Maharashtra Breaking News LIVE Updates : पुण्यातील जुन्नर तालुक्यात भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Mar 2022 05:46 PM
मोहोळजवळ दुचाकी आणि कंटेनरच्या अपघात झालेल्या शेतकऱ्याच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल

मोहोळजवळ दुचाकी आणि कंटेनरच्या अपघात झालेल्या शेतकऱ्याच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


आरटीओ अधिकारी राजेश अहुजा, शिवाजी सोनटक्के, तसेच त्यांच्या गाडीतील आरटीओचे इतर कर्मचारी आणि कंटेनर ट्रक चालक विरोधात गुन्हा नोंद


द्राक्ष बागायतदार मोहन आदमाने यांच्या मृत्यूस आरटीओ अधिकारी आणि कंटेनर चालक कारणीभूत असल्याचा आरोपी


मृताचे नातेवाईक अमोल आदमाने यांच्या फिर्यादीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


भांदवि 304 अ, 283, 427 तसेच मोटारवाहन अधिनियम च्या विविध कलमनुसार गुन्हा नोंद

Navi Mumbai - महानगर पालिकेच्या 7 हजार कंत्राटी कामगारांचे बेमुदम कामबंद आंदोलन सुरू

Navi Mumbai -  विविध मागण्यांसाठी आजपासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या  7 हजार कंत्राटी कामगारांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलेय. कोविड मुळे मृत पावलेल्या कंत्राटी कामगारांना आर्थिक मदत देणे, कोविड काळात काम केल्याबद्दल कोविड भत्ता देणे व कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन लागू करणे या तीन प्रमुख मागण्यांसाठी आजपासून आंदोलन पुकारण्यात आलेय. नवी मुंबई मनपा मध्ये कंत्राटी पद्धतीवर विविध विभागात काम करणाऱ्या 7000 कंगारांनी या आंदोलनात सहभाग घेतलाय. यात 4 हजार पेक्षा अधिक सफाई कर्मचारी आहेत. या आंदोलनाबाबत योग्य तोडगा न काढल्यास हे आंदोलन डोईजड होण्याची शक्यता असून मनपा आयुक्त अभिजीत बांगर आडमुठे पणाचे धोरण अवलंबत असल्याची टीका कामगार नेत्यांनी व्यक्त केलेय.

बारावीच्या पेपरमध्ये गैरप्रकार झाल्याचे उघड शिक्षणाधिकारी ,गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून पोलिसात अद्यातविरोधात गुन्हा दाखल होणार

बारावीच्या पेपरमध्ये गैरप्रकार झाल्याचे उघड शिक्षणाधिकारी ,गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून पोलिसात अद्यातविरोधात गुन्हा दाखल होणार,बोर्डाकडून माहिती

Pune Junner Accident :  पुण्यातील जुन्नर तालुक्यात भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

Pune Junner Accident :  पुण्याच्या जुन्नर तालुक्यात झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.  बदगीच्या घाटात ही दुर्दैवी घटना घडली. नवनाथ हुलावळे आणि राहुल हुलावळे अशी मृतांची नावे होती. स्कॉर्पिओ गाडीतून हे दोघे अकोले जिल्ह्यातील त्यांच्या गावी निघाले होते. तेव्हा बदगीच्या घाटात गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी तीनशे फूट दरीत कोसळली. खाली जाऊन गाडी एका झाडावर लटकली, यात अपघातात एकाचा जागीच तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

SSC EXAM : उद्यापासून दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात होणार, गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाकडून भरारी पथकांची नेमणूक

SSC EXAM : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या मार्च एप्रिल  2022 दहावी बोर्ड परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे. मागील वर्षी कोरोनाच्या परिस्थितीत दहावी परीक्षा ऐनवेळी रद्द करावी लागली होती. त्यामुळे दोन वर्षानंतर दहावी परीक्षा घेतली जात आहे. यंदाच्या दहावी बोर्ड परीक्षेला 16,39,172 विद्यार्थी बसणार आहेत. दहावी बोर्ड परीक्षेसाठी एकूण 22,911 शाळांमधील विद्यार्थ्यांनी अर्ज भरले  असून राज्यातील 21,284 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. उद्या पहिला पेपर हा प्रथम भाषेचा असणार आहे. 

शेतकऱ्यांना मोफत वीज देणे हा शेतकऱ्यांचा मुलभुत अधिकार आहे - राजू शेट्टी

शेतकऱ्यांना मोफत वीज देणे हा शेतकऱ्यांचा मुलभुत अधिकार आहे - राजू शेट्टी

Kolhapur : कोल्हापुरात वीज कनेक्शन तोडल्याने शेतकरी आक्रमक, महावितरण कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

कोल्हापुरात भरमसाठ बिलं देऊन नंतर वीज कनेक्शन तोडण्याच्या महावितरणाच्या कृतीवर शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. महावितरणाच्या कार्यालयात काही शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.  

HSC Exam : बारावीचा गणिताचा पेपर फुटला, पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या व्हाट्सअपवर आली प्रश्नपत्रिका 

HSC Exam : अहमदनगर येथील श्रीगोंद्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटला आहे. बारावीच्या गणिताची प्रश्नपत्रिका पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या व्हाट्सअपवर आल्याने हा प्रकार समोर आला आहे. परंतु, ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली किंवा नाही याबाबत पोलीस तपासानंतरच खुलासा होणार आहे. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिली आहे. 

Kolhapur latest news : वीज कनेक्शन तोडल्याने गावकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयातच केला आत्मदहनाचा प्रयत्न 

Kolhapur latest news : गावातील विजेचे कनेक्शन तोडल्याने गावकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयातच केला आत्मदहनाचा प्रयत्न 


महावितरणच्या कार्यालयातच अंगावर डिझेल ओतून घेतले


कोल्हापूर जिल्ह्यातील महे, कसबा बीड, वाशी गावातील ग्रामस्थ आक्रमक 


कोणतीही पूर्वसूचना न देता गावातील पाणीपुरवठाची वीज खंडित केल्याने गावकरी आक्रमक 


महावितरणचे अधिकारी आणि गावकरी यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी

Anil Deshmukh News : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख जामीन अर्ज  कोर्टाने नाकारला, मुंबई सत्र न्यायालय विशेष पीएमएलए कोर्टाचा आदेश,अनिल देशमुखांना दिलासा नाहीच 

Anil Deshmukh News : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख जामीन अर्ज  कोर्टाने नाकारला, मुंबई सत्र न्यायालय विशेष पीएमएलए कोर्टाचा आदेश,अनिल देशमुखांना दिलासा नाहीच  


100 कोटी वसुली  मनी लाँड्रिंग प्रकरणात  देशमुख यांना ईडीने अटक केली होती


  सध्या देशमुख आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत . ईडीने 29 डिसेंबर 2021  रोजी  अनिल देशमुख आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध दाखल केले होते पुरवणी आरोपपत्र 


 या प्रकरणी  अनिल देशमुख यांनी सेशन कोर्टात नियमित  जामिनासाठी  दाखल केला होता अर्ज

Share Market Update :   सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला तर निफ्टीत देखील 139 अंकांनी वर , कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण बघायला मिळाल्यानं गुंतवणूकदारांमध्ये उत्साह




Share Market Update :   सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला तर निफ्टीत देखील 139 अंकांनी वर , कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण बघायला मिळाल्यानं गुंतवणूकदारांमध्ये उत्साह


१४० डाॅलर प्रति बॅरलवरुन ११० डाॅलर प्रति बॅरलवर कच्चा तेलाच्या किंमती


उत्पादक देशांकडून उत्पादन वाढवण्यावर भर दिल्याने किंमतीत घ


युरोपीयन युनियनने निर्बंध लावू असं सांगितलं होतं मात्र आतापर्यंत अंमलबजावणी न झाल्याने देखील परिणाम


एलआयसीच्या आयपीओला रशिया-युक्रेन युद्धाचा फटका, एलआयसीचा आयपीओ पुढील आर्थिक वर्षात येणार 


सरकारला ६० ते ७० हजार कोटींचा फटका, निर्गुंतवणुकीतून सरकार ह्या आर्थिक वर्षात १ लाख ७५ हजार कोटी उभे करणार होती मात्रफक्त १ लाख कोटींच्या जवळपासच उद्दिष्ट पूर्ण झालं होतं 


 

 



 


Pune : एकतर्फी प्रेमातून दहावीतील मुलीवर प्राणघातक हल्ला; वडगाव शेरीमधील घटना

Pune :  एकतर्फी प्रेमातून इयत्ता दहावीत शिकणारी अल्पवयीन मुलीवर वडगाव शेरी हद्दीत धारदार हत्याराने वार करण्यात आले आहे. मुलीवर सिटी हॉस्पिटल वडगाव शेरी याठिकाणी उपचार सुरू आहेत. सदर घटना वडगाव शेरी येथे घडली. शास्त्रीनगर पोलीस ठाणे येरवडा हद्दीत आहे आहे.

Mumbai News : विनामास्क फिरणाऱ्या लोकांकडून वसूल केलेला दंड परत करा, हायकोर्टात याचिका


विनामास्क फिरणाऱ्या लोकांकडनं वसूल केलेला दंड परत करा, हायकोर्टात याचिका


बेकायदेशीरपणे लॉकडाऊनचे निर्बंध लादत केलेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी


फिरोझ मिठबोरवाला यांचा राज्य सरकारवर पाच कोटींच्या नुकसानभरपाईचा दावा


राज्य सरकारनं घोषित केलेल्या लससक्तीला हायकोर्टात पुन्हा आव्हान

Palghar Updates : पालघरमध्ये पार्किंगमधील बाईक्सला भीषण आग, आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याने पार्किंगमधील सात ते आठ बाइक जळून खाक  

Palghar Updates : पालघरमध्ये पार्किंगमधील बाईक्सला भीषण आग, आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याने पार्किंग मधील सात ते आठ बाइक जळून खाक  

Palghar News : पालघरमध्ये पार्किंग केलेल्या बाईकसला भीषण आग

Palghar News : पालघरमध्ये पार्किंग केलेल्या बाईकसला भीषण आग लागली आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी आल्यानं पार्किंगमधील सात ते आठ बाइक जळून खाक झाल्या आहेत. पालघर पूर्व येथील रामनगर परिसरातील घटना. आगीचं कारण अजूनही अस्पष्ट.

Akola News : अकोल्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी वैद्यकीय शिक्षकांचं कामबंद आंदोलन

Akola News : अकोल्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी वैद्यकीय शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू आहे. 130 लोक आंदोलनात सहभागी झाले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयातील कामकाजावर परिणाम झाला आहे. पगार आणि भत्ते वाढविण्याची मागणी केली जात आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी घोषणाबाजी केली जात आहे. 

Navi Mumbai : नवी मुंबईतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांकडून मारून घेतला झाडू

नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 20 चा अजब कारभार समोर आला आहे. मनपा शाळेनं चक्क विद्यार्थ्यांकडूनच झाडू मारून घेत शाळेची स्वच्छता केली आहे. आजपासून नवी मुंबई मनपा क्षेत्रातील कंत्राटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनात सफाई कामगारही सहभागी झाली आहेत. सफाई कामगार कामावर न आल्यानं मनपा शाळेतील शिक्षकांनी चक्क आपल्या विद्यार्थ्यांकडूनच झाडू मारून घेत साफसफाई करून घेतली आहे. हा सर्व प्रकार एका इसमाने आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केल्याने सर्वांसमोर आलाय. आता विद्यार्थ्यांच्या हातात झाडू देणाऱ्या शिक्षकांवर मनपा प्रशासन काही कारवाई करते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत प्लास्टिकबंदी मुळे 90 टन कचरा घटला; पालिका प्रशासनाचा दावा

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी मागील 2 वर्षांपासून प्रयत्न सुरु आहे. पालिका प्रशासनाकडून ओल्या कचऱ्याची विल्हेवाट, कचरा वर्गीकरण आणि प्लास्टिक बंदीवर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून 3 जानेवारीपासून प्लास्टिक बंदी मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मागील 2 महिने या मोहिमेत सातत्य ठेवत प्लास्टिकचा वापर करणाऱ्या नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून दोन महिन्यात 20 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर हजारो नागरिकांना प्लास्टिक बंदीसाठी शपथ देत नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये जनजागृती करत प्लास्टिक वापर टाळण्याचे आवाहन ही करण्यात येत आहे. तर नियम न पाळता प्लास्टिक वापरणाऱ्या व्यापाऱ्यांना 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला जात असून व्यापाऱ्यांना प्लास्टिकच्या पिशव्यांना पर्याय उपलब्ध करून दिले जात असल्यानं शहरातील प्लास्टिकचा वापर थांबल्यामुळे 90 टन कचरा कमी झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

Maharashtra Assembly Session : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या घरी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणावा; भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

Maharashtra Assembly Session : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या घरी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणावा; भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांची पोलीस चौकशी; भाजपचा विधानसभेत स्थगन प्रस्ताव

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांची पोलीस चौकशी; भाजपचा विधानसभेत स्थगन प्रस्ताव

HSC Exam : मुंबई: बारावी केमिस्ट्रीचा पेपर फुटला; मालाडमधील खाजगी क्लासेसच्या शिक्षकाला पोलिसांकडून अटक केली

HSC Exam Paper Leak : मुंबई: बारावी केमिस्ट्रीचा पेपर फुटला; मालाडमधील खाजगी क्लासेसच्या शिक्षकाला पोलिसांकडून अटक केली

पालघरमध्ये शर्मिला ठाकरे यांच्या उपस्थितीत सामूहिक विवाह सोहळा संपन्न

पालघर : विक्रमगड इथे रविवारी (13 मार्च) मनसेतर्फे आयोजित करण्यात आलेला भव्य सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला.  साडे सातशेपेक्षा अधिक आदिवासी दाम्पत्यांचा विवाह सोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या धर्मपत्नी शर्मिला ठाकरे यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद दिले. शर्मिला ठाकरे यांच्यासह मनसेचे नेते अभिजीत पानसे, आमदार राजू पाटील यांनीदेखील उपस्थिती लावली. साडे सातशेपेक्षा जास्त नवदाम्पत्यांना यावेळी जीवनावश्यक साहित्याचं वाटप देखील मनसेतर्फे करण्यात आलं. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी एका नवदाम्पत्याचं कन्यादान केलं. ही भावना बोलता न येण्यासारखी असल्याच शर्मिला ठाकरे यावेळी म्हणाल्या. तसंच जव्हार, मोखाडा , विक्रमगड या ग्रामीण भागात रोजगाराची कमतरता असल्याने लग्न आम्ही करुन देऊ मात्र सरकारने येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, असा खोचक टोला यावेळी शर्मिला ठाकरे यांनी लगावला. पालघरमधील आरोग्य व्यवस्था सुधारण्याचं आवाहन यावेळी त्यांनी सरकारला केलं. 

बुलढाण्यात देऊळगाव राजानजीक भीषण अपघात; पाच मृत्युमुखी, चार गंभीर जखमी

बुलढाणा : देऊळगाव राजा नजीक भक्तांच्या बोलेरो गाडीला भीषण अपघात झाला. खामगाव जालना महामार्गावर बोलेरो आणि ट्रकमध्ये आज सकाळी साडेपाचच्या सुमारास जोरदार धडक झाली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बोलेरो चालक, एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. याशिवाय अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर देऊळगाव राजा आणि जालना इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. बोलेरो गाडी भक्तांना घेऊन जालन्याकडून शेगाव इथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी निघाली होती. 


 

पार्श्वभूमी

Maharashtra Assembly Session : आज विधिमंडळात पुन्हा गदारोळ? फडणवीसांच्या चौकशीमुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता


महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनाचा आजचा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांनी केलेली चौकशी, नवाब मलिक यांचा राजीनामा आदी मुद्यांवर विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. तर, दुसरीकडे सत्ताधारी महाविकास आघाडीकडूनही विधीमंडळात विरोधकांच्या आरोपांना कसं उत्तर देतं याकडेही लक्ष लागले आहे. मागील आठवड्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सरकारी वकिलांवर आणि महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले होते. आपल्या आरोपांच्या पुष्टीसाठी त्यांनी 125 तासांची व्हिडिओ रेकोर्डिंगचा पेनड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला होता. फडणवीस यांच्या आरोपानंतर महाविकास आघाडी सरकार काहीसं बॅकफूट गेलं असल्याचे चित्र होते. रविवारी, पोलीस बदली कथित घोटाळ्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी दोन तास चौकशी केली. फडणवीस यांची चौकशी राजकीय सूडबुद्धीने करण्यात आली असल्याचा आरोप भाजपने केला होता. तर, फडणवीस यांना याआधी 6 वेळेस नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्यांनी त्याला उत्तर दिले नसल्याने पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन जबाब नोंदवला असल्याची माहिती सरकारने दिली. 


Russia Ukraine War : रशिया-युक्रेन यांच्यात आज पुन्हा चर्चा; तोडगा निघणार?


युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरूच आहे. दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटला, पण रशियाचे हल्ले कमी होण्याचे नाव घेत नाहीत आणि युक्रेनही हार मानायला तयार नाही. दोन्ही देशांमध्ये चर्चाही झाली असली, तरी त्यातून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. दरम्यान, आता दोन्ही देशांमध्ये चर्चेची आणखी एक फेरी होणार आहे. आज पुन्हा दोन्ही देशांमार्फत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा होणार आहे. रशिया-युक्रेन युद्धावर होणारी चर्चा सोमवारी 10:30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) व्हिडीओ लिंकद्वारे सुरू होईल. युक्रेनच्या शिष्टमंडळाच्या हवाल्यानं स्पुतनिकनं हे वृत्त दिलं आहे.


Parliament Budget Session : आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात,


संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारी म्हणजेच आजपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनामध्ये वाढती बेरोजगारी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर कपात आणि युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढणे यासह अनेक मुद्द्यांवर विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय प्रस्तावांना संसदेची मंजुरी मिळवणे तसेच जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशासाठी अर्थसंकल्प सादर करणे हे सरकारच्या अजेंड्याच्या शीर्षस्थानी असेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोमवारी जम्मू आणि काश्मीरसाठी अर्थसंकल्प सादर करतील. दुपारच्या जेवणानंतरच्या कामकाजादरम्यान सभागृहात त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.