Maharashtra Breaking News LIVE Updates : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...

प्रिया मोहिते Last Updated: 14 Mar 2025 09:58 AM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...आज राज्यभरात रंगपंचमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. राज्यातील ठिकठिकाणी लोक होळीचा उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत....More

होळीनिमित्त मटणामध्ये भाववाढ, ग्राहकांच्या खिषाला कात्री; मटणाच्या दुकानाबाहेर लांबच लांब रांगा

होळीनिमित्त मटणामध्ये भाव वाढ ग्राहकांच्या खिषाला कात्री... मटणाच्या दुकानाबाहेर लांबच लांब रांगा..


आज धुळवळीचा दिवस त्यात शुक्रवार आल्यामुळे चिकन आणि मटणावर ताव मारणाऱ्या खवय्याने चिकन मटन शॉप च्या बाहेर रांगा लावल्या आहेत. 


ठाण्यातील मखमली परिसरात   चिकन मटन शॉप च्या बाहेर अर्ध्या  किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या आहेत. 


महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांची वाढलेली संख्या पाहता सध्या मटणाचा भाव ८४० रुपये किलो झाला आहे 



तरी देखील नागरिक रांगा लावून मटण खरेदी करताना दिसून येत आहेत.