Maharashtra Breaking News LIVE Updates : दिल्लीत इमारतीला भीषण आग; 16 जणांचा होरपळून मृत्यू, बचावकार्य सुरू

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 May 2022 10:33 PM
Delhi Fire: दिल्लीत इमारतीला भीषण आग; 16 जणांचा होरपळून मृत्यू, बचावकार्य सुरू

पश्चिम दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळील एका इमारतीला शुक्रवारी संध्याकाळी लागलेल्या आगीत 16 जणांचा मृत्यू झाला. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीची माहिती दुपारी 4.40 च्या सुमारास मिळाली, त्यानंतर 24 अग्निशामक गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या.

Congress : कायम सक्रिय असणाऱ्या नेत्याकडे काँग्रेसचे अध्यक्षपद हवं, चिंतन शिबिरात नेत्यांची मागणी

Congress : कायम सक्रिय असणाऱ्या नेत्याकडे काँग्रेसचे अध्यक्षपद हवं, चिंतन शिबिरात नेत्यांची मागणी काँग्रेसमध्ये कायम सक्रिय असणाऱ्या नेत्याकडे काँग्रेसचे अध्यक्षपद असायला हवं असं अशी मागणी काही नेत्यांनी केली आहे. राहुल गांधींकडे अध्यक्षपद देण्यात यावं अशीही मागणी काहींनी केली. काँग्रेसचे चिंतन शिबिर तीन दिवस चालणार असून त्यामध्ये अध्यक्षपदाचा तिढा सुटणार का ते पाहावं लागेल.

Amravati News Update : आमदार रवी राणा यांच्या पोस्टरला जोडे मारून मुस्लिम ब्रिगेडतर्फे निषेध

अमरावतीलमधील छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडतर्फे आमदार रवी राणा यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा हे दोघेही मुस्लिम समाजाची मतं घेऊन निवडून आले आहेत. मात्र, आता दोघेही मुस्लिमांच्या विरोधात बोलत असल्याने आमच्या भावना दुखावल्या असल्याचं यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. त्यामुळे आज नागपुरी गेट चौकात आंदोलनकर्त्यांनी आमदार रवी राणा यांच्या पोस्टरला जोडे मारून आणि पोस्टर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. 

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या आयोध्या दौऱ्याच्या तारखेत बदल?

Aaditya Thackeray :  शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्या बदल होण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. राज्यसभेच्या  महाराष्ट्रातील सहा जागांसाठी 10 जून रोजी मतदान होणार आहे आणि याच दिवशी आदित्य ठाकरे यांचा आयोध्या दौरा निश्चित करण्यात आला होता. परंतु, राज्य सभेच्या मतदानाची तारीख काल जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याच्या तारखेमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Kalyan Dombivali: कल्याण डोंबिवली महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

मागील दोन वर्षापासून रखडलेल्या राज्यातील महापालिका नगरपरिषदा आणि नगरपालिकाच्या निवडणुकीची प्रक्रिया 15 दिवसात थांबलेल्या टप्प्यावरून पुढे सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते . त्यानंतर निवडणूक आयोगाने राज्यातील 14 महापालिकाना निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरु करण्याचे निर्देश देत कार्यक्रम आखून दिला होता. या कार्यक्रमानुसार 17 मे पर्यत अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याच्या आदेशाचे पालन करताना कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. 133 नगरसेवकासाठी 44 प्रभागात होणार्या निवडणुकीची प्रभाग रचना 13  मे रोजी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली असून पालिकेच्या मुख्य कार्यालयासह प्रभाग समितीच्या सर्व कार्यालयात प्रभाग रचना आणि सिमारचनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

बारामतीत हॉटेलच्या वेटरने तडीपार गुंडाचा खून केला

Baramati News : बारामती शहरामध्ये हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका वेटरने दुसऱ्या वेटरचा खून केल्याची घटना घडली आहे. खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या एक तासात आरोपीला अटक केली. दरम्यान नाशिक येथून तडीपार असलेला गणेश प्रभाकर चव्हाण हा एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होता. याच हॉटेलमध्ये वेटरचे काम करणारा विकास दीपक सिंह या दोघांचे तू माझ्या व्हेज किचनमध्ये येऊ नको, यावरुन वाद झाला. हा वाद मिटवण्यात आला होता मात्र त्यानंतर रात्री दोन वाजता पुन्हा या दोघांची भांडण झाले आणि या भांडणात विकास दीपक सिंग याने गणेश प्रभाकर चव्हाणचा खून केला. खुनानंतर बारामती पोलिसांनी अवघ्या एक तासात आरोपी विकास दीपक सिंह यास अटक केली आहे.. 

Aurangabad: औरंगाबाद महापालिका आयुक्तांवर हल्ल्याचा प्रयत्न

पाणी प्रश्नावरून निवेदन देण्यासाठी गेलेल्या 2 जणांनी औरंगाबाद महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार महापालिकेने पोलिसात दिली आहे. महापालिका आयुक्त दुपारी कार्यालयातून निघत असताना 2 जण त्यांना खाली निवेदन द्यायला आले आणि वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यातून एक कार्यकर्ता आयुक्तांच्या अंगावर धावून गेला, याच दरम्यन  सुरक्षारक्षकमध्ये आल्याने पुढील गोष्टी टळल्या असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलाय, दरम्यान या दोन्ही कार्यकर्त्यांविरोधात महापालिकेकडून पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

Appasaheb Dharmadhikari : पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विक्रमगड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

Appasaheb Dharmadhikari : पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समर्थ बैठक वाडा समितीच्या वतीने विक्रमगड मध्ये आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळत असून दुपारी साडेबारा वाजेपर्यंत विक्रमी रक्तदान झाले. यावेळी जवळपास 700 जणांनी रक्तदानाचा हक्क बजावला. अजूनही रक्तदानासाठी रक्तदात्यांची रांग लागली असून आठशे जणांनी नोंदणी केली आहे. कोविड नंतर हे विक्रमी रक्तदान असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे

Washim News Update : संपत्तीच्या वादातून जावयाने केली सासू आणि मेव्हणीची हत्या, वाशीम जिल्ह्यातील घटना 

संपत्तीच्या वादातून जावयाने कोयत्याने वार करून सासू आणि मेव्हनीची हत्या केली आहे.  वाशिम जिल्ह्यातील शेलुबाजार येथे ही घटना घडली आहे. निर्मला पवार ( वय 65 ) आणि विजया  गुंजावळे (वय 40 ) अशी हत्या झालेल्या दोघींची नाव आहेत. तर सचिन थोरात असे हत्या करणाऱ्या संशयिताचे नाव आहे.  


पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास मंगरुळपिर पोलीस करत आहेत. आरोपी थोरात हा काही दिवसांपूर्वी पुण्यावरून सासुरवाडीला आला होता. सासूच्या संपत्तीमधील काही हिस्सा तो मागत होता.  मात्र, विजया गुंजावळे आणि सासूचा त्याला वाटा देण्यास विरोध होत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने दोघींची हत्या केली.  

Ambajogai: रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनींची आत्महत्या

बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे घडली आहे. याच गावातील एका रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने दिल्यानंतर त्या रोडरोमिओवर गुन्हा नोंदवण्यात आलाय.17 वर्षाच्या दीपाली रमेश लव्हारे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तिने नुकतीच बारावीची परिक्षा दिली होती. दिपालीचे वडील राज्य परिवहन मंडळात चालक असून सध्या पालघर येथे कार्यरत आहेत. दिपालीची आई सुमित्रा यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या घराशेजारी राहणारा अकबर बबन शेख हा तरुण मागील काही दिवसापासून दिपाली कॉम्प्युटर क्लासला जात येत असताना तिला छेडत होता. रस्त्यात अडवून वेडेवाकडे बोलणे, सतत करणे अशा पद्धतीने तो तिला त्रास देत होता.

Washim : संपत्तीच्या वादातून जावयाने सासू आणि मेव्हनीची हत्या

Washim : संपत्तीच्या वादातून जावयाने सासू आणि मेव्हनीची हत्या केल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील शेलुबाजार येथे घडली निर्मला भिकाजी पवार वय 65 व विजया  गुंजावळे वय 40 यांचा लहान मुलीच्या नवरा सचिन थोरात यांनी संपत्तीच्या वादातून खून केला असल्याचा संशय  पोलिसांना आहे दरम्यान घटनास्थळून आरोपी पलायन करत असल्याचं   दिसताच आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास मंगरुळपिर पोलीस करत आहे. 

अनिल देशमुखांना दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाचा नकार, खासगी ऐवजी जेजेतच खांद्यावरील शस्त्रक्रिया करण्यास परवानगी

अनिल देशमुखांना दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाचा नकार


खासगी ऐवजी जेजेतच खांद्यावरील शस्त्रक्रिया करण्यास परवानगी


तपासयंत्रणेनं देशमुखांचा सादर केलेला वैद्यकीय अर्ज ठरला निर्णायक


खाजगी रूग्णालयात उपचारांची गरज नाही, जेजेतही उपचार होऊ शकतात - ईडी

Konkan Weather News Updates : तळकोकणात अवकाळी रिमझिम पाऊस, आंबोलीत दाट धुकं

Konkan Sindhudurga Weather News Updates :  सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून रिमझिम पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग या भागात पाऊस पडत आहे. असनी चक्रीवादळामुळे कोकणात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. कोकणात किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस कोसळत आहे. कोकणातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या आंबोलीत तर सकाळी दाट धुकं पडलं होतं. त्यामुळे मे महिन्यातचं पावसाळा असल्याचा भास होत होता. मात्र जिल्हावासियांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या शेतातील अंतिम टप्प्यातील काम रेंगाळली आहेत. 

Maharashtra Dhule News : महापालिकेकडे टँकरची सुविधा उपलब्ध नसल्याने अग्निशमन बंबाच्या मदतीने पाणीपुरवठा करण्याची महापालिकेवर नामुष्की

Dhule News : महापालिकेकडे टँकरची सुविधा उपलब्ध नसल्याने अग्निशमन बंबाच्या मदतीने पाणीपुरवठा करण्याची महापालिकेवर नामुष्की

Mumbai Traffic Updates : पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीची शक्यता, ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना फटका

पूर्व द्रुतगती मार्गावर जेव्हीएलआर म्हणजेच जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड ज्या ठिकाणी सुरू होतो, त्या ठिकाणी असलेला ब्रिज हा दुरुस्तीच्या कामासाठी 13 ते 24 मे अश्या दहा दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या ब्रिजच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून याचे दोनशे बेरिंग बदलायचे काम सुरू आहे. तर या ब्रिजचे एक्सपान्शन जॉइंट बदलण्यासाठी ब्रिज बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस मुंबईवरून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना या ब्रिजच्या खालील सिग्नल वर थांबावे लागेल. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे.

Maharashtra Breaking News : शिवसेना आमदार रमेश लटके यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार


अंधेरी पूर्व परिसरातील पारसी वाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडणार 


थोड्याच वेळात रमेश लटके यांचे पार्थिव पारसी वाडा स्मशानभूमीत दाखल होणार

प्रवीण दरेकर माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये हजर, जामिनाची प्रक्रिया पूर्ण
विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे आज माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये हजर राहीले

 

मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने प्रवीण दरेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता

 

जामीन मंजूर झाल्यानंतर या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रवीण दरेकर यांना पोलीस स्टेशन येथे हजर राहण्यास सांगितले होते

 
 अकबरुद्दीन ओवेसींचे थडगे औरंजेबाच्या थडग्या शेजारी बंधू, मनसे नेते दिलीप धोत्रे यांचं वक्तव्य
काल अकबरुद्दीन ओवेसी यांनी आपल्या औरंगाबाद येथील भाषणात राज ठाकरे यांच्यावर जहरी टीका केल्यावर आज त्याला उत्तर मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिले असून ओवेसीनवर निशाणा साधताना मात्र धोत्रे यांची जीभ घसरली . राज ठाकरे यांच्यावर सध्या राज्यभरातून सातत्याने टोकाची टीका आणि शाब्दिक हल्ले सुरु असताना राज ठाकरे यांनी मात्र शांत राहण्याची भूमिका घेतली आहे. यातच त्यांनी नेमलेल्या प्रवक्त्यांशिवाय कोणीही माध्यमांशी संवाद साधू नये असा सज्जड दम देखील मनसे नेते आणि कार्यकर्त्यांना दिला असला तरी राज ठाकरे यांच्यावरील टीकेमुळे मनसे नेते आणि मन सैनिक सध्या जास्तच अस्वस्थ झाला आहे. ओवेसी यांची टीका जिव्हारी लागलेले मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी आज मात्र सर्व बंधने तोडून ओवेसींना अत्यंत कडक आणि खालच्या भाषेत उत्तर दिले आहे . ज्या संभाजी राजन आम्ही दैवत मानतो त्यांचे हाल करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून अकबरुद्दीन ओवेसी याने आमच्या जखमेवर मीठ चोळले आहे . आता त्याचे थडगे  देखील औरंगजेबाच्या थडग्या शेजारी बांधल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिलीप धोत्रे यांनी दिला आहे . राज ठाकरे यांची औरंगाबादची ऐतिहासिक सभा यशस्वी करण्यात दिलीप धोत्रे आघाडीवर होते. 
Pune News Updates : पुणे रेल्वेस्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू आढळल्यानं स्टेशन परिसरात खळबळ

Pune News Updates : पुणे - रेल्वेस्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू आढळल्यानं स्टेशन परिसरात खळबळ, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 पूर्णपणे रिकामे करण्यात आले. बीडीडीएसचं पथक रेल्वेस्थानकावर दाखल. काही काळासाठी रेल्वेवाहतूकही थांबवण्यात आली

Pune Breaking : पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू आढळली, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 पूर्णपणे रिकामं 

Pune Breaking : पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू आढळली, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 पूर्णपणे रिकामं 

नवाब मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा तात्पुरता दिलासा, वैद्यकीय कारणांसाठी जामीन नाही, परंतु खासगी रुग्णालयात उपचार करण्याची विनंती कोर्टाकडून मान्य

नवाब मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा तात्पुरता दिलासा


वैद्यकीय कारणांसाठी जामीन नाही, परंतु खासगी रुग्णालयात उपचार करण्याची विनंती कोर्टाकडून मान्य


नवाब मलिकंवर कुर्ल्यातील क्रिटी केअर रूग्णालयात उपचार होणार


उपचांरासह पोलीस बंदोबस्ताचा खर्च नवाब मलिकांनाच करावा लागणार


उपचारादरम्यान केवळ एका कुटुंब सदस्याला सोबत राहण्याची मुभा

Maharashtra Election Updates : महाराष्ट्रातल्या निवडणुका नेमक्या कधी होणार याचा फैसला सुप्रीम कोर्टात 17 मे रोजी

महाराष्ट्रातल्या निवडणुका नेमक्या कधी होणार याचा फैसला सुप्रीम कोर्टात 17 मे रोजी


निवडणूक आयोगाने आज आपली याचिका सुप्रीम कोर्टात मेन्शन केली


कोर्टाने त्यावर सुनावणी साठी 17मे दुपारी दोन वाजता ची वेळ निश्चित केली 


महापालिका नगरपंचायती सप्टेंबरमध्ये तर जिल्हा परिषद ग्रामपंचायती ऑक्‍टोबरमध्ये घेण्याची विनंती आहे


सुप्रीम कोर्ट पावसाळ्यानंतर निवडणुका घेण्यासाठी मुभा देणार का याचे उत्तर 17 मे रोजी कळणार

Ramesh Latke Latest Updates : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल, सोबत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे देखील उपस्थित

Ramesh Latke Latest Updates : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल, सोबत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे देखील उपस्थित, शिवसेनेचे अनेक नेते आणि मंत्र्यांची उपस्थिती 

दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रशासनाला सूचना

शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पार्थिवावर आज शासकिय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत

विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे देखील आमदार रमेश लटके यांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल

विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे देखील आमदार रमेश लटके यांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आमदार रमेश लटके यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी दाखल  

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आमदार रमेश लटके यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी दाखल  

Ulhasnagar : भाड्याने खोली दिली नाही म्हणून वृद्ध महिला आणि तिच्या मुलावर जीवघेणा हल्ला; उल्हासनगर मधील धक्कादायक घटना

Ulhasnagar : उल्हासनगर मधील धक्कादायक घटना. भाड्याने खोली दिली नाही म्हणून वृद्ध महिला आणि तिच्या मुलावर जीवघेणा हल्ला. आरोपी अजय पवार आणि त्याचा साथीदारांनी एका महिन्यात तीन वेळा हल्ला केला . या हल्ल्यात आई आणि मुलगा गंभीर जखमी असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर एकच्या साधुबेला शाळेजवळ ही घटना आहे. 

Raigad : कर्नाळ्या जवळ एसटी बसने घेतला पेट; प्रवासी सुखरूप

Raigad : मुंबई - गोवा हायवेवर कर्नाळानजीक एसटी बसला आग. कर्नाळ्या जवळ एसटी बसने घेतला पेट; प्रवासी सुखरूप. 


जळगावमध्ये भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

जळगावमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. दुधाचा टँकर आणि ट्रकचा अपघात झाला. मुक्ताईनगर तालुक्यात घोडासगाव जवळ ही घटना घडली.

आमदार रमेश लटके यांचे पार्थिव महाराष्ट्र कामगार कल्याण भवनमध्ये आणलं

आमदार रमेश लटके यांचे पार्थिव महाराष्ट्र कामगार कल्याण भवन येथे आणण्यात आले आहे 


सकाळी १० ते १२ पर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी कामगार भवन येथे ठेवण्यात येणार आहे

Sensex Update : आशियाई बाजारातील तेजीमुळे भारतीय शेअर बाजार वधारला, सेन्सेक्स 685 अंकांनी वधारला तर निफ्टी 210 अंकांनी वर 

Sensex Update : आशियाई बाजारातील तेजीमुळे भारतीय शेअर बाजार वधारला, सेन्सेक्स ६८५ अंकांनी वधारला तर निफ्टी २१० अंकांनी वर 


पाच दिवसांच्या पडझडीनंतर बाजार हिरव्या फितीत उघडला, निफ्टीचा निर्देशांक पुन्हा १६ हजारांच्या पार 


टाटा मोटर्स, ओएनजीसी, अदानी पोर्ट, अपोलो रुग्णालय, सन फार्मासारख्या कंपन्यांच्या समभागात तेजी 


डाॅलरच्या तुलनेत रुपया मजबूत स्थिती उघडला, काल रुपया ७७.४२ प्रति डाॅलरवर बंद झाला होता आज तो ८ पैशाने वधारत रुपया ७७.३५ प्रति डाॅलरवर उघडलाय


कच्च्या तेलाच्या किंमती १०७ डाॅलर प्रति बॅरलवर

Nanded News : माहूर येथे देवदर्शनासाठी आलेल्या मायलेकींना चारचाकी वाहनाने चिरडले, श्री देवदेवेश्वर मंदिराजवळील घटना 
 माहूर येथे देवदर्शनासाठी आलेल्या आलेल्या मायलेकींना चारचाकी वाहनाने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडलीय. यात लेकीचा जागीच मृत्यू असून गंभीररित्या जखमी झालेल्या आईवर  माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.  आज पहाटे तीन ते साडेतीन वाजताच्या दरम्यान श्रीक्षेत्र माहूर येथील श्री देवदेवेश्वर मंदिर जवळील एका दुकानात झोपलेल्या मायलेकीला इंडिका कारने चिरडलेय.  ज्यात लेकीचा जागीच मृत्यू झाला असून आई गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली.. दरम्यान अपघातग्रस्त मायलेकी हदगाव तालुक्यातील मौजे करोडी येथील रहिवासी असून लक्ष्मीबाई शिवराम खंदारे (70) आणि त्यांची मुलगी शिला आनंदराव इनकर (48) या दोघी मागील सहा दिवसांपूर्वी देवदर्शनासाठी देवदेवेश्वरी जवळ माहूरात आल्या होत्या. दरम्यान माहूरातील श्री देवदेवेश्वर मंदीराजवळील एका दुकानात रात्री झोपल्या होत्या. पहाटेच्या वेळी कारच्या चालकाने निष्काळजीपणे गाडी पाठीमागे घेताना शिला आनंदराव ईनकर यांच्या अंगावरून गेली,ज्यात शिला यांचा जागीच मृत्यू झालाय,तर लक्ष्मीबाई शिवराम खंदारे  गंभीर जखमी झाल्यात.याप्रकरणी माहूर पोलीस ठाण्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 
उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार रमेश लटके यांच्या निवासस्थानी दाखल, पवारांकडून लटके कुटुंबियांचे सांत्वन 

उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार रमेश लटके यांच्या निवासस्थानी दाखल, पवारांकडून लटके कुटुंबियांचे सांत्वन 

शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार रविंद्र वायकर रमेश लटके यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी

शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार रविंद्र वायकर रमेश लटके यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आत्या संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात वृद्धापकाळाने निधन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आत्या संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात वृद्धापकाळाने आज सकाळी निधन झालं. त्या 84 वर्षांच्या होत्या.  प्रबोधनकार ठाकरे यांच्या त्या सर्वात लहान कन्या होत्या.

अनिल देशमुख यांच्यावरील शस्त्रक्रिया खासगी की सरकारी रुग्णालयात? आज फैसला

Mumbai News : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील शस्त्रक्रिया खासगी की सरकारी रुग्णालयात यावर आज फैसला होणार आहे. अनिल देशमुख यांच्या वैद्यकीय अर्जावर आज सुनावणी होणार आहे. खासगी रुग्णालयात उपचार व्हावेत, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे. परंतु देशमुखांच्या या मागणीला ईडीने विरोध केला आहे.

चंद्रपुरातील दुर्गापूर परिसरातून हल्लेखोर मादी बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात

Chandrapur News : चंद्रपुरातील दुर्गापूर परिसरातून हल्लेखोर मादी बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकली आहे. दोन दिवसांपूर्वी घराच्या अंगणात खेळत असलेल्या तीन वर्षीय मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली होती. यानंतर स्थानिक जमावाने वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोंडले होते. या प्रकारानंतर हल्लेखोर बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले होते. यादरम्यान आज पहाटे सिनाळा-भटाळा गावालगत लावलेल्या एका पिंजर्‍यात ही मादी बिबट्या अडकली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर मादी बिबट्याला चंद्रपूरच्या वन्यजीव शुश्रुषा केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. दुर्गापूर-ऊर्जानगर परिसरातील एक वाघ आणि 2 बिबटे आतापर्यंत जेरबंद झाले आहेत.

अमरावतीमध्ये तब्बल एक क्विंटल 24 किलो वजनाचा 'बुधभूषणम' ग्रंथ

Amravati News : छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषणम हा ग्रंथ लिहिला. अमरावती इथल्या अजय लेंडे यांनी तब्बल चार वर्ष कठोर मेहनत घेत या महाकाय ग्रंथाचा हस्तलिखित 'बुधभूषणम' ग्रंथ तयार केला आहे. हा ग्रंथ तब्बल 1 क्विंटल 24 किलोचा आहे आणि हा एकूण 164 पानांचा असून याची लांबी 5 फूट तर रुंदी 3 फूट इतकी आहे. या ग्रंथाची निर्मिती करण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागला असून किमान पुढील 200 वर्ष हा ग्रंथ सुस्थितीत राहिल. विशेष म्हणजे या ग्रंथासाठी खास शिवकालीन पद्धतीच्या कागदाचा वापर करुन हस्तलेखनाद्वारे ग्रंथ तयार करण्यात आला आहे. यासाठी विशेष शाईचा वापर करण्यात आला आहे.

आमदार रमेश लटके यांच्यावर आज अंत्यसंस्कार, अंत्यविधिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह अनेक नेतेमंडळींची उपस्थिती असणार

आमदार रमेश लटके यांच्यावर आज अंत्यसंस्कार, पार्थिवाचे अंत्यदर्शन सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत कामगार कल्याण भवन येथे ठेवण्यात येणार आहे. अंत्यविधिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह मंत्रीमंडळातील काही मंत्री तसेच नेतेमंडळी उपस्थित असणार आहे. काल त्यांचं दुबईमध्ये हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं होतं. 

बंगळुरूसमोर पंजाबचे आवाहन, रंगणार चुरशीचा सामना 

 


IPL 2022 मध्ये शुक्रवारचा सामना मोठा आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. बेंगळुरूचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा प्रबळ दावेदार बनला आहे. पण पंजाबच्या (पीबीकेएस) आशाही अबाधित आहेत. आणि त्याच आशेला पंख देण्यासाठी पंजाब बंगळुरूविरुद्ध (आरसीबी) विजयाचा गजर करताना दिसतो. पंजाबने हा सामना जिंकल्यास बंगळुरूचे गणित थोडेसे विस्कळीत होईल आणि बंगळुरूने विजय मिळवला तर त्याचे प्लेऑफचे चित्र अधिक स्पष्ट होईल. दोन्ही संघांमधील हा महत्त्वाचा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने ताजमहालच्या 22 खोल्या उघडण्याची याचिका फेटाळून लावली 

 


अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने ताजमहालच्या 22 खोल्या उघडण्याची याचिका फेटाळली आहे. कोर्टाने म्हटलं की, 'आम्ही इथे कोणत्या विषयावर संशोधन व्हायला हवं की करू नये, यासाठी बसलो नाही आहोत'. यासोबतच लखनौ खंडपीठानं म्हटलं की, हे प्रकरण न्यायालयाच्या बाहेर आहे आणि ते इतिहासकारांवर सोडलं पाहिजे.

नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

 


देशातून अनेक विद्यार्थ्यांनी 21 मे रोजी होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. आयएमए ने सुद्धा यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री यांना पत्र लिहिले आहे. नीट पीजी 2021 काऊन्सेलिंग राउंड अद्याप अनेक राज्यात पूर्ण झाले नाहीत त्यामुळे यामध्ये कौन्सिसिंग राउंडस आणि परीक्षा यात फार अंतर नाही. शिवाय कोव्हीड ड्युटी मुळे परीक्षेच्या तयारीला पुरेसा वेळ विद्यार्थ्यांना मिळालेला नाही त्यामुळे किमान दहा आठवडे परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी केली गेली आहे यासंदर्भात उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुद्धा होणार आहे.

संभाजीराजे स्वराज्य संघटना स्थापन करणार, कोणाला देणार पाठिंबा ?

संभाजीराजेंच्या संघटनेंची भुमिका काय असणार? पाठिंबा कोणाला ? महाविकास आघाडीला की महायुतीला ? खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज स्वराज्य नावाची संघटना स्थापन करताना राजकरणात उतरल्याशिवाय सर्वसामान्य जनेतच्या अडचणी सोडवता येणारं नाहीत. याचवेळी त्यांनी आपण अपक्ष म्हणून खासदारकीची निवडणुक लढण्याचं जाहीर केल आहे. मात्र दुसरीकडे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील निवडणुकांबाबत संभाजीराजे कोणती भुमिका घेणार? संभाजीराजे यांची संघटना कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार ? हे पाहावं लागणार आहे. 

अनिल देशमुखांची शस्त्रक्रिया सरकारी की खासगी दवाखान्यात? न्यायालयाचा आज निकाल

अनिल देशमुखांची शस्त्रक्रिया कुठे होणार ? सरकारी की खासगी दवाखाण्यात?  न्यायालयाचा आज निकाल. जेजे रुग्णालयात अद्ययावत सोयी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे आपले वाढते वय पाहता आपल्याला सरकारी रुग्णालयाऐवजी खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अनिल देशमुखांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली. मात्र ईडीनं याला विरोध केला असून देशमुखांवर तातडीनं शस्त्रक्रिया करण्याची गरज नसल्याचं सांगणारा अहवाल कोर्टात सादर केलाय. तसेच खासगी ऐवजी जेजेतही ही शस्त्रक्रिया होऊ शकते, असाही ईडीचा दावा आहे. अनिल देशमुख मात्र खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यावर ठाम आहेत. त्याचा निकाल आज येणार आहे.

महागाईचा भस्मासुर सर्वसामान्यांना गिळतोय, 8 वर्षातील सर्वात जास्त महागाई 

एप्रिल महिन्यातील किरकोळ महागाईची आकडेवारी समोर आलीय. एप्रिलमध्ये महागाई दर 7.79 टक्क्यांवर. मार्चमध्ये महागाईचा दर होता. 6.95 टक्के. तर  गेल्यावर्षी एप्रिलमध्ये महागाईदर होता 4.23 टक्के. त्यामुळे येत्या काही दिवसांत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर (आरबीआय) व्याजदरात आणखी वाढ करण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये फूड इन्फ्लेशनमध्ये मोठी वाढ झाली आहे. अन्नधान्य महागाई दर 8.38 टक्क्यांवर पोहोचलाय. त्यामुळे येत्या काही दिवसात नागरिकांना वाढत्या महागाईला तोंड द्यावे लागणार आहे. 

धर्मवीर चित्रपट आज सिनेमागृहात होणार प्रदर्शीत

धर्मवीर चित्रपट आज प्रदर्शीत होणार. या चित्रपटाला मोठी ओपनिंग मिळू शकते. या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानपर्यंत अनेक दिग्गज राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातून उपस्थितीत होते.

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निवडणुकीला परवानगी द्या आयोगाची मागणी, सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष?  
राज्यातल्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाकडून अर्ज सादर करण्यात आला आहे. निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात सादर अर्जाची एक्स्क्लुझिव्ह कॉपी एबीपी माझाकडे आहे. महापालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये घेण्यास परवानगी द्यावी अशी विनंती निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. ग्रामीण भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याची परवानगी द्या अशी विनंती देखील केली आहे. जून महिन्याअखेरीस सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वॉर्ड रचना आणि इतर प्राथमिक प्रक्रिया पूर्ण करु असं आयोगाने कोर्टात सादर केलेल्या अर्जात म्हटलं आहे. पण त्यानंतर पुढची प्रक्रिया ऐन पावसाळ्यात पूर्ण करावी लागेल. त्यात काय काय प्रशासकीय अडचणी आहेत हे निवडणूक आयोगाने नमूद केले आहे. पावसाळ्यात मतदान झाल्यास मतदानाची टक्केवारी कमी होऊ शकते ही भीती देखील व्यक्त केली आहे. त्यामुळे यावर न्यायालय काय निर्णय देतं याकडे लक्ष आहे?


राहुल गांधी पुन्हा कॉंग्रेस अध्यक्षपदी विराजमान होणार?  
काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्याकडे सोपवावीत अशी मागणी नेहमी होत असते. आता राहुल गांधीही काँग्रेस अध्यक्षपदाबाबत सकारात्मक विचार करत असल्याची माहिती आहे.  काँग्रेसची संघटनात्मक मतदान प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे उदयपूर येथील चिंतन शिबिरात अध्यक्षपदाबाबत चर्चा होणार नाही. तसंच संघटनात्मक पातळीवर पूर्ण प्रक्रिया पार पाडूनच राहुल गांधी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतील अशी सूत्रांची माहिती आहे. राहुल गांधी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहिले तर त्यांच्याविरोधात काँग्रेसमधून कोणी उमेदवारी दाखल करणार का? याबाबत उत्सुक्ता आहे. ठरल्याप्रमाणे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पार पाडणार आहे. अशोक गेहलोत, प्रियंका गांधी यांचीही नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत असतात.


यूपीत विरोध, मुंबईत जोरात तयारी; राज ठाकरेंच्या दौऱ्यासाठी मनसे 11 ट्रेन बुक करणार? 
भाजप खासदाराकडून राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध होत आहे. तर मनसेकडून मात्र दौऱ्याची जोरात तयारी सुरु आहे. अयोध्या दौऱ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 11 ट्रेन बुक केल्या जाणार आहेत. महाराष्ट्रभरातून मनसैनिक राज ठाकरेंच्या आधी अयोध्येत दाखल होतील. मोठं शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत मनसे आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा दौरा वादळी होण्याची शक्यता आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.