Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Mar 2022 06:56 AM
kolhapur latest news : करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी आता ई पासची गरज नाही

kolhapur latest news : करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी आता ई पासची गरज नाही.


देवस्थान समितीने ई पास ची सक्ती रद्द केली, चारही दरवाजातून मंदिरात प्रवेश.


भाविकांच्या मागणीचा आदर करून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा निर्णय.


जोतिबा डोंगरावर देखील अशाच पद्धतीने सक्ती हटवली जाणार

Kolhapur News Updates : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर

Kolhapur Local News Updates - कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 12 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे जागा रिक्त झाली होती.भाजपा - कॉग्रेस पुन्हा येणार समोरासमोर

Vastala Deshmukh : ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचं निधन झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची पिंजरा चित्रपटात खलनायिकेची भूमिका गाजली होती. 


 

Chandrakant Patil : राज्य सरकार गोंधळून आणि घाबरून गेले आहे ; चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका 

Chandrakant Patil : राज्य सरकार गोंधळून आणि घाबरून गेले आहे. सरकारमधील मंत्री जेलमध्ये जात आहेत. परंतु, सध्या सुरू असलेला प्रकार हा चोराला सोडून सावाला शिक्षा देण्यासारखा आहे. बुडत्याचा पाय खोलात जातोय, सरकारची ही विनाशकाले विपरीत बुद्धी आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केली आहे.

Aditya Thackeray : मुंबई कधीच थांबत नाही, कोविड काळात पायाभूत कामं न थांबवता कोविडची कामं केली: आदित्य ठाकरे

कोविड काळात कोणतीही पायाभूत कामे न थांबवता कोविडची कामे केली, मुंबई कधी थांबत नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे म्हणाले की, "कोस्टल रोडचे 50 ते 55 टक्के काम झाले, लवकरच उदघाटन करू तसेच वरळी ते शिवडी काम हाती घेतलं असून ते देखील डिसेंबर 2023 पूर्ण करू. 2027 पर्यंत 10 हजार इलेक्ट्रिक बसेस असतील, त्यात दीड हजार डबल डेकर बसेस असतील."


 

बुलढाण्यात पुरुषोत्तम हागे शेतकऱ्याच्या घराला व गोडाऊनला भीषण आग

बुलढाणा जिल्ह्यातील बोडखा गावातील पुरुषोत्तम हागे या शेतकऱ्याच्या गावाजवळील शेतात असलेल्या घराला व गोडाऊनला आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीत शेतकऱ्याचं घर व गोडाऊन पुर्णतः जळून खाक झालं असून अंदाजे 15 ते 16 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. 

Sangli : सांगलीत 'सुरश्री' संगीत महोत्सवाचे आयोजन

सांगलीत तीन दिवसीय 'सुरश्री' संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं.  मिलेनियम होंडा आणि चितळे उद्योग समूहाच्या वतीने  या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं. या संगीत महोत्सवाची सुरुवात शर्वरी जमेनिस  यांच्या बहारदार कथक नृत्यांनी झाली. शिव-पार्वतीच्या अर्धनारीनटेश्वर स्रोत्राने शर्वरी जमेनिस यांनी नृत्यास सुरूवात केली. शर्वरी जमेनिसांच्या उद्घाटनाच्या नृत्याविष्कारानंतर पं. पुर्बायन चॅटर्जी यांच्या अतिशय बहारदार सतारवादनाने आणि त्यांच्या साथीला असलेल्या पं. सत्यजीत तळवलकर यांच्या तबला वादनाने रसिकांची मने जिंकून घेतली. त्यांच्यासोबत व्हायोलिनवर नात्स्या व सतारीची साथ मेघा राऊत यांनी केली. सुरुवातीला त्यांनी श्यामकल्याण राग सादर केला. आलाप, जोड, रुपक तालात तर तीन तालात गत वाजवली. त्यानंतर त्यांनी मिश्रखयालमध्ये विविध धून एकत्रितपणे सादर करत आपलं वादन रसिकांना आनंद देणारं केलं.

भाजप कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला प्रकरण, भाजप आक्रमक

भाजप कार्यकर्ते मनोज कटके यांच्यावर हल्ला झाल्याच्या घटनेला 15 दिवस उलटले. मात्र अद्याप हल्लेखोर पोलिसांच्या हाती न लागल्यानं भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमदार चव्हाण यांनी आज डीसीपी सचिन गुंजाळ यांची भेट घेतली. यावेळी चव्हाण यांनी शहरात काही वाईट प्रवृत्तीचे लोकं गुंड घेऊन शहराचे वातावरण खराब करत आहेत. हल्ल्यामागे कोण आहे? हल्ला कशामुळे झालाय? यामध्ये राजकीय लोक आहेत. याचे पुरावे आम्ही पोलिसांना दिले आहेत. मात्र त्या दिशेने तपास होत नाही, 15 दिवस उलटूनही आरोपीला अटक नाहीत. लवकरात लवकर गुन्हेगाराला अटक झाली पाहिजे. ज्याने हे घडवलं त्याचा छडा लागण गरजेचं आहे, अशी मागणी करत मंगळवारी भाजपच्या वतीने पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी पोलिसांना दिला आहे. 

विरोधी पक्ष नेत्यांकडे पुरावे आहेत ते त्यांनी द्यावे : जंयत पाटील

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या आपला जबाब बीकेसी येथील सायबर पोलीस ठाण्यात नोंदवणार आहेत. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, "मला यासंदर्भात तपशील माहीत नाही. गृहमंत्री किंवा नोटीस पाठवली ते सांगू शकतील. कोणतीही सूडबुद्धी किंवा कुणाला अडचणीत आणणं हा सरकारचा हेतू नाही. माहिती घेण्यासाठी त्यांना बोलवलं असेल. त्यांच्यावर कारवाई करणे अडचणीत टाकणे असा हेतु सरकारचा नाही. विरोधी पक्ष नेत्यांकडे पुरावे आहेत ते त्यांनी द्यावे."

बीकेसी सायबर पोलीस स्टेशनमध्ये उद्या फडणवीस आपला जबाब नोंदवणार

मुंबईच्या बीकेसी सायबर पोलीस स्टेशन मध्ये उद्या सकाळी 11 वाजता राज्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आपल्या जबाब नोंदवण्यासाठी सायबर पोलीस स्टेशनमध्ये येणार आहेत. यावेळी बीकेसी पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठा संख्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांचा गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज पासून बीकेसी पोलिस स्टेशनचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि झोनचे डीसीपी डॉक्टर डी एस. स्वामी साहेब बीकेसी पोलिस स्टेशनच्या बाहेर बंदोबस्ताचा आढावा घेत आहे. 

Buldhana News : नाभिक समाजाचं राज्यस्तरीय साहित्य संमेलन शेगाव येथे संपन्न, साहित्यिक , लेखकांची शेगावात मांदियाळी

Buldhana News :  नाभिक समाजाचं द्वितीय साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आज पार पडलं. शहरातील विघ्नहर्ता हॉल येथील 'वीर हुतात्मा भाई कोतवाल साहित्य नगरी'त हे एकदिवसीय साहित्य संमेलन पार पडलं. 'महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पन संघा'नं या साहित्य संमेलनाचं आयोजन केलं. संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी पुणे येथील सुप्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते डॉ. प्रदीप कदम होते. त्यांनी मावळते संमेलनाध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर यांच्याकडून संमेलनापदाची सुत्रे स्विकारली. सातारा येथील सुप्रसिद्ध लेखक, कादंबरीकार आणि व्याख्याते कॅप्टन महेश गायकवाड यांनी या संमेलनाचं उद्घाटन केलं. यात समाजातील साहित्यिकांना व्यासपीठ निर्माण करून देणा-या 'विशेष स्मरणिके'चं विमोचन करण्यात आलं. चर्चासत्र, परिसंवाद आणि कवी संमेलनातून साहित्यिकांनी विविध गोष्टींवर भाष्य केलं. समाजातील लेखक आणि कवींच्या अनेक पुस्तकांचं प्रकाशनही या संमेलनात करण्यात आलं.

pune daund Accident news : दौंड तालुक्यातील अष्टविनायक मार्गावर स्कूल व्हॅनचा आणि कारचा अपघात , 7 वर्षीय विद्यार्थ्यांनीचा जागीच मृत्यू
pune daund Accident news : दौंड तालुक्यातील अष्टविनायक मार्गावर पडवी गावच्या हद्दीत स्कूल व्हॅनचा आणि कारचा अपघात झालाय.. या अपघातात एका 7 वर्षीय विद्यार्थ्यांनीच जागीच मृत्यू झालाय. तर एका विद्यार्थीनी सह दोन्ही गाड्याचे चालक जखमी झालेत.  सकाळी आठच्या सुमारास कार आणि व्हॅनचा अपघात झाला. बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान स्कुल मध्ये ही व्हॅन विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी चालली होती. स्कुल व्हॅन मध्ये 2 विद्यार्थी होते. सकाळी विद्यार्थी घेत ही व्हॅन पडवी गावच्या हद्दीतील रस्त्यावर चढ असल्याने व रस्ता अरुंद असल्याने समोरील वाहन जवळ आल्याशिवाय दिसत नाही. दोन्ही गाड्यांच्या चालकांना समोरील वाहन दिसले नसावे आणि त्यामुळे अपघात झाला असावा अशी माहिती यवत पोलिसांनी दिली आहे.  सुदैवाने गाडी सर्व विद्यार्थ्यांनी भरली नव्हती अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.  अपघातामध्ये पाटस येथील अवनी गणेश ढसाळ ही विद्यार्थिनी जागीच ठार झाली. तर मरीन तांबोळी  ही विद्यार्थिनी जखमी झाली. तर स्कुल व्हॅन आणि कारचा चालकदेखील जखमी झाले आहेत.. सध्या सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. मृत विद्यार्थीनीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

 
अमरावती : राज्यमंत्री बच्चू कडू यांना मातृशोक.

Amravati news : अमरावती : राज्यमंत्री बच्चू कडू यांना मातृशोक..इंदिराबाई बाबाराव कडू यांचं ८४ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन..


अमरावती येथील खासगी रुग्णालयात सुरू होते उपचार..


चांदुर बाजार तालुक्यातील बेलोरा येथील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास..

Pune Maval News : पुण्याच्या मावळात टेम्पो चालकाने भरधाव वेगात रिव्हर्स गाडी चालवली, एका मृत्यू, सीसीटीव्हीत घटना कैद

Pune Maval News Update : पुण्याच्या मावळात एका टेम्पो चालकाने भरधाव वेगात रिव्हर्स गाडी चालवली. निमुळता मार्ग असल्याने गाडीची अनेकांना ठोकर ही बसली. ही घटना सीसीटीव्हीत देखील कैद झालीये. अपघात झाल्याने पळून जाताना त्याने हे कृत्य केलं. नवलाख उंबरे गावात ही घटना 9 मार्चला घडली. रिव्हर्स जाण्याआधी टेम्पो चालकाने एका धडक दिल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू ही झाला. आता ग्रामस्थ आपल्याला मारतील या भीतीने त्याने रिव्हर्स गाडी हाकली, यात अनेकांचं नुकसान झालं काही जखमी ही झाले.

Nashik Maharashtra News : नाशिकमधील EVM मशीन असुरक्षित? गोदामात ठेवलेल्या evm मशिनचे cctv मिळत नसल्याचा प्रशासनाचा दावा,

Nashik Maharashtra News : नाशिकमधील EVM मशीन असुरक्षित? गोदामात ठेवलेल्या evm मशिनचे cctv मिळत नसल्याचा प्रशासनाचा दावा, अंबड गोदामात ठेवलेल्या evm मशीन चे cctv रेकॉर्डिंग मागून देखील मिळत  नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून गुन्हा दाखल, यंत्राच्या निगरणासाठी नेमलेल्या दोघांवर गुन्हा दाखल , नायब तहसीलदारांनी केला  केला गुन्हा दाखल 2019 ते 2022 पर्यंतचं cctv रेकॉर्डिंग  मिळत नसल्याने खळबळ

Satara News Update : खंडाळा घाटात लांबच लांब रांगा, दोन तासापासून वाहतूक विस्कळीत, सातारा बाजूकडे जाणारी वाहतून जॅम झाल्यानंतर आणखी परिस्थिती बिघडली

Satara News Update : खंडाळा घाटात लांबच लांब रांगा, दोन तासापासून वाहतूक विस्कळीत, सातारा बाजूकडे जाणारी वाहतून जॅम झाल्यानंतर आणखी परिस्थिती बिघडली, चालकांनी आपली वाहने विरूद्ध दिशेने  बोगद्याकडे वळवली, अचानक बोगद्यात विरूद्ध दिशेने वाहने वाढल्याने बोगद्यातील वाहतूकही ठप्प

Kolhapur Crime update : तंबाखूला लावण्यासाठी चुना का मागितला म्हणून एकाची हत्या, कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील धामोडमधील धक्कादायक घटना

Kolhapur Crime update : तंबाखूला लावण्यासाठी चुना का मागितला म्हणून एकाची हत्या


कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील धामोड इथला प्रकार


अनिल रामचंद्र बारड असं मृत नागरिकाचे नाव


विकास कुंभार या इसमाने केला बारड यांच्यावर हल्ला


हल्ल्यात अनिल रामचंद्र बारड हे जागीच ठार


घटनेमुळे राधानगरी तालुक्यात खळबळ, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Crime News : महिला बाऊन्सरकडून शाळेतच पालकाला मारहाण

Pune Crime News : पुण्यात महिला बाऊन्सरकडून शाळेतच पालकांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. फी बाबत विचारणा केली असता पालकांना मारहाण करण्यात आली आहे. पुणे- बिबवेवाडी परिसरातील क्लाईन मेमोरियल शाळेत ही घटना घडली. पालक मंगेश गायकवाड यांच्याकडून या प्रकरणी शाळेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून अदखलपात्र गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. मात्र पालकांच्या आरोपांवर अद्याप क्लाईन मेमोरियल शाळेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Palghar News : डहाणू नगर परिषदेच्या माध्यमातून डहाणू महोत्सवाचे आयोजन

Palghar News : पालघर जिल्ह्याला अथांग  समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव असून पर्यटनाला महत्त्व प्राप्त व्हावा म्हणून डहाणूमध्ये डहाणू नगर परिषदेच्या माध्यमातून डहाणू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पर्यटनाबरोबरच पालघर जिल्ह्यातील हस्तकला, लोककला, त्याच प्रमाणे उत्पादित वस्तूंना बाजारपेठ निर्माण करून दिली जाणार आहे. या महोत्सवाचे आयोजन दोन दिवस असून महोत्सवाची जय्यत तयारी झाले आहे. या महोत्सवाला हजारो पर्यटकांची हजेरी लागणार असून काही दिग्गजांची हजेरी लागणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. 

Election Results 2022 : पाच राज्यांतील निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या G-23 नेत्यांची बैठक

Election Results 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. निवडणुका झालेल्या पाच राज्यापैकी एकमेव पंजाब हे राज्य काँग्रेसच्या ताब्यात होते. मात्र, तिथेही काँग्रेसला हादरा देत आम आदमी पार्टीने जोरदार धक्का दिला आहे. बाकीच्या राज्यातही काँग्रेसला म्हणावं तसे यश संपादन करत आले नाही. दरम्यान, या निकालांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील जी-23 (G-23) नेत्यांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत पाच राज्यात लागलेल्या निकालांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच काँग्रेस नेतृत्व बदलाची मागणीवरही चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Defence Ministry Update: भारताच्या मिसाईलचा निशाणा थेट पाकिस्तानमध्ये; मिसाईल चुकून डागल्याचं सांगत भारताकडून खेद व्यक्त


नवी दिल्ली: भारताच्या सीममधून पाकिस्तानमध्ये एक सुपरसोनिक मिसाईल फायर केल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता. हे मिसाईल 9 मार्च रोजी डागण्यात आलं असून ते पाकिस्तानच्या तब्बल 124 किमीपर्यंत गेल्याचंही पाकिस्तानकडून सांगण्यात आलं. भारताने ही गोष्ट अपघाताने घडली असल्याचं मान्य केलं आणि त्यावर खेद व्यक्त केला आहे.


तपासाचे आदेश दिले
संरक्षण मंत्रालयाने यावर एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. भारत सरकारने हे प्रकरण गंभीरपणे घेतल्याचं त्यामध्ये सांगण्यात आलंय. हे मिसाईल पाकिस्तानच्या सीमेमध्ये पडल्याचं संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण ही गोष्ट अपघाताने घडली असून भारताकडून यावर खेद व्यक्त करण्यात आला आहे. नियमित देखरेख करताना तांत्रिक बिघाड झाल्याने ही घटना घडल्याचं संरक्षण मंत्रालयाने आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे. 


पाकिस्तानवर चुकून डागण्यात आलेले हे मिसाईल ब्रम्होस असल्याचं सांगण्यात येतंय. हे मिसाईल हरियाणातील सिरसा एअर बेसवरून फायर करण्यात आल्याचंही सांगण्यात येतंय. 


पाकिस्तानचे गंभीर आरोप
भारताकडून चुकून डागण्यात आलेलं हे मिसाईल पाकिस्तानच्या मियॉं चन्नू या ठिकाणी पडलं. या ठिकाणापासून केवळ 160 किमीवर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहरचे घर आहे. बुधवारी पाकिस्तानमध्ये हे मिसाईल पडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. 


Beed: सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर तिसऱ्या दिवशी लाच प्रकरणात अटक; पदोन्नतीच्या आनंदावर विरजण


पाटोद्यातील एका पीएसआयला सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाली. पण तिसऱ्याच दिवशी त्याला एसीबीने लाचखोरीच्या गुन्ह्याखाली अटक केली. त्यामुळे पदोन्नतीच्या आनंदावर विरजण पडलं आहे.


अफरोज तैमीरखा पठाण यांची सहायक निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली होती. राज्यातील उपनिरीक्षकांना सहायक निरीक्षकपदी पदोन्नतीसाठी महसूल विभागाचे वाटप करुन पसंती क्रमांक मागविलेले आहेत. याची यादी 9 मार्च रोजी अपर पोलीस महासंचालकांनी जाहीर केली. या यादीत अफरोज पठाण यांचेही नाव असल्याने सध्या त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव सुरू होता. या पदोन्नतीच्या तीन दिवसातच त्यांनी लाच मगितल्याच्या आरोपातून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे पदोनत्तीच्या आनंदावर तीन दिवसातच विरजण पडलं आहे


एका जबरी लुटीच्या गुन्ह्यात जप्त केलेला मोबाईल आणि आरोपीस अटकपूर्व जामीनासाठी सहकार्य करण्यासाठी बीडच्या पाटोदा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी संबंधितांकडे केली होती. या प्रकरणी तडजोडअंती 40 हजार रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अफरोज तैमीरखा पठान याना लाचलूचपत विरोधी विभाग-एसीबीने अटक केली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.