Dilip Walse Patil : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विविध घटना घडत आहेत. तपास यंत्रणांची छापेमारी असो अथवा अमरावती दंगल, या सर्व प्रकरणातून महाराष्ट्राला बदन करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप सत्ताधारी महाविकास आघाडीमधील नेत्यांनी अनेकदा केलाय. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असताना राज्याच्या गृहमंत्र्यांकडून काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत अनेक प्रश्नांवर मौन सोडलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये झालेले दंगे असतील किंवा परमबीर सिंह यांना फरार घोषित या सर्व प्रश्नांची उत्तरे गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली आहेत.
परमबीर सिंह यांना फरार घोषित केलं, आता पुढे काय?
यामध्ये विशेष असं काही नाही मुंबई आणि ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या आहेत त्यासाठी पोलीसांनी चौकशीला बोलवलं आहे पण चौकशीला उपस्थित राहू शकले नाही त्यामुळे त्यांना फरार घोषित केलं गेलं
परमबीर सिंह यांनी महाराष्ट्रास बदनाम करण्याचा प्रयत्न केला ?
ते एक आयुक्त राहिले आहेत, आधीचं वक्तव्य आणि आता केलेलं वक्तव्य हे योग्य नाही त्यामुळे त्यांनी केलेलं बदनाम करायला तर केलं नाही ना असा संशय निर्माण होतोय
परमबीर सिंह आहेत कुठे?
ते जर माहित असतं तर त्यांना आता शोधून काढलं असतं. ते सापडले नाहीत म्हणून तर त्यांना फरार घोषित केलं
तुमची कारकीर्द कशी सुरु आहे ? तुम्ही अधिका-यांवर किती विश्वास ठेवता?
आपण सावधानतेने आणि अधिका-यांवर विश्वास ठेऊनच काम करावं लागतं मी नियमांना घरूनच काम करत आलेलो आहे त्यामुळे माझी कारकीर्द सुरळीत सुरु आहे
केंद्रीय यंत्रणांबद्दल काय वाटतं?
केंद्रीय यंत्रणांमुळे महाराष्ट्र सरकारवर कोणताही दबाव येणार नाही. आम्ही पुढची उरलेली वर्ष पुर्ण करणार केंद्रीय यंत्रणाांचा वापर करणं योग्य नाही पण ते आजकाल होऊ लागलं आहे यामुळे दबाव तयार करण्याचा प्रयत्न
नक्षलवाद्यांना कसं घातलं कंठस्नान?
गडचिरोलीच्या सीमेवर अशा मोहिमा नेहमी सुरू असतात. अशीच एक कारवाई १३ तारखेला पुर्ण झाली, आपल्या सीमेची पुर्ण जबाबदारी पोलीस चोख पार पाडत असतात पोलीसांच्या गुप्तचर यंत्रणेला माहिती मिळाली त्यानंतर त्या भागात पेट्रोलिंग वाढवलं. जसं पोलीस गस्ती घालत होत्या तसतसं हालचाली वाढू लागल्या. पोलीस गस्ती घालत असताना गोळीबार झाला आणि चकमक सुरु झाली
नक्षलवादी याचं चोख प्रतित्त्युर देणार, आपण तयार आहात का?
जेव्हा जेव्हा अशा चकमका होत असतात तेव्हा तेव्हा प्रतित्त्युर येत असतं पण आम्ही सज्ज आहोत आम्हाला याची पुर्ण कल्पना आहे .
महाराष्ट्रातील दंगलीची माहिती गुप्तचर यंत्रणांकडे नव्हती का?
गुप्तचर यंत्रणांकडे माहिती होती पण एवढी दंगल होईल असं वाटलं नव्हतं, पण बांगालादेशनध्ये घडलेल्या गोष्टीनंतर एक संस्था बंद पुकारते. त्यानंतर राजकीय मोर्चे निघतात हे सगळे महाराष्ट्राला अशोभनीय आहे. अशा घटना का घडतात ? कोण घडवत आहे का? याची चौकशी आम्ही करत आहोत चौकशी पूर्ण झाल्यावर आम्ही कारवाई करणार आहोत. मग ती कुठलीही संघटना असो किंवा कुणीही असो आम्ही आमची कारवाई करणार.
रझा अकदमीवर बंदी घालण्याची वेळ आली आहे का?
आता मी बोलणं लवकर होईल चौकशी करायला सांगितली आहे. तपास पूर्ण झाला आणि त्यानध्ये जर रझा अकादमी दोषी सापडली तर नक्की कारवाई करणार .
या दंगलीमध्ये हिंदुत्ववादी आणि युवा सेना असल्याची पोलीस अहवालात माहिती आहे, त्यांच्यावरही कारवाई होणार का?
कोण नेता आहे, कोणता पक्ष आह हे महत्वाचं नाहीय जो कोण दोषी आहे त्यावर नक्कीच कारवाई केली जाणार
या मोर्च्यांना सरकारनं समर्थन दिलं असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करत आहेत किती तथ्य आहे या आरोपांमध्ये ?
देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांशी मी सहमत नाही, राज्यकर्ते राज्य करत असताना ते सुरळीत चाललं गेलं पाहिजे अशाप्रकारे काम करत असतात त्यामुळे असं काही नसतं फडणवीसांच्या या आरोपांमध्ये काहीही तथ्य वाटत नाही, फडणवीस असं का बोलतात मला याची कल्पना नाही पण आम्ही सगळी माहिती घेत आहोत.
या मोर्च्याचा परवानग्या घेण्यात आलेल्या होत्या का?
कोणत्याही मोर्च्याची परवानगी घेण्यात आली नव्हती, मोर्चा काढले गेले धार्मिक विषयांवर लोकांना भडकवण्याचा प्रयत्न झाला त्यातून लोकांना सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरु होते वातावरण तयार झालं एकमेकांना तापवातपावी केली गेली
देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य भडकवण्यासारखं आहे का?
देवेंद्रजी एक जबाबदार नेते आहेत मला माहित नाही त्यांनी असं वक्तव्य का केलं? मी जरूर त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करेल असा परिस्थितीत सर्वांनी सलोख्यानं वागलं पाहिजे.
अमरावतीत आता परिस्थती कशी आहे?
अमरवतीत आता परिस्थिती हळुहळु सुधारत आहे, शांतता आहे. संचारबंदी ठेवण्यात आली आहे हळुहळु पोलिस परिस्थितीनुसार संचारबंदी मागे घेतील.
या दंगलीमागे खरा चेहरा कोण आहे?
हे आत्ताच सांगणं कठिण आहे, चौकशी पुर्ण झाल्यावर यावर सविस्तर बोलता येईल पण आता सांगणं घाईचं ठरेल रझा अकादमी किंवा कोणीही असली तरी कारवाई होईल.