दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


1. आजपासून दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार, ९ डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत


 2. अनिल देशमुखांना पुन्हा त्यांच्या जागेवर बसवायचं आहे, प्रफुल पटेलांचं नागपुरात वक्तव्य, देशमुखांवर अन्याय झाल्याचं शरद पवारांचं मत
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना पुन्हा त्यांच्या जागेवर बसवायचं आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी केलं आहे. नागपुरातल्या लकडगंज परिसरात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं. शरद पवारांच्या आशिर्वादानं अनिल देशमुख लवकरच जेलमधून बाहेर येतील, असा विश्वासही यावेळी प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी व्यक्त केला. हे आपलं मत नसून शरद पवार (Sharad Pawar) यांचं मत असल्याचं स्पष्टीकरणही प्रफुल पटेलांनी दिलं आहे
 
3.  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह फरार घोषित, किल्ला कोर्टाचा निर्णय, गोरेगाव पोलीस ठाण्यातल्या खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी कारवाई


4. अतिवृष्टीची मदत मिळताच महावितरणकडून थकीत वीजबिल भरण्याची नोटीस, एचपी मोटरसाठी 10 ते 15 हजार भरण्याची सक्ती, बळीराजा संतप्त


5. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून अल्टिमेटम, 2 हजार 296 रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस 
ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी एसटी महामंडळ सरसावलं आहे.  रोजंदारीवर काम करणाऱ्या 2296 कामगारांना एसटी महामंडळाने सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे. या कामगारांनी 24 तासांत कामावर हजर व्हावे अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल असं या नोटीशीत म्हटलं आहे. 



6. दंगलीप्रकरणी दोषी कोणत्याही पक्षाचा असो, त्यांच्यावर कारवाई करणार; गृहमंत्र्यांचं वक्तव्य 


7. भारतीय रेल्वेचे पहिले 'पॉड हॉटेल' मुंबई सेंट्रल स्थानकात सुरु
Indian Railways First Pod Hotel : जगातील विविध देशांप्रमाणे आता भारतात देखील रेल्वे स्थानकांमध्ये पॉड हॉटेलची संकल्पना राबविण्यात येत आहे. भारतातील पहिले रेल्वे स्थानकातले पॉड हॉटेल पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात सुरु करण्यात आले आहे. ज्याचे नाव आहे, अर्बन पॉड हॉटेल. काल (बुधवारी) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या नवीन हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले. आयआरसीटीसी (IRCTC) तर्फे कंत्राटी पद्धतीवर या हॉटेलची निर्मिती करण्यात आली आहे. जर मुंबई सेंट्रल येथे असलेल्या पॉड हॉटेलला प्रवाशांनी पसंती दिली, तर येणाऱ्या काळात विविध मोठ्या स्थानकांवर अशी हॉटेल्स निर्माण करण्यात येतील.


8. अखेर पाकिस्तान झुकला, पाकिस्तानच्या संसदेत विधेयक पारित, कुलभूषण यांना शिक्षेविरोधात अपील करण्याचा अधिकार 


9. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी २० सामन्यात टीम इंडियाची विजयी सलामी, मुंबईकर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव तळपले


10. सलमान खान आता जनतेला लस घेण्याचा सल्ला देणार, महाराष्ट्र सरकारने दिली विशेष जबाबदारी