Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

Breaking News LIVE Updates, 12 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Oct 2021 12:06 PM
टीपीजी ग्रूपकडून टाटाच्या इलेक्ट्रीक वाहन उपकंपनीमध्ये 7 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक

टीपीजी ग्रूपकडून टाटाच्या इलेक्ट्रीक वाहन उपकंपनीमध्ये 7 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.  पुढील दीड वर्षात टप्प्याटप्प्याने टाटा मोटर्स ईव्हीमध्ये ही गुंतवणूक होणार आहे. एप्रिल 2021 मध्ये महिंद्रा अँड महिंद्राकडून पुढील तीन वर्षात 3 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली आहे.  2025 सालापर्यंत पाच लाख ईव्ही वाहन तयार करण्याचे लक्ष्य आहे

मुंबई पोलिसांच्या पूर्व सायबर विभागाचा ईमेल आयडी हॅक

मुंबई पोलिसांच्या पूर्व सायबर विभागाचा ईमेल आयडी हॅक  झाला आहे. पूर्व सायबर विभागाच्या अधिकृत मेल आयडीवरून राज्यभरात ईमेल जात आहेत . terrorist behind jk attack gunned down in mumbai अशा आशयाचा मेल हा काही ठिकाणी गेल्याच उघडकीस आले आहे. राज्य सायबर सेलने प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तपासाला सुरुवात केली

भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात मंदाकिनी खडसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला

भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात मंदाकिनी खडसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला. वैद्यकीय कारणास्तव एकनाथ खडसेंना मात्र तूर्तास दिलासा

राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृह प्रमाणेच बंदिस्त सभागृह आणि मोकळ्या जागेत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना 22 ऑक्टोंबरपासून परवानगी

राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृह प्रमाणेच बंदिस्त सभागृह आणि मोकळ्या जागेत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना 22 ऑक्टोंबरपासून परवानगी 


राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृह प्रमाणेच बंदिस्त सभागृह आणि मोकळ्या जागेत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना 22 ऑक्टोंबर पासून परवानगी 


कोविडच्या  पार्श्वभूमीमुळे गेले अनेक महिन्यांपासून सभागृह आणि सांस्कृतीक कार्यक्रम बंद होते 


बंदिस्त सभागृह 50% नि सुरू करता येतील


 मात्र कोविडच्या नियमांचं पालन कराव लागणार


  सभागृहातील एसी 24 ते 30 अंश सेल्सिअस मर्यादित असली पाहिजे 


मोकळ्या जागेतील आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम


 मोकळ्या जागेतील कार्यक्रमासाठी दोन व्यक्ती मधील अंतर सहा फूट असावा 


सहभागी होणाऱ्या कलाकारांचे दोन ही डोस होणं महत्वाच

राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर आरोप असलेल्या बलात्कार प्रकरणाचा कोर्टाच्या आदेशाने पुन्हा तपास होणार

राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर आरोप असलेल्या बलात्कार प्रकरणाचा कोर्टाच्या आदेशाने पुन्हा तपास होणार. पूर्वी एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याने तपास केला होता. मात्र, पुन्हा औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी दुसऱ्या एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे तपास दिला आहे. राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी बलात्कार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. औरंगाबाद शहरातील सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपासाअंती पोलिसांनी या प्रकरणात बी समरी रिपोर्ट दाखल केला. हा रिपोर्ट फेटाळत कोर्टाने पुन्हा तपास करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांनी पोलीस आयुक्त यांना दिलेत. त्यानंतर औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी हा तपास श्रीकांत सराफ नावाच्या अधिकाऱ्याकडे दिला आहे.

भावना गवळी प्रकरणात ईडी अधिकाऱ्यांकडून वाशीम येथे चौकशी सुरू

भावना गवळी प्रकरणात ईडी अधिकाऱ्यांकडून वाशीम येथे चौकशी सुरू. खासदार भावना गवळी यांचे वाशीम येथे महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्ट आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थाही आहेत. या दोन संस्थांशी संबंधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू. याच ठिकाणी ईडी अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी धाडी टाकल्या होत्या. यानंतर आता चौकशीची कारवाई सुरू आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या तात्काळ मदतीसाठी मनसेचे औरंगाबादमध्ये आंदोलन

औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मनसे धरणे आंदोलन करत आहे .अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ  मदत  देण्यात यावी, संपूर्ण मराठवड्यात ओला  दुष्काळ जाहीर करावा, पंचनामे न करता शेतकऱ्यांना थेट हेक्‍टरी 50 हजार मदत करावी, ज्या शेतकऱ्यांची गुरे वाहून गेले आहेत, मृत्युमुखी पडले आहेत त्यांना  गुरामागे पन्नास हजाराची मदत करावी, ज्यांची घरे पडली आहेत त्यांना घर बांधण्यासाठी, डागडुजीसाठी तात्काळ मदत करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. सरकारला जागे करण्यासाठी जागरण गोंधळ करण्यात येत आहे

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या तात्काळ मदतीसाठी मनसेचे औरंगाबादमध्ये आंदोलन

औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मनसे धरणे आंदोलन करत आहे .अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ  मदत  देण्यात यावी, संपूर्ण मराठवड्यात ओला  दुष्काळ जाहीर करावा, पंचनामे न करता शेतकऱ्यांना थेट हेक्‍टरी 50 हजार मदत करावी, ज्या शेतकऱ्यांची गुरे वाहून गेले आहेत, मृत्युमुखी पडले आहेत त्यांना  गुरामागे पन्नास हजाराची मदत करावी, ज्यांची घरे पडली आहेत त्यांना घर बांधण्यासाठी, डागडुजीसाठी तात्काळ मदत करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. सरकारला जागे करण्यासाठी जागरण गोंधळ करण्यात येत आहे

Maharashtra Kolhapur News : जोतिबा डोंगरावर देवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी 

कोल्हापूरातील जोतिबा डोंगरावर देवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. नोंदणी केलेल्या भाविकांची रांग रिकामी असून इतर बाजूंनी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं दिसून येतंय. 

Maharashtra News : इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी याचिकेवर आज सुनावणी


प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आज औरंगाबाद खंडपीठात अंतरिम सुनावणी होणार आहे .संगमनेर न्यायालयानं दिलासा दिल्यानंतर दाखल झालेल्या याचिकेवर आज औरंगाबाद खंडपीठ काय निर्णय देणार याकडे सगळ्याचं लक्ष लागले आहे. पुत्रप्राप्तीबाबत इंदोरीकर महाराजांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यावरुन अंधश्रद्धा निर्मुलन समितीने याचिका दाखल केली आहे.

आर्थिक कोंडीत सापडल्याने बीडमध्ये बसचालकाची गळफास घेऊन आत्महत्या

वेळेवर पगार होत नाही त्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या एसटी कर्मचाऱ्यावर वाईट वेळ आल्यानं बीडमध्ये एका कर्मचार्‍याने आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय. पगार वेळेवर झाला नसल्याने ही आत्महत्या केली असल्याचे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे..

पुण्यातील बिल्डर डी. एस. कुलकर्णी यांच्या ईडीनं सील केलेल्या बंगल्यात चोरी

Pune DS Kulkarni Bungalow Theft : पुण्यातील बिल्डर डी. एस. कुलकर्णी यांच्या ईडी (ED) नं सील केलेल्या बंगल्यात चोरी झाली आहे. ED ने सील केलेल्या चतुर्श्रुंगी येथील आलिशान बंगल्यात चोरट्यांनी सहा लाखांचा ऐवज लुटला आहे. 





आजपासून पुण्यातील कॉलेज आणि विद्यापीठं 'अनलॉक'

पुणे जिल्ह्यातील कॉलेज आणि विद्यापीठ आजपासून सुरू होणार आहेत. कॉलेजेस आणि विद्यापीठात प्रवेश करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दोन्ही डोस घेणं गरजेचं असणार आहे. तसेच, जे विद्यार्थी पुणे जिल्ह्याच्या बाहेरून येणार आहेत, त्यांना RT-PCR अहवाल दाखवावा लागणार आहेत.





दिवाळीनंतर राज्यभराचील महाविद्यालयं सुरु होणार? उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले...

दिवाळीनंतर राज्यभरातील महाविद्यालयं सुरु करण्याचा सरकारचा विचार असल्याचं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. 

स्वीस बँकेकडून भारताला खातेदारांच्या माहितीचा तिसरा संच सुपूर्द

स्वीस बँकेकडून भारताला खातेदारांच्या माहितीचा तिसरा संच सुपूर्द करण्यात करण्यात आलाय. भारतातील अनेक व्यक्ती आणि कंपन्यांंची  स्वीस बँकेत खाती असल्याचे दिसून आलंय. गेल्या महिन्यात ही माहिती मिळाली असून आता माहितीचा पुढचा संच सप्टेंबर 2022 मध्ये मिळणार आहे. 

दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट मिळणार? पीएफचं व्याज खातेधारकांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा होण्याची शक्यता

दिवाळीच्या तोंडावर देशभराल्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. पीएफचा व्याज खातेधारकांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा केलं जाऊ शकतं. 2020-21 या आर्थिक वर्षासाठी पीएफवर साडे आठ टक्के व्याज जाहीर करण्यात आला आहे.  हे व्याज खातेधारकांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. 

मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर यांच्याकडे समीर वानखेडे यांचा महाराष्ट्र पोलिसांवर आरोप

मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर यांच्याकडे समीर वानखेडे यांनी पोलिसांकडे तक्रार केलीये. मुंबई पोलीस दलातले काही पोलीस साध्या वेशात वानखेडेंवर पाळत ठेवत असल्याचं एनसीबीच्या सूत्रांनी सांगितलंय.

पार्श्वभूमी

Mumbai Drugs Case : समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची पाळत? NCB च्या झोनल डायरेक्टरांनी दाखल केली तक्रार


Mumbai Drugs Case : मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. काही दिवसांपूर्वी कॉर्डेलिया क्रूझवरील छापेमारीमुळे चर्चेत आलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी महाराष्ट्र पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे सध्या खळबळ माजली आहे. वानखेडे बोलताना म्हणाले की, त्यांच्यावर बेकायदेशीर पद्धतीनं पाळत ठेवली जात आहे. तसेच मुंबई पोलीस दलातील काही पोलीस साध्या वेशात वानखेडेंवर पाळत ठेवत असल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओशिवरा पोलीस स्थानकातील 2 पोलीस  समीर वानखेडेंच्या हालचालींवर पाळत ठेवून आहेत. 


समीर वानखेडेंनी यासंदर्भात तक्रार करताना एक सीसीटीव्ही फुटेजचाही आधार घेतला आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) अधिकाऱ्यांनी या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भेटही घेतली आहे.


2 ऑक्टोबर रोजी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंच्या नेतृत्त्वात एनसीबीच्या एका पथकानं कॉर्डेलिया क्रूझवर छापा मारला होता. एजंन्सीनं दावा केला आहे की, क्रूझवरील छापेमारीत ड्रग्ज जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह एकूण 18 जणांना एनसीबीनं अट केल्याचं सांगितलं. 


क्रूझ ड्रग्ज प्रकरणी करण्यात आलेल्या छापेमारीनंतर राष्ट्रवादीकडून एनसीबीवर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले. महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी दावा केला होता की, एनसीबीनं केलेली कारवाई ही बनावट होती आणि यामध्ये भाजप नेत्यांसह अनेक बाहेरचे लोक सहभागी होते. तसेच नवाब मलिकांनी आरोप केला आहे की, एनसीबीने सुरुवातीला 11 लोकांना अटक केली होती. परंतु, भाजप नेते मोहित भारतीय यांच्या एका निकटवर्तीयासह तिघांना अवघ्या काही तासांत सोडण्यात आलं. तसेच पुढे बोलताना त्यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या फोन रेकॉर्ड्सचा तपास करणं गरजेचं आहे, अशी मागणीही केली. 


सांगलीकरांना वीज वितरण कंपनीचा 'हाय व्होल्टेज' झटका; 600 घरांतील विद्युत उपकरणं जळून खाक


दुष्काळात तेरावा महिना या म्हणीचा प्रत्यय सध्या सांगलीकर घेत आहेत. एकीकडे महागाईनं डोकं वर काढलंय आणि दुसरीकडे वीजबिलही जास्त येत आहे. त्यातच सांगलीतल्या गणेशनगर भागातील जवळपास 600 घरांना विजेच्या उच्च दाबामुळे मोठा फटका बसला आहे. घरातील टीव्ही, फ्रीज अशी विद्युत उपकरणं जळून खाक झाली आहेत. कोरोना, लॉकडाऊन, अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या या कुटुंबांना आता घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्त अथवा नवीन आणण्याची वेळ आली आहे. नुकसानाचा आकडा देखील मोठा असल्यानं महावितरणकडून नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा या सामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे.


सांगलीमध्ये विजेच्या उच्च दाबामुळं 600 भर  घरातील टीव्ही, फ्रीज असे हजारो विद्युत उपकरण जळून खाक झाली आहेत. त्यामुळे नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे. सांगलीच्या गणेशनगर भागामध्ये ही घटना घडली असून वीज वितरण कंपनीकडून नुकसान पंचनामे सुरु करण्यात आलं आहे. मात्र ऐन सणासुदीच्या काळात वीज वितरण कंपनीच्या झटक्यानं ग्राहक मोठ्या संकटात सापडले आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.