Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील देश विदेशातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील राजकीय, क्रीडा, गुन्हेगारी जगतातील ताज्या घडामोडी आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Jun 2024 03:22 PM
NEET परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय कडून FIR दाखल

NEET परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय कडून FIR दाखल


केंद्र सरकारने काल रात्री NEET परीक्षेतील गैरव्यवहाराचे प्रकरण सीबीआय ला तपास करण्यासाठी दिले होते


नुकताच सीबीआय कडून FIR दाखल करण्यात आला आहे

अकोल्यात पठार नदीला पूर, पनोरी आणि जणोरी गावाचा संपर्क तुटला

अकोल्यात पनोरी आणि जणोरी गावाचा संपर्क तुटलाय. अकोल्यातील अकोट तालुक्यातल्या पठार नदीच्या पाण्यात अचानक पणे पहाटेपासून वाढ झालीय, त्यामुळ नदीला काहिसा पुर आला आहे, त्यात पणोरी आणि जणोरी गावाच्या रस्त्यावरील पठार नदीवर पुलाचं बांधकाम सुरूये. म्हणून गावकऱ्यांना पर्यायी वाहतूकीसाठी पर्यायी रस्त्या बांधन्यात आला, पण सातपुडा पर्वतरांगात सुरू असलेल्या पावसामुळे पठार नदीला पूर आला, आणि हा पर्यायी रस्ता वाहून गेला. सद्यस्थितीत दोन्ही गावांचा संपर्क तुटला असून गावकऱ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास सुरू आहे... याचेच काहीसे व्हिडिओ समोर आले आहे.

रावसाहेब दानवे यांनी मंत्रीपद नसल्याची व्यक्त केली खंत

भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी मंत्री पदी नसल्याची व्यक्त केली खंत....


धाराशिवमधे पदाधिकाऱ्यांशी बोलताना मी मंत्री नाही अन्यथा नवा रेल्वे प्रस्ताव दिला असता अस दानवे म्हणाले...


सोलापूर-कळंब-बीड-जालना अशा रेल्वे


मार्गाच्या मागणीसाठी पदाधिकारी आले असता दानवे यांनी व्यक्त केली खंत.....


रेल्वे मंत्री आणि अधिकारी आपलेच आहेत मार्ग काढण्याचं दिलं आश्वासन....

गेल्या 24 तासात रायगडमध्ये सरासरी 5767.44 मिमी पावसाची नोंद 

रायगड मध्ये गेल्या 24 तासात 5767.44 मिमी सरासरी पावसाची नोंद 


सर्वाधिक पाऊस 400 मिमी पेक्षा अधिक अलिबाग आणि म्हसळा तालुक्यांत कोसळला 



त्यांनतर मुरूड पनवेल, श्रीवर्धन कर्जत पोलादपूर, माथेरान मध्ये सर्वाधिक पाऊस 



नद्या नाले तुडुंब भरून वाहु लागलेत 


अद्याप रायगडमध्ये कोणत्याच नद्यांना धोक्याची पातळी नाहीं

सातारा जिल्ह्यात शरद पवार गटाला विधानसभेच्या 7 जागा मिळाव्यात , जिल्हा कमिटीची मागणी 

सातारा जिल्ह्यातील शरद पवार गटाला ७ विधानसभेच्या जागा मिळाव्यात 


जिल्हा कमिटीची शरद पवारांकडे मागणी 


आज शरद पवार सातारा जिल्हयाचा घेणार आढावा 


सरचिटणीस राजकुमार पाटील अहवाल घेवून शरद पवारांच्या भेटीला 


विधानसभेच्या सातारा जिल्ह्यात ७ विधानसभा लढवा

तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी.......

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली असुन आज रविवारची शासकीय कार्यालये व शाळांना सुट्टी असल्याने भाविकांनी गर्दी केली आहे.
तुळजाभवानीच्या मंदीरात कुलधर्म,कुलाचार गोंधळ हे धार्मिक विधी करण्यासाठी मोठय़ा भाविक दाखल होत असतात.. समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला असुन पेरणीची कामे उरकून शेतकरी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आल्याच चित्र पाहायला मिळतय.

शरद पवारांनी जिल्हानिहाय विधानसभेचा मागवला अहवाल, उद्या मुंबईत महाविकास आघाडीची बैठक 

शरद पवारांनी जिल्हा निहाय विधानसभेचा मागवला अहवाल 


उद्या मुंबईत महाविकास आघाडीची बैठक 


बैठकीत किती जागा मागायच्या यासाठी अहवाल मागितला 


प्रत्येक मतदारसंघात पक्षाची स्थिती काय , मताधिक्य संभाव्य उमेदवार यावर माहिती मागवली 


सगळ्या जिल्हा प्रमुखांना अहवाल देण्याच्या सूचना

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील राजकीय, क्रीडा, गुन्हेगारी जगतातील ताज्या घडामोडी आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर


 


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.