Maharashtra Breaking News LIVE Updates : ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ, कुलगुरूंच्या बैठकीत निर्णय

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Apr 2022 07:37 PM
बडतर्फ एसटी कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले

सिल्वर ओक वर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन प्रकरणी मुंबई पोलिसांनी नागपुरातून संदीप गोडबोले नावाच्या बडतर्फ एसटी कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे... संदीप गोडबोले हा गुणवंत सदावर्ते यांच्यासोबत त्यादिवशी संपर्कात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे... 

MPSC Health Officer Recruitment: एमपीएससी प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी (होमिओपॅथी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत स्वानंद अरुण सोनार यांनी बाजी मारली असून प्रशासकीय वैद्यकीय अधिकारीच्या (होमिओपॅथी) परीक्षेत ते उत्तीर्ण झाले आहेत.

खासदार नवनीत राणा यांनी हजारो महिलांसह केले हनुमान चालीसा पठण

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी हजारो महिलांच्या सोबत आज हनुमान चालीसाचे पठण केले. अमरावतीच्या रवी नगर परिसरातील संकटमोचन हनुमान मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी 2 हजारांहून अधिक महिलांची उपस्थिती होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहानंतर सध्या राज्यभरात हनुमान चालीसाचे पठण करण्यात येत असल्याने या कार्यक्रमाची शहरात चर्चा सुरू झाली आहे.

Exam 2022 : ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ, कुलगुरूंच्या बैठकीत निर्णय

 Offline Exam :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्याने, ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात येत होती.  ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय  कुलगुरूंच्या बैठकीत घेण्यात आला.

दिंडी मार्गावर पिकअप-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू, चार जखमी

Accident : दिंडी मार्गावर पिकअप-ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन व्यक्तींचा मृत्यू झला असून चारजण गंभीर जखमी झाले आहे. मृत आणि जखमी सेलू ( जि. परभणी) येथील रहिवासी असून पंढरपूरहून गावी परतत असल्याची माहिती आहे. पिकअप-ट्रॅक्टरची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.  पंढरपूर-शेगाव दिंडी मार्गावरील नित्रुडजवळ आज दुपारी साडेतीन वाजता घडली. अपघातात चारजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.  मृतांची आणि जखमींची नावे अद्याप समजलेली नाही. 


 

Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी

Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची  न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. 

Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी

Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची  न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. 

उद्यापासून चार दिवस अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश

अहमदनगर शहर आणि  जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि महावीर जयंती, गुड फ्रायडे, हनुमान जयंती तसेच ईस्टर संडेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 
 

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना केंद्र सरकार कडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना केंद्र सरकार कडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. खासदार नवनीत राणा सातत्याने राज्य सरकारच्या विरोधात भूमिका लोकसभेत उचलत असल्याने त्यांच्या जीवाला धोका असल्याचा केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचा अहवाल आहे. 

ग्रामीण भागातील आरोग्य सेवेसाठी इस्कॉन चा मदतीचा हात

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षम होण्यासाठी  इस्कॉनसारखी संस्था पुढे आली आहे. ग्रामीन भागातील रुग्णांना यामूळे अधिक फायदा होणार असून लवकरच राज्यातील सर्वात मोठे आयसीयू बेड असलेले रुग्णालय प्रवरा रुग्णालयात उभारण्यात येणार आहे. 

Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांच्या सुनावणीला सुरूवात, पोलिसांकडून पुरावे सादर

Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांच्या सुनावणीला सुरूवात झाली आहे. सदावर्ते यांच्या घरी जी मीटिंग झाली त्याचे पुरावे पोलिसांकडून सादर करण्यात आले आहे. 

Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते कोर्टात दाखल

Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते कोर्टात दाखल झाले आहे. 

सातारा पोलिस पुन्हा एकदा गिरगाव न्यायालयात दाखल, वकील गुणरत्न सदावर्तेंचा ताबा घेण्याचा प्रयत्न सातारा पोलिसांकडून करण्यात येणार

Satara Police News : सातारा पोलिस पुन्हा एकदा गिरगाव न्यायालयात दाखल, वकील गुणरत्न सदावर्तेंचा ताबा घेण्याचा प्रयत्न सातारा पोलिसांकडून करण्यात येणार, वकील गुणरत्न सदावर्ते यांची मुलगी झेन सदावर्ते देखील न्यायालयात दाखल

Jalgaon News : जळगाव शहरात अनेक मूलभूत सुविधांचा अभाव, घरपट्टीमध्ये चुकीच्या पद्धतीने आकारणी केली जात असल्याने नागरिकांमध्ये रोष

जळगाव शहरात अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असताना ही महानगर पालिकेच्यावतीने घरपट्टीमध्ये चुकीच्या पद्धतीने आकारणी केली जात असल्याने नागरिकांच्यामध्ये मोठा रोष असल्याचं पाहायला मिळत आहे. नागरिकांच्या मनातील भावना लक्षात घेत आज खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली जळगाव मनपा चे प्रवेशद्वारात निदर्शने आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले 

kirit Somaiya News : किरीट सोमय्यांना हायकोर्टाचा दिलासा, मुंबई उच्च न्यायालयानं दिलं अटकेपासून संरक्षण

kirit Somaiya News : किरीट सोमय्यांना हायकोर्टाचा दिलासा


मुंबई उच्च न्यायालयानं दिलं अटकेपासून संरक्षण


आम्ही त्यांना चौकशीला हजर राहण्याचे निर्देश देऊ


साल 2013 पासून 2022 पर्यंत काहीच तक्रार नव्हती

Raj Thackeray News : राज ठाकरे यांच्याविरोधात तलवार दाखवल्याप्रकरणी गुन्हा, नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

#BREAKING : राज ठाकरे यांच्याविरोधात तलवार दाखवल्याप्रकरणी गुन्हा, नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल, अविनाश जाधव आणि रवींद्र मोरे यांच्या विरोधात देखील आयोजक म्हणून गुन्हा दाखल

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आज दुपारी 1 वाजता संवाद साधणार, राज ठाकरेंच्या टीकेला काय उत्तर देणार याकडे लक्ष

#BREAKING : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आज दुपारी 1 वाजता संवाद साधणार, राज ठाकरेंच्या टीकेला काय उत्तर देणार याकडे लक्ष https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-marathi-news-breaking-news-live-updates-13-april-2022-today-sunday-marathi-headlines-maharashtra-political-news-mumbai-news-national-politics-news-1049925 

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार पंकज भुजबळ राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थ निवासस्थानी

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार पंकज भुजबळ मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थ निवासस्थानी दाखल...


 राज ठाकरे यांच्या नातवाला पाहण्यासाठी ते भेट घेऊन आले आहेत...


काल ठाणे येथील सभेत राज ठाकरेंनी छगन भुजबळांवर सडकून टीका केली होती 


त्यानंतर आज  भुजबळ परिवाराकडून  पंकज भुजबळ आणि पत्नी भेटायला आलेत

 कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक प्रेरणादायी ठरणार- नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

कल्याण पूर्वेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे ही मागणी गेल्या 13 वर्षापासून होती. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नागरीकांना सोबत घेऊन भव्य स्मारक उभारण्यासाठी पुढाकार घेतला. नगरविकास खात्यातर्फे स्मारकाला 9 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. हे स्मारक प्रेरणादायी आणि स्फूर्ती ठरेल असा विश्वास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला आज नगरविकास मंत्री शिंदे यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले.

कल्याण पूर्वेत ड प्रभाग कार्यालयाच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकात पुतळा ,उद्यान , भव्य ग्रंथालय , डॉ. बाबासाहेब यांचा जीवनप्रवास, त्यांच्या आयुष्यातील महत्वाचे टप्पे, आंदोलन, चळवळी यांचे दर्शन देणाऱ्या छायाचित्रांचे स्वतंत्र दालन , दृकश्राव्य माध्यमातून डॉ. आंबेडकर समजून घेण्यासाठी एक भव्य सभागृह येथे उभारले जाणार आहे.आज या स्मारकाचे भूमिपूजन झाले असून पुढील वर्षी 14 एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे
 

Maharashtra News : पंकजा आणि प्रीतम मुंडे धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात

Maharashtra News : भाजप नेते कृपाशंकर सिंह राज ठाकरे यांच्या भेटीला, राज यांच्या ठाण्यातील सभेनंतर भेटीला महत्त्व

Raigad News Update : रायगड : अलिबागनजीक खाजगी बस आणि एसटी बसचा अपघात, प्रवासी जखमी

Raigad News Update : रायगड : अलिबागनजीक खाजगी बस आणि एसटी बसचा अपघात, प्रवासी जखमी...  


बागमळानजीक एसटी बसचा अपघात, १५ ते २० प्रवासी जखमी...


मुरूडहून अलिबागच्या दिशेने येणाऱ्या बसचा अपघात, सकाळच्या सुमारास अपघात...

भाजप नेते कृपाशंकर सिंह मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला

भाजप नेते आणि मुंबईतील उत्तर भारतीयांच्या राजकारणातील महत्वाचा चेहरा कृपाशंकर सिंह मनसेअध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला...


नितीन गडकरी, रावसाहेब दानवेंपाठोपाठ आणखी एका भाजप नेत्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थान असलेल्या शिवतिर्थावर भेट

Dhananjay Munde News : धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल

धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल

धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ब्रीच कॅंडी रुग्णालयात


राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ब्रिच कॅंडी रुग्णालयात दाखल 


काल रात्री आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील दाखल झाले होते 


धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून काळजीचं कारण नसल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Aurangabad News : औरंगाबाद जिल्ह्यात उन्हामुळे शाळा सकाळच्या सत्रात 7:30 ते 11:20 वाजेपर्यंत भरवणार

उन्हामुळे शाळा सकाळच्या सत्रात 7:30 ते 11:20 वाजेपर्यंत भरवणार.
जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी घेतला आहे.
 दोन सत्रांत भरणाऱ्या शाळांच्या वेळापत्रकात बदल नाही.

Panvel CSMT Trains Local News Update : पनवेल रेल्वे स्थानकातील बिघडलेली सिग्नल यंत्रणा दुरूस्त, रेल्वे सेवा सुरू

नवी मुंबई - पनवेल रेल्वे स्थानकातील बिघडलेली सिग्नल यंत्रणा दुरूस्त केल्याने रेल्वे सेवा सुरळीत सुरू झाली आहे. पनवेल रेल्वे स्थानकातून सीएसटी आणि ठाणेसाठी रेल्वे सुरू झाली आहे.

Panvel CSMT Trains Local News Update : हार्बर मार्गावरील पनवेल रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड, वाहतूक विस्कळीत

Panvel CSMT Trains Local News Update : हार्बर मार्गावरील पनवेल रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे पनवेल स्थानकातून सीएसएमटी आणि ठाण्याच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन सकाळच्या वेळी लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा मात्र चांगलाच खोळंबा झाला आहे.

Cyber Attacks on Oil India Limited Headquarter : हवामान विभाग, यूजीसी पाठोपाठ आता ऑईल इंडिया हॅकर्सकडून लक्ष्य

Cyber Attacks on Oil India Limited Headquarter : गेल्या अनेक दिवसांपासून देशातील संस्थांवर सायबर हल्ले सुरूच आहेत. पण हे सत्र काही थांबायचं नाव घेत नाही. सरकारी मालकीच्या ऑईल इंडिया लिमिटेडच्या (Oil India Limited) आसामच्या दिब्रुगढ जिल्ह्यातील दुलियाजन येथील नोंदणीकृत मुख्यालयावर सायबर हल्ला झाला आहे. हॅकर्सनी कंपनीला कार्यालयातील सर्व संगणक आणि आयटी प्रणाली बंद करण्यास भाग पाडलं. कंपनीच्या प्रवक्त्यांनी यासंदर्भात मंगळवारी माहिती दिली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशातील महत्त्वाच्या संस्थांवर सायबर हल्ल्यांचं सत्र सुरु आहे. 


काही दिवसांपूर्वी यूजीसी इंडियाचं ट्विटर अकाउंट हॅक झालं होतं. याशिवाय भारतीय हवामान खात्याच्या ट्विटर अकाऊंटवरही सायबर हल्ला झाला होता. हवामान खात्याचं ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आलं होतं. एवढंच नाही तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाचं ट्विटर अकाउंटही हॅक करण्यात आलं आहे. मात्र, हॅक केल्यानंतर काही वेळातच ट्विटर अकाउंट सुरक्षित करुन हॅकर्सच्या तावडीतून सोडवण्यात संस्थांना यश आलं होतं. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका, सध्या प्रकृती स्थिर

Dhananjay Munde : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे वृत्त समजत आहे. मुंडे यांना तातडीने मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मुंडे काल परभणीला गेले होते. त्यानंतर आज त्यांचा जनता दरबार होता. 


मुंडे यांची प्रकृती स्थिर : आरोग्यमंत्री 


मंत्री धनंजय मुंडे याना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे वृत्त समजताच आरोग्य मंत्री राजेश टोपे देखील रुग्णालयात तातडीने पोहचले आणि मुंडे यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली, धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर असून काळजी करण्याचे काहीच कारण नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर माहिती देताना सांगितले. त्यांच्या सर्व आवश्यक तपासण्या झाल्या असून सर्वकाही ठीक आहे, कामाच्या ताणामुळे असे होऊ शकते, असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले. दरम्यान सध्या तरी मुंडेंना काही धोका नसल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. पुढील तीन ते चार दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचेही टोपेंनी सांगितले.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


आज मध्यरात्रीपासून मुंबईत सीएनजी आणि पीएनजीचे दर वाढत आहेत


इंधन दरवाढीमुळे हैराण असलेल्या सामान्य जनतेला पुन्हा एकदा नव्या दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. कारण  मुंबई आणि परिसरात सीएनजी आणि पीएनजीच्या  दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. सुधारित दरानुसार सीएनजी प्रति किलो  ५ रुपयांनी, तर घरगुती पाईप अर्थात PNG  साडेचार रुपयांनी महागलाय. आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू होणार आहेत


 गुणरत्न सदावर्तेंची पोलीस कोठडी संपणार


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची कोठडी संपणार आहे. आज गिरगाव न्यायालयात हजर करणार आहेत.  


सोमय्या पिता-पुत्रांच्या अडचणी वाढल्या, EOW कडून समन्स


भाजप नेते किरीट सोमय्या (BJP) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सोमय्या पिता- पुत्रांना आर्थिक गुन्हे शाखेकडून हजर राहण्याबाबत समन्स  बजावले आहे. हजर न राहिल्यास पोलीस किरीट सोमय्या यांना फरार म्हणून घोषित करण्याची शक्यता आहे.


कोरोनाच्या  'XE' विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य  मंत्र्यांची तज्ज्ञांसोबत  बैठक 


कोविड-19 प्रकारात ओमायक्रॉन व्हेरीयंट अनेक नवीन प्रकारांना जन्म देत आहे.  X व्हेरीयंट आणि XE व्हेरायंटसारखी उदाहरणे समोर आहेत.  असे अनेक व्हेरीयंट पुढे देखील येणार असल्याची माहिती केंद्रीय टास्कफोर्सकडून देण्यात येत आहे. मात्र, यासंदर्भात घाबरण्यासारखे काही नाही. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मनसुख मांडविया यांची तज्ज्ञांसोबत  बैठक  होणार आहे


मुलींच्या लग्नासाठीची किमान वयोमर्यादा 18 वरून वाढवून 21 करण्याचा प्रस्ताव संसेदेच्या स्थायी समितील पाठवण्यात आला.  खासदार डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांच्या अध्यक्षतेखाली कमिटीसमोर हा विषय चर्चेत येणार असून त्यावर लोकांची मतेही मागवण्यात येणार  आहे.


अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये दहशतवादी हल्ला, 16 जण जखमी


अमेरिकेच्या न्यूयॉर्कच्या ब्रुकलीन मेट्रो स्टेशनवर गोळीबाराची घटना घडलीय. या गोळीबारात 16 जण जखमी झाल्याचं सांगितलं जातंय. यापैकी दोन जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबार करणाऱ्या व्यक्तीनं बांधकाम कामगारासारखे कपडे घातले होते आणि तोंडावर गॅस मास्कही लावला होता. त्याच्या हातात गन होती आणि तो काही बॉम्ब घेऊन स्टेशनमध्ये घुसला होता. गोळीबारानंतर पोलिसांनी स्टेशनवर सर्च ऑपरेशन करण्यात आलंय. त्यात काही बॉम्बही सापडले. न्यूयॉर्क पोलीस विभागाची कमांडो टीम मेट्रो स्टेशनमध्ये तैनात करण्यात आलीय. एफबीआयची टीमही घटनास्थळी पोहोचली असून त्यांनी चौकशी सुरु केलीय.


रक्षामंत्री राजनाथ सिंह इंडो पॅसफिक कमांड सेंटर दौऱ्यावर


रक्षामंत्री राजनाथ सिंह इंडो पॅसफिक कमांड सेंटर दौऱ्यावर आहेत.


 पाकिस्तानमधील सत्ता परिवर्तनानंतर पेशावारमध्ये इमरान खान यांची  रॅली


इमरान खानने सोमवारी ट्वीट करत पेशवारमधील रॅलीचे आयोजन करण्यात आली आहे. 


उद्याचा आयपीएलचा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स 


उद्या आयपीएलचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्जचा सामना रंगणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.