Latur Rain Update : लातूर जिल्ह्यात कालपासून पावसाची (Rain) संततधार सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. लातूर उदगीर मार्गाचे (Udgir Road) काम सध्या सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी पर्यायी पूल बांधण्यात आले होते. कालपासून पडत असलेल्या पावसामुळे चांभरगा गावाजवळील लहान ओढ्यात पाणी आल्याने सिमेंटचे मोठे पाईप टाकून बांधण्यात आलेला पर्यायी पुल देखील वाहून गेल्याचे समजते. नरसिंगवाडी पाटी येथील पर्यायी पुल पावसामुळे वाहून गेला आहे. यामुळे हा रस्ता बंद असून या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे उदगीरसह चामरगा, बावलगाव, जंगम वाडी, वेरूळसह अनेक गावाचा संपर्क तुटला आहे


उदगीरहून लातुरकडे जाणारा राज्यमार्ग बंद, गावाचा संपर्क तुटला


उदगीरवरुन लातूरला जाणार्‍या लोहारा गावाजवळील नरसिंगवाडी पाटी येथील पर्यायी पुल कालपासुन झालेल्या पावसामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे उदगीरहून लातुरकडे जाणारा राज्यमार्ग बंद झाला आहे. एसटी वाहतुक आणि इतर वाहतूकही बंद झाली आहे. आष्टा मोड ते उदगीर या राज्यमार्गाचे काम गेल्या तीन वर्षापासुन सुरु आहे. ज्या ज्या ठिकाणी ओढे आहेत, त्या ठिकाणी जुने पुल पाडून नव्या पुलाचे काम सुरू आहे. हे काम संत गतीने सुरु आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून सिमेंटचे पाईप टाकून पर्यायी पूल तयार करण्यात आले होते. भर पावसाळ्यात पूलाचे काम होत आहे. हे पर्यायी पूल धोकादायक आहेत. त्यातच हे पूल वाहून गेले आहेत. 
 
आता पर्यायी रस्ता 
लातूर वरून उदगीरकडे जाण्यासाठी चाकुर कडून वाहतूक वळविण्यात आली असली तरी, वाहतूक बंद झालेल्या मार्गावरील अनेक गावाचा संपर्क बंद झाला आहे. पाऊस बंद झाला असला तरी पाणी ओसरण्याची वाट पाहिली जात आहे. पर्यायी पुलाचे काम नुकसान झाले आहे हे पाणी ओसरल्या नंतरच स्पष्ट होईल. त्यानंतर पूलाची डागडुजी केल्यानंतर मार्ग खुला होणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Ajit Pawar : अजित पवार उद्यापासून अतिवृष्टीग्रस्त विदर्भ, मराठवाड्याच्या दौऱ्यावर, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र