मुंबई: राज्यातील लोकसभेसाठी महायुतीच्या जागा जवळपास ठरल्या असल्याची (Mahayuti Seat Sharing ) मोठी बातमी समोर येतेय. महायुतीच्या 42 जागांवर घटक पक्षांचं एकमत झालं असून केवळ सहा जागांचा तिढा सुटायचा बाकी असल्याचं समोर येतंय. त्यामध्ये भाजप 25 जागा लढवणार असून एकनाथ शिंदे 11 जागांवर तर अजित पवार (Ajit Pawar) 7 जागांवर निवडणूक लढवणार हे नक्की झालंय. ज्या सहा जागांवर चर्चा सुरू आहे त्यापैकी काही जागा या मनसेला देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
महायुतीच्या घटक पक्षांचे 42 जागांवर एकमत
महायुतीतील घटक पक्षांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट 6, भाजप 25 आणि शिवसेना शिंदे गट 11 जागांवर निवडणूक लढणार आहेत. या तीनही पक्षांनी कोणत्या लोकसभेच्या जागा लढवायच्या यावरही एकमत झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. आता केवळ सहा जागांवर बोलणी सुरू आहे.
मनसेला भाजपचं बळ मिळणार
ज्या सहा जागांवर चर्चा सुरू आहे त्यापैकी काही जागा या मनसेला देण्यात येणार आहेत. त्यामध्ये दक्षिण मुंबई या जागेचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीला मनसेचं बळ मिळाल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत अधिक फायदा होण्याचा अंदाज आहे. तसेच मनसेलाही या युतीचा फायदा होणार असल्याचं दिसतंय.
राज्यातल्या महायुतीच्या जागावाटपावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्यासाठी राज्यातल्या नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दोन वेळा भेट झाली. त्यानंतर मुंबईतही जागावाटपावर चर्चा झाली. महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम झाली असून एक दोन दिवसात ती जाहीर करण्यात येणार असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी नुकतंच केलं होतं.
भाजपचे पाच उमेदवार जाहीर होणं बाकी
भाजप राज्यात एकूण 25 जागावर लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यापैकी आतापर्यंत 20 जागांवरचे उमेदवार भाजपने जाहीर केले असून केवळ पाच जागांवर उमेदवार जाहीर करायचं बाकी आहे. उर्वरित जागांवर भाजप आपल्या समर्थकांना देणार असल्याची माहिती आहे. त्यामध्ये अमरावतीची जागा नवनीत राणा यांना सोडण्यात येणार आहे.
ज्या सहा जागा बाकी आहेत त्यामध्ये दक्षिण मुंबईची जागा असल्याची माहिती आहे. गडचिरोलीची जागाही त्यामध्ये आहे. त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा अत्राम हे इच्छुक असून त्यांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल अशी शक्यता आहे.
ही बातमी वाचा: