Maharashtra Breaking News LIVE Updates : पुण्यातील कोविड सेंटरचं कंत्राट मुंबईतील चहावाल्याला!

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 12 Feb 2022 09:58 AM
नागपूर अमरावती महामार्गावर भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

कोंढाळी परिसरात कारचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून भीषण  अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून एक महिला दोन पुरुषांचा समावेश आहे. नागपूर -अमरावती राष्ट्रीय मार्गावरील कोंढाळी नजिकच्या निर्मल सूतगिरणी समोर दुपारी12 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे. अमरावती कडून नागपूरच्या दिशेने येत असलेल्या  जाणारी एमपी 20 - सीएच 3041 क्रमांकाची  कारचा टायर  फुटल्याने कारचालकाचे वाहावरून  नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजकावर फेकल्या गेल्याने रोडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन गाडीने पलटी खालली. त्यामुळे गाडीत बसलेल्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये एक महीला  दोन  पुरूष जागीच ठार झाले. अपघात इतका भयंकर होता की मृतदेह काढण्यासाठी सुद्धा अडचण गेली. घटनेची माहित मिळताच कोंढाळीचे ठाणेदार  चंद्रकांत काळे आणि महामार्ग सुरक्षा पोलीस  सहघटना स्थळी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.

चंद्रपूर : वाघिणीला जेरबंद करण्यात यश..

चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोंडेगाव-सीतारामपेठ भागात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात यश... जेरबंद करण्यात आलेल्या वाघिणीचे वय अंदाजे २२ महिने असून ती सोनम या वाघिणीपासून म्हणजे आपल्या आई पासून अलीकडेच वेगळी झाली होती. मात्र ही वाघीण वारंवार पाळीव प्राण्यांवर हल्ले करत होती, सोबतच या वाघिणीच्या हल्ल्यात २ गुराखी जखमी झाले होते तर नमू धांडे (५७) या ग्रामस्थाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे वनविभागाने आज दुपारी या वाघिणीला डार्ट मारून बेशुध्द केले, सध्या या वाघिणीला चंद्रपूरच्या ट्रान्सीट ट्रीटमेंट सेंटर मध्ये ठेवण्यात आले आहे.

अश्या धमक्या रोज येत राहतात, मी माझं काम करत राहीन - एकनाथ शिंदे

नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व गेल्या अनेक महिन्यांपासून एकनाथ शिंदे करत आहेत. यामध्ये अनेक नक्षलवाद्यांवर कारवायादेखील करण्यात आल्या. यामुळेच नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे याना वारंवार धमकीचे फोन आणि पत्र येत आहेत. त्यात आज गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी ट्विट करून एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे तरी सुरक्षेत वाढ करावी अशा सूचना केल्या आहेत. परंतु अशा बऱ्याच धमक्या येत असतात, मी माझं काम करत राहीन, असे एकनाथ शिंदे म्हणाले. गडचिरोली जिल्हा नक्षलवादी जिल्हा आहे त्या भागाचे नक्कीच सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री आणि सरकार करत आहे. आणि मीही करिन आणि सुक्षेत वाढ करावी कि नाही हे गृह खात ठरवत. सर्वस्वी निर्णय त्यांचा आहे परंतु अश्या धमक्यांचा मला कधीच फरक पडला नाही असे एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर सांगितले.

दहा मार्च नंतर महाविकास आघाडी सरकार जाणार असा दावा पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय

चंद्रकांत पाटील पिंपरी-चिंचवडमधे आले असता पत्रकारांनी काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या अशा प्रकारच्या दाव्याबाबत विचारले असता पाच राज्यातील निवडणूका झाल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जाणार आहे असं ते म्हणाले.  महाविकास आघाडीतील मंत्री एकामागोमाग एक घोटाळ्यात अडकत असल्याने महाविकास आघाडीचे सरकार जाईल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलय.  मागील आठवड्यात चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील मांजरी भागातील एका सभेत बोलताना दहा मार्चनंतर महाविकास आघाडीचे सरकार जाईल असं म्हटलं होतं.  मात्र सभेनंतर त्या वक्तव्याबद्दल विचारले असता कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आपण दहा मार्चची तारीख दिल्याच चंद्रकांत पाटील यांनी म्हटल होत. मात्र आता पुन्हा एकदा त्यांनी दहा मार्चनंतर महाविकास आघाडी सरकार जाईल नमस्कार असं विधान केलय.

दहावी बारावी बोर्डाच्या प्रॅक्टिकल परीक्षेवर कुठलाही बहिष्कार नाही, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे स्पष्टीकरण
दहावी बारावी बोर्डाच्या प्रॅक्टिकल परीक्षेवर कुठलाही बहिष्कार नाही, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने स्पष्टीकरण दिले आहे. 

 
Pune News update :  बैलगाडा शर्यत पाहून घरी परतत असताना तरुणाचा अपघाती मृत्यू

Pune News update :  पुणे येथील मावळमधील बैलगाडा शर्यत पाहून घरी परतत असताना एका तरुणाचा अपघातात मृत्यू झालाय. अनिल प्रकाश शेटे ( वय 30) असं मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे. नाणोली घाटात तो शेटेवाडीतून बैलगाडा शर्यत पहायला आला होता. दुपारी सव्वा एकच्या सुमारास शर्यत पाहून तो घाटासमोरील मार्गावर आला, त्यावेळी आयशर टेम्पोचा त्याला धक्का लागला. यात त्याला डोक्याला जबर मार लागला आणि त्याचा मृत्यू झाला. 

भारतीय उद्योगांच्या विकासात भरीव योगदान देणारा देशाभिमानी उद्योजक गमावला - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राहूल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव योगदान देणारा ज्येष्ठ उद्योजकच आपण गमावला नाही तर सामाजिक भान असलेला, आणि देशासमोरील समस्यांवर निर्भिडपणे आपली मते मांडणारा, तरुण उद्योजकांचा प्रेरक असा देशाभिमानी उद्योजक आपल्यातून गेला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राहूल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.
 

बजाज उद्योग समूहाचे प्रमुख  राहुल बजाज यांचं निधन!

बजाज उद्योग समूहाचे प्रमुख राहुल बजाज यांचं निधन! 


Rahul Bajaj : राहुल बजाज यांचं निधन

Rahul Bajaj :  देशातले प्रमुख उद्योगपती आणि बजाज ग्रुपचे प्रमुख राहुल बजाज यांचं आज निधन झालं आहे. त्यांना 2001 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA 

Kirit Somaiya : सुजित पाटणकर यांची भाजप नेते किरीट सोमय्या यांना कायदेशीर नोटीस.

Kirit Somaiya  : सुजित पाटणकर यांची भाजप नेते किरीट सोमय्या यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. सुजित पाटणकर यांच्या कंपनीने कोविड सेंटरमध्ये कोट्यवधी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.  

धारावी परिसरात युवकावर गोळीबार

मुंबईच्या धारावी परिसरात असलेला पिला बंगला बस स्टॉपच्या पाठीमागील खाडीमध्ये तीस वर्षाच्या युवकावर सकाळी दहाच्या सुमारास बाथरूम ला जात असताना त्याच्यावर अज्ञात इसमाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे, या गोळीबारात आमीरला  दोन गोळ्या लागल्यामुळे जखमी झाला आहे. त्याला जवळच्या रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे,  

Satara News Update : ताम्हिणी घाटातून चार दिवसाच्या बाळाला दरीत फेकून दिले, आरोपी अटकेत 

Satara News Update : ताम्हिणी घाटातून एका आरोपीने चार दिवसाच्या बाळाला दरीत फेकून दिले. पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांकडून आरोपीला अटक. बाळाला फेकून दिल्याची आरोपीकडून कबुली. लोणावळा येथील ट्रेकर्स बाळाला शोधण्याचे काम करत आहेत.   

अमरावती मनपा आयुक्तांनी खासदार नवनीत राणा यांची भेट नाकारली


अमरावती मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी खासदार नवनीत राणा यांची भेट नाकारली आहे. तब्येतीचं कारण देत भेट नाकारल्याची माहिती आहे. मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणी खासदार नवनीत राणा या आयुक्तांना भेटायला जाणार होत्या.

Maharashtra Sindhudurga Live News : सिंधुदुर्ग : वैभववाडीतील करुळ घाटात कंटेनर पलटी, कंटेनर पलटी झाल्याने करूळ घाटातील 2.30 तासांपेक्षा जास्त काळ वाहतूक ठप्प , 

सिंधुदुर्ग : वैभववाडीतील करुळ घाटात कंटेनर पलटी, कंटेनर पलटी झाल्याने करूळ घाटातील 2.30 तासांपेक्षा जास्त काळ वाहतूक ठप्प , 


सकाळी ९. ३० च्या सुमारास करूळ घाटात कंटेनर पलटी


करूळ घाटातील वाहतूक पुर्णतः ठप्प


करूळ घाटातील वाहतूक भुईबावडा आणि फोंडा घाटमार्गे वळवली


घटनास्थळी वैभववाडी पोलीस दाखल

'शिवसेनेला गोव्यात चांगला प्रतिसाद' : आदित्य ठाकरे

गोव्यामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे म्हणाले, '11 ठिकाणी आम्ही निवडणूक लढवत आहोत. इथं शिवसेना घरोघरी पोहचली आहे. शिवसेनेला गोव्यात चांगला प्रतिसाद मिळत आहेगोव्यासह देशातल्या प्रत्येक राज्यात शिवसेना निवडणूक लढावेल. 

अनैतिक संबंधातून ब्लॅकमेल केल्याने युवकाची आत्महत्या, फरा महिलेवर गुन्हा दाखल

बुलढाणा : अनैतिक संबंधातून ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेमुळे एका युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील आदिनाथ गडकर नामक युवकाला परिसरातील 23 वर्षे महिला अनैतिक संबंधातून ब्लॅकमेल करत वारंवार पैशाची मागणी करत होती. या त्रासाला कंटाळून या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आदिनाथच्या वडिलांच्या फिर्यादीवरून तेवीस वर्षीय या महिला आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला सध्या फरार असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांकडून देण्यात आली आहे.

भागवत कराडांच्या घराबाहेर आंदोलन सुरू 

Aurangabad : भागवत कराडांच्या घराबाहेर आंदोलन सुरू 





पुण्यातील कोविड सेंटरचं कंत्राट मुंबईतील चहावाल्याला

संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर कोविड सेंटर घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी आज मुंबईत परळमधल्या हॉटेलमध्ये सरप्राईज व्हिजिट दिली. पुण्यातलं कंत्राट मुंबईतल्या एका चहावाल्याला दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. आज सकाळी सोमय्या परळमधील या चहावालाच्या सह्याद्री हॉटेलमध्ये पोहोचले. आणि हॉटेलमालकाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सोमय्यांनी भेट दिली तेव्हा हॉटेल मालक तिथं नव्हते. त्यामुळे माध्यमांशी बोलून काही वेळातच सोमय्या तिथून निघाले.

Maharashtra Raigad News Update : रायगडमधील माणगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास तरुणावर गोळीबार

Maharashtra Raigad News Update : रायगड : माणगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास तरुणावर गोळीबार, मोटारसायकलवर आलेल्या इसमाने केला गोळीबार, माणगाव शहरातील औषध दुकानात काम करणाऱ्या तरुणावर गोळीबार,  24 वर्षीय शुभम जयस्वाल जखमी..


शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मोटारसायकलवर आलेल्या दोन तरुणांनी केला गोळीबार. जखमी शुभम याला मुंबईतील रुग्णालयात दाखल...

Nagpur News Big Breaking : नागपुरात सीबीआयचं सर्च ॲापरेशन , कोराडी ग्रीन लॅवरेज परिसरात सीबीआयची रेड, सकाळपासून  रेड सुरू

Big Breaking : नागपुरात सीबीआयचं सर्च ॲापरेशन , कोराडी ग्रीन लॅवरेज परिसरात सीबीआयची रेड, सकाळपासून  रेड सुरू, कोरोडी पोलिसांची सोसायटीत जाण्यास मनाई,   सीए आणि शेअर ट्रेडिंगशी संबंधीत व्यक्तीवर धाड पडल्याची माहिती

नाशिक : गावगुंडाची पोलिसांकडून धिंड

नाशिकमधील गावगुंडाची धिंड काढून पोलिसांनी मस्ती उतरवली आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शुभम पार्क परिसरात बुधवारी पाच जणांच्या टोळक्याने हौदोस घालत चारचाकी वाहनांची आणि दुकानांची तोडफोड करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व संशयितांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यातील एका अल्पवयीनाची बाल सुधारगृहात रवानगी केली तर, उर्वरितांनी आरोपींची तोडफोड केलेल्या ठिकाणी नेऊन धिंड काढली. मागील आठवड्यातही नाशिकरोड परिसरात गुन्हेगारी करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढत इतरही गुन्हेगारांना इशारा दिला होता. निवडणुकीचे दिवस जवळ आल्यानं शहरात कायद्या सुव्यवस्थाला बाधा पोहचू नये यासाठी पोलीस दल सतर्क झाले आहे.

Maharashtra Nashik News Update : नाशिकमधील गावगुंडाची धिंड काढून पोलीसांनी मस्ती उतरवली

Maharashtra Nashik News Update :  नाशिकमधील गावगुंडाची धिंड काढून पोलीसांनी मस्ती उतरवली, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शुभम पार्क परिसरात  बुधवारी पाच जणांच्या टोळक्याने हौदोस घालत चारचाकी वाहनांची आणि दुकानांची तोडफोड करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व संशयितांना पोलिसांनी शिताफीने अटक केली त्यातील एका अल्पवयीनाची बाल सुधारगृहात रवानगी केली तर उर्वरितांनी जिथे जिथे मद्यधुंद अवस्थेत वाहनांची तोडफोड केली त्या ठिकाणी नेऊन धिंड काढली, मागील आठवड्यातही नाशिकरोड परिसरात गुन्हेगारी करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढत इतरही गुन्हेगारांना इशारा दिला होता, निवडणुकीचे दिवस जवळ आल्यानं शहरात कायद्या सुव्यवस्थाला बाधा पोहचू नये यासाठी पोलीस दल सतर्क झालाय, त्याचीच प्रचिती सध्याच्या कारवाया वरून येतीय. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शुभम पार्क परिसरात  बुधवारी पाच जणांच्या टोळक्याने हैदोस घालत चारचाकी वाहनांची आणि दुकानांची तोडफोड करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व संशयितांना पोलिसांनी शिताफीने अटक केली त्यातील एका अल्पवयीनाची बाल सुधारगृहात रवानगी केली तर उर्वरितांनी जिथे जिथे मद्यधुंद अवस्थेत वाहनांची तोडफोड केली त्या ठिकाणी नेऊन  धिंड काढली, मागील आठवड्यातही नाशिकरोड परिसरात गुन्हेगारी करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढत इतरही गुन्हेगारांना इशारा दिला होता, निवडणुकीचे दिवस जवळ आल्यानं शहरात कायद्या सुव्यवस्थाला बाधा पोहोचू नये यासाठी पोलीस दल सतर्क झालाय, त्याचीच प्रचिती सध्याच्या कारवाया वरून येतीय.

काँग्रेसकडून भागवत कराड यांच्या औरंगाबाद येथील घरावर मोर्चा

काँग्रेसमुळे राज्यात कोरोना वाढला असल्याचं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. महाराष्ट्राचा अवमान होत असताना भाजपचे महाराष्ट्रातील गप्प होते. त्यामुळे काँग्रेसकडून आज अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या औरंगाबाद येथील घरावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वीच भाजपकडून कराड यांच्या घरासमोर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी करत संरक्षण देण्यासाठी आम्ही तयार असल्याचं म्हटलं आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी चिंताजनक बातमी

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी चिंताजनक बातमी


डिसेंबर 2021 मधील भारताचे औद्योगिक उत्पादन वाढ 0.4 टक्क्यांपर्यंत कमी, २०२१ मधील औद्योगिक उत्पादन वाढ गेल्या 10 महिन्यातील सर्वात कमी, 


राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून आकडेवारी प्रसिद्ध, आठ प्रमुख उद्योगांचा निर्देशांक जाहीर 


डिसेंबर २०२० मध्ये औद्योगिक उत्पादन वाढ २.२ टक्के राहिली होती तर नोव्हेंबर २०२१ मध्ये १.४ टक्के वाढ झाली होती


फेब्रुवारी २०२१ पासून उत्पादन क्षेत्रात घट होण्यास सुरुवात, प्रामुख्याने कोरोनाची दुसऱ्या लाटेमुळे वाढ नाही 


डिसेंबर महिन्यात उत्पादन क्षेत्रात ०.१ टक्क्यांची घट


खाण क्षेत्रात डिसेंबर महिन्यात २.६ टक्क्यांची वाढ, तर वीज निर्मिती क्षेत्रात नोव्हेंबर २०२१ च्या तुलनेत ०.७ टक्क्यांची अधिकची वाढ, वीज निर्मिती क्षेत्रात २.८ टक्कांनी वाढ, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादनात घट

धुळे : लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी जन अभियान

धुळे : लसीकरणाचा टक्का वाढावा यासाठी धुळे जिल्ह्यात जिल्हाधिकारी जन अभियान राबवण्यात येणार आहे. मंगळवारी एकाच दिवशी तब्बल एक लाख लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे.

पुण्यातील जंबो कोविड सेंटरमधे कोणतीही चुकीची गोष्ट झालेली नाही : अजित पवार

सध्या जंबो कोविड सेंटरची खुप चर्चा सुरु आहे. याबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की, 'पुण्यात एक आणि पिंपरी-चिंचवडमधे एक असे दोन जंबो कोविड सेंटर उभारण्यात आले होते. या सेंटरच्या व्यवस्थापनात कोणतीही राजकीय व्यक्ती नव्हती तर सगळी जबाबदारी पालिका अधिकाऱ्यांवर होती. मात्र या जंबो कोविड सेंटरबाबत आरोप होत असल्याने पीएमआरडीए च्या आयुक्तांना याबाबत नोट काढायला सांगितलंय.'

भंडाऱ्यात देशी कट्ट्यासह  दोघांना अटक, बनावट नंबरची दुचाकीही जप्त

भंडारा : भंडारा जिल्ह्यात ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात येत असून या अंतर्गत भंडारा शहरातील शास्त्री चौक ते सिंधी कॉलनी मार्गावरील कब्रस्तानच्या बाजूला असलेल्या एका ऑटो रिपेअरिंग सेंटरजवळ दोन युवक संशयितरित्या फिरताना आढळले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे देशी कट्टा आढळला. याप्रकरणी भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अमन ब्रह्मो (22) आणि नितेश पटले (21) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून देशी कट्ट्यासह चोरीची दुचाकी सुद्धा जप्त केली आहे.  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समयसूचकता दाखविल्याने दोन्ही तरुणांना वेळीच पकडण्यात यश आले असून त्यांच्या ताब्यातून अवैधरित्या वापरात असलेला गावठी बनावटीचा देशी कट्टा किंमत सात हजार रुपये दुचाकी साहित्याची किंमत 47 हजार 265 रुपये सांगण्यात येत आहे. दोन्ही आरोपी विरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पार्श्वभूमी

राष्ट्रपतींचा आज रत्नागिरी दौरा; आंबडवे गावाला भेट देणार


राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते मंडणगड तालुक्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे या गावाला भेट देणार आहेत. राष्ट्रपती यांचा दौरा हा ऐतिासिक आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता आजची राष्ट्रपतींची आंबडवे गावाला भेट ही अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. मंडणगड शहराशिवाय आंबडवे गावच्या परिसराला छावणीचे स्वरूप आल्याचे चित्र आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्भूमीवर याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रपतीच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.


माघी एकादशीनिमित्त कोरोनाच्या सावटानंतर पहिल्यांदाच गजबजली पंढरी; चार लाख भाविक दाखल


आज माघ शुद्ध अर्थात जया एकादशी. कोरोनाच्या महामारीनंतर जवळपास सहा महत्वाच्या वाऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. आजची माघी वारी कोरोना नंतरची पहिली वारी आहे ज्या वारीला वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यामुळं वारकऱ्यांमध्ये देखील चैतन्याचं वातावरण आहे. दरम्यान माघीच्या निमित्तानं विठुरायाची महापूजा मंदिर समितीचे सदस्य अतुल महाराज भगरे यांच्या हस्ते तर रुक्मिणी मातेची महापूजा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते पार पडली. एसटीचा संप असूनही जवळपास चार लाख भाविक या सोहळ्यासाठी पंढरीत दाखल झाल्याने पंढरी नगरी हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून निघाली आहे. विठुरायाच्या प्रमुख यात्रांपैकी माघी यात्रा ओळखली जाते. आज या सोहळ्यानिमित्त विठुरायाची महापूजा भगरे गुरुजी यांनी सपत्नीक केली. रुक्मिणी मातेची महापूजा प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सपत्नीक केली. 


मुंबई महापालिकेत उंदीर मारण्याचा घोटाळा; भाजप मनपा गटनेते प्रभाकर शिंदेंचा स्थायी समितीत आरोप


मुंबई महापालिकेत उंदीर मारण्याचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपनं स्थायी समितीत केला आहे. मुंबईकरांचा त्रास दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या किटक नाशक विभागाच्या माध्यमातून उंदरांचा नायनाट करण्यात येतो. उंदिर मारण्याबाबतचा 2 कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आला होता. त्यात ए ते टी विभागात म्हणजेच मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात 1 कोटी रुपये खर्च करून उंदिर मारण्यात आल्याचे म्हटले आहे, अशी माहिती भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे. प्रभाकर शिंदे यांनी म्हटलं आहे की, एक उंदिर मारण्यासाठी 20 रुपये तर ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा अधिक उंदिर मारल्यास प्रत्येक उंदिर मारण्यास 22 रुपये या दराने उंदिर मारण्यात आल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. पालिकेने केवळ 5 वॉर्डमध्ये 1 कोटी रुपये खर्च करून उंदीर मारले आहेत. मात्र किती उंदिर मारले याचा आकडा पालिकेने दिलेला नाही, प्रभाकर शिंदे यांनी म्हटलं आहे. उंदरांच्या उत्पतीची कारणे कोणती ती सुद्धा प्रस्तावात दिलेली नाहीत. यामुळे नक्कीच उंदिर मारले गेले का यावर शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.