Maharashtra News LIVE Updates : संतोष बांगर यांच्याविरोधात फेसबुक पोस्ट भोवली, ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांच्यावर गुन्हा दाखल
Maharashtra News LIVE Updates : राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा वाचा एका क्लीकवर..
ठाकरे गटाच्या हिंगोलीच्या नेत्या अयोध्या पोळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या घरासमोर गोळीबार झाल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हसन मुश्रीफ यांची आव्हाड यांच्यावर टीका
मनुस्मृतीचे दहन करायचे होते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यावर फोटो छापण्याची गरज काय?
त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जनतेचा अपमान केला आहे
केवळ माफी मागून होणार नाही
जितेंद्र आव्हाड यांना अद्दल घडवण्याची गरज
चालत्या रेल्वेतून धूर यायला लागला धूर
अचानक धूर येत असल्यामुळे गाडी थांबली
खंडाळा स्टेशनहून गाडी मुंबईकडे निघाली तेव्हा घडली घटना
लोक घाबरून पळत सुटले
जवळपास १५ मिनिटे झाला गोंधळ
आता परिस्थिती नियंत्रणात
ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात वसंत विहार येथे करण्यात आले आंदोलन
भाजप वाहतूक सेल अध्यक्ष प्रशांत मोरे आणि पदाधिकारी यांनी केले आंदोलन
आव्हाड यांच्या पोस्टरला काळे फासून केले आंदोलन, तसेच जोडे मारून करण्यात आला निषेध
मध्य रेल्वेच्या ठाणे आणि सीएसएमटी स्थानकांवर एकाच वेळी महा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. ठाणे स्थानकात आज रात्रीपासून पुढील 63 तास मेगाब्लॉक असेल. तर सीएसएमटी स्थानकात शनिवारी आणि रविवारी असा 36 तासांचा मेगाब्लॉक असेल. या दोन्ही मेगाब्लॉकमुळे शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवशी मध्य आणि हार्बर मार्गावर एकूण 956 लोकल रद्द केल्या जाणार आहेत. तर या तीन दिवसात एकूण 72 लांब पल्ल्यांच्या गाड्यादेखील रद्द असतील. ज्या लोकल सुरू असणार आहेत त्यादेखील कर्जत, कसारा ते दादर आणि भायखळापर्यंतच धावतील. सीएसएमटी ते भायखळा पूर्णतः बंद असेल. त्याचप्रमाणे हार्बर लाइनवरदेखील पनवेल पासून घड्याळापर्यंतच लोकल धावतील. त्यापुढे लोकल धावणार नाहीत. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द केल्याने प्रवाशांना याचा नक्कीच त्रास होणार आहे.
जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यासाठी नागपुरातील संविधान चौकावर भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चा चा निषेध आंदोलन सुरू असताना कार्यकर्त्यांनी आव्हाड यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, आंदोलन करणारे कार्यकर्ते तसेच पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या हातून पुतळा हिसकावण्याच्या प्रयत्न केला असता, कार्यकर्ते तिथून पळून गेले. तर काही कार्यकर्त्यांनी पुतळा पेटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग विझविण्यात आली.
सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या शुटर्सना मदत करणाऱ्या बिष्णोई टोळीतील 3 संशयित पोलिसांच्या ताब्यात
चंदीगड पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या तीन सदस्यांना अटक केले आहे.
सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार करण्यासाठी अटक करण्यात आलेल्या नेमबाजांना मदत केल्याप्रकरणी ही अटक केली आहे
गुन्हे शाखेचे डीएसपी उदय पाल यांनी सांगितले की, चंदीगडच्या दादुमाजरा कॉलनीतून रविंदर सिंग आणि पंजाबच्या फाजिल्का येथून जावेद झिंझा यांना २५ मे रोजी अटक करण्यात आली होती.
त्यांच्या चौकशीनंतर दुसऱ्या दिवशी मोहाली-रहिवासी करण कपूरला अटक करण्यात आली
स्थानिक न्यायालयाने सोमवारी त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली
चंदीगडमध्ये बिश्नोई आणि लकी पटियाल टोळीचे सदस्य असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस 18 मे पासून या तिघांचा माग काढत होते
ते मोबाईल ॲप्सद्वारे संवाद साधून अटक टाळत होते
रविंद्र धंगेकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
एक्साईज मंत्री संभूराजे देसाई यांच्यावर व त्या विभागावर केलेल्या वक्त्व्यावरून धंगेकर यांना
पाठवणार नोटिस
तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडेही करणार तक्रार
पुणे कार अपघातप्रकरणी धंगेकर यांनी केले होते आरोप
याच आरोपांवरून आता धंगेकरांना करावा लागणार कायदेशीर बाबींचा सामना
संजय राऊत यांनादेखील काल कोर्टाची धाडली होती नोटीस
राऊतांपाठोपाठ आता धंगेकरांनाही जाणार नोटीस
ठाणे : जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ठाणे भाजप रस्त्यावर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या खाली आंदोलन
थोड्याच वेळात आमदार संजय केळकर होणार सहभागी
आज देखील विदर्भात उष्णतेची लाट काय राहणार असून नागपूर वेध शाळेने नागपूर, वर्धा व चंद्रपूर या तीन जिल्ह्याला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेला नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे असा सल्ला देखील जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
उत्तराखंडहून ड्रग्ज तस्करीसाठी आलेल्या दोघांना मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून अटक
या दोन्ही आरोपींकडून 1 कोटी 12 लाखांचे उच्च प्रतीचे हेराॅईन पोलिसांनी जप्त केले आहे
हे दोघंही बोरिवलीत ड्रग्ज डिलिवरीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना होती
त्यानुसार दोघांना सापळा रचून पोलिसांनी अटक केली आहे
या दोघांना न्यायालयाने 3 जून पर्यंत पोलिसक कोठडी सुनावली आहे.
दमानिया ह्या सुपारी घेऊन आरोप करतात असं महाराष्ट्रातला पानटपरीवालाही म्हणतो हीच त्यांची समाज प्रतिमा आहे. त्या काही मृणाल गोरे नाहीत की कॉ. अहिल्याताई रांगणेकर नाहीत की तारा रेड्डी नाहीत. त्यांनी आजवर कोणाकोणाच्या सुपाऱ्या घेऊन कोणावर आरोप केले याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी केली.
पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या आईची चौकशी केली जाणार आहे. शिवानी अगरवाल यांनी डॉक्टरांना धमकवल्याचा आरोप आहे. या आरोपात काही तथ्य आहे का? याची चौकशी पोलीस करणार आहेत.
अजित पवार यांचे आव्हान अंजली दमानिया यांनी स्वीकारले
तुम्ही तुमची नार्को टेस्ट करा
तुम्ही खरे ठरले तर माझा तुम्हाला शब्द आहे यापुढे मी कोणत्याही गोष्टीवर वाच्यता करणार नाही
मी जे प्रश्न लिहून देईल त्यावरच मार्को टेस्ट झाली पाहिजे, अशी अट दमानिया यांनी ठेवली आहे.
पुणे अपघात प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आधीही सांगितले होते कोणालाही सोडणार नाही म्हणजे नाही. पुणे कार अपघात प्रकरणात योग्य प्रकारची कारवाई सुरु आहे. मात्र काहीजण या प्रकरणात राजकारण करत आहेत, त्यांचा पर्दाफाश लवकरच होईल, असे फडणवीस म्हणाले.
आता बारामतीकरांवर देखील पाणी कपातीचे संकट उडवलेला आहे. बारामती नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नीरा डावा कालव्याचे आवर्तन बंद झाले असल्यानं उपलब्ध पाणीसाठा मर्यादित आहे. त्यामुळे पर्यायाने बारामती शहरासाठी पाणी पुरवठा एक दिवसाआड केला जाणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाने सांगितले आहे. निरा डावा कालव्याचे पुढील आवर्तन मिळेपर्यंत हा एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. आज संपूर्ण बारामती शहरात पाणी पुरवठा होईल व शुक्रवारी पाणीपुरवठा होणार नाही असं नगरपरिषदेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
पार्श्वभूमी
सध्या देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. या वेळीही आमचाच विजय होणार, असा दावा सत्ताधारी भाजपकडून केला जातोय. तर दुसरीकडे यावेळी सत्तांतर होणार, असा विश्वास विरोधकांकडून व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी मनुस्मृतीचे दहन करत महाडमध्ये राज्य सरकारविरोधात आंदोलनक केले. या आंदोलनादरम्यान आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याचा दावा भाजपकडून केला जातोय. या प्रकरणी त्यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या प्रकरणावरूनही आज महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दुसरीकडे महाराष्ट्राला मान्सूनची चाहूल लागली आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी चालू केली आहे.
या घडामोडींसह राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा संपूर्ण आढावा वाचा एका क्लीकवर!
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -