Maharashtra Breaking News LIVE Updates : चंद्रकांत पाटील यांची विधानं म्हणजे जनतेची करमणूक - खडसे

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेबटीम Last Updated: 13 Feb 2022 08:44 PM
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट

अहमदनगर - राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली आहे अण्णांनी वाईन विरोधात सरकारला उपोषणाचा इशारा दिला होता, त्या पार्श्वभूमीवर या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी अण्णांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. यावेळी हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याचं म्हणत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आपली बाजू मांडली आहे.तर यावेळी अण्णांनी त्यांचे निवेदन स्वीकारत जर जनतेला मान्य असेल तर मला काहीच हरकत नाही असं त्यांच्याशी चर्चा करतांना म्हटले आहे.

बार्शीत व्यापाऱ्याकडून खंडणी वसूल करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी केली अखेर अटक

बार्शीत व्यापाऱ्याकडून खंडणी वसूल करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अखेर अटक केली आहे.  बार्शीतील खडी क्रशर व्यापारी सुनील भराडिया यांना केली होती 5 लाखांची मागणी.  

परभणीत 17 वर्षीय तरुणाचा चुलत भावाकडूनच खून

परभणी शहरातील रामेश्वर प्लॉट भागात चुलत भावानेच आपल्या 17 वर्षीय भावाचा डोक्यात फर्शी घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे.  

पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा एकदा अपघात

पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा एकदा अपघात झालाय.  पुण्याहून सातारच्या दिशेने निघालेल्या मोठ्या ट्रेलर रस्यामधेच बंद पडल्याने पुणे  - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

मुंबई - गोवा महामार्गावर कारचा अपघात, नऊ प्रवासी जखमी

मुंबई - गोवा महामार्गावर कारचा अपघात झाला आहे. या अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. दासगावनजीक वळणावर स्कॉर्पिओ गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला आहे. सर्व जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

चंद्रकांत पाटील यांची विधान म्हणजे जनतेची करमणूक - खडसे

सरकार पडण्या साठी भाजपा नेते चंद्रकांत पाटील हे गेल्या दोन वर्ष पासून सरकार पडत असल्याचं सांगत आहेत अगदी सरकार पडण्या बाबत त्यांनी या पूर्वी तारखा ही त्यांनी जाहीर केल्या होत्या मात्र आघाडी सरकार पडू शकले नाही ,सरकार पडण्यासाठी काही ठोस कारण ही असावे लागते ते अजून पर्यंत त्यांना मिळू शकले नाही,आघाडी सरकार कडे बहुमत पेक्षा अधिक आमदार असल्याने सरकार पडण्याची शक्यता नाहीच,आणि अगदी पडलेच तरी पुन्हा ते बहुमताने निवडून येणार असल्याचा विश्वास ही खडसे यांनी व्यक्त केले आहे,सरकार पाडण्यासाठी जे प्रयत्न विरोधकांच्या मधून जो प्रयत्न केला जात आहे आणि सरकार पाडलच  तर ते अतिशय दुर्दैवी आणि लोकशाही विरोधी राहील अस ही  एकनाथ खडसे यांनी म्हटल आहे.

तुळजाभवानी मंदिरात अनाधिकृत पुजारी

श्री तुळजाभवानी मंदिर आणि मंदिर परिसरात कांही अनाधिकृत पुजारी आढळून आले आहेत. गैरवर्तन करणाऱ्या काही पुजारी बांधवाकडून भाविकांना दर्शन रांगेत घुसवणे, सुरक्षारक्षकांशी हुज्जत घालणे, त्यांना शिवीगाळ करणे, दर्शन पास शिवाय आपले सोबतचे भाविकांना दर्शन साठी घेऊन जाणे, श्रीदेविजींचे थेट दर्शन देतो असे सांगून पैसे घेऊन मुख दर्शन रांगेत सोडून जाणे याबाबत भाविकांकडून मेलद्वारे तसेच व्हाट्सअप द्वारे अनेक तक्रारी मंदिर प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.   व्यवस्थापक प्रशासन यांनी अनधिकृतपणे पुजारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला आळा घालण्यासाठी…. त्यांची ओळख पटवण्यासाठी पुजारी मंडळाचे अध्यक्ष यांना सोबत घेऊन आज स्वतंत्र पथक निर्माण करून मंदिर आणि मंदिर परिसरात पाहणी केली. यावेळी तीन अनाधिकृतपणे पुजारी व्यवसाय करणारे निदर्शनास आले आहेत. त्यांना ताब्यात घेऊन मंदिर पोलिस चौकी, तुळजापूर येथे पोलीसांच्या ताब्यात पुढील कारवाईसाठी देण्यात आले अनधिकृतपणे व्यवसाय करणारे पुजारी पुढील प्रमाणे 


1) श्री बजरंग उत्तम शेळके, रा. अंबूलगा ता. निलंगा जि. लातूर 

2) श्री प्रेमनाथ प्रकाशनाथ पुजारी, तुळजापूर

 3) श्री गणेश कुंडलिक साळुंखे, वेताळ नगर तुळजापूर 
कौटुंबिक वादातून दोन बालकांसह पित्याची रेल्वे खाली आत्महत्या

कौटुंबिक वादातून दोन बालकांसह पित्याने रेल्वे खाली आत्महत्या केली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नगर देवळा गावा जवळ ही घटना घडली आहे. 

निवडणुकीपूर्वी निघालेल्या सहलीत नगरसेविकेचा मृत्यू..

निवडणुकीपूर्वी निघालेल्या सहलीत नगरसेविकेचा मृत्यू.. नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यातील नगराध्यक्ष निवडणुकीपूर्वी एक धक्कादायक घटना घडलीय. नगरसेवकांच्या सहलीत सहभागी झालेल्या नवनिर्वाचित भाजप नगरसेविकेचा आज रविवारी सकाळी वापीमधील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाल्याचं समोर आलय. सुरगाण्याच्या राजकारणात या घटनेमुळे खळबळ उडाली असून नगराध्यक्ष निवडणुकीत आता नक्की काय होणार ? याकडे सगळ्याचं लक्ष लागलय.


 


 

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सहसंपादक,साहित्यिक नरेंद्र लांजेवार बुलढाणा यांचे निधन

बुलढाणा येथील भारत विद्यालयाचे ग्रंथपाल, साहित्यिक आणि अनेक साहित्यिकांना घडविणारे नरेंद्र लांजेवार यांचे निधन झाले आहे. सकाळी 10 वाजता लद्धड हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

दित्य ठाकरे यांनी उद्योगपती राहूल बजाज यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले

युवासेना प्रमुख पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज उद्योगपती राहूल बजाज यांच्या पार्थिवाचे दर्शन आकुर्डी येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतले. त्यांच्यासोबत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरजी, संपर्कप्रमुख सचिन अहीरजी, खासदार श्रीरंग आप्पा बारणेजी नगरसेवक प्रमोद कुटजीे.

Beed News Update :  बीडमधील सह्याद्री देवराईला भीषण आग

Beed News Update :  बीडमधील सह्याद्री देवराईला भीषण आग लागली होती. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली आहे.  

पंचवीस वर्ष त्यांची सत्ता होती तरी देखील तुम्हाला विकास कामासाठी निधी आणता आला नाही - संदीप क्षीरसागरांची जयदत्त क्षीरसागरावर टीका..
पंचवीस वर्षे सत्तेत होते तरी त्यांना विकास निधी आला नाही.. मी फक्त एकदा आमदार झालो आणि त्याच काळात मी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आणलाय असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी चुलते जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर जाहीर टीका केलीय..

 

संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते आज राजुरी जिल्हा परिषद सर्कल मधील विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आलं यावेळी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपले काका जयदत्त क्षीरसागर यांच्यावर टीका केलीय.
Fire On Bigg Boss Set : गोरेगाव फिल्मसिटीतील ‘बिग बॉस’च्या सेटवर मोठी आग

Bigg Boss Set : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) रिअॅलिटी शो 'बिग बॉस'च्या (Bigg Boss) सेटवर आग लागल्याची बातमी समोर आली आहे. ‘बिग बॉस’च्या सेटवर आग (Bigg Boss Set Fire) लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. बिग बॉसच्या सेटच्या नेमक्या कोणत्या भागात आग लागली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे.

Maharashtra Mumbai Thane : काँग्रेस कार्यकर्त्यांची केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या घराकडे आगेकूच, मात्र पोलिसांनी रांजणोली नाक्यावरच अडवले
Maharashtra Mumbai Thane : काँग्रेस कार्यकर्त्यांची केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या घराकडे आगेकूच, मात्र पोलिसांनी रांजणोली नाक्यावरच अडवले

 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज ठाणे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या घरावर आंदोलन करण्याचा इशारा देऊन मंत्री पाटील यांच्यावर घराकडे आगेकूच करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रचंड पोलिसांच्या ताफ्याने  काँग्रेस कार्यकर्त्यांना रांजनोली नाका येथे अडवले, यावेळी काँग्रेस कार्यकर्ते व पोलिसांमध्ये हुज्जत झाली, पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवून धरल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच बैठक मांडून निषेध केला 
धुळे शहरातील देवपुरात असलेल्या देवरे एक्सिडेंट हॉस्पिटलच्या वरच्या मजल्याला आग

धुळे शहरातील देवपुरात असलेल्या देवरे एक्सिडेंट हॉस्पिटल येथील वरच्या मजल्याला आग लागल्याची घटना गेल्या काही वेळापूर्वीच घडली या आगीत फर्निचर सह विविध वस्तू जळून खाक झाल्या असून सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही दरम्यान हॉस्पिटल मधील रुग्णांना तात्काळ सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली

Jayprabha Studio Kolhapur : जयप्रभा स्टुडिओ वाचवण्याकरता कोल्हापूरकर आक्रमक

Jayprabha Studio Kolhapur : जयप्रभा स्टुडिओ वाचवण्याकरता कोल्हापूरकर आक्रमक झाले आहेत. जयप्रभा स्टुडिओ खरेदीदार रौनक शहा गुंदेशा आणि पोपट शहा गुंडेशा याच्या कार्यालयावर शाई फेकून जाहीर निषेध केला आहे. लवकरात लवकर जयप्रभा स्टुडिओ परत करावा अन्यथा यापेक्षा तीव्र स्वरूपाच आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. 

17 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) 29 मे ते 4 जून 2022 या कालावधीत होणार

17 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) 29 मे ते 4 जून 2022 या कालावधीत होणार


15 फेब्रुवारी 2022 पासून प्रवेशिका स्विकारल्या जाणार


1 सप्टेंबर 2019 आणि 31 डिसेंबर 2021 दरम्यान पूर्ण झालेले चित्रपट मिफ्फ महोत्सवामध्ये (MIFF-2022) प्रवेशासाठी पात्र

सह्याद्री एक्सप्रेससह अनेक एक्सप्रेस कायमच्या रद्द; मिरज-हुबळी लिंक एक्स्प्रेस, मिरज-पंढरपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस कायमस्वरूपी रद्दचा निर्णय; पाच पॅसेंजर गाड्या एक्स्प्रेस म्हणून धावणार
रतीय रेल्वेच्या नव्या धोरणानुसार प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याने कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्स्प्रेससह कोल्हापूर-मनगुरू, कोल्हापूर-बिदर, कोल्हापूर-सोलापूर, मिरज-हुबळी लिंक एक्स्प्रेस, मिरज-पंढरपूर सुपरफास्ट या एक्स्प्रेस कायमस्वरूपी रद्द झाल्या आहेत. तर कोल्हापूर-पुणे, मिरज-हुबळी, मिरज-परळी, मिरज-कॅसलरॉक या पाच पॅसेंजर गाड्या एक्स्प्रेस म्हणून धावणार आहेत.


रेल्वेच्या नवीन धोरणानुसार केवळ हंगामामध्ये फुल्लं व इतरवेळा तोट्यात धावणाऱ्या सर्व एक्स्प्रेस व पॅसेंजर रद्द करण्यात येत आहेत. याबाबत रेल्वेने अधिकृत घोषणा केली नसली तरी कोविड साथीमुळे मार्च २०२०पासून बंद केलेल्या या रेल्वेगाड्या पुन्हा सुरू होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. 


यापुढे फक्त १५० किमीपर्यंतच पॅसेंजर रेल्वे धावणार आहे. १५० कि.मी.च्या पुढे धावणाऱ्या पॅसेंजरचे एक्स्प्रेसमध्ये रूपांतर होणार आहे. त्यानुसार कोल्हापूर-पुणे पॅसेंजर, मिरज-हुबळी पॅसेंजर, मिरज-परळी पॅसेंजर, मिरज-कॅसलरॉक पॅसेंजरचा एक्स्प्रेसमध्ये विस्तार होणार आहे. 
 

 

जयप्रभा स्टुडिओ वाचवण्याकरता कोल्हापूरकर आक्रमक; तीव्र आंदोलन करण्याचा इशारा


जयप्रभा स्टुडिओ वाचवण्याकरता कोल्हापूरकर आक्रमक . 


जयप्रभा स्टुडिओ खरेदीदार रौनक शहा गुंदेशा आणि पोपट शहा गुंडेशा याच्या कार्यालयावर शाई फेकून जाहीर निषेध केला 


लवकरात लवकर जयप्रभा स्टुडिओ परत करावा अन्यथा यापेक्षा तीव्र स्वरूपाच आंदोलन करण्याचा इशारा

Sangali : सह्याद्री एक्सप्रेससह अनेक एक्सप्रेस कायमच्या रद्द, पाच पॅसेंजर गाड्या एक्स्प्रेस म्हणून धावणार

Sangali : भारतीय रेल्वेच्या नव्या धोरणानुसार, प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याने कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्स्प्रेससह कोल्हापूर-मनगुरू, कोल्हापूर-बिदर, कोल्हापूर-सोलापूर, मिरज-हुबळी लिंक एक्स्प्रेस, मिरज-पंढरपूर सुपरफास्ट या एक्स्प्रेस कायमस्वरूपी रद्द झाल्या आहेत. तर कोल्हापूर-पुणे, मिरज-हुबळी, मिरज-परळी, मिरज-कॅसलरॉक या पाच पॅसेंजर गाड्या एक्स्प्रेस म्हणून धावणार आहेत. रेल्वेच्या नवीन धोरणानुसार, केवळ हंगामामध्ये फुल्ल आणि इतरवेळी तोट्यात धावणाऱ्या सर्व एक्स्प्रेस आणि पॅसेंजर रद्द करण्यात येत आहेत. याबाबत रेल्वेने अधिकृत घोषणा केली नसली तरी कोविड साथीमुळे मार्च 2020 पासून बंद केलेल्या या रेल्वेगाड्या पुन्हा सुरू होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. यापुढे फक्त 150 किमीपर्यंतच पॅसेंजर रेल्वे धावणार आहे. 150 किमीच्या पुढे धावणाऱ्या पॅसेंजरचे एक्स्प्रेसमध्ये रूपांतर होणार आहे. त्यानुसार कोल्हापूर-पुणे पॅसेंजर, मिरज-हुबळी पॅसेंजर, मिरज-परळी पॅसेंजर, मिरज-कॅसलरॉक पॅसेंजरचा एक्स्प्रेसमध्ये विस्तार होणार आहे. 

काँग्रेसकडून मालेगावची परतफेड! राष्ट्रवादीकडे असलेल्या सेलू नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह सर्व 20 नगरसेवकांचा काॅंग्रेसमध्ये प्रवेश

काँग्रेसकडून मालेगांवची परतफेड! राष्ट्रवादीकडे असलेल्या सेलू नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह सर्व 20 नगरसेवकांचा काॅंग्रेसमध्ये प्रवेश


आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काॅंग्रेस-राष्ट्रवादीत पक्षप्रवेशांची चढाओढ, मालेगांव महापालिकेतील सर्व काॅंग्रेसच्या सदस्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता


परभणी,औरंगादाबाद,नांदेड येथे राष्ट्रवादीला मोठे खिंडार पाडून आज मोठ्या संख्येनं महत्वाच्या पदाधिका-यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश झालाय


आज परभणीतल्या जिंतुर आणि सेलू नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह इतर नगरसेवकांनी काॅग्रेसमध्ये प्रवेश केलाय

Rahul Bajaj : शरद पवार, राज्याचे  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार श्रीरंग बारणे, मिलिंद नार्वेकरांकडून राहुल बजाज यांना श्रद्धांजली

Rahul Bajaj :  उद्योगपती पद्मविभूषण राहुल बजाज यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी आकुर्डीतील बजाज कंपनी येथे असलेल्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. बजाज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राजकारणी, उद्योगपती त्यांच्या निवासस्थानी हजेरी लावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, राज्याचे  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, साताराचे खासदार श्रीनिवास पाटील, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेनेचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकर आणि इतर उद्योगपती यांनी बजाज यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Rahul Bajaj : कंपनीतील कामगारांनीही घेतलं राहुल बजाज यांचे अखेरचे दर्शन, निरोप देताना सगळे कामगार भावूक

कंपनीतील कामगार राहुल बजाज यांचे अखेरचे दर्शन घेत आहेत. ज्या व्यक्तीमुळे रोजगार मिळाला त्या व्यक्तीस निरोप देताना सगळे कामगार भावूक झालेत.

Rahul Bajaj : मंत्री छगन भुजबळ राहुल बजाज यांच्या पार्थिववाचे दर्शन घेण्यासाठी आले ,रघुनाथ माशेलकर यांनीही घेतलं अंत्यदर्शन 

Rahul Bajaj : मंत्री छगन भुजबळ राहुल बजाज यांच्या पार्थिववाचे दर्शन घेण्यासाठी आले ,रघुनाथ माशेलकर यांनीही घेतलं अंत्यदर्शन 

Rahul Bajaj : उद्योगपती राहुल बजाज यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी आकुर्डीतील बजाज कंपनी येथे असलेल्या निवासस्थानी ठेवलं

उद्योगपती पद्म विभूषन राहुल बजाज यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी आकुर्डीतील बजाज कंपनी येथे असलेल्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. बजाज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राजकारणी, उद्योगपती त्यांच्या निवासस्थानी हजेरी लावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, राज्याचे  पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे, साताराचे खासदार श्रीनिवास पाटील, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेनेचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकर आणि इतर उद्योगपती यांनी बजाज यांना श्रद्धांजली अर्पण केली. सध्या राहुल बजाज यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी कंपनीतील मैदानावर ठेवण्यात आले आहे.  

अण्णा हजारेंचा उपोषण न करण्याचा निर्णय, ग्रामपंचायतीचा ठराव अण्णांनी केला मान्य...

राज्य सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 14 फेब्रुवारीपासून आंदोलन करणार होते. मात्र, अण्णांनी उपोषण करू नये असा ग्रामसभेत ठराव करण्यात आला. अण्णांना वयाचा विचार करून उपोषण निर्णय मागे घेण्याची विनंती करण्यात आली. अण्णांनी ग्रामसभेचा ठराव मान्य केला आहे. त्यामुळे अण्णा आंदोलन करणार नाहीत.

देशातील सर्व बोर्डाच्या दहावी बारावी परीक्षांना ऑफलाईन ऐवजी अंतर्गत मूल्यांकन पद्धतीचा अवलंब करण्यात यावा,सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

देशातील सर्व बोर्डाच्या दहावी बारावी परीक्षांना ऑफलाईन ऐवजी अंतर्गत मूल्यांकन (इंटर्नल असेसमेंट)पद्धतीचा अवलंब करण्यात यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल


15 राज्यातील विद्यार्थ्यांसोबत इंडिया वाईड पॅरेण्टस असोसिएशनच्या अनुभा सहाय आणि ओडिशा स्टुडेंट युनियन कडूज बोर्ड परीक्षेसंदर्भात याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे


मार्च एप्रिल महिन्यात राज्यातील दहावी बारावी बोर्ड परीक्षा तसेच देशभरात घेतल्या जाणाऱ्या सीबीएससी, आयसीएसई  बोर्ड परीक्षा या ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत


कोरोना काळात अनेक दिवस शाळा बंद असल्याने दहावी बारावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास पुरेसा न झाल्यान,  परीक्षेची तयारी झाली नाही अशा मध्ये ऑफलाईन परीक्षा ऐवजी अंतर्गत मूल्यांकन करून निकाल जाहीर करावेत, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे

Ralegansiddhi Anna Hazare Update : आज ग्रामसभेनंतर अण्णा हजारे उपोषणाबाबत निर्णय जाहीर करणार
Ralegansiddhi Anna Hazare Update :  सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांनी काल अण्णांची भेट घेत तब्बल तीन तास अण्णांसोबत चर्चा केली. वाईन विक्री संदर्भातील निर्णय आणि अंमलबजावणीबाबत त्यांनी अण्णांना माहिती  दिली..त्यानंतर अण्णांनी आपण 50 टक्के समाधानी असल्याचे म्हटले मात्र, आज राळेगणसिद्धी येथे ग्रामसभा घेतल्यानंतर उपोषणाबाबत आपण निर्णय देऊ असं अण्णांनी म्हटले आहे 

 
Biggest Bank Scams in India : एनपीए झाल्यानंतर एबीजी शिपयार्डमध्ये कोणत्या बॅंकांचं किती नुकसान? 

Biggest Bank Scams in India : एनपीए झाल्यानंतर एबीजी शिपयार्डमध्ये कोणत्या बॅंकांचं किती नुकसान? 



  • आयसीआयसीआय बॅंक : 7089 कोटी रुपये 

  • आयडीबीआय बॅंक : 3640 कोटी रुपये 

  • स्टेट बॅंक ऑफ इंडिया : 2943 कोटी रुपये 

  • बॅंक ऑफ बरोडा : 1602 कोटी रुपये 

  • पंजाब नॅशनल बॅंक : 1294 कोटी रुपये 

  • एक्झिम बॅंक ऑफ इंडिया : 1326 कोटी रुपये 

  • इंडियन ओव्हरसीज बॅंक : 1229 कोटी रुपये 

  • बॅंक ऑफ इंडिया : 768 कोटी रुपये 

  • ओरीयंटल बॅंक ऑफ कॉमर्स : 769 कोटी रुपये 

  • स्टॅंडर्ड चार्टर्ड बॅंक : 743 कोटी रुपये 

  • सिंडिकेट बॅंक : 440 कोटी रुपये 

  • स्टेट बॅंक ऑफ इंडिया, सिंगापूर : 459 कोटी रुपये 

  • देना बॅंक : 406 कोटी रुपये 

  • आंध्र बॅंक : 266 कोटी रुपये 

  • सीकॉम लिमिटेड : 259 कोटी रुपये 

  • आयएफसीआय लिमिटेड : 300 कोटी 

  • एसबीएम बॅंक : 125 कोटी 

  • फिनिक्स आर्ट प्रायव्हेट लिमिटेड : 140 कोटी 

  • एलआयटी : 136 कोटी 

  • डीसीबी बॅंक : 105 कोटी 

  • आर्के लॉजिस्टिक्स लिमिटेड : 95 कोटी 

  • पंजाब नॅशनल बॅंक (इंटरनॅशनल) लिमिटेड : 97 कोटी 

  • लक्ष्मी विलास बॅंक लिमिटेड : 61 कोटी 

  • इंडियन बॅंक : 17 कोटी 

  • इंडियन बॅंक, सिंगापूर : 43 कोटी 

  • कॅनरा बॅंक : 40 कोटी 

  • सेंन्ट्रल बॅंक ऑफ इंडिया : 39 कोटी 

  • एस्सर प्रोजेक्ट्स इंडिया लिमिटेड : 39 कोटी 

  • पंजाब सिंध बॅंक : 36 कोटी 

  • एस्सर पावर (झारखंड) लिमिटेड : 17 कोटी 

  • यस बॅंक : 1 कोटी 71 लाख 

Maharashtra Chandrapur News : 2 कोटींचा गंडा घालणाऱ्या आरोपीला 3 वर्षांनी अटक
Maharashtra Chandrapur News : आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून लोकांना 2 कोटींचा गंडा घालून फरार झालेल्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने पालघर येथून अटक केली आहे. पंकज फुलझेले असं या आरोपीचं नाव असून त्याने चंद्रपूर शहरात २०१५ साली एक कंपनी स्थापन करून लोकांना आकर्षक व्याज दराचे आमिष दाखविले. काही वर्ष परतावा दिल्यावर हा आरोपी २०१८ साली फरार झाला. त्यामुळे फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी पोलिसात त्याच्या विरोधात तक्रार दिली. मात्र तेव्हा पासून फरार असलेल्या या आरोपीला अखेर ३ वर्षांनी जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळालंय.
‘आरे’तील स्वच्छता अभियानासंदर्भातला अहवाल पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंना सादर




‘आरे’तील स्वच्छता अभियानासंदर्भातला अहवाल पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंना सादर

 

आरेतील ८०० एकर जागा वनविभागाच्या स्वाधीन, मात्र काही भाग पालिकेच्या अखत्यारीत त्यामुळे जबाबदारी निश्चिती करण्यासंबंधी अहवालात सूचना 

 

संजय गांधी नॅशनल पार्क, महापालिका आणि आरे प्रशासन यांच्यापैकी कोणता विभाग ८०० एकरातील स्वच्छतेची जबाबदारी घेईल हे ठरवण्याची गरज 

 

मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेमुळे बिबट्या आरेतील मानवी वसाहतींकडे आकर्षित होत असल्याने उपाययोजनांसाठी अहवाल सादर 

 

कचरा उचलण्याची नियमित व्यवस्था करणे, पर्यटक आरेत आल्यानंतर मोठ्या प्रमाणात कचरा करतात अशातच ठिकठिकाणी कचऱ्याकुंड्यांची व्यवस्था, कचरा करणाऱ्यास दंड लावणे, रात्रीची गस्त वाढवणे, आरेतील प्रवेशद्वारांवर वाहनांची नियमित तपासणी करणे, नियम मोडणाऱ्यांना दंड ठोठवणे अशा विविध उपाययोजना 

 

मुंबई महापालिका आणि एम्पॉवर सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यामानाने आरे वसाहतीत २३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्ताने रवींद्र वायकर यांच्याकडून ५६ ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्याची योजना आखली गेली होती

 

 



 


मुंबई एअरपोर्टवरुन 60 कोटींचं ड्रग्स जप्त, मुंबई कस्टम विभागाची कारवाई, झिम्बॉब्वेमधील एका महिलेला अटक, 7 हजार 6 ग्राम हेरोइन आणि 1480 ग्राम MD ड्रग्स हस्तगत

मुंबई एअरपोर्टवरुन 60 कोटींचं ड्रग्स जप्त, मुंबई कस्टम विभागाची कारवाई, झिम्बॉब्वेमधील एका महिलेला अटक,  7 हजार 6 ग्राम हेरोइन आणि 1480 ग्राम MD ड्रग्स हस्तगत

किरीट सोमय्यांवरील हल्ला प्रकरणी दोन पोलिस निलंबित, सोमय्यांची ट्वीट करत माहिती

किरीट सोमय्यांवरील हल्ला प्रकरणी दोन पोलिस निलंबित, सोमय्यांची ट्वीट करत माहिती, सोमय्या म्हणाले माझ्यावरील शिवसेनेच्या गुंडांनी केलेल्या हल्ला प्रकरणात आत्ता, शिवाजीनगर पुणे, पोलिस ठाण्यातील  दिलीप गोरे, सतीश कुंभार दोन पोलिस निलंबित करण्यात आले





ज्येष्ठ अभिनेत्री आसावरी जोशी 15 फेब्रुवारीला करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

ज्येष्ठ अभिनेत्री आसावरी जोशी 15 फेब्रुवारीला करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील शासकीय निवासस्थानी होणार आसावरी जोशींचा पक्षप्रवेश. आसावरी जोशींचा हिंदी, मराठी चित्रपट आणि मालिकांमधून अभिनय. सध्या लोकप्रिय असलेल्या 'स्वाभिमान'  मालिकेत मुख्य भूमिकेत.

Maharashtra Satara Vai Update : साताऱ्यातील वाई पोलिसांनी केंजळ गावातील बेकायदेशीरपणे बसवलेला पुतळा हटवला

Satara Vai Update : साताऱ्यातील वाई तालूक्यातील केंजळ गावात काल दिवसभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. छत्रपती शिवरायांचा पुतळा अज्ञातांनी केंजळच्या ग्रामपंचायतीच्या आवारात बसवला होता. विनापरवाना बसवलेल्या या पुतळ्यामुळे पोलिस प्रशासन आणि महसूल विभाग तात्काळ गावात दाखल झाले. हा पुतळा काढू नये असे काही शिवभक्तांनी पुढे येऊन पोलिसांना सांगितले. तणाव वाढल्यानंतर पोलिसांचा मोठा फौज फाटा गावात दाखल झाला. दुपार नंतर ग्रामस्थ महसूल विभाग आणि पोलिसांची संयुक्त बैठक ग्रामपंचायतीत घेण्यात आली. या बैठकीतून हा पुतळा शांततेच्या मर्गातून काढण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर हा पुतळा रात्री ग्रामस्थांच्या मदतीने काढण्यात आला होता. काही अतिउत्साही युवकांकडून मात्र सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवून वातावरन चिघळवण्याचा प्रयत्न केला. बेकायदा पुतळा बसवणाऱ्यांवर भुईंज पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या गावातील वातावरण निवळले आहे. ग्रामस्थांनी रितसर परवानगी घ्यावी, त्यासाठी पोलिस मदत करतील असे मत अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख अजित बोराडे यांनी सांगितले

Pune News Update : भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह 300 जणांवर गुन्हे दाखल





Pune News Update :  भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या सत्काराला मर्यादित लोकांनाच परवानगी दिली असताना मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमवून, धक्काबुक्की करून गोंधळ घातला प्रकरणी भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेवक आणि भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह तीनशे जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शहराध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेवक दीपक पोटे, राजेश येनपुरे, पदाधिकारी बापू मानकर, धनंजय जाधव, दत्ता खाडे, गणेश घोष, प्रतीक देसरडा यांच्यासह तीनशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

पुणे शहर भाजपच्या वतीने शनिवारी किरीट सोमय्या यांचा पुणे महानगरपालिकेत सत्कार करण्यात आला. मर्यादित लोकांच्या उपस्थितीतच हा कार्यक्रम करण्यात यावा अशा सूचना पोलिसांनी यापूर्वीच दिल्या होत्या. परंतु या ठिकाणी मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमले होते. त्यांनी केलेल्या धक्काबुक्कीत पोलिसांना किरकोळ इजा झाली.  तर काही पोलिसांच्या ड्रेसवरील नेमप्लेट या धक्काबुक्कीत तुटून पडल्या.  


 

 



 


Mumbai eastern expressway accident : पूर्व द्रुतगती मार्गावर कुर्ला ते चेंबुरदरम्यान भीषण अपघात





Mumbai eastern expressway accident - पूर्व द्रुतगती मार्गावर कुर्ला ते चेंबुरदरम्यान भीषण अपघात झाला. माती घेऊन जात असलेल्या डंपरने चारचाकीला जोरदार धडक दिली आणि यात एक हातगाडीवर केळी घेऊन जात असलेला व्यक्ती आल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय तर ५ जण जखमी झाले आहेत. सकाळी ७च्या दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती आहे. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत.


 

 



 


Mumbai Accident News :  पूर्व द्रुतगती मार्गावर कुर्ला आणि चेंबूरच्यामध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी

Mumbai Accident News :  पूर्व द्रुतगती मार्गावर कुर्ला आणि चेंबूरच्यामध्ये भीषण अपघात, माती घेऊन जात असलेला डंपर, चारचाकी आणि हातगाडीमध्ये टक्कर झाल्याने एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी, जखमींना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिस आणि फायर ब्रिगेडचे जवान घटनास्थळी दाखल

Mumbai Juhu : जुहू चौपाटी वर शिवसेनेतर्फे वॉकथॉनचे आयोजन

Mumbai Juhu  : जुहू चौपाटीवर शिवसेनेतर्फे वॉकथॉनचे आयोजन


मुंबईत कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागताच आता विविध खेळ, मॅरेथॉन, वॉकथॉनला नागरिक चांगला प्रतिसाद देऊ लागले आहेत. आज सकाळी अंधेरी पश्चिम शिवसेनेच्या वतीने जुहू चौपाटी येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते.पाच किलोमीटरची ही वॉकथॉन होती.यात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला होता.विशेष म्हणजे या वॉकथॉनमध्ये महिला आणि जेष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.शिवसेनेतर्फे दरवर्षी अंधेरीमध्ये अंधेरी महोत्सव चे आयोजन केले जाते.या अंधेरी महोत्सवचाच वॉकथॉन एक भाग असून पुढील काही दिवस या महोत्सवात अशा अनेक स्पर्धांचे आणि कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक संजय कदम यांनी सांगितले.

Maharashtra sangli jat news update : जतमध्ये छत्रपतीचा पुतळा बसवण्यावरुन वाद, सांगलीतून जतला पुतळा अखेर रवाना, मात्र पुतळा बसवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्याच्या बैठकीत सोमवारी होणार
Maharashtra sangli jat news update :  सांगली जिल्ह्यातील जत शहरात  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन वाद रंगलाय.त्यामुळे   सांगलीत बनवलेला पुतळा जतला उभारण्यास नेताना  छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीला पोलिसांनी रात्री अडवले.  अखेर 3 तासानंतर पोलीस, जिल्हा प्रशासन आणि पुतळा समितीचे अध्यक्ष विलासराव जगताप यांच्यातील चर्चेनंतर पोलिसांनी सांगलीतून जतला पुतळा नेण्यास परवानगी दिली, मात्र सोमवारी जिल्हाधिकारी यांच्यासोबतच्या बैठकीनंतरच पुतळा बसवण्याचा निर्णय होईल  यावर एकमत झाल्याने पुतळा जतला नेण्यास पोलिसांनी परवानगी दिली. 3 तासापासून अधिक काळ पोलीस आणि पुतळा समितीचे सदस्य आमने-सामने होते. मात्र पोलीस महाराजाचा पुतळा सांगलीहून जतला नेऊन द्यायला परवानगी देत नव्हते. बराच काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण बनल्याने मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात केला गेला होता. 
Panvel nanded express news : पनवेल ते नांदेड चालत्या रेल्वेत प्रवाशांची लूट
Panvel nanded express news :  पनवेल ते नांदेड प्रवासादरम्यान  महिला प्रवाशी शिल्पा कमल मोदी राहणार पुसद जिल्हा यवतमाळ येथील महिलेला बोगी क्र. एस 2  बर्थ क्र. 41 या डब्यातून सोलापूर दरम्यान चोरट्यांनी लुटल्याची घटना घडलीय. लोणावळा ते नांदेड असा त्यांचा प्रवास सुरू असताना रेल्वे गाडी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील ढवळस रेल्वे स्थानकात सदरची घटना घडलीय. दरम्यान आऊटर सिग्नल नजीक गाडीचा वेग कमी झाला असता त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन पेंडलसह अंदाजित दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय . तर याच कालावधीत याच गाडीत बोगी क्र.एस10 बर्थ क्र.7 मधुन दुसरे प्रवासी अक्षय मोरे हे चिंचवड ते पुर्णा असा प्रवास करीत होते. त्यांच्या बॅगेतून अॅपल इअरबडसह इतर साहित्य मिळून असे एकूण 33 हजार 900 रुपयांचा ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारलाय. या दोन्ही घटनेतून चोरट्यांनी एकुण 2 लाख 83 हजार 900 रूपयांचा ऐवज लुटलाय. या दोन्ही प्रकरणी वेगवेगळ्या फिर्यादीनुसार  कुर्डुवाडी रेल्वे पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 
Nagpur news : गायक यो यो हनी सिंग याचे वकील नागपूरच्या पाचपवाली पोलीस स्टेशनमध्ये

Nagpur news :  प्रसिद्ध रॅप गायक यो यो हनी सिंग याचे वकील काल रात्री पाचपवाली पोलीस स्टेशनला पोहचले होते. 2015 मध्ये पाचपवाली पोलीस स्टेशनमध्ये हनी सिंगच्या विरोधात  यूट्यूबवर अश्लील गाणे अपलोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणी न्यायालयाने आवाजाचे नमुने देण्यास त्याला पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते.त्यानुसार त्याचे वकील काल रात्री पाचपावली पोलिस स्टेशन मध्ये पोहोचले होते.दरम्यान आवाज घेण्याची यंत्रणा व साधने दुसऱ्या विभागाकडे असल्यामुळे याबाबत संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते.त्यामुळे काल रात्री त्याच्या आवाजाचे नमुने घेणे शक्य नसल्याने त्याचे वकील रात्री पाचपवली पोलीस स्टेशन निघाले. दरम्यान आज हनी सिंगच्या आवाजाचे नमुने घेण्याची दाट शक्यता आहे.

नागपूरच्या मोठ्या ताजबाग परिसरात "जत्रा" मैदानावर ठेवण्यात आलेल्या भंगाराला मोठी आग लागली... 

नागपूरच्या मोठ्या ताजबाग परिसरात "जत्रा" मैदानावर ठेवण्यात आलेल्या भंगारात काल रात्री दोनच्या सुमारास मोठी आग लागली... 


नासिर खान नावाच्या भंगार व्यावसायिकाने त्या ठिकाणी जुन्या रेफ्रिजरेटर्सची साठवणूक केली होती... 


मोठ्या प्रमाणावर भंगार झालेले रेफ्रिजरेटर आणि त्यांचे सुटे भाग त्याठिकाणी साठवण्यात आले होते... 


त्याच भंगारात रात्री दोनच्या सुमारास आग लागली... अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी सुमारे दोन तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली...


या आगीत भंगार व्यावसायिकाचे मोठे नुकसान झाले असून कोणती ही जीवित हानी झालेली नाही... दरम्यान, रात्री भंगार ला लागलेल्या आगीतून मोठ्या ज्वाळा निघत असल्याने आग अत्यंत विक्राळ दिसत होती...

ऊसाच्या टेलरला पाठीमागून कार धडक , तीन ठार

अहमदनगर ; श्रीगोंदा येथुन काष्टी येथील मित्राला सोडविण्यासाठी जात असताना ऊसाच्या टेलरला पाठीमागून कार धडकल्याने मोठा अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना रविवारी रात्री एक वाजता हाॅटेल अनन्या समोर घडली.
या अपघातात राहुल आळेकर, केशव सायकर, आकाश खेतमाळीस या तिघांचा जागीच मृत्यू झाला. राहुल आणि आकाश हे आपला मित्र केशव सायकरला याला काष्टी येथे सोडविण्यासाठी जात असताना हाॅटेल अनन्या समोर नादुरुस्त असलेल्या उभ्या उसाच्या टेलरला पाठीमागून त्यांच्या कारची जोराची धडक बसली

पार्श्वभूमी

1. सुपर मार्केटमधील वाईन विक्रीचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता, नागरिकांच्या हरकती मागवणार, तर अण्णा हजारे उपोषणाबाबत आज भूमिका जाहीर करणार


2. बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा उघड, गुजरातच्या एबीजी शिपयार्ड कंपनीचा 28 बँकांना 22 हजार 842 कोटींचा चुना, 8 जणांविरोधात गुन्हा दाखल


3. गोव्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या, १४ फेब्रुवारीला मतदान, भाजप, काँग्रेस, आप, शिवसेना-राष्ट्रवादी पक्षाची प्रतिष्ठापणाला


4. पाच राज्यातील निवडणुकीनंतर इंधन दरवाढीची चिन्हं, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यानं इंधन दरवाढीची शक्यता 


5. किरीट सोमय्यांची सह्याद्री हॉटेलला भेट, पुणे जम्बो कोविड सेंटरचं कंत्राट चहावाल्याला दिल्याचा आरोप, तर राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांची सोमय्यांना नोटीस


6. गोरेगावमध्ये 5 बोगस दवाखान्यांचा भांडाफोड, 4 बोगस डॉक्टरासह 1 कंपाउंडर अटकेत, रुग्णांच्या जीवाशी खेळ


7.  मुंबईच्या अंधेरीत बड्या बँक अधिकाऱ्याची पत्नी आणि मुलाकडून निर्घृण हत्या, हत्येनंतर मृतदेह सातव्या मजल्यावरुन फेकला, आरोपींकडून आत्महत्येचा बनाव 


8. बजाज ऑटोचे सर्वेसर्वा राहुल बजाज यांचं काल निधन,  आकुर्डीत पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येणार, दुपारी अंत्यसंस्कार होणार


9. पाकिस्तानातून समु्द्रामार्गे आणलेलं 2 हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, एनसीबी आणि नौदलाची संयुक्तं कारवाई, तर विशाखापट्टणमध्ये शेकडो कोटींचा गांजा नष्ट


10. आयपीएल मेगालिलावाच्या पहिल्या दिवशी खेळाडूंची चांदी, 15 कोटी मोजून मुंबई इंडियननं इशान किशनला संघात कायम ठेवलं. तर आवेश खान आजवरचा सर्वात महागडा अनकॅप्ड क्रिकेटपटू


IPL 2022 Mega Auction Players List, Who got whom : आयपीएलच्या 15 व्या हंगमासाठी सुरु असलेल्या लिलावाचा पहिला दिवस संपला आहे.  आज दिवसभरात दहा संघांनी 74 खेळाडूंवर 388 कोटी 10 लाख रुपयांची बोली लावली. 74 खेळाडूंमध्ये 54 भारतीय आणि 20 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. दिल्ली संघाने सर्वाधिक खेळाडूंना खरेदी केलं. तर पहिल्या दिवशी ईशान किशन सर्वात महागडा खेळाडू खेळाडू ठरला. मुंबई इंडियन्सने ईशानला 15.25 कोटी रुपयांत खरेदी केलं आहे. तर आवेश खान सर्वात महागडा अनकॅप खेळाडू राहिला. लखनौ संघाने आवेश खानला 10 कोटी रुपयांत खरेदी केलं. मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना पहिल्या दिवशी अनसोल्ड राहिला आहे... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.