Maharashtra Breaking News 11 August 2022 : देश-विदेशसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Aug 2022 09:49 PM
Bandra Firing : वांद्रे लिंकिंग रोड परिसरात गोळीबार

बांद्रा लिंकिंग रोड परिसरात गजीबो शॉपिंग सेंटरजवळ फायरिंग झाली आहे. अज्ञात तीन लोकांनी या ठिकाणी गोळीबार केला आहे. या घटनेत कोणीही जखमी किंवा जीवितहानी नाही. खार पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत ते तपास करत आहेत. लिंकिंग रोडवर असलेला गजीबो शॉपिंग सेंटरचा बाहेर असलेला फुटपाथवरील धंद्याच्या वादावरून आज  दोन गटांमध्ये तीन राऊंड फायरिंग झाली आहे. गोळीबार केल्यानंतर त्या ठिकाणी आरोपीने चिठ्ठी ठेऊन पळून गेलेत. चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे की, इथे धंदा लावला तर बघून घेणार. सध्या घटनास्थळावर खार पोलीस अधिकारी आणि डीसीपी मंजुनाशिंगे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी पोहोचले आहेत.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतले संत गजानन महाराजांचे दर्शन

बुलढाणाः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज शेगाव येथे भेट दिली. आधी संत गजानन महाराज मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं व नंतर संत गजानन महाराज संस्थानचे दिवंगत कार्यकारी विश्वस्त शिवशंकर पाटील यांच्या निवासस्थानी ते सांत्वनपर भेट दिली. यावेळी जिल्हाभरातून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन

माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन झाले. पुणे जिल्ह्यातील एक अतिशय लोकप्रिय नेतृत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पाचर्णे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो ही प्रार्थना, असं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.





राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली, दुपारी साडे चार वाजता शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठकीचं आयोजन


बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुनील तटकरे उपस्थित राहणार


मातोश्रीवर काल राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आज होणाऱ्या बैठकीला विशेष महत्त्व


आगामी स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महाविकास आघाडीचं भवितव्य याबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती

जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती, राष्ट्रपती भवनात घेतली शपथ

Jagdeep Dhankhar : जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

मंत्रालयातील इंटरनेट बंद झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचा खोळंबा, मंत्रालयातील प्रवेशासाठी नेट बंद असल्यामुळे नागरिकांना प्रवेशासाठी पास मिळण्यास अडचण

मंत्रालयातील इंटरनेट बंद झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचा खोळंबा


मंत्रालयातील प्रवेशासाठी नेट बंद असल्यामुळे नागरिकांना प्रवेशासाठी पास मिळण्यास अडचण


मागील एक तासापासून नेट बंद असल्यामुळे नागरिकांच्या मंत्रालयीन प्रवेशासाठी पास मिळवण्यासाठी रांगा

इनरव्हील क्लब ऑफ पालघरकडून एसटी कर्मचाऱ्यांना राखी बांधून भेटवस्तू देऊन रक्षाबंधन साजरी

Palghar News : इनरव्हील क्लब ऑफ पालघर यांनी पालघर आगारातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरी केली. ऊन पाऊस वारा या कसल्याचाही विचार न करता एसटी कर्मचारी नेहमी जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात. त्यामुळे एसटी कर्मचारी हा नेहमीच सर्व प्रवाशांना आपल्या जवळचा वाटतो. त्यामुळे एक अनोखा ऋणानुबंध म्हणून इनरव्हील क्लब ऑफ पालघर मार्फत रक्षाबंधन आणि भेटवस्तू देत रक्षाबंधन साजरी केली.

इनरव्हील क्लब ऑफ पालघरकडून एसटी कर्मचाऱ्यांना राखी बांधून भेटवस्तू देऊन रक्षाबंधन साजरी

Palghar News : इनरव्हील क्लब ऑफ पालघर यांनी पालघर आगारातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरी केली. ऊन पाऊस वारा या कसल्याचाही विचार न करता एसटी कर्मचारी नेहमी जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात. त्यामुळे एसटी कर्मचारी हा नेहमीच सर्व प्रवाशांना आपल्या जवळचा वाटतो. त्यामुळे एक अनोखा ऋणानुबंध म्हणून इनरव्हील क्लब ऑफ पालघर मार्फत रक्षाबंधन आणि भेटवस्तू देत रक्षाबंधन साजरी केली.

कांजुरमार्गच्या जागेवर मेट्रो 6 चं कारशेड उभारण्याकरता जागा मिळावी, MMRDA ची राज्य सरकारकडे मागणी

Mumbai News : ठाकरे सरकारच्या काळात वादग्रस्त ठरलेल्या कांजुरमार्गच्या जागेवर मेट्रो 6 चं कारशेड उभारण्याकरता जागा मिळावी, अशी मागणी एमएमआरडीएने राज्य शासनाकडे केली आहे. एकूण 40 हेक्टरपैकी 15 हेक्टरची कांजुरमार्ग येथील जागा मेट्रो 6 च्या कारशेडला मिळावी अशी मागणी करण्यात आली. ठाकरे सरकारच्या काळात मेट्रो 3 सह मेट्रो 6, मेट्रो 4, मेट्रो 14 अशा चार मेट्रोचे इंटीग्रेटेड कारशेड उभारण्याचा प्रस्ताव कांजुरमार्ग येथील जागेकरता होता. मात्र, ही जागा वादग्रस्त आहे, खाजगी मालकीची आहे, तसेच दलदलयुक्त असल्यानं कारशेड बनवण्यास अयोग्य आहे असे युक्तीवाद केले गेले होते. आता मात्र, शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात मेट्रो 3 चे कारशेड आरेतच होणार हे निश्चित झाल्यानंतर मेट्रो 6 साठी कांजुरमार्गची हीच वादग्रस्त ठरलेली जागा मागितली गेली आहे.

अखेर हसन मुश्रीफ यांनी सरकारी बंगला सोडला, बंगल्यात राहणाऱ्या रुग्णांनी घेतला भावूक निरोप

Kolhapur News : अखेर हसन मुश्रीफ यांनी सरकारी बंगला सोडला 


बंगल्यात राहणाऱ्या रुग्णांनी घेतला भावूक निरोप


हसन मुश्रीफ यांच्या सरकारी बंगल्यात होती मोफत उपचारासाठी आलेल्या रुग्ण आणि नातेवाईकांच्या राहण्याची सोय


राज्यातील सत्ता बदलानंतर हसन मुश्रीफ यांना सोडावा लागला सरकारी बंगला


सत्ता बदल होऊनही सरकारी बंगला न सोडल्यामुळे काही दिवसापूर्वी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर झाली होती टीका

शिंदे गटातील नवनियुक्त मंत्री शिवतीर्थावरील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन अभिवादन करणार

Mumbai News : दादरच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या ठिकाणी शिंदे गटातील नवनियुक्त मंत्री येणार आहेत


मंत्रीपद मिळाल्यानंतर शिंदे गटातील हे नऊ मंत्री एकत्रितपणे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या ठिकाणी येऊन दर्शन घेतील 


याआधी सुद्धा मुख्यमंत्री शिंदे गटातील आमदारांनी बहुमताची चाचणी झाल्यानंतर शिवाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळ या ठिकाणी येऊन दर्शन घेतलं होतं


या नवनियुक्त आमदारांचं अभिनंदनाचे आणि स्वागताचे पोस्टर्स शिवाजी पार्क परिसरात लावण्यात आले आहेत

रक्षाबंधनानिमित्त वर्धा जिल्हा काँग्रेसने अमृतसर, पंजाब सीमेवरील जवानांना एक हजार राख्या पाठवल्या

Wardha News : शत्रूपासून भारतवासियांचं रक्षण करण्यासाठी मरणाची पर्वा न करता डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस सीमेवर तैनात असलेल्या जवनांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे धन्यवाद मानण्यासाठी वर्धा जिल्हा काँग्रेसच्या वतीने जवानांना एक हजार राख्या पाठवण्यात आल्या. जवानांना कुठलाही सण नाही, कुठलाही महोत्सव नाही. फक्त 24 तास देशाची सेवा बजावत असतात. अशा शूरवीर जवानांसाठी वर्धा जिल्हा कॉंग्रेस कमिटी, सर्व फ्रँटल सेल विभागाच्या वतीने काँग्रेसच्या चारुलता टोकस उपाध्यक्षा म.प्र.कॉंग्रेस कमिटी याच्या हस्ते, तसेच जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, जिल्हा अध्यक्ष सुधीर पांगुळ यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश सेलुकर यांच्या नेतृत्वात 'रक्षाबंधन' सोहळ्यानिमित्त खासा बॉर्डर अमृतसर, पंजाब भारत पाक सीमेवरील जवानांसाठी 1001 राख्या या भारतीय पोस्टाने पाठवण्यात आल्या.

Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ उद्धव ठाकरेंच्या भेटीला

Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ आज रात्री 8 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. यामध्ये विरोधी पक्ष नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ असणार आहेत. सत्तांतरानंतर सदिच्छा भेट घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती आहे. 




 


Maharashtra Politics : अजित पवारांच्या उपस्थितीत विरोधकांची बैठक

Maharashtra Politics : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत आज विरोधी पक्ष नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. कामकाज सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांची बैठक होणार आहे. राज्य विधीमंडळाचे अधिवेशन आणि विरोधकांची भूमिका या संदर्भात बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. 

Jagdeep Dhankhar Oath : जगदीप धनखड उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेणार

Jagdeep Dhankhar Oath : देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड हे शपथ घेणार आहेत. त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम दुपारी 12.30 वाजता होणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना शपथ देतील. 

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत...


जगदीप धनखड उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेणार 


देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड हे शपथ घेणार आहेत. त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम दुपारी 12.30 वाजता होणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना शपथ देतील. 


अजित पवारांच्या उपस्थितीत विरोधकांची बैठक


विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत आज विरोधी पक्ष नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. कामकाज सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांची बैठक होणार आहे. राज्य विधीमंडळाचे अधिवेशन आणि विरोधकांची भूमिका या संदर्भात बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. 


राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ उद्धव ठाकरेंच्या भेटीला


राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ आज रात्री 8 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. यामध्ये विरोधी पक्ष नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ असणार आहेत. सत्तांतरानंतर सदिच्छा भेट घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती आहे. 


आज रक्षाबंधन साजरा करण्यात येणार


देशभरात आज भाऊ आणि बहिणीच्या नात्याच्या रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात येणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.