Maharashtra LIVE Updates: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाडवा मेळाव्याचा मार्ग मोकळा, दादरच्या शिवाजी महाराज मैदानात राज ठाकरेंची तोफ धडाडणार
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, बातम्या आणि विविध घटनांचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. राज्यात आज नेमकं काय घडतंय?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाडवा मेळाव्याचा मार्ग मोकळा
मनसेच्या गुडी पाडवा मेळाव्याच्या परवानगीला मान्यता
दादर शिवाजी महाराज मैदानात ३० मार्चला होणार मेळावा.
मुंबई पालिका आणि पोलिस प्रशासनाची मिळाली परवानगी मनसेला परवानगी
राज्यभरातून येणाऱ्या मनसैनिकाना राज ठाकरे करणार संबोधित.
मुंबईच्या शिवाजी पार्कवर मनसेच्या राज ठाकरेंच्या या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका मांडणार?
महापालिकेची पक्ष बांधणी ते महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणावर राज ठाकरे घेणार भूमिका
अमरावती : शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण आज पार पडणार आहे. या समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रतिष्ठेचा 'डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2024' ने सन्मानित करण्यात येणार आहे. पाच लाख रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच या सोहळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या दाननिधीतून विदर्भातील उत्कृष्ट शेतकरी महिलेला 'शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार 2024' आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने 'श्रीमती विमलाबाई देशमुख शेतीनिष्ठ महिला शेतकरी पुरस्कार 2024' असे दोन पुरस्कार उत्कृष्ट महिला शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहेत.
विक एंड असल्यानं मुंबईकर मोठ्या संख्येने शहराबाहेर पडलेत. परिणामी पुणे-मुंबई एक्सप्रेसवे मंदावला आहे. बोरघाटातील अमृतांजन पुलाजवळ वाहतूक कासवगतीने पुढं सरकत आहे. त्यामुळं वाहतूक मंदावली आहे. ही वाहतूक सुरळीत करण्यातसाठी पोलिसांनी दहा-दहा मिनिटांचे ब्लॉक घ्यायला सुरुवात केलीये. मुंबईकडे जाणारी वाहतूक दहा मिनिटांसाठी थांबवून दोन्ही दिशेने वाहतूक पुण्याच्या दिशेला सोडली जातीये. पुढील काही वेळात पुण्याकडे येणारी वाहतूक पूर्ववत होईल, असा विश्वास महामार्ग पोलिसांना आहे.
शिर्डी : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत आज विठूनामाचा गजर होतोय. 13 व अखिल भारतीय मराठी संत साहित्य दोन दिवसीय संमेलनाला आजपासून शिर्डीत प्रारंभ होत आहे. शिर्डी शहरातून सकाळी वारकऱ्यांनी विठूनामाचा गजर केला पालखी काढली. आज आणि उद्या दोन दिवस हे संमेलन पार पडणार असून यासाठी राज्यभरातील विविध साहित्यिकांसह वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
म्हाडाने गोरेगावातील नव्याने बांधलेल्या वसाहतींची ३५ लाखांची मुंबई महापालिकेची पाण्याची बिले थकवली
सोबतच, म्हाडाकडून २० लाखांच्या जवळपास इमारतींची वीज बिलं देखील थकीत
बिले थकवल्याने महापालिकेकडून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न
मुंबई महापालिकेकडून मागील १० दिवसांपासून इमारतींना अपुरा पाणीपुरवठा
महापालिकेकडून इमारतींना बिले थकीत असल्याच्या नोटीस
म्हाडाकडून हॅंडओव्हर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने इमारतींच्या सोसायटींच्या हाती अपुरा कारभार, अशात सोसायट्या बिलं भरण्यास हतबल
म्हाडा आणि महापालिकेकडून जवळपास २ हजार ८०० कुटुंबियांना वेठीस धरण्याचा प्रयत्न
गोरेगावमधील बांगूर नगर आणि प्रेम नगर परिसरात नव्याने बांधलेल्या इमारतींची बिले थकवली
Gondia: गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील चिंताटोला येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह मध्यप्रदेश राज्याच्या किरणापुर पोलीस स्टेशन हद्दीतील बगडमारा जंगल परिसरात गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळलेला आहे. विकास बघेले (30) असे मृतक तरुणाचे नाव आहे... मृतक तरुण हा गोंदिया येथे खाजगी नोकरी करायचा तो 18 मार्चपासून बेपत्ता होता.. याप्रकरणी विकासच्या कुटुंबीयांनी गोंदियाच्या रामनगर पोलिसांमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.. त्यानंतर विकासचा शोध घेत असताना कुटुंबीयांना त्याचा मृतदेह मध्यप्रदेश राज्याच्या बगडमारा या गावाच्या जंगलात आढळला आहे.. कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून त्या दृष्टिकोनातून पोलीस तपास करत आहेत.

Sangli News : सांगलीतील कडेगाव तालुक्यातील वांगी येथे दोन कारची समोर समोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात सातारा जिल्ह्यातील खटाव मधील दांपत्याचा मृत्यू झालाय. विकास मोहिते आणि पुष्पा मोहिते अशी त्यांची नावे आहेत. दोघेही वाळवा तालुक्यातील ताकारी येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटपून गुरुवारी रात्री उशिरा ते खटावकडे परतत होते. यावेळी महाबळेश्वरहून वांगी कडे परतत असणाऱ्या कारने त्यांना समोरून धडक दिली. दोन कारची समोर - समोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दांपत्य जागीच ठार झाले. तर या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचा मात्र अक्षरशः चक्काचूर झालाय.
- हिंसाचाराच्या घटनेनंतर आज सहाव्या दिवशीही नागपूर शहरातील नऊ पोलीस स्टेशन अंतर्गत कर्फ्यू कायम आहे.
- सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीनंतर नागपूर शहरातील 11 पोलीस स्टेशन हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली होती.
- गणेशपेठ, कोतवाली, तहसील, लकडगंज, पाचपावली,शांतीनगर,सक्करदरा, इमामवाडा आणि यशोधरानगर या पोलीस स्टेशन हद्दीत संचारबंदी लावण्यात आली आहे
- संचार बंदीमुळे या परिसरातील सामान्य जनजीवनावर याचा परिणाम होतोय
-
- दोन पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी गुरुवारी नागपूर पोलीस आयुक्तांनी आदेशाद्वारे उठवली
- मात्र आज सहाव्या दिवशी उर्वरित नऊ पोलीस स्टेशन हद्दीत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.
Patan News : पाटण शहरात बिबट्याचा संचार वाढला असून तहसील कार्यालयासमोरील पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. तर टोळेवाडी रस्त्यावर वाहन चालकांना बिबट्याचे दर्शन झाल्याने वन विभागाने पिंजरा लावण्याची मागणी लोक करत आहेत.
पुण्यातील वसंतदादा शुगर इंस्टिट्यूटमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार येणार एकत्र
पुण्यातील मांजरी येथील वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी दोन्ही नेते येणार एकत्र
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलची होणार आहे बैठक
या बैठकीसाठी हे दोन्ही नेमके एकत्र असणार
-त्याशिवाय जयंत पाटील, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर असे साखर उद्योगातील नेतेही या बैठकीला उपस्थित असणार
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्याने तिरंगी लढती होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले. विद्यमान चेअरमन माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सत्ताधारी गटा विरोधात भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये बिघाडी झाल्याने तिरंगी लढत होणार आहे.
सत्ताधाऱ्या विरोधात विद्यमान आमदार मनोज घोरपडे आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील यांचे पॅनेल असणार आहे. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ आणि काँग्रेसचे कराड तालुका अध्यक्ष निवास थोरात या तिघांचे मिळून एक पॅनेल असणार आहे. या तिरंगी लढतीमुळे आता मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
गडचिरोली : बकऱ्या चारण्यासाठी जंगलात गेलेल्या गुराख्याचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना गडचिरोलीच्या कोणसरी गावात घडली. शंकर शिंपतवार असे मृतक गुराख्याचे नाव आहे. उमरी येथील शंकर शिंपतवार बकऱ्या चारण्यासाठी कोनसरी लगतच्या जंगलात गेले होते. सायंकाळच्या सुमारास विजांच्या गडगडाटसह पाऊसाला सुरवात झाली. यावेळी शंकर यांच्या अंगावर वीज कोसळली आणि ते जागीच गतप्राण झाले. घटनेची माहिती मिळताच तलाठी नाईक आणि पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून दगड वातावरण असून काल काही ठिकाणी हलका पाऊस झाला.
प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलीस चंद्रपूरला रवाना. पत्नीचा जबाब नोंदवल्यानंतर कोरटकर चंद्रपूरला गेल्याची माहिती. जुना राजवाडा पोलीस, एलसीबी आणि सायबर शाखेचे पोलीस चंद्रपूरला रवाना. कोरटकरच्या नातेवाईक आणि मित्रांकडे चौकशी सुरू
आयपीएलच्या 18व्या सत्राला आजपासून ऐतिहासिक इडन गार्डन्स स्टेडियमवरून सुरुवात होणार. पहिला सामना हा गतविजेता कोलकत्ता नाईट रायडर्स आणि रॉयल चँलेंजर्स बंगळुरू या दोन संघात पार पडणार आहे. सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळण्यात येणार. उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आणि लोकप्रिय गायिका श्रेया घोष रंग भरणार असल्याची माहितीही समोर येत आहे. मात्र आयपीएलच्या यंदाच्या पहिला सामनाच रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने गुरुवार ते रविवार या कालावधीत दक्षिण बंगाल परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या लढतीच्या दिवशी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून याशिवाय रविवारी येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
मागेल त्याला सोलार पंप योजना फक्त कागदावरच, अनेक शेतकऱ्यांना पैसे भरूनही सहा महिन्यापासून सोलार पंप मिळेना. धाराशिव जिल्ह्यात 17 हजार शेतकऱ्यांना पैसे भरूनही सोलर पंप मिळालेले नाही, कधी मिळणार याबाबतही शेतकऱ्यांना स्पष्टता नाही. जिल्ह्यात 61 हजार शेतकरी सोलार पंपासाठीच्या ऑनलाइन प्रक्रियेत अडकलेले. सोलार पंप कंपनी निवडणे, स्पॉट सर्वे रखडले. तसेच मुख्यमंत्री सौर पंप योजना, कुसुम योजनेतील अर्जदार शेतकरीही सोलर पंपासाठी वेटिंगवरच.
मुंबईतील रुग्णालयांत शेकडो मेट्रिक टन कचरा. महापालिकेची विशेष स्वच्छता मोहीम. स्वच्छ आणि सुंदर शहरासह मुंबईकर निरोगी राहावेत, या हेतूने महानगरपालिका प्रशासनाने विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या स्वच्छता मोहिमेला व्यापक स्वरूप देत शासकीय, महानगरपालिका आणि खासगी रूग्णालयांमध्येही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दररोज सकाळी ११ ते दुपारी १ या दोन तासांच्या कालावधीत राबवलेल्या मोहिमेतून तब्बल ५६० मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. तसेच, ५५४ मेट्रिक टन राडारोडा आणि २२५ टाकाऊ वस्तूही गोळा करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. महापालिकेने सुमारे ६१५ विविध अद्ययावत यंत्रे आणि १५ हजार मनुष्यबळाच्या साहाय्याने ही मोहीम पूर्ण केली.
नागपूर हिंसाचार प्रकरणी काँग्रेसची 'सत्यशोधक समिती' आज नागपुरात. पोलीस, प्रशासन, नागरिक यांच्याशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसची समिती करणार प्रयत्न. नागपुरात झालेल्या हिंसाचाराचे कारणे काय त्या पाठीमागे कोण जबाबदार आहेत याचा शोध घ्यायचा प्रयत्न काँग्रेसचे ही सत्यशोधक समिती करणार आहे. या समितीचा अहवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार. समितीमध्ये माणिकराव ठाकरे,यशोमती ठाकूर, नितीन राऊत,हुसेन दलवाई, साजिद पठाण, विकास ठाकरे, प्रफुल गुडधे यांचा समावेश. पोलिसांनी परवानगी दिल्यास हिंसाचार ग्रस्त प्रभावित भाग असलेला महाल, भालदारपुरा परिसरात समिती जाणार
भात पिकाची केलेली लागवड बघण्याकरिता गेलेल्या पुष्पा बनकर (३७) या महिलेचा मृतदेह शेतशिवारात आढळून आला होता. ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील शिवनी मोगरा गावाच्या शितशिवारात उघडकीस आली. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी तपासाअंती गावातीलचं संशयित आरोपी खुशाल पडोळे (२७) याला चौकशीसाठी ताब्यात घेवून अटक केली. मृतक महिला ही विधवा असून तिला एक मुलगी आहे. कुठल्या कारणानं महिलेची हत्या केली याचा शोध लाखनी पोलीस करीत आहे.
नेरूळ शिकवणे येथील सुबोधा केमिकल कंपणी मध्ये मध्यरात्री आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. या आगीत कोणीही जखमी झालेले नाही. नेरूळ अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल आगीवर नियंत्रण मिळविले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात रहिवासी असलेले सतीश राक्षसे यांना यांना त्यांचा मित्र असलेला जितेंद्र कांबळे याने आणि त्याचा एक सहकारी मित्र नदी दिबाकर याने तलाठी पदाच्या नोकरीचे आमिष देऊन 16 लाख रुपयाची फसवणूक केल्याचा प्रकार हिंगोली च्या वसमत शहरांमध्ये उघड झाला आहे याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात दोन आरोपीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरणात मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पार्टीचे कार्याध्यक्ष हमीद अन्सारी व मोहमद शहजाद खान दोघांना अटक. सोशल मीडियाच्या माध्यमातून यांनी हिंसाचाराचा अशी कट रचल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. युट्युब चॅनेलच्या माध्यमातून हमीद अन्सारी हा हिंसाचाराच्या दिवशी सकाळी समाजात भीती पसरवत असल्याचे दिसून आले. तो लोकांना मुजाहिदीन साठी देणग्या गोळा करण्याची विंनती करत होता त्यात त्यानं गाझा देणगीची मागणी केली हे सायबर तपासात पुढे आले. मुख्य आरोपी पैकी एक फहीम खान हा हमीद एंजिरियाच्या पक्षाचा सदस्य असल्याने नियोजनबद्द हिंसाचाराचे धागेदोरे जुळताना दिसत आहेत.
राज्य शिक्षण मंडळाचे बोर्ड तेच मात्र; अभ्यासक्रम सीबीएसई बोर्डाच्या धर्तीवर. राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम ठरवतांना सीबीएसई पॅटर्न मार्गदर्शक मानला जाणार. भाषा; इतिहास; भूगोल या विषयांचा अभ्यासक्रम राज्य शिक्षण मंडळच ठरवणार. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात ७०% - ३०% फॉर्म्युला. ७० टक्के सीबीएसई तर ३० टक्के राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असणार. भाषा आणि इतिहास विषयाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके छापण्याची जबाबदारी राज्य शिक्षण मंडळाची असेल... १ जूनला शाळा सुरू झाल्यानंतर लगेच शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
लोकांना चिथावणी देऊन हिंसाचार केल्याच्या प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या फहीम खानने त्याच्या जामीनसाठी सत्र न्यायालयात वकिलांमार्फत अर्ज दाखल केले. त्याच्या विरोधातले सर्व आरोप खोटे आहे म्हणून त्याची जामिनावर मुक्तता करण्यात यावी असे मत त्यांने आपल्या जामण्यासाठीचे अर्जातून मांडले आहे. आरोग्यविषयक कारणे सांगितल्यामुळे आधीच फहीम खान याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती.
काल मध्यरात्री एकच्या सुमारास शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर एका मालाचा साठा असणाऱ्या गोडाऊनमध्ये आग लागली होती. अग्निशमन दलाची सहा वाहने व जवान यांनी आगीवर नियंञण मिळवत आग पूर्ण विझवली. जखमी कोणी नाही .
नागपूर हिंसाचारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदा नागपूरमध्ये येणार आहेत. फडणवीस आपल्या विधानसभा मतदारसंघात जाणार आहेत. शु्क्रवारी रात्री ते नागपूरसाठी रवाना झाले होते. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटी घेतील.
पार्श्वभूमी
राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीचा वाद गाजत आहे. या मुद्द्यावरुन काही दिवसांपूर्वी नागपूरच्या महल आणि हंसापुरी भागात दंगल उसळली होती. या पार्श्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचा दौरा करणार आहेत. त्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात काय घडणार, याकडेही साऱ्यांच्या नजरा आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दररोज शाब्दिक वाद, हल्ले-प्रतिहल्ले सुरु आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -