Maharashtra Live Updates: सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्र विधीमंडळात सत्कार; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Maharashtra Live Blog updates: राज्यातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. सर्व घडामोडींचे अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर.
पार्श्वभूमी
राज्यातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. सर्व घडामोडींचे अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर. चेन स्नॅचिंग, दुचाकी चोरी, घरफोड्या करणाऱ्या आंतरराजीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली....More
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज महाराष्ट्र विधीमंडळात सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा सत्कार फक्त विधीमंडळाचा नाही तर 13 कोटी जनतेकडून आहे. त्यांना सत्कारासंदर्भात विचारणा केली तर ते फक्त सत्कार नाही म्हणाले तर संविधानावर मार्गदर्शन ही ठेवा, असे म्हटले. हा त्यांचा साधेपणा आहे. दादासाहेब गवई हे अजातशत्रू होते. त्यांचा गुण भुषण गवई यांनी घेतला, असे त्यांनी म्हटले.
पुणे : पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने एका महिलेकडून 73 तोळे सोने आणि 17 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडलीय. 51 वर्षीय महिलेने याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. यावरून संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर चतुशृंगी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश जगताप असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. फिर्यादी आणि आरोपी जगताप हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. या ओळखीचा फायदा घेत जगताप यांनी फिर्यादी व त्यांच्या पतीला वेगवेगळे कारणे देत त्यांच्याकडून वेळोवेळी आर्थिक मदत घेतली. ज्यामध्ये 73 तोळे सोने आणि तब्बल 17 लाख रुपये लाटले. इतकच नाही तर याआधी सुद्धा त्याने पुण्यातील औंध भागातील एका सराफी व्यावसायिकडून 8 लाख रुपयांचे दागिने घेऊन फसवणूक केली होती.
पुणे : पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने एका महिलेकडून 73 तोळे सोने आणि 17 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडलीय. 51 वर्षीय महिलेने याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. यावरून संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर चतुशृंगी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश जगताप असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. फिर्यादी आणि आरोपी जगताप हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. या ओळखीचा फायदा घेत जगताप यांनी फिर्यादी व त्यांच्या पतीला वेगवेगळे कारणे देत त्यांच्याकडून वेळोवेळी आर्थिक मदत घेतली. ज्यामध्ये 73 तोळे सोने आणि तब्बल 17 लाख रुपये लाटले. इतकच नाही तर याआधी सुद्धा त्याने पुण्यातील औंध भागातील एका सराफी व्यावसायिकडून 8 लाख रुपयांचे दागिने घेऊन फसवणूक केली होती.
बीड : सख्ख्या बहिणीच्या नावे असलेला प्लॉट नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांशी संगनमत करत माजी नगराध्यक्ष अशोक होके यांनी थेट आपल्या पत्नीच्या नावावर करून घेतल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे 100 रुपयांच्या बॉण्ड पेपरवर खोट्या सह्या करून बनावट हक्क सोडपत्र तयार करण्यात आलं. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बहिणीनं थेट पोलिसांत धाव घेतली. तिच्या फिर्यादीवरून अशोक होके, त्यांची पत्नी उज्ज्वला होके आणि नगरपालिकेचे तीन तत्कालीन कर्मचारी अशा पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. माजलगाव शहर पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा अधिकचा तपास माजलगाव पोलीस करत आहेत.
भंडारा : जिल्ह्यात हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलाय. आज सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडतोय. परिणामी, भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व शाळांना आज आणि उद्या अशा दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील 25 मार्ग पाण्याखाली आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातील 40 पैकी 38 मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
Supriya Sule on Devendra Fadnavis : मीरा-भाईंदरमध्ये (Marathi Morcha MNS in Mira bhayandar) उद्भवलेल्या परिस्थितीला सर्वस्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे जबाबदार आहेत. सरन्यायाधीश भूषण गवई आज महाराष्ट्रात आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अशावेळी गृहखातं काय करतं? त्यामुळे याला जबाबदार मुख्यमंत्री आणि गृहखातं आहेत. असा आरोप राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेप्रमाणेएका शशक्त लोकशाहीत प्रत्येक भारतीयाला आंदोलन करायचा अधिकार दिला आहे. ही लोकशाही आहे दडपशाही नाही. असेही त्या म्हणाल्या. सविस्तर बातमी इथे वाचा
MNS Marathi Morcha in Mira bhayandar: मराठीच्या मुद्द्यावरुन मिरारोड-भाईंदर परिसरात मनसेकडून मंगळवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला (Marathi Morcha) पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे सध्या मुंबईतील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. अशातच आता मंत्री प्रताप सरनाईक मीरा भाईंदरमधील मोर्चात, आंदोलकांकडून 50 खोके, एकदम ओकेच्या घोषणा, घटनास्थळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आहे.
मनसे नेते अविनाश जाधव यांना विरार हद्दीतील मांडवी पोलीस ठाण्यात आणले
मीरा भाईंदर मध्ये मराठी मार्चला पोलिसांनी परवानगी नाकारल्या नंतर मनसे नेते अविनाश जाधव यांना काशिमीरा पोलिसांनी पहाटे तीन वाजता ताब्यात घेतले होते
मराठी माणस आक्रमक झाल्या नंतर अविनाश जाधवला काशिमीरा मधून मांडवी ला हलविले आहे
मांडवी गुन्हे प्रकटीकरणच्या रूम मध्ये ठेवले आहे
बीड: परळीतील महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला 18 महिने होत आहेत. मात्र गुन्हा दाखल होऊन देखील यातील आरोपी अटकेत नाहीत. आज महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यातील आरोपींना अटक करावी अन्यथा पुढील आठ दिवसात कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिला.. स्थानिक पोलिसांवर दबाव असल्याने त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.. आता पोलीस अधीक्षक आणि मुख्यमंत्र्यांनीच लक्ष देऊन न्याय द्यावा. अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली.
अखेर पोलीस अन् सरकार नमलं, मराठी आंदोलकांच्या एकीचा विजय, मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा निघाला
मोर्चाच ठिकाण आहे बालाजी हॉटेल सर्कल, मिरा रोड ते मीरा रोड स्टेशन
मीरा- भाईंदर येथे मराठीच्या मुद्द्यावर सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी
मराठीच्या मुद्द्यावर मिरा भाईंदरमध्ये जोरदार आंदोलन
आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी घेतलय ताब्यात
तर मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी आंदोलनापूर्वीच घेतलं होत ताब्यात
शांतता मार्गाने मोर्चा काढला होता
काल मराठी एकीकरण समितीचे नेते गेले तेव्हा परवानगी नाकारली
काही लोकांना तडीपारीच्या नोटीसेस दिल्या
पोलिस आयुक्तांसंदर्भात मी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली
आमदार म्हणून मी हे सहन करणार नाही
मी मोर्चामध्ये सामील व्हायला निघालो आहे… पोलिसांनी अडवून दाखवा
सरनाईकांचं पोलिसांना आव्हान!
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पितृशोक
अश्विनी वैष्णव यांचे वडील दाऊलाल वैष्णव यांचे जोधपूर एम्स मध्ये निधन
गेले अनेक दिवस सुरू होते उपचार
दाउलाल वैष्णव राजस्थानच्या पाली जिल्ह्यात एका गावाचे सरपंच होते
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह जनसंघाचे कार्यकर्ते होते दाऊलाल वैष्णव
Mira Bhayandar MNS Morcha: निशिकांत दुबे यांचं जर पूर्ण ऐकलं तर ते संघटनेच्या संदर्भात बोलल, ते मराठी माणसाला सरसकट बोलले नाहीत.तथापि,माझं मत आहे की अशाप्रकारे बोलणं योग्य नाही. कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ हे लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात. मराठी माणसाचं ऐतिहासिक योगदान या महाराष्ट्रामध्ये प्रचंड आहे. आजही देशाच्या जीडीपीमध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन देणारा आमचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं कॉन्ट्रीब्युशन या देशाच्या इतिहासामध्ये आणि या देशाच्या वर्तमानामध्ये कोणीच नाकारू शकत नाही आणि जर कोणी नकारात असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे : देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं मुसळधार पाऊस होतोय. परिणामी, धरण प्रशासनानं गोसेखुर्द धरणाचे आता सर्व ३३ ही दरवाजे दीड मीटरनं सुरू केले आहेत. यातून ३ लाख ५५ हजार ९८३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. पाऊस सातत्यानं पडत राहिल्यास विसर्गात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नदी काठावरील गावातील नागरिकांनी सावध राहावं, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडीमध्ये कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने श्रीदत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे...पंचगंगा आणि कृष्णा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाढ होत आहे... त्यामुळे दत्त मंदिरामध्ये पाणी शिरले आहे... यामुळे दत्त मंदिरातील दक्षिणद्वार सोहळा हा रद्द करण्यात आला आहे...मंदिरात पाणी शिरल्यामुळे बाहेरूनच भक्तांना गाभाऱ्याच दर्शन घ्यावे लागत आहे. नृसिंहवाडी येथील दत्त मंदिराच्या आजूबाजूच्या मंदिरात ही पाणी शिरले आहे..
कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडीमध्ये कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने श्रीदत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे...पंचगंगा आणि कृष्णा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाढ होत आहे... त्यामुळे दत्त मंदिरामध्ये पाणी शिरले आहे... यामुळे दत्त मंदिरातील दक्षिणद्वार सोहळा हा रद्द करण्यात आला आहे...मंदिरात पाणी शिरल्यामुळे बाहेरूनच भक्तांना गाभाऱ्याच दर्शन घ्यावे लागत आहे. नृसिंहवाडी येथील दत्त मंदिराच्या आजूबाजूच्या मंदिरात ही पाणी शिरले आहे..
अशी होणार भारतातील पहिली डिजिटल जनगणना
राष्ट्रीय, मास्टर आणि फिल्ड अशा तीन स्तरावरील कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम
तीन स्तरांवर सुमारे ३४ लाख कर्मचारी काम करणार
भारताच्या इतिहासातील पहिली डिजिटल जनगणना असेल
जनगणनेचा निकाल १८ महिन्यांऐवजी ९ महिन्यांत उपलब्ध होतील
१९३१ नंतर प्रथमच सर्व जातींची (फक्त अनुसूचित जाती/जमाती नव्हे) गणना केली जाईल
MNS Mira Bhayandar Morcha: मराठी अस्मिता आणि मराठी भाषा या मुद्द्यांवर मीरा भाईंदरमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं मोर्चाची (MNS Mira Bhayandar Morcha) हाक दिलीय. आज सकाळी बालाजी हॉटेल ते मीरारोड स्टेशनपर्यंत हा मोर्चा निघणार आहे. मात्र पोलिसांनी या मोर्चाआधी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा जारी केल्या आहेत. काल रात्री साडेतीन वाजता पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं. तर वसई विरारमधीलही अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र कारवाई झाली तरी मोर्चा निघणारच असा ठाम पवित्रा मनसेने घेतला आहे. सध्या मीरा-भाईंदरमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. यावरुन मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची असल्याचं म्हटलं आहे. सविस्तार बातमीसाठी इथे क्लिक करा
पुणे: हिंजवडी आयटी पार्कला ग्रासलेल्या विविध समस्यांमधून मुक्तता मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी विधानभवनात आढावा बैठक घेतली जाणार आहे. दुपारी दोन वाजता होणाऱ्या या बैठकीत फेडरेशन स्वयंसेवी संस्था आणि हिंजवडीशी निगडित विविध अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. हिंजवडी मध्ये गेल्या काही दिवसांपासून वाहतुकी बरोबरच इतरही अनेक समस्या उद्भवल्याने आयटी कर्मचारी हैराण झाले होते. त्यांनी विविध पातळ्यांवर हिंजवडीच्या समस्या बाबत आवाज उठवल्यानंतर आता मुख्यमंत्री यासंबंधी बैठक घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत.
"मै मराठी नही बोलुंगा" अशी भूमिका घेणाऱ्या सुशील केडियाचं कार्यालय फोडणारे मनसैनिक राज ठाकरेंच्या भेटीला
मनसे माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष सचिन गोळे यांच्यासोबत मनसे माथाडी कामगार सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवतीर्थावर घेणार राज ठाकरे यांची भेट
सुशील ककेडियाच्या वरळी येथील कार्यालयावर मनसैनिकांनी नारळ फेकत केलं होत आंदोलन
आंदोलना प्रकरणी दंगल माजवल्या प्रकरणी पोलिसांनी केली होती कारवाई
विरोधी पक्षनेतेसाठी संख्या महत्त्वाची आहे हे सांगितलं जात होतं
मात्र आम्ही संख्या गरजेची नाही १० टक्के हे सांगितलं आणि विधानसभाध्यक्षांना देखील मान्य करावं लागलं
अध्यक्ष मुख्यमंत्री यांना विनंती करत तिन्ही पक्ष आलोय विरोधी पक्षनेत्यासंदर्भात
मात्र, हे सरकार काय अध्यक्ष काय निर्णय घेण्याच्या तयारीत नाही
त्यामुळे आज आता काय करायचं, स्मरण पत्र द्यायचं ?
आज न्यायाधीश येतायत अशात त्यांना निवेदन देत आमची कैफियत आम्ही मांडणार आहोत
भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया
पोलिसांनी एका पक्षासाठी काम करू नये, मी मुख्यमंत्री यांच्याशी बोलणार आहे... मी पोलीस आयुक्ताना बोलून नाराजी व्यक्त केली आहे- प्रताप सरनाईक
पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची आहे. व्यापाऱ्यांना मोर्चा काढायला परवानगी देता मग मराठी एकीकरण समिती मोर्चा काढत होती तर तुम्हाला काय अडचण होती? त्यांना मोर्चा का काढू दिला नाही. यामुळे महायुती सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे
गृहखात्याचे आदेश नव्हते तरी देखील पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावरून धरपकड केली ह्याची माहिती घेत आहोत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे आहे. जे सुरू आहे मीरारोड मधे हे अत्यंत चुकीच आहे
कुणाल कामरला येत्या दोन दिवसात हक्कभंग नोटीस पाठवली जाणार
कामराला देण्यात येणारी नोटीस तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पाठवली जाणार
कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत गाण्याच्या माध्यमातून केली होती टीका
सुषमा अंधारेंना सुद्धा हक्कभंग समितीची नोटीस पाठवली जाणार आहे
अंधारे यांनी कामराचे समर्थन करताना विधीमंडळाचा अवमान करणारी भाषा वापरल्याचा आरोप
MNS Mira Bhayandar Morcha: मिरा-भाईंदरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मंगळवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आज सकाळी दहा वाजता बालाजी हॉटेलपासून (Balaji Hotel) या मोर्चाला सुरुवात होणार होती. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी मनसेच्या अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. अनेक कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. यानंतर मनसेचे (MNS) नेते संदीप देशपांडे यांनी आम्ही मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचे म्हटले होते. मात्र, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता शिंदे (Datta Shinde) यांनी मिरा-भाईंदरमध्ये नागरिकांनी मोर्चासाठी एकत्र येऊ नये. अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. सविस्तर बातमी साठी इथे क्लिक करा
मीरा रोड येथे आज होत असलेल्या मराठी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वसई विरारमधील बऱ्याच मनसे पदाधिकाऱ्यांना पहाटे तीन वाजता घरातून उचलून विविध पोलीस ठाण्यात बसवण्यात आले आहे. नालासोपारा पोलीस ठाणे, विरार पोलीस ठाणे, नायगांव पोलीस ठाणे, वालीव पोलीस ठाणे आदी ठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ठेवण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने पालघर लोकसभा अध्यक्ष जयेंद्र पाटील, माजी नगरसेवक आणि शहर सचीव प्रफुल्ल पाटील, वसई शहर संघटक राकेश वैती, शहर अध्यक्ष प्रवीण भोईर, विरार शहराध्यक्ष विनोद मोरे, नालासोपारा उपशहराध्यक्ष संजय मेहरा, नालासोपारा विभागध्यक्ष दिलीप नेवाळे, कल्पेश रायकर, वाहतूक सेना अध्यक्ष पांडुरंग लोखंडे आदींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Mira Bhayandar MNS Morcha : अमराठी व्यापाऱ्यांच्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज मीरा-भाईंदर शहरात मोर्चा (Mira Bhayandar MNS Morcha) काढण्यात येणार आहे. मात्र, पोलिसांनी (Police) या मोर्चाला परवानगी नाकारली असून, प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली होती. त्याअंतर्गत, पोलिसांनी सोमवारपासून मनसे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा देण्यास सुरुवात केली होती. मात्र, मंगळवारी पहाटे पोलिसांनी आणखी कठोर पाऊल उचलले. सकाळी साडेतीन वाजता, मोठ्या पोलीस फौजफाट्यासह त्यांनी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांचे निवासस्थान गाठले आणि त्यांना ताब्यात घेतले. यापूर्वीच त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, अविनाश जाधव मोर्चात सहभागी होण्यावर ठाम होते. त्यांनी मराठी बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील केले होते. सध्या अविनाश जाधव यांना काशिमीरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. यानंतर मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) चांगलेच आक्रमक झाले आहे. पूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
महादेव मुंडे खून प्रकरणी विजयसिंह बाळा बांगर यांनी केलेल्या धक्कादायक दाव्यानंतर त्याचा बीड पोलिसांनी नोंदवून घेतला होता आता यानंतर मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी आज बीड पोलीस अधीक्षकांची सकाळी ११ वा.भेट घेणार आहेत.
या भेटीमध्ये महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करणार असून याबाबतचे एक निवेदन देखील पोलीस अधीक्षकांना देणार आहेत...
पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर महादेव मुंडे यांचे कुटुंब विजयसिंह बाळा बांगर यांची भेट घेणार असून त्यांच्यासोबत संवाद साधणार आहेत.
Crime News: उसने घेतलेले पैसे लवकर परत दिले नाही अशा आर्थिक वादातून चार महिलांनी माय लेकींना लाकडी दांड्याने जबर मारहाण केल्याची घटना बुलढाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा गावात घडली . या संपूर्ण मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे. याप्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी मारहाण करणाऱ्या विमल धांडेकर , कमल धांडेकर , सुमन चव्हाण , दिपाली मंजुळकर अशा चौघीनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर मायलेकींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संजय शिरसाठ प्रकरणाचे राजधानी दिल्लीत पडसाद
आयकर विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीत चर्चा
विरोधी पक्षांच्या महिला खासदार सदस्यांकडून मुद्दा उपस्थित
आयकर विधेयकावरील तरतुदींवर चर्चा करताना संजय शिरसाठ प्रकरणाचा उल्लेख
विश्वसनीय सूत्रांची माहिती
मुंबईत मध्यरात्री वृक्षतोड करण्याचा डाव हाणून पाडला, कुर्ला आयटीआय परिसरात केली जाणार होती वृक्षतोड
मुंबईच्या कुर्ला पश्चिम येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे आयटीआय परिसरात एक वर्षापूर्वी मियावकी पद्धतीने लावलेली ९ हजार झाडे लावली गेली होती.
जी कोणतीही परवानगी न घेता मध्यरात्री तोडली जाणार होती.
यासाठी दोन व्यक्ती जेसीबी घेवून पोहचलेही आणि त्यांनी संरक्षक भिंत तोडून झाडे जमीनदोस्त करायला सुरूवात केलीच होती, तोवर शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी मनिष मोरजकर यांच्या नेतृत्वात शिवसैनिक पोहचले.
झाडे तोडण्याच्या तयारीत असलेल्या दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तसंच मुंबई महापालिकेच्या गार्डन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही पोलिसांत याविषयी तक्रार दाखल केलीय.
आयटीआय परिसरातील ९ हजार झाडांचे अर्बन फॉरेस्ट तोडण्यामागे त्यांचा नेमका काय उद्देश होता? हे समोर आले नसले तरी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी एक्स वर पोस्ट करत यामागे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढांचा हात असल्याचा आरोप केलाय.
स्विमिंग पूल बांधण्यासाठी हिंदूस्थान पेट्रोलियमच्या सीएसआर फंडातून लावण्यात आलेली झाडे तोडून त्याठिकाणी स्विमिंग पूल बांधणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय.
सोलापूर : स्वामी समर्थ भक्तांसाठी एक आनंदाची बातमी
यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच गुरु पौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थांचे मंदिर दर्शनासाठी 22 तास खुले राहणार
वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांची माहिती
गुरुवार 10 जुलै रोजी होतेय यंदाची गुरु पौर्णिमा, त्यामुळे बुधवारच्या मध्यरात्री 2 पासून गुरुवार रात्री 12 पर्यंत मंदिर सुरु राहणार
गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी हजारो स्वामीभक्त अक्कलकोट मध्ये येतात
मात्र यापूर्वी पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असायचे
मात्र यंदाच्या वर्षी स्वामीभक्तांच्या सोयीसाठी मंदिर पहाटे 2 ते रात्री 12 पर्यंत सुरू राहणार आहे
गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर स्वामी भक्तांना दर्शनाची ओढ लागलेली असते त्यामुळे वटवृक्ष देवस्थानकडून हा निर्णय घेण्यात आलाय
विशेष म्हणजे भक्तांच्या दर्शन रांगेसाठी पत्रा शेड उभारण्यात आलेय.
यंदाच्या वर्षी स्वामी भक्तांसाठी देवस्थाकडून मोठ्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्यात
नागपूर महानगर पालिकेने शहरातील 241 इमारतीला धोकादायक इमारती म्हणून घोषित केल्या आहे.
बहुतांश इमारती मध्ये घरमालक व भाडेकरू यांच्यात वाद न्यायप्रविष्ट असल्याने धोकादायक इमारत म्हणून नागपूर महानगर पालिकेने नोटीस दिल्या नंतर त्या अजीर्ण इमारती मध्ये नागरिकांचे वास्तव पाहायला मिळत आहे.
त्यामुळे अशा इमारतीमध्ये मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारत येत नसल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
तर जुन्या वस्तीत पडीक अजीर्ण घर देखील घोकादायक स्थितीत आहे. मात्र तिथे कुणाचे वास्तव नसल्याने तेथे धोका कमी असला तरी तो पण एक चिंतेचा विषय आहे.
झोन निहाय्य धोकादायक इमारती
झोन धोकादायक इमारती
लक्ष्मीनगर 14
धरमपेठ 13
धंतोली 25
हनुमाननगर 04
नेहरूनगर 14
गांधीबाग 73
लखडगंज. 09
आरसीनगर 18
मंगळवारी 68
Satara: सातारा जिल्ह्यातील कराड येथील काले गावातील 71 वर्षीय शेतकरी लक्ष्मण शंकर करपे यांची गेली दहा ते पंधरा दिवस झाले म्हैस चोरीस गेली आहे.पोलिसांच्या कासवाच्या गतीने सुरू असलेल्या तपासाला कंटाळून चोरीस गेलेली म्हैस शोधून देणाऱ्यास ५ हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येईल अशी ऑफर ठेवली आहे. जो कोणी म्हैस शोधून देईल त्याला ५ हजार रुपये बक्षीस देऊ असे संबंधित शेतकऱ्यानं सांगितलं आहे.म्हैशीचा तपास पोलिसांकडून अजून सुरु आहे...पोलिसांच्या कासवगतीने केल्या जाणाऱ्या तपासाला कंटाळून आता शेतकऱ्यानं म्हैस शोधून देणाऱ्यास ५ हजाराचे बक्षीस देऊ असे सांगितले आहे.त्यामुळे कराड सह जिल्ह्यात आता या शेतकऱ्याची चर्चा सुरु झाली आहे..
उजनी धरणा मध्ये येणारा पाण्याचा विसर्ग 20 हजार क्युसेक पेक्षा जास्त झाल्याने सकाळी दहा वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा नदीत दहा हजार क्युसिक विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात होणार .. नदीकाठच्या लोकांना धरण प्रशासनाने दिला सावधानतेचा इशारा
गडचिरोली : कालपासून जिल्ह्यात संततदार पाऊस सुरू आहे. त्यातच गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आले असून साडेतीन लाख पेक्षा जास्त क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी आज सायंकाळपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात पोहोचण्याची शक्यता असून मोठ्या पूर परिस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. गडचिरोली जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट तर आज मंगळवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून देसाईगंज, गडचिरोली, चामोर्शी या तालुक्यात वैनगंगा तर अहेरी, सिरोंचा या तालुक्यात प्राणहिता नदीच्या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
नाशिकच्या गोदावरी नदीची पूरस्थिती आजही कायम आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्हाभरामध्ये जोरदार पाऊस पडतोय त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे. रात्रीपासून पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली त्यामुळे गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत काही प्रमाणामध्ये घट आलेली आहे. काल दुतोंडया मारुतीच्या छातीपर्यंत पाणी होतं मात्र आता हे पाणी कमरेच्या खाली पर्यंत गेले गेली आहे. तरी देखील पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा एकदा वाढला तर गंगापूर धरणातुन पाण्याचा विसर्ग हा वाढवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची देखील शक्यता आहे. आज सकाळपासून पाऊस थांबला जरी असला तरी देखील ढगाळ हवामान आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील नदी काठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
बुलढाणा : नाकाबंदी दरम्यान काल सायंकाळी मलकापूर शहराजवळ एका ट्रकच्या गोपनीय कप्प्यात ठेवलेले 39 लाख रुपयांचे पांढरे चंदन पोलिसांनी जप्त केले आहे. हा ट्रक बीड हून मध्य प्रदेशातील बुरहानपुर कडे जात होता. नाकाबंदी दरम्यान मलकापूर जवळ पोलिसांनी ट्रक चालकाला थांबण्याचा इशारा केला मात्र ट्रक चालकाने ट्रक न थांबवता बोदवड मार्गाने पळवून नेला. पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करत ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे एका गोपनीय कप्प्यात हे चंदन ठेवण्यात आलं होतं.
भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण दिल्लीला रवाना
आज भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार
भाजपा अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर नड्डाजींची पहिली भेट
अध्यक्ष झाल्यानंतर प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पुण्यात भेट घेतली
सेनगाव शहरातील गाडे ज्वेलर्स या सोने चांदीच्या दुकानावर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी डल्ला मारला असून लाखो रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यावर हात साफ केला आहे. सेनगाव शहरांमध्ये सोन्या चांदीचे दागिने विक्री करणारे गाढे ज्वेलर्स हे नामांकित दुकान आहे मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास दोन ते तीन चोरट्यांनी दुकान चे शटर तोडून दुकानांमध्ये प्रवेश केला दुकानात असलेले सर्व सोन्या-चांदीचे दागिने पूर्णपणे या चोरट्यांनी लंपास केले आहे लाखो रुपयांचा ऐवज या चोरांनी लंपास केला आहे दरम्यान ही चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून चोरटे कशा पद्धतीने दुकानावर दागिने पिशवीमध्ये भरून पसार झाले आहेत हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये पाहायला मिळत आहे
Ratnagiri News: ऐन जुलैच्या महिन्यात कोकणात श्रावण सरी बरसत आहेत. पाऊस कमी असल्यामुळे कोकणातलं निसर्ग सौंदर्य देखील अधिक खुलले आहे. शिवाय धरणं पूर्ण क्षमतेने भरलेली असल्यामुळे ती ओसंडून वाहत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील खोरनिनको धरण देखील पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाच्या सांडव्यातून फेसाळत कोसळणारे पाणी लक्षवेधी ठरते. त्यामुळे इथं जिल्हासह बाहेरच्या जिल्ह्यातील पर्यटकांची देखील मोठ्या संख्येने गर्दी होते. धरणाच्या सांडव्यातून कोसळणारे हे पाणी प्रत्येकाला इथं खिळवून ठेवते.
Ratnagiri News: ऐन जुलैच्या महिन्यात कोकणात श्रावण सरी बरसत आहेत. पाऊस कमी असल्यामुळे कोकणातलं निसर्ग सौंदर्य देखील अधिक खुलले आहे. शिवाय धरणं पूर्ण क्षमतेने भरलेली असल्यामुळे ती ओसंडून वाहत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील खोरनिनको धरण देखील पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाच्या सांडव्यातून फेसाळत कोसळणारे पाणी लक्षवेधी ठरते. त्यामुळे इथं जिल्हासह बाहेरच्या जिल्ह्यातील पर्यटकांची देखील मोठ्या संख्येने गर्दी होते. धरणाच्या सांडव्यातून कोसळणारे हे पाणी प्रत्येकाला इथं खिळवून ठेवते.
Hingoli News: सेनगाव शहरातील गाडे ज्वेलर्स या सोने चांदीच्या दुकानावर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी डल्ला मारला असून लाखो रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यावर हात साफ केला आहे. सेनगाव शहरांमध्ये सोन्या चांदीचे दागिने विक्री करणारे गाढे ज्वेलर्स हे नामांकित दुकान आहे. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास दोन ते तीन चोरट्यांनी दुकान चे शटर तोडून दुकानांमध्ये प्रवेश केला दुकानात असलेले सर्व सोन्या-चांदीचे दागिने पूर्णपणे या चोरट्यांनी लंपास केले आहे. लाखो रुपयांचा ऐवज या चोरांनी लंपास केला आहे. दरम्यान ही चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून चोरटे कशा पद्धतीनं दुकानावर दागिनं पिशवीमध्ये भरून पसार झाले आहेत. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये पाहायला मिळत आहे.
Bonalu Festival At Sri Tulja Bhavani Temple: आषाढ महिन्यात तेलंगणा येथे बोनालू उत्सव साजरा केला जातो. हैदराबाद येथील भाविकांकडून तुळजाभवानी मंदिरात या उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी हैद्राबाद येथील भाविक आदिशक्ती श्रीतुळजाभवानी मातेची प्रतिकृती घेऊन तुळजापूरला भवानीमाता मंदिरात येतात. या प्रतिकृतीशी श्री भवानीमातेची भेट घडवून येथे नाचत गात बोनालू सण साजरा करतात. मागील काही वर्षांपासून ही प्रथा चालू आहे. पोतराजाच्या वेशभूषित नृत्य करत यावर्षीही मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करण्यात आला.
Mira Bhayandar MNS Morcha: मराठी अस्मिता आणि मराठी भाषा या मुद्द्यांवर मीरा भाईंदरमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं मोर्चाची हाक दिलीय. पोलिसांनी या मोर्चाआधी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा जारी केल्या आहेत. काल रात्री साडेतीन वाजता पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं. तर वसई विरारमधीलही अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र कारवाई झाली तरी मोर्चा निघणारच असा ठाम पवित्रा मनसेने घेतलाय. आज सकाळी 10 वाजता बालाजी हॉटेल ते मीरारोड स्टेशनपर्यंत हा मोर्चा निघणार आहे.
Mira Bhayandar MNS Morcha: मराठीच्या मुद्द्यावर आज मीरा भाईंदरमध्ये मनसेकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. त्या मोर्चाआधी पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलंय. पहाटे 3.30 वा. पोलिसांनी जाधवांना ताब्यात घेण्याची कारवाई केली. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांनी कालच मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनेक नेत्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
Mira Bhayandar MNS Morcha: मीरा भाईंदरमधील मोर्चाआधी अविनाश जाधव यांना पोलिसांनी पहाटे साडेतीन वाजता घेतलं ताब्यात, तसेच वसई विरारमधील अनेक मनसे पदाधिकाऱ्यांनाही घेतलंय ताब्यात
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Updates: सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्र विधीमंडळात सत्कार; देवेंद्र फडणवीस म्हणाले...