्यांतील जनावरांना महाराष्ट्रात नो एंट्री . 


पालघर जिल्हा पशुसंवर्धन विभागाचा निर्णय . 


महाराष्ट्र सीमेवर तीन तपासणी नाके उभारून केली जाणार तपासणी . 


बोर्डी , उधवा आणि अच्छाड येथे उभारले जाणार तपासणी नाके 

Mumbai News : माहिममधील मशिदींवर पुन्हा लाऊडस्पीकरवर अजान होत असल्याचं मनसेकडून तक्रार

Mumbai News : माहिममधील मशिदींवर पुन्हा लाऊडस्पीकरवर अजान होत असल्याचं मनसेकडून तक्रार


माहीम विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदारांचं पोलिसांना पत्र


बेकायदेशीररित्या सुरू झालेल्या मशिदीवरील लाऊडस्पीकरवर कारवाईची मनसेची मागणी


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यावर अनेक मशिदींनी लाऊडस्पीकर उतरवले होते

किनारपट्टीवरील समुद्री सस्तन प्राण्यांचा अभ्यास येत्या 18 महिन्यांत पूर्ण करण्यात येणार : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई महानगर प्रदेशाच्या किनारपट्टीवरील समुद्री सस्तन प्राण्यांचा अधिवास, त्यांचा विस्तार आणि गणना यांचा अभ्यास येत्या 18 महिन्यात करण्यात येणार आहे. यामध्ये इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन आणि फिनलेस पोरपॉइस या प्रजातींवर प्रामुख्याने काम केले जाईल अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
 
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सहयाद्री अतिथीगृह येथे कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाची बैठक झाली असून त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. या अभ्यासामध्ये मुंबई किनारपट्टीच्या १० किमीच्या पट्ट्यात आढळणाऱ्या इतर सागरी सस्तन प्राण्यांच्या नोंदी करण्याबरोबरच महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीतील करण्यात येणाऱ्या आत्तापर्यंतच्या या पहिल्या अभ्यासात मुंबई महानगरातील साधारण ७० किमी (उत्तर - दक्षिण) किनारपट्टीचा समावेश करण्यात येणार आहे. 

बुलढाण्यात मुलं पळवणाऱ्या टोळी बद्दलचा व्हिडीओ व्हायरल, विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण

Buldhana News : मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या बुलढाण्यातील तालुक्यात मुलं पळवणारी टोळी सक्रिय असल्याच्या चर्चा होत असताना, जिल्ह्यात मध्य प्रदेशातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामुळे शाळकरी विद्यार्थी आणि पालकामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. खेड्यापाड्यातून जवळच्या गावातील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये यामुळे दहशत पसरली आहे. त्यामुळे प्रशासनाने आता या व्हायरल व्हिडीओ संबंधी पालकांना हमी देण्यात यावी अशी मागणी होताना दिसत आहे.

मद्यधुंद अवस्थेतील चारचाकी चालकाने आधी दुचाकीस्वाराला धडक दिली, मग इमारतीचं कम्पाऊंड तोडलं, वसईतील घटना

Vasai News : मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका चारचाकी चालकाने दुचाकीस्वाराला धडक देऊन मग एका इमारतीच्या कंपाऊंडमध्ये शिरल्याची घटना वसईत रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. वसई गावातील रमेदी येथील शनी मंदिर परिसरात चारचाकी मुख्य रस्त्याने वेगाने येत होती. त्यावेळी त्या ठिकाणाहून एक दुचाकीचालक जात होता. पहिल्यांदा या दुचाकीस्वाराला चारचाकीने धडक दिली. त्यानंतर ही चारचाकी या ठिकाणी असलेल्या पवन कुटी या इमारतीच्या कंपाऊंड तोडून आतमध्ये गेली. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. तर इमारतीच्या कंपाऊंडचे काही प्रमाणावर नुकसान झाले आहे. चारचाकी चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता त्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं असून वसई पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

हर्षा इंजिनिअर या कंपनीचा आज आयपीओ येणार

बेअरिंग केज बनवणाऱ्या हर्षा इंजिनिअर  या कंपनीचा आयपीओ येणार आहे.  कंपनी आयपीओच्या (IPO) माध्यमातून शेअर बाजारात लिस्ट होणार असून या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 755 कोटी रुपये उभारणार आहे. कंपनीने 314 ते 330 रुपयांच्या दरम्यान प्राइस बँड निश्चित केला आहे.

Jacqueline Fernandez ED Inquiry : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार

Jacqueline Fernandez ED Inquiry : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या अनेक दिवसांपासून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता दिल्ली पोलिसांकडून जॅकलीनला मनी लाँड्रिंग प्रकरणी समन्स बजावण्यात आला आहे. 14 सप्टेंबरला जॅकलीन सकाळी 11 वाजता चौकशीला उपस्थित राहणार आहे. 

केंद्रीय मंत्री रेणुकाजी सिंह शिरूर लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर

केंद्रीय मंत्री  रेणुका सिंह या शिरूर लोकसभा मतदार संघाचा दौरा करणार आहेत.  14 ते 16 सप्टेंबर दरम्यान संघटनात्मक व सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात आज चांगल्या पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Update : कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशकडे सरकले असले तरी महाराष्ट्रात पुढील आज चांगल्या पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.  त्यामुळे मुंबईसोबतच उपनगरात जोरदार पावसाची शक्यता आहे.

Sanjay Raut : संजय राऊतांच्या जामीन याचिकेवर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी

Sanjay Raut : गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात (Patra Chawl Land Scam) अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर ईडीने भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश विशेष न्यायालयाने दिले होते. मागील एक महिन्याहून अधिक काळ राऊत न्यायालयीन कोठडीत असून, ते आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात आहेत. त्यांनी केलेल्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. संजय राऊतांच्या याचिकेवर ईडी आपलं उत्तर सादर करणार आहे.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...


संजय राऊतांच्या (Sanjay Raut) जामीन याचिकेवर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी


संजय राऊतांच्या जामीन याचिकेवर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. संजय राऊतांच्या याचिकेवर ईडी आपलं उत्तर सादर करणार आहे


महाराष्ट्रात  आज चांगल्या पावसाचा अंदाज  (Maharashtra Rain Update) 


कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशकडे सरकले असले तरी महाराष्ट्रात पुढील आज चांगल्या पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.  त्यामुळे मुंबईसोबतच उपनगरात जोरदार पावसाची शक्यता आहे.


केंद्रीय मंत्री  रेणुकाजी सिंह शिरूर लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर


केंद्रीय मंत्री  रेणुका सिंह या शिरूर लोकसभा मतदार संघाचा दौरा करणार आहेत.  14 ते 16 सप्टेंबर दरम्यान संघटनात्मक व सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 


अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez)  ईडी (ED) कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार


बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या अनेक दिवसांपासून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता दिल्ली पोलिसांकडून जॅकलीनला मनी लाँड्रिंग प्रकरणी समन्स बजावण्यात आला आहे. 14 सप्टेंबरला जॅकलीन सकाळी 11 वाजता चौकशीला उपस्थित राहणार आहे


हर्षा इंजिनिअर या कंपनीचा आज आयपीओ (IPO) येणार 


बेअरिंग केज बनवणाऱ्या हर्षा इंजिनिअर  या कंपनीचा आयपीओ येणार आहे.  कंपनी आयपीओच्या (IPO) माध्यमातून शेअर बाजारात लिस्ट होणार असून या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 755 कोटी रुपये उभारणार आहे. कंपनीने 314 ते 330 रुपयांच्या दरम्यान प्राइस बँड निश्चित केला आहे.


आज  हिंदी दिवस 


हिंदी भाषेचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी हिंदी भाषा भारताच्या अधिकृत भाषांपैकी एक म्हणून घोषित करण्यात आली. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.