Maharashtra News LIVE Updates : शिवाजी पार्कवर लतीदीदींच स्मारक नको, राजकारण थांबवाव- ह्रदयनाथ मंगेशकर

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 10 Feb 2022 06:27 PM
TET घोटाळ्यानंतर आरोग्य पेपरफुटी प्रकरणाच्या वेग...

आरोग्य विभाग गट ड परीक्षा पेपरफुटी संदर्भात आणखीन एक अटक...


अर्जुन भरत राजपूत याला औरंगाबाद मधून केली अटक....


अर्जुन हा औरंगाबाद येथे म्हाडा परिक्षे करिता येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी केली अटक


तर आरोग्य विभाग गट क च्या पेपरफुटी प्रकरणात अतुल राख याला काल पोलिसांनी पुण्यात केली होती अटक...


अर्जुन राजपूत याला न्यायालयात हजर केलं असता चार दिवसांची पोलीस कोठडी


तर अतुल राख याला 7 दिवसांची पोलीस कोठडी

BEED : बीड जिल्ह्यात आज मध्यरात्री पासून मनाई आदेश लागू..

बीड जिल्ह्यात आज मध्यरात्री पासून मनाई आदेश लागू..


पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणुक / मोर्चा काढता येणार नाही. 


सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचवणारी असेल आणि जाहिरपणे प्रक्षोभक भाषण व असभ्य वर्तन करण्यास मनाई असेल.


 बीड जिल्हयात होणा-या राजकिय सामाजिक हालचाली व घडामोडींमुळे मोर्चे निदर्शने, आंदोलने, धरणे आंदोलने, रास्ता रोको आंदोलने या सारखे आंदोलने होण्याची शक्यता असून यातुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दिनांक 19.2.2022 रोजी शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे. जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या करीता कलम 37 (1) (3) मु.पो.का. लागू करणे अत्यंत आवश्यक आहे. तरी दिनांक 10.2.2022 रोजीचे 00.00 वाजेपासून ते दिनांक 24.2.2022 चे 00.00 वाजेपर्यंत चे काळात जिल्हयात कलम 37 (1) (3) म.पो.का. लागु करण्यात येत आहे.

हांव हायलो तुमका मेळपाक, आदित्य ठाकरेंची गोंयेकरांना साद
गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. भाजप, कॉंग्रेस, आप आणि तृणमूल कॉंग्रेससह विविध राजकीय पक्षांचे नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी आरोप प्रत्यारोप करत आहेत.येत्या 14 फेब्रुवारीला गोव्यात मतदान होत असून घरोघरी जाऊनसर्वच सर्वच पक्ष प्रचार करण्यावर  भर देत आहेत.त्यात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे हे ही आता गोव्याच्या मैदानात प्रचाराला उद्या उतरत आहेत.

 
शिवाजी पार्कवर लतीदीदींच स्मारक नको, राजकारण थांबवाव-ह्रदयनाथ मंगेशकर

मागील काही दिवसांपासून शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांचं स्मारक तयार करण्यावरुन राजकारण तापलं आहे. यावर लतादीदींचे बंधु ह्रदयनाथ मंगेशकर यांनी हे स्मारक नको, आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय हीच दीदींना श्रद्धाजंली असं ते म्हणाले आहेत.

Maharashtra News : सनातन आणि हिंदू जनजागृती समिती सारख्या कट्टर संस्था समाजासाठी घातक, सीबीआयचा हायकोर्टात दावा

सनातन आणि हिंदू जनजागृती समिती सारख्या कट्टर संस्था समाजासाठी घातक असल्याचा दावा सीबीआयने हायकोर्टात (Highcourt) केला आहे.  डॉ. दाभोळकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडे याच्या जामीनाला सीबीआयने विरोध केला आहे.  हिंदू विरोधी विचारसरणीच्या लोकांना हे कट्टरतावादी शत्रू समान मानून त्यांचा खातमा करणं हाच उपाय मानतात. वीरेंद्र तावडेंच्या जामीनासाठीच्या याचिकेवर हायकोर्टात लवकरच सुनावणी होणार आहे

गोव्यात पुन्हा एकदा कमळ फुलणार - नरेंद्र मोदी

गोव्यातील जनतेने गोल्डन भविष्यासाठी भाजपलाच निवडण्याचं ठरवलं आहे. प्रमोद सावंत यांच्या युवा नेतृत्त्वाखाली भाजप यश मिळवेल. असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात केलं आहे. 14 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा गोव्यात कमळ फुलवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान होईल. सर्व उमेदवारांना शुभेच्छा, असंही मोदी म्हणाले आहेत.

मणिपूर विधानसभेसाठी मतदानाच्या तारखा निवडणूक आयोगाने बदलल्या

manipur election 2022 : मणिपूर विधानसभेसाठी मतदानाच्या तारखा निवडणूक आयोगाने बदलल्या आहेत. मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 27 फेब्रुवारी ऐवजी आता 28 फेब्रुवारीला होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 3 मार्च ऐवजी 5 मार्चला होणार आहे. स्थानिक कारणांमुळे मतदानाची तारीख बदलत असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितले.  


 

Nana Patole : पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाने जाहीर माफी मागावी - पटोले

Nana Patole :  शिवरायांच्या महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाने जाहीर माफी मागावी, अन्यथा राज्यातील भाजपाचे नेते, खासदार, आमदार व केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर भाजपाला महाराष्ट्रद्रोही म्हणून काँग्रेस तीव्र आंदोलन करेल: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

Barshi fate scam : विशाल फटेच्या भावाला जामीन मंजूर

Barshi fate scam : बार्शीच्या विशाल फटे घोटाळ्याप्रकरणी विशाल फटेच्या भावाला जामीन मंजूर


विशालचा भाऊ वैभव अंबादास फटे याला जामीन मंजूर 


एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर 


बार्शी सत्र न्यायालयाने मंजूर केला जामीन 


आरोपी विशाल फटे याचे वकील विशालदीप बाबर यांची माहिती

Hijab Row : मालेगावमध्ये आज हिजाबसाठी महिलांचा मेळावा

मालेगावमध्ये आज हिजाबसाठी (Hijab Row)  महिलांचा मेळावा घेण्यात आला.  त्याला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती त्यामुळे या मेळाव्याचे आयोजकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता  आहे. 

Amravati News : मनपा आयुक्त शाईफेक प्रकरणी पाच जणांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

Amravati News : अमरवातीचे मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर झालेल्या शाइफेक प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने पाचही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हे पाचही जण युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते आहेत. याप्रकरणी आमदार रवी राणासह 11 जणांवर 307 कलम सहित विविध कलमं लावण्यात आली आहेत. या 11 पैकी 6 जणांना पोलिसांनी अटक केली असून एकजण रुग्णालयात दाखल आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे मुंबईत आगमन

Ramnath kovind maharashtra : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीसाठी आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष विमानाने सपत्नीक आगमन झाले.  महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यासह मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी आदींनी यावेळी राष्ट्रपतींचे स्वागत केले.

Hijab Controversy : पुढील निकालापर्यत धार्मिक पोशाख टाळावेत; हिजाब प्रकरणी कर्नाटक न्यायालयाचा निर्णय


हिजाब प्रकरणी कर्नाटकातील वातावरण तापलं असून हे प्रकरण आता न्यायालयात आहे.  या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार असून तोपर्यंत विद्यार्थ्यांनी धार्मिक पोशाख टाळावेत असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. 


 

वैद्यनाथ महाविद्यालयात नाट्यमय घडामोडी..

Beed Latest News : परळीतील जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ महाविद्यालयामध्ये मागच्या अनेक दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळतायेत. दोन दिवसापूर्वी पंकजा मुंडे यांच्या गटाने प्राचार्य वैधनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डी व्ही मेश्राम यांचे निलंबन केल्याचे जाहीर केले होते मात्र अशा प्रकारचे निलंबन करण्याचा अधिकार पंकजा मुंडे यांच्या गटाला नसल्याचा आरोप प्राचार्य डी व्ही मेश्राम यांनी केलाय.. विशेष म्हणजे प्राचार्य मेश्राम हे महाविद्यालयाचे नियमित कामकाज बघत आहे

Wardha HinganGhat Case : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोपी विकेश नगराळेला मरेपर्यंत जन्मठेप

Wardha News : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी (Wardha HinganGhat Case) आरोपी विकेश नगराळेला (Vikesh Nagrale) मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्यात आली आहे. विशेष सरकारी वकील उज्जल निकम यांनी ही माहिती दिली आहे.

Hinghanghat : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोपीला फाशी देण्याची सरकारी वकीलांची मागणी

राज्यात गाजलेल्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीला फाशी देण्याची मागणी सरकारी वकीलांनी केली आहे. 

Nanded News : नांदेडमध्ये हिजाब प्रकरणी युथ्स ब्रिगेडचं आंदोलन

Nanded News : कर्नाटकातील हिजाब प्रकरणावर (Karnatak Hijab Issue) संताप व्यक्त करत,आज नांदेड येथे मुस्लीम विद्यार्थिनीनी (Muslim Girls) आंदोलन केले आहे. कर्नाटकातील काही महाविद्यालयात व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणून मुस्लिम महिलांना धर्माचे पालन करण्यापासून अडवले जात असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलेल आहे.

ST Strike : मुंबईत आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बैठकीचा सिलसिला संपन्न

ST Strike : मुंबईत आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Employee)  बैठकीचा सिलसिला संपन्न. कर्मचाऱ्यांकडून संपावर मार्ग काढण्यासाठी मागील आठ  दिवसांपासून बैठकीचे खलबतं सुरू आहे.  उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही कर्मचाऱ्यांसोबत बैठक झाली. कर्मचाऱ्यांकडून संपाचा तिढा सुटावा म्हणून इतर काही मागण्या समोर ठेवण्यात आल्या असून  सरकारसोबत बातचीत करुन मार्ग काढण्यासाठी कर्मचारी तयार आहे. 

Nitesh Rane: मी न्यायालयाचे आभार मानतो, तपास कार्यात पोलिसांना मदत करणार: नितेश राणे

मला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, त्यामुळे मी न्यायालयाचे आभार मानतो. ज्यावेळी पोलिसांना गरज लागेल तर त्यावेळी मी तपासकार्यात त्यांना मदत करणार असल्याचं आमदार नितेश राणे म्हणाले. 

Palghar News Update :रुग्णवाहिकेने बाईकस्वारांना धडक, एकाचा जागीच मृत्यू

Palghar News Update : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या सेवेसाठी असलेल्या आयआरबी कंपनीच्या रुग्णवाहिकेने बाईकस्वारांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे . या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत . जखमींवर सध्या वापी येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे . विशेष म्हणजे धडक देऊन रुग्णवाहिकेचा चालक अपघातग्रस्तांना रुग्णालयात न दाखल करताच घटनास्थळावरून पसार झाला .  

Shina Bora Murder Case : शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील  मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीची जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

Shina Bora Murder Case : शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील  मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीची जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका


मुंबई उच्च न्यायालयानं इंद्राणीचा जामीन अर्ज फेटाळला होता


जामीन अर्जावर सोमवारी होणार सुनावणी

MNS Meeting : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात 


पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध समित्या तयार करण्यात आल्या असून समित्यांची घोषणा होणार 


बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमेय खोपकर, शिरीष सावंत, संदीप देशपांडे या प्रमुख नेत्यांची उपस्थिती, सोबतच मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

Maharashtra Nashik News : नाशिकच्या पवित्र रामकुंडात लतादीदींच्या अस्थींचं आदिनाथ मंगेशकरांच्या हस्ते विसर्जन; उषाताई मंगेशकरांसह मंगेशकर कुटुंबातील सदस्य उपस्थित 

Nashik News : नाशिकच्या पवित्र रामकुंडात लतादीदींच्या अस्थींचं विसर्जन; आदिनाथ मंगेशकरांच्या हस्ते विसर्जन ,उषाताई मंगेशकरांसह मंगेशकर कुटुंबातील सदस्य उपस्थित ,शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, लता दिदींचे चाहते मोठ्या संख्येने हजर

Maharashtra News : राज ठाकरेंच्या घरी शिवतीर्थावर बैठकीचे आयोजन




आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या घरी मुंबई आणि इतर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध समित्या तयार करण्यात आल्या आहे, ह्या समितीच्या अध्यक्षांची नावे घोषित केली जाणार आहेत,  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी शिवतीर्थावर सकाळी 10 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आलंय 

 

 



 


रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढावा समितीचा निर्णय आज जाहीर होणार




रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढावा समितीचा निर्णय आज जाहीर होणार,  रेपो रेट वाढवणार नसल्यानं व्याजदरात बदल होण्याची शक्यता कमी, त्यामुळे सामान्यांना दिलासा नाही , रिव्हर्स रेपो रेट वाढवला जाण्याची शक्यता, बॅंकांच्या हाती काही रक्कम राहू शकते, महागाई दर आणि वाढत्या कच्च तेलाच्या किंमती पाहता, देशांतर्गत चलनवाढीच्या स्थितीबाबत मध्यवर्ती बॅंकेच्या आकलनाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष 

 

 



 


पत्नीच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय लष्करी जवानाची आत्महत्या 

pune crime news : भारतीय सेना दलात भरती नर्सिंग असिस्टंट असणाऱ्या एका 24 वर्षीय तरूणाने पत्नीच्या व सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी त्रासाबाबतचा एक व्हिडीओच तयारकरून ठेवला असून, सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे. पोलीसांनी पत्नीसह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. गोरख नानाभाऊ शेलार (24, वानवडी) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी अश्विनी युवराज पाटील, युवराज पाटील, संगिता युवराज पाटील, योगेश पाटील, भाग्यश्री पाटील (सर्व रा. शहादा, जि. नंदूरबार) यांच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत केशव पाटील (शेलार) यांनी तक्रार दिली आहे. वानवडी पोलिस आता या संपूर्ण घटनेचा चौकशी करत आहे आणि आरोपींना लवकरच अटक केला जाईल..

भाजप नेते आणि खासदारांचे शिष्टमंडळ आज केंद्रीय गृहसचिवांची भेट घेणार

भाजप नेते आणि खासदारांचे शिष्टमंडळ आज केंद्रीय गृहसचिवांची भेट घेणार, कोविड सेंटर उभारणीतल्या घोटाळ्यांची चौकशी करा, किरीट सोमय्या यांच्या हल्ल्यावरील घटनांची चौकशी करा या मागणीसाठी भेट, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथोरिटी केंद्रीय गृह खात्यांतर्गत, त्यामुळे त्यांनी यात लक्ष घालण्याची मागणी, किरीट सोमय्या, गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, गिरीश बापट हे दहा वाजता केंद्रीय गृहसचिव यांना भेटणार

Maharashtra Kolhapur News : करूळ घाटात वाहतूक ठप्प, वाहनांच्या 5 किलोमीटरपर्यंत लांब रांगा

Kolhapur News : करूळ घाटात वाहतूक ठप्प, वाहनांच्या 5 किलोमीटरपर्यंत लांब रांगा, गेल्या तासाभरापासून वाहतूक ठप्प, घाटात मध्येच ट्रक बंद पडल्याने वाहतूक ठप्प, गगनबावडा आणि वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल, बंद पडलेल्या ट्रकला बाजूला करण्याचं काम सुरू

Amravati : मनपा आयुक्तांवरील शाईफेक प्रकरणी आमदार रवी राणा यांच्यासह 11 जणांवर कलम 307 चा गुन्हा दाखल,

मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या तक्रारी वरून शाईफेक करणाऱ्यांवर हत्येचा प्रयत्न करणारी कलम 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 11 जणांवर विविध कलम लावून गुन्हे दाखल करण्यात आला आहे. सहा जणांना  राजापेठ पोलीसांनी अटक केली आगे. 5 जणांचा शोध सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha

Wardha HinganGhat Case : फाशी की जन्मठेप? आज फैसला

Wardha HinganGhat Case Update : वर्ध्यातील हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून एका शिक्षिकेला जिवंत जाळण्यात आलेलं. हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी न्यायालय आज दोषी विकेश नगराळेला शिक्षा सुनावणार आहे. कालही या प्रकरणाची सुनावणी पार पडली. काल न्यायालयात विकेश नगराळेवरील गुन्हा सिद्ध झाला असून नगराळेला दोषी ठरवण्यात आलं आहे. आज दोन्ही पक्षांच्या युक्तीवादानंतर न्यायालय दोषीच्या शिक्षेवर निर्णय देणार असल्याची माहिती सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे. 


एकतर्फी प्रेमातून एका शिक्षिकेला जिवंत जाळण्यात आलेलं. त्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी पार पडली. कालच्या सुनावणीत आरोपीवरील गुन्हे सिद्ध झाले असून त्याला न्यायालयाच्या वतीनं दोषी ठरवण्यात आलं आहे. आज न्यायालय दोषी विकेश नगराळेला शिक्षा सुनावणार असून निकाल देणार आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Wardha HinganGhat Case : फाशी की जन्मठेप? हिंगणघाट जळीतकांड, दोषीच्या शिक्षेचा आज फैसला


Wardha HinganGhat Case Update : वर्ध्यातील हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून एका शिक्षिकेला जिवंत जाळण्यात आलेलं. हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी न्यायालय आज दोषी विकेश नगराळेला शिक्षा सुनावणार आहे. कालही या प्रकरणाची सुनावणी पार पडली. काल न्यायालयात विकेश नगराळेवरील गुन्हा सिद्ध झाला असून नगराळेला दोषी ठरवण्यात आलं आहे. आज दोन्ही पक्षांच्या युक्तीवादानंतर न्यायालय दोषीच्या शिक्षेवर निर्णय देणार असल्याची माहिती सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे. 


एकतर्फी प्रेमातून एका शिक्षिकेला जिवंत जाळण्यात आलेलं. त्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी पार पडली. कालच्या सुनावणीत आरोपीवरील गुन्हे सिद्ध झाले असून त्याला न्यायालयाच्या वतीनं दोषी ठरवण्यात आलं आहे. आज न्यायालय दोषी विकेश नगराळेला शिक्षा सुनावणार असून निकाल देणार आहे. 


3 फेब्रुवारी 2020 रोजी आरोपी विकेश नगराळेनं एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवलं होतं. 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यृ झाला होता. या गुन्ह्यात दोषी ठरलेल्या विकेशला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. या प्रकरणी 426 पानांचं दोषारोपपत्र, 64 सुनावणी, 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे, पीडित तरुणीच्या मृत्यूला 2 वर्ष पूर्ण होताना काल हा निकाल दिला जाणार होता. परंतु, आता दोषी विकेशच्या शिक्षेवर आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत सरकारनं विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वल निकमांची नियुक्ती केली होती.


विशेष म्हणजे, 29 साक्षीदारांपैकी एकही साक्षीदार फितूर झालेला नाही. त्यामुळे आरोपीचा दोष सिद्ध करण्याइतपत भक्कम पुरावे असून ते सरकारी पक्षाने न्यायालयापुढे सादर केल्याचे दीपक वैद्य म्हणाले होते. अखेर आज न्यायालयानं पुराव्यांच्या आधारे विकेश नगराळेला दोषी सिद्ध केलं. 


3 फेब्रुवारी 2020 रोजी हिंगणघाट येथे दोषी विकेश नगराळेनं एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिका तरुणीवर पेट्रोल टाकून पेटवलं होतं. यांत गंभीररित्या जखमी झालेल्या पीडित प्राध्यापिका तरुणीचा उपचारादरम्यान 10 फेब्रुवारी 2020 रोजी मृत्यू झाला होता. या जळीतकांड प्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. दोषी विकेश नगराळेविरोधात तब्बल 426 पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केलं होतं. या प्रकरणात आतापर्यंत 29 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. 


PM Modi Interview: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीतील महत्त्वाचे सात मुद्दे....


नवी दिल्ली: काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष असून त्यामुळे देशातील लोकशाहीला मोठा धोका असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थेला एक विशेष मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलत होते. 


पंतप्रधानांच्या मुलाखतीतील महत्त्वाचे सात मुद्दे


सर्व राज्यात भाजप निवडूण येणार
पाच राज्यांमध्ये भाजपचाच विजय होणार असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. आगामी निवडणुकीत आम्हाला पाच राज्यांत सेवा करण्याची संधी मिळेल. निवडणुकीच्या निमित्तानं सर्व राज्यांना पाहतोय. सर्व राज्यात मला  भाजपाची लाट आहे. भाजप प्रचंड बहुमताने निवडणूक जिंकेल असं ते म्हणाले.



मी पंतप्रधानांवर टीका केली होती, कोणाच्या आजोबांवर नाही


मी कोणाचेही वडील, आजोबा किंवा आईबाबत बोललेलो नाही. मी देशाच्या पंतप्रधानांबाबत बोललो होतो असा पलटवार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींच्यावर केला. त्यावेळच्या पंतप्रधानांचे काय विचार होते आणि आताच्या पंतप्रधानांचे काय विचार आहेत हे मी सांगितलं असं मोदी म्हणाले.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.