Maharashtra Breaking News LIVE Updates : रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी पुणे पोलिस उद्या नाना पटोले यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणार

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 May 2022 09:37 PM
रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी पुणे पोलिस उद्या नाना पटोले यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणार

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी पुणे पोलिस उद्या नाना पटोले यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणार आहे. पुणे पोलिस मुंबईत येऊन स्टेटमेंट रेकॉर्ड करणार आहे. काग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यांच्या सहकार्यांचा फोन टॅप करण्यात आला होता. अमजद खान नावाने नाना पटोले यांचा फोन टॅप करण्यांत आला होता.

Nashik News Update : ओझरच्या एअर फोर्सच्या भागात पेटला वनवा  

ओझरच्या एअर फोर्सच्या भागात वनवा पेटला आहे. वारा असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. नाशिक आणि परिसरातील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जवळच विमानतळ असल्यामुळे यंत्रणांची धावपळ उडाली आहे. 

Yavatmal News Update : यवतमाळमधील वणी येथे वरळी मटका अड्ड्यावर धाड ,  21 आरोपींसह 13 लाख 63 हजाराचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी वेषांतर करून यवतमाळमधील  वणी येथील सराईत गुन्हेगार मिनाज ग्यासुद्दीन शेख याच्या वरळी मटका अड्ड्यावर  धाड टाकली आहे.  यामधे तब्बल 21 आरोपींना अटक करण्यात आली असून 13 लाख 62 हजार 905 रुपये जप्त करण्यात आले आहेत.
घटनास्थळावरुन तीन लॅपटॉप, चार प्रिन्टर, 17  दुचाकी, 53 मोबाईल हॅण्डसेट असा 1362905  रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला. 


विशाल महिपतराव पिसे (वय 43), फरदीन अतिक अहेमद (वय 21), अनिकेत शिवा काकडे (वय 22), मोहन पांडुरंग काकडे (वय 23), ज्ञानदेव अनिल बावणे (वय 23), संजय शामराव ढुमणे (वय 37 रा. जैताई नगर, वणी ) राजेश विजय शिवरात्रीवार (वय 51), शेख साजिद शेख साबिर (वय 32) शेख युनुस शेख मुनाफ (वय 33) अनिल मधुकर लोणारे (वय 48) मुजिबुर हबिबुर रहेमान शेख (वय 38) रउफ हबिबुर रहेमान शेख ( वय 40) प्रणाल माधवराव पारखी (वय 28), गजानन वामनराव चित्तलवार (वय 52)दिपक गोविंदा पचारे ( वय 54) महेश गंगाधर टिपले (वय 47 ), दिलावर अकबर शेख ( वय 42) अतिक फहिम अहेमद (वय 45) सुरज भरत सातपुते( वय 27) सईद साबिर सईद सलाउद्दीन (वय 29) गौरव संतोष नागपुरे (वय 22 सर्व राहणार वणी )  अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.


 यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातून अवैद धंद्याचे उच्चाटन करण्याचे आदेश पारित करताच जिल्ह्यातील अनेक अवैध व्यवसायीकांनी आपले कारभार लगतच्या जिल्ह्यामध्ये हलविले होते.  पोलीस विविध बंदोबस्तामध्ये व्यस्त असल्याची संधी साधून वणी येथील सराईत गुन्हेगार मिनाज ग्यासुद्दीन शेख याने आपली वरळी मटक्याचे बस्तान परत जिल्ह्यामध्ये घेउन आल्याची गोपनिय माहीती पोलीस अधिक्षकांना मिळाली. माहितीची शहानिशा करुन कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. गोपनिय माहितीवरुन सायबर सलेचे अमोल पुरी व पथकाने वेशांतर करुन वणी शहरामध्ये प्रवेश करुन मिनाज ग्यासुद्दीन शेख याच्या वरली मटका जंत्रीवर कारवाई केली. 

Jalgaon News Update : महागाई विरोधात जळगाव युवा सेनेचे भोंगा वाजवत अनोखे आंदोलन

पेट्रोल व डिझेलचे भाव गगनाला भिडले असून सध्या  भोंग्यावरून जातीपातीचे राजकारण सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांचा जिव्हाळ्याचा विषय ऐरणीवर आला आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले असून सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न बाजूला ठेवून राज्यात भोंग्यावरून राजकारण सुरू असून आज वाढत्या महागाई विरोधात  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाजाची ऑडीओ क्लिप वाजवत वाढत्या महागाई विरोधात युवसेनेतर्फे केंद्र सरकारविरोधात भोंगा वाजवून आंदोलन करण्यात आले.   

राज्यात अशांतता निर्माण करण्याचा काही जणांचा प्रयत्न : गृहमंत्री वळसे पाटील

राज्यात अशांतता निर्माण करण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत. मात्र पोलीसांकडून योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळली जात असल्याचे गृहमंत्री वळसे पाटील म्हटले आहे. 

मुंबई उच्च न्यायालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सदिच्छा भेट

मुंबई उच्च न्यायालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सदिच्छा भेट देणार आहे.  सायंकाळी 5 वाजता मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना भेटण्यासाठी हायकोर्टात येणार आहे. 

Navi Mumbai Fire : पावणे एमआयडीसीतील वेस्ट क्लाय पॉलिकॅब कंपनीला भीषण आग

Navi Mumbai Fire : पावणे एमआयडीसी मध्ये कंपनीला भीषण आग लागली आहे. वेस्ट क्लाय पॉलिकॅब या  रासायनिक कंपनीला आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच पाच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.  कंपनीमध्ये काही कामगार अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. 

ओबीसी आरक्षणाबाबत मध्य प्रदेश सरकारचा रिपोर्ट सुप्रीम कोर्ट मान्य करणार का? याचा फैसला आता मंगळवारी

ओबीसी आरक्षणाबाबत मध्य प्रदेश सरकारचा रिपोर्ट सुप्रीम कोर्ट मान्य करणार का याचा फैसला आता मंगळवारी होणार आहे. महाराष्ट्रातल्या ओबीसी आरक्षणाच्या दृष्टीने देखील हा दिवस आणि निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. आजच्या सुनावणीत मध्यप्रदेश सरकार ट्रिपल टेस्टच्या निकषांसह रिपोर्ट पूर्ण करण्यासाठी अधिकचा वेळ कोर्टाकडे मागत होतंय मध्य प्रदेश सरकारला हा अधिकचा वेळ मिळणार का, की तिथेही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकांचे आदेश कोर्ट देणार याचा फैसला मंगळवारी होणार आहे.

पालिका आणि नगरपालिका निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रचना योग्यच - हायकोर्ट

पालिका आणि नगरपालिका निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रचना योग्यच - हायकोर्ट


राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली


तन्मय कानेटकर आणि मारूती भापकर यांनी दाखल केल्या होत्या दोन स्वतंत्र याचिका

Amravati News : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात काँग्रेस प्रणित एनएसयुआयचे आंदोलन

Amravati News : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात काँग्रेस प्रणित एनएसयुआयचे आंदोलन..


उन्हाळी परीक्षा ऑनलाइन घेण्याची मागणी..


एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची मुलगी आकांशा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन..


विद्यापीठाविरोधात जोरदार घोषणाबाजी..पोलिसांसोबत बाचाबाची..


विद्यापिठाच्या गेटवर फेकले पत्रक...

ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर भाजपच्या ओबीसी मोर्चाची कार्यकारणीची बैठक उद्या

ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर भाजपच्या ओबीसी मोर्चाची कार्यकारणीची बैठक उद्या वसंत स्मृती दादर येथे होणार आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. या संदर्भात ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी नवनाथ बन यांनी.


योगेश टिळेकर नेमकं काय म्हणाले...

हे सरकार ओबीसीच्या आरक्षणाच्या मुळावर उठलं आहे


सरकारच्या विरोधात आंदोलन आणि धोरण ठरविण्यासाठी उद्याची बैठक आहे


ओबीसींचे नेतृत्व तयार होऊ नये ही राज्य सरकारची भूमिका दिसत आहे


राज्य सरकारने तातडीने फेरविचार याचिका दाखल करावी


मध्यप्रदेश मध्ये इंपरिकल डाटा जमा करण्यात येत आहे महाराष्ट्रातही त्याचप्रमाणे आयोगाने तातडीने डाटा जमा करावा


राज्याचा आयोग वेळकाढूपणा करत आहे


जोपर्यंत आरक्षण निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये


गरज पडली तर निवडणुकीवर बहिष्कार घालायचा का याबद्दलही उद्या चर्चा करू

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणासाठी समर्पित आयोगासमोर राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी मांडली भूमिका

मुंबई, : राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व परिणामांची समकालीन अनुभवधिष्ठीत सखोल चौकशी करण्यासाठी समर्पित आयोग स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने दि. 11 मार्च 2022 रोजीच्या अधिसूचनेद्वारे “महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरीकांच्या मागास प्रवर्गास आरक्षणासाठी समर्पित आयोग”गठीत  केला आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या  निर्देशानुसार या आयोगाच्या कार्यकक्षेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व परिणामांची समकालीन अनुभवधिष्ठीत सखोल चौकशी करण्यासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षाकडून अभिवेदन / सूचना मागविण्यात आल्या आहेत. या बरोबर दिनांक 28 एप्रिल 2022 रोजीच्या पत्रान्वये मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे मत आयोगासमोर मांडण्यासाठी गुरूवार, दिनांक 5 मे 2022 रोजी उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले होते.


त्यानुसार  कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, भारतीय जनता पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्स्कवादी), राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, जनता दल (सेक्युलर), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी आणि आम आदमी पार्टी अशा 10 राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून त्यांच्या पक्षाची वरील बाबीवर भुमिका आयोगासमोर मांडली आणि लेखी निवेदनही सादर केले आहे. या सर्व पक्षांच्या निवेदनाची योग्य ती दखल आयोग घेत आहे, अशी माहिती या समर्पित आयोगाच्या सदस्य सचिवांनी दिली आहे.

Nagpur Crime News : इन्शुरन्स क्लेमसाठी नागपूर-रायपूर मार्गावर ट्रक पेटवून दिला, चालक भांडाफोड करेल या भीतीपोटी केली हत्या

Nagpur Crime News : नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी शिवारामध्ये चार दिवस आधी एका अनोळखी तरुणाची हत्या करून मृतदेह फेकून देण्यात आला होता. नागपूर ग्रामीण पोलिसांना त्या प्रकरणाचा उलघडा करण्यात यश आले. ट्रक मालकाने ट्रकमधील 25 टन लोखंड विकून इन्शुरन्स क्लेमसाठी नागपूर-रायपूर मार्गावर ट्रक पेटवून दिला. मात्र चालक याचा भांडाफोड करेल या भीती पोटी ट्रक मालक संजय परधीने आपल्या मित्रांच्या मदतीने ट्रक चालक नितीन सेलोकरची हत्या केली व मृतदेह पारशिवनी शिवारात फेकून दिला. नागपूर ग्रामीण पोलिसांनी गुप्तहेरांच्या मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करत तीन आरोपींना अटक केली.

BJP MNS Agitation : औरंगाबादमध्ये पाण्यासाठी आंदोलन, भाजप आणि मनसे एकत्र 

BJP MNS Agitation : पाण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनात औरंगाबादमध्ये आज पहिल्यांदाच भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आले. शहरातील सिडको आणि हाडकोतील नागरिकांनी महापालिका पाणीपुरवठ्याच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात दोन्ही पक्ष एकत्र आले. भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय केनेकर आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

Hubali News : हुबळी येथे गुरुवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे टेबल,खुर्च्या अक्षरशः उडून गेल्या
जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे हुबळी आणि परिसरातील नागरिकांची दाणादाण उडाली.संध्याकाळी अचानक पावसाला सुरुवात झाली आणि जोरदार वारे वाहू लागले.वाऱ्यामुळे जनतेत घबराट निर्माण झाली.जोरदार पाऊस आणि वेगाने वाहणारे वारे यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले.जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू कागदा प्रमाणे उडून गेल्या.विमानतळाच्या परिसरातील एका कोल्डड्रिंक शॉप समोरील कचऱ्याचा डब्बा उडून गेला.याशिवाय दुकानातील खुर्च्या, टेबल देखील उडून गेली.वाऱ्याचा जबरदस्त वेग असल्यामुळे दुकान मालक हतबल होवून वाऱ्यामुळे उडून जाणारे खुर्ची,टेबल पाहत बसण्या खेरीज काही करू शकले नाहीत.
Chandrapur News : डांबरी रस्ता स्थानिकांनी हाताने काढला खोदून 
चंद्रपूर जिल्ह्यातील जीवती तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तयार करण्यात येत असलेला एक रस्ता किती निकृष्ट दर्जाचा आहे याची स्थानिक नागरिकांनी पोलखोल केली आहे. कुंभेझरी-नारायणगुडा हा 3 किलोमीटर चा डांबरी रस्ता स्थानिकांनी हाताने खोदून काढला आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. समाजमाध्यमात रस्ता हाताने वेगळा काढला जात असल्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. त्यामुळे हा रस्ता आहे की डांबरी कारपेट असा प्रश्न उपस्थित झालाय. वर्षभरापूर्वी सुरू झालेले रस्त्याचे बांधकाम अद्याप सुरूच असून कंत्राटदार पावसाळ्याच्या तोंडावर घाईघाईने केवळ डांबर अंथरत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. त्यामुळे नागरिकांनी दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

 
Sangola News : महूद येथे चोरट्यांचा बिअरबारवर पाचव्यांदा डल्ला, एक लाख रूपयांची दारू केली लंपास
सांगोला तालुक्यातील महूद येथील अशोक येडगे यांच्या मालकीच्या परमिट रूम आणि बिअर बार हाॅटेलचे  शटर उचकटून  अज्ञात चोरट्यांनी विविध कंपन्यांची सुमारे एक लाख रुपये किंमतीची दारू पळवली आहे .  आज पहाटेच्या सुमारास चोरटयांनी दारूवर हात साफ केला आहे .  चोरट्यांचे हे बहुदा आवडीचे दारू दुकान असून यापूर्वी चार वेळा चोरटयांनी याच दारू दुकानात हात साफ कइले आहेत . आज पहाटे पाचव्यांदा याच दुकानात चोरटयांनी पुन्हा दारू पळविली आहे .  या प्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. महूद परिसरात  चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकात भीतीचे वातावरण असून आता दारूची चोरी रोखण्यासाठी काय करावे हा प्रश्न अशोक परमिट रूमचे मालक अशोक येडगे याना पडला आहे . 
Mumbai News : राजकीय आणि सामाजिक गुन्हे मागे घेण्यासंदर्भात गृहमंत्र्यांनी बोलावली बैठक, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी राहणार उपस्थित

राजकीय आणि सामाजिक गुन्हे मागे घेण्यासंदर्भात गृहमंत्र्यांनी बोलावली बैठक, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी राहणार उपस्थित


मागील मंत्रीमंडळ बैठकीत हा प्रस्ताव आला होता मात्र काही मंत्र्यांच्या विरोधामुळे ही निर्णय होऊ शकला नाही


हे गुन्हे मागे घेण्याचा अधिकार स्थानिक जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकारी यांना देण्याचा निर्णय होता


मात्र या निर्णयाला काही मंत्र्यांनी विरोध करत ही निर्णय मंत्रांच्या पातळीवर झाला पाहिजे अशी मागणी केली होती


स्थानिक पातळीवर दबाव आणुन गुन्हे मागे घेतले जाऊ शकतात त्यामुळे मंत्र्यांच्या पातळीवर निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली होती


त्यानंतर आज राज्यातील सर्व गुन्ह्यांची आकडेवारी घेत चर्चा केली जाईल त्यांनतर ही निर्णय पुन्हा मंत्रीमंडळ बैठकीत आणला जाईल

CM Uddhav Thackeray LIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह; राजर्षि शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष कार्यक्रम लाईव्ह

CM Uddhav Thackeray LIVE :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह; राजर्षि शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष कार्यक्रम लाईव्ह



 


चंदेरी गडावरुन खाली कोसळला तरुण, 22 तासांनंतर सुखरुप सुटका, पोलीस यंत्रणेची मदत नाहीच

बदलापूर जवळील चंदेरी गडावरून ट्रेकिंगसाठी आलेला एक तरुण खाली कोसळला. या अपघातात हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला तब्बल 22 तास रेस्क्यु ऑपरेशन करून बाहेर काढण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये शेवटपर्यंत पोलीस यंत्रणा आणि अग्निशमन दलाची मदत मिळली नाही. विराज म्हस्के असं गडावरून खाली कोसळलेल्या तरुणाचं नाव आहे. विराज हा मुलुंड येथील रहिवासी आहे. बुधवारी तो ट्रेकिंगसाठी तो चंदेरी गडावर आला होता. विराजसोबत त्याचे इतर सात मित्र ट्रेकिंगला आले होते. परंतु या तरुणांना चंदेरी गडाची माहिती नसल्याने ते तरुण भरकटले आणि अंदाज न आल्याने विराज गडावरून खाली कोसळला. याची माहिती नेचर एक्सप्लोरर रेस्क्यू टीमला मिळाली, तात्काळ रेस्क्यू टीम चे 20 हून अधिक सदस्य गडावर पोहचले आणि 22 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर विराजला बदलापुरच्या चिंचवली गावामार्गे रेस्क्यू करून बाहेर काढलं. 

वसईत पापडी तलावाचा गेट अंगावर पडून चार वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Vasai News : वसई पश्चिमेकडील पापडी तलावाचा गेट अंगावर पडून एका चार वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भूमिका मेहरे असं तिचं नाव आहे. काल संध्याकाळच्या सुमारास तलावाजवळ खेळत होती, त्यावेळी ती गेटचा आधार घेऊन उभी होती. इतक्यात अचानक गेट तिच्या अंगावर पडला आणि त्यात ती गंभीर जखमी झाली. तिथल्या नागरिकांनी तिला तात्काळ पालिकेच्या रुग्णालयात नेलं, मात्र तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या पापडी तलावाचे काम पूर्ण झालं आहे. मात्र ठेकेदाराने गेट व्यवस्थित ठेवले नसल्याने ही दुर्घटना झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित मुलीच्या पालकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.



'एबीपी माझा'च्या बातमीची गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून दखल, इस्लाम धर्माचे अभ्यासक अब्दुल कादिर मुकादम यांच्याशी संपर्क साधणार

'एबीपी माझा'च्या बातमीची गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून दखल


भोंग्याच्या प्रश्नांवर कायम स्वरूपी उपाय सुचवणाऱ्या इस्लाम धर्माचे अभ्यासक अब्दुल कादिर मुकादम यांच्याशी संपर्क साधणार


अब्दुल मुकादम यांनी मुस्लिम बांधवांना अजान साठी सुचवला लोकल रेडिओ स्टेशनचा पर्याय


लोकल रेडिओच्या माध्यमातुन मुस्लिम बांधवांना घरीच नमाज पठण करता येणार


लोकल रेडिओ स्टेशनच्या पर्यायाचं गृहमंत्र्यांकडून स्वागत

चैन खेचल्याने एक्स्प्रेस पुलावर थांबली; लोको पायलटनं जीव धोक्यात घालून ब्रेकचा खटका काढला अन्...

चैन खेचल्याने एक्स्प्रेस पुलावर थांबली; लोको पायलटनं जीव धोक्यात घालून ब्रेकचा खटका काढला अन्...

ही सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

https://marathi.abplive.com/news/mumbai/loco-pilot-taking-risk-to-reset-alarm-chain-of-train-godan-express-halted-over-river-bridge-between-titwala-and-khadavli-stations-1056724 

Navneet Rana Latest News : राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं, मुंबई सत्र न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं

Navneet Rana : राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं, मुंबई सत्र न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं

सविस्तर बातमी वाचा- https://marathi.abplive.com/news/politics/maharashtra-marathi-political-news-mumbai-sessions-court-slams-state-government-says-wrong-to-file-sedition-case-against-rana-couple-1056714 

मुंबईत छत्रपती शाहू महाराज यांचे स्मारक व्हावं : संभाजीराजे

छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकासाठी केवळ राज्य सरकारनेच नाहीतर केंद्र सरकारने देखील निधी द्यायला पाहिजे असे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईत देखील शाहू महाराज यांचे स्मारक बांधले पाहिजे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जसे मुंबईत स्मारक आहे, तसे शाहू महाराज यांचे स्मारक व्हावे असेही संभाजीराजे म्हणाले.

Vasai News Updates : वसईमध्ये पापडी तलावाचा गेट अंगावर पडून एका 4 वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू

Vasai News Updates : वसई पश्चिमेकडील पापडी तलावाचा गेट अंगावर पडून एका 4 वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  भूमिका मेहरे असं तिचं नाव आहे. काल संध्याकाळच्या सुमारास तलावाजवळ खेळत होती. त्यावेळी तिने गेटचा आधार घेवून उभी होती. इतक्यात अचानक गेट तिच्या अंगावर पडला आणि त्यात ती गंभीर जखमी झाली. तेथील नागरिकांनी तिला तत्काळ पालिकेच्या रुग्णालयात नेल मात्र तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या पापडी तलावाचे काम पूर्ण झाले आहे.  मात्र ठेकेदाराने गेट व्यवस्थित ठेवले नसल्याने ही दुर्घटना झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सदर मुलीच्या पालकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.

नाशिक महापालिकेतील 800 कोटी रुपयांच्या भूसंपादन प्रकरणाची होणार चौकशी

नाशिक महापालिकेतील 800 कोटी रुपयांच्या भूसंपादन प्रकरणाची चौकशी होणार आहे. भूसंपादन प्रकणाची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.  पुणे नगररचना संचालक चौकशी करणार आहे. त्यामुळे मनपावर 5 वर्ष सत्ता गाजविणाऱ्या भाजपच्या अडचणी वाढणार आहेत. सात दिवसात चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भूसंपादन प्रक्रियेत अनियमितता झाल्याची तक्रार  पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मागील महिन्यात भुजबळ यांनी  महापालिकेच्या कामकाजाचा आढावा देखील घेतला होता.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात परळी बीड कोर्टाचं अजामीनपात्र वॉरंट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात परळी बीड कोर्टाचं अजामीन वॉरंट


सांगली शिराळा कोर्टानंतर आता परळी बीड कोर्टाचं देखील अजामीन पत्र वॉरंट


मराठी पाट्या आणि मराठी मुद्द्यावर आंदोलन केल्यानंतर बळजबरी दुकाने बंद करणे, दुकाने बंद करण्यास दुकानदारांना भाग पाडणे याप्रकरणी गुन्हा दाखल


परळी कोर्टाकडून मुंबई पोलीसांना पत्र, पोलीस कारवाई करण्याची शक्यता- सुत्र

अहमदनगर येथे भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू तर 4 गंभीर जखमी

अहमदनगर येथे नागपूर - मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. कोपरगाव तालुक्यातील डाऊच शिवारात कंटेनरची रिक्षाला धडक बसल्यानं अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 4 गंभीर जखमी आहेत. जखमींवर जनार्दन स्वामी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये 2 महाविद्यालयीन विद्यार्थिनी, 2 महिला आणि 2 पुरूषांचा समावेश आहे. 






 

संभाजीराजे छत्रपतींचे अखेर ठरलं! 12 मे ला पुढची भूमिका जाहीर करणार

संभाजीराजे छत्रपती हे येत्या 12 मे ला आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. पुण्यात ते आपला पुढील भूमिका जाहीर करणार आहेत. संभाजीराजे पक्ष प्रवेशाऐवजी एकला चलो रे च्या भूमिकेत राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, संभाजीराजे नेमकी काय भूमिका घेणार हे 12 मे च्या दिवशीच समजणार आहे. मात्र, त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मनसेने परप्रांतीयांबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी : सचिन अहिर

मनसेने आता परप्रांतीयांबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी केले. कायदा हा सर्वांसाठी समान आहे. राणा दाम्पत्य असेल अथवा अन्य कोणी असेल त्या सर्वांना कायदा लागू होतोच. तेव्हा कोणी चूक केल्यास कारवाई होणारच असल्याचे  सचिन अहिर म्हणाले. शिर्डीत आरतीसाठी मुस्लिम बांधव समोर आले, यातून सर्व-धर्म समभावाची भावना दिसते. हे राज्यभर दिसेलच. पहिले त्यांचे भोंगे काढा मग आम्ही भोंगे काढू, असं होणार नाही. सर्वांना समान कायदा लागू होईल असेही अहिर म्हणाले.

Navneet Rana vs Shivsena : राणा दांपत्याविरोधात राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही; राणा दांपत्याला जामीन देताना मुंबई सत्र न्यायालयाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण

Navneet Rana : राणा दांपत्याविरोधात राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही; राणा दांपत्याला जामीन देताना मुंबई सत्र न्यायालयाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण

Navneet Rana News : आज सकाळी 11.30 वाजता नवनीत राणांचं पुन्हा लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून चेकअप

आज सकाळी साडे 11 वाजता पुन्हा एकदा नवनीत राणांचं लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून चेकअप होईल


त्यानंतर लीलावती रुग्णालयात नवनीत राणा यांना आणखी काही दिवस ठेवायचं की डिस्चार्ज द्यायचा ? याबद्दल डॉक्टर ठरवतील


तर दुसरीकडे रवी राणांच्या खारमधील घराच्या तपासणीकरता बीएमसीकडे रवी राणांकडून २-३ दिवसांचा अवधी मागण्यात आलाय...  


तपासणीकरता बीएमसी पथकाला सहकार्य करु  असे बीएमसीला कळवलेले आहे...


२-३ दिवसांचा अवधी देण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले असून, त्यानंतर पुन्हा एक नोटीस बीएमसीकडून  रवी राणांच्या घराला दिली जाईल...


पुढील तारखेच्या तपासणीवेळी  राणा कुटुंबातील प्रतिनीधी, वकील, किंवा आर्किटेक्ट उपस्थित राहू शकतात

खासदार नवनीत राणा दिल्लीला जाण्याची शक्यता

खासदार नवनीत राणा लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर पती आमदा रवी राणा यांच्यासोबत थेट दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्लीला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांना भेटण्याची शक्यता आहे. खासदार नवनीत राणा यांनी मुंबईच्या पोलीस स्टेशनमध्ये पाणी सुद्धा दिलं नाही आणि बाथरूम सुद्धा वापरू दिलं नाही, अशी तक्रार लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे केली होती. त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर टाकून आरोप फेटाळले. पण आता खासदार नवनीत राणा या स्वतः लोकसभा अध्यक्षांना भेटून आपबिती सांगतील अशी माहिती समोर येत आहे.

संभाजीराजे छत्रपती यांचं अखेर ठरलं, 12 मे रोजी पुण्यात पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार

Kolhapur News : संभाजीराजे छत्रपती यांचं अखेर ठरलं. 12 मे रोजी पुण्यात पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. संभाजी राजे पक्षप्रवेशाऐवजी एकला चलो रे च्या भूमिकेत राहण्याची शक्यता आहे. संभाजीराजे काय भूमिका जाहीर करणार याकडे लक्ष लागलं आहे.

कोल्हापूर : संभाजी राजे छत्रपतींचं अखेर ठरलं, 12 मे रोजी पुण्यात पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार

कोल्हापूर : संभाजी राजे छत्रपतींचं अखेर ठरलं, 12 मे रोजी पुण्यात पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार, संभाजी राजे पक्षप्रवेशा ऐवजी एकला चलो रेच्या भूमिकेत राहण्याची शक्यता, संभाजीराजे काय भूमिका जाहीर करणार याकडे लागल लक्ष्य

Ahmednagar News : छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन 

Ahmednagar : राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी निमित्ताने अहमदनगर येथे छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे, 100 सेकंद स्तब्ध उभे राहत राजर्षी शाहू महाराजांना
अभिवादन करण्यात आले...राज्यात विविध ठिकाणी सकाळी 10 वाजता राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी निमित्ताने 100 सेकंद स्तब्ध उभे राहून महाराजांना अभिवादन करण्यात आवाहन करण्यात आलं होतं..स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी निमित्ताने स्मारक परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे...संध्याकाळी 4 वाजता राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य या विषयावर परिसंवाद देखील आयोजित करण्यात आला आहे...

राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्ताने सोलापुरात अभिवादन

 राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्ताने सोलापुरात देखील अभिवादन करण्यात आले. सकाळी बरोबर 10 वाजता 100 सेकंद स्थब्ध राहून सोलापुरातील विविध संघटनानी शाहू महाराजांना अभिवादन केले. यायेवेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. सोलापुतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हा अभिवादन कार्यक्रम पार पडला. राजश्री शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज कोल्हापुरात 100 सेकंद स्थब्द राहून अभिवादन करण्यात येत आहे. सोलापुरात देखील याच पद्धतीने अभिवादन करण्यात आले. विशेष म्हणजे या वेंळी सर्व संघटनानी एकत्रित येत महाराजांना अभिवादन केले.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा नातेवाईक असल्याचे सांगत अनेकांना गंडा, सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत अनेकांना लुटलं 

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा नातेवाईक असल्याचे सांगत अनेकांना गंडा, सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत अनेकांना लुटलं 


दादर पोलिसांकडून संदीप राऊत नावाच्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल, ऊर्जा खात्यात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून लोकांना गंडा


संदीप राऊत ह्या व्यक्तीनं ११ जणांची फसवणूक केल्याचं समोर 


ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा पुतण्या असल्याचे सांगून फसवणूक केल्याचं समोर


सध्या दादर पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती


9 लाखांच्या जवळपास फसवणूक केल्याचं समोर 


फसवणूक झालेल्यांपैकीच एका जण  तक्रारदार असल्याची पोलिसांची माहिती

Sandeep Deshpande : मनसे नेता संदीप देशपांडेंच्या ड्रायव्हरला अटक, शिवाजी पार्क पोलिसांनी घेतलं ताब्यात, संदीप देशपांडे आणि संतोष धुरी अद्याप फरार 

Sandeep Deshpande : मनसे नेता संदीप देशपांडेंच्या ड्रायव्हरला अटक, शिवाजी पार्क पोलिसांनी घेतलं ताब्यात, संदीप देशपांडे आणि संतोष धुरी अद्याप फरार 

Amravati News Update : डिस्चार्ज झाल्याबरोबर रवी राणा आणि नवनीत राणा अमरावतीला न येता थेट दिल्लीला जाण्याची शक्यता...

Amravati News Update : खासदार नवनीत राणा यांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याबरोबर रवी राणा आणि नवनीत राणा अमरावती न येता थेट दिल्लीला जाण्याची शक्यता...


दिल्लीला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांना भेटण्याची शक्यता...


खासदार नवनीत राणा यांनी मुंबईच्या पोलीस स्टेशनमध्ये पाणी सुद्धा दिलं नाही आणि बाथरूम सुद्धा वापरू दिलं नाही अशी तक्रार लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे केली होती. त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर टाकून आरोप फेटाळले पण आता खासदार नवनीत राणा या स्वतः लोकसभा अध्यक्षांना भेटून आपबिती सांगतील अशी माहिती मिळतेय

Kolhapur Live : अनोख्या पद्धतीनं लोकराजा राजर्षि शाहू महाराजांना अभिवादन, 100 सेकंद स्तब्ध राहून कृतज्ञता

Kolhapur Live : अनोख्या पद्धतीनं लोकराजा राजर्षि शाहू महाराजांना अभिवादन, 100 सेकंद स्तब्ध राहून कृतज्ञता https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA 

Ratnagiri Chiplun News : तिवरे धरण दुर्घटनेत घरे वाहून गेल्यानंतर तयार करण्यात आलेल्या पुनर्वसन यादीत चक्क जिवंत असलेल्या तिघांची मृत म्हणून नोंद करण्यात आली.. प्रशासनाचा अजब कारभार

Ratnagiri Chiplun News : तिवरे धरण दुर्घटनेत घरे वाहून गेल्यानंतर तयार करण्यात आलेल्या पुनर्वसन यादीत चक्क जिवंत असलेल्या तिघांची मृत म्हणून नोंद करण्यात आली.. प्रशासनाचा अजब कारभार.. 


चिपळूण प्रांताधिकारी यांनी दिले चौकशीचे आदेश..

राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता कार्यक्रमाकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची पाठ 

राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता कार्यक्रमाकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची पाठ 


शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील अशी होती कोल्हापूरकरांची अपेक्षा


शंभर सेकंद स्तब्ध राहिल्यानंतर होणाऱ्या सभेत ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नातू आणि अमित ठाकरे यांच्या चिरंजीवाच्या  नामकरणाचा आज शिवतीर्थावर कार्यक्रम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नातू आणि अमित ठाकरे यांच्या चिरंजीवाच्या  नामकरणाचा आज शिवतीर्थावर कार्यक्रम, कौटुंबिक मित्र आणि नातेवाईक यांच्या उपस्थितीत नामकरणाचा कार्यक्रम, दुपारच्या दरम्यान शिवतीर्थवर कार्यक्रम, शिवतीर्थ निवासस्थानी फुलांची सजावट करण्यात आलीय, राज ठाकरे यांच्या नातवाचे नाव काय असणार?

अहमदनगर-अतिरिक्त ऊस गाळपाची जबाबदारी शेजारील कारखान्यांवर, जिल्हाधिकारी साखर आयुक्तांना प्रस्ताव सादर करणार.
अहमदनगर-अतिरिक्त ऊस गाळपाची जबाबदारी शेजारील कारखान्यांवर, जिल्हाधिकारी साखर आयुक्तांना प्रस्ताव सादर करणार.

 
Nanded Crime : थरार...! पिस्तुल हिसकावून पोलिसावरच गोळीबार, कुख्यात बिगाणिया गँगच्या सदस्याच्या मुसक्या आवळल्या

Nanded Crime : थरार...! पिस्तुल हिसकावून पोलिसावरच गोळीबार, कुख्यात बिगाणिया गँगच्या सदस्याच्या मुसक्या आवळल्या 

https://marathi.abplive.com/crime/nanded-crime-snatched-a-pistol-and-fired-at-the-police-bigania-gang-member-arrested-1056646 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


मुंबई :  आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी.. पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..


राज ठाकरेंविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, आज सुनावणीची शक्यता


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना राज्यातील विविध मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याची तसेच मशिदींवरील भोंग्याबाबत चिथावणीखोर वक्तव्य करून महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या याचिकेतून राज ठाकरे यांच्यावर करण्यात आलाय. इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी त्यांचे वकील आर. एन. कछवे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. यावर शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे


कोरेगाव भीमा प्रकरणी फडणवीस सरकार संशयाच्या भोवऱ्यात


कोरेगाव भीमा घटनेला तत्कालीन सरकार जबाबदार होते असा गंभीर आरोप तत्कालीन फडणवीस सरकार वर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. काल भीमा कोरेगाव आयोगासमोरं शरद पवार यांनी जबाब देताना सदर बाब नमूद केली आहे. तसेच ही संपुर्ण घटना वेळीच थांबवता आली असती. परंतु, तत्कालीन सरकारनं तसं केलं नाही असं देखील पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता तत्कालीन फडणवीस सरकार संशयाच्या भोवऱ्यात येऊन उभं राहिलं आहे


राणा दाम्पत्याचा मुंबईतला मुक्काम वाढणार? 


भायखळा कारागृहात प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नवनीत राणा यांची तब्येत खालावली असल्याचा आरोप करण्यात येतोय. नवनीत राणा यांची आज कारागृहातून सुटका झाली. मात्र, नवनीत राणा यांची तब्येत खालावली असून त्यांना लीलावती रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलंय. त्यामुळे,
जोपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळत नाही तोपर्यंत राणा दांपत्य मुंबईतच थांबणार आहे 


मुंबईतील 26/11 हल्ल्याचा दहशतवादी कसाबला आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली  


तब्बल चार वर्षांनंतर 26/11 मुंबईवरील हल्ल्याचा आरोपी पाकिस्तानचा दहशतवादी अजमल आमीर कसाब याला आज पुण्याच्या येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली. 'ऑपरेशन एक्स' अंतर्गत कसाबच्या फाशीची शिक्षा पूर्ण झाली. 6 मे 2010 रोजी  कसाबला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती


हरियाणातल्या करनाल जिल्ह्यातील चार संशयित दहशतवाद्यांचे नांदेड कनेक्शन उजेडात


हरियाणातल्या करनाल जिल्ह्यातील चार संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलंय. या चारही संशयितांचं नांदेड कनेक्शन असल्याचं उघड झालंय या चौघांना नांदेड जिल्ह्यात येण्यापूर्वी ताब्यात घेण्यात आलंय. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांकडून स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत.


केदरनाथचे  दरवाजे आज भाविकांसाठी खुले होणार


बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक, पंचकेदार व छोटा धाम या अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्रांपैकी केदारनाथ एक मानले जाते. बाबा केदारनाथ (Kedarnath) मंदिराचे दरवाजे सहा महिन्यांनंतर सोमवारी पहाटे 6.15 वाजता उघडणार आहे. 


योगी आदित्यनाथ अयोध्या दौऱ्यावर


उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्या दौऱ्यावर आहे. अयोध्येमध्ये  हनुमानगढी आणि राममंदिराला भेट देणार आहेत


मुंबई आत्मसन्मानासाठी खेळणार, गुजरातसोबत लढत


GT vs MI : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) यंदाच्या हंगामातील टेबल टॉपर असणारा गुजरात टायटन्सचा संघ मैदानात उतरणार आहे. त्यांच्यासमोर तळाशी असणाऱ्या मुंबई इंडियन्सचे (Gujrat Titans vs Mumbai Indians) आव्हान असणार आहे. मुंबई गुणतालिकेत सर्वात खाली असून त्यांनी 9 पैकी तब्बल 8 सामने गमावले आहेत. तर गुजरातने मात्र 10 पैकी 8 सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे. गुजरात संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली असली तरी मागील सामन्यात पंजाबने त्यांना मात दिली. दुसरीकडे मुंबईने सलग 8 सामने गमावल्यानंतर मागील सामन्यात दमदार राजस्थान संघाला मात दिली. त्यामुळे गुजरातला आज मुंबईचं आव्हान अवघड पडू शकतं.


आज इतिहासात



  • 1589 - गायक तानसेन यांचे निधन

  • 1861 - मोतीलाल नेहरू यांचा जन्म

  • 1944 - महात्मा गांधी यांची पुण्यातील आगाखान पॅलेसमधून सुटका झाली. हा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा तुरुंगवास होता


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.