Lilavati Hospital Black Magic: आठ मडकी, तांदूळ, केस अन् तंत्रमंत्र विद्येचं साहित्य, लीलावती रुग्णालयात जे सापडलं ते पाहून भल्याभल्यांची बोबडी वळाली

Lilavati Hospital Black Magic: लीलावती रुग्णालयात खोदकाम करण्यात आले. त्यावेळी एका केबिनच्या फरशीखाली काळी जादू करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य सापडले.

Lilavati Hospital Black Magic case

1/10
मुंबईतील सुप्रसिद्ध लीलावती रुग्णालयात काळी जादू आणि तंत्रमंत्र विद्येचा प्रयोग झाल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.
2/10
लीलावती रुग्णालयाचे विश्वस्त विजय मेहता आणि अन्य काही जणांनी मिळून एका केबिनमध्ये फरशीच्या खाली तंत्र-मंत्राचे साहित्य पुरुन ठेवल्याचा आरोप लीलावती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक परमबीर सिंग यांनी केला. त्यांनी नुकतीच यासंदर्भात एक पत्रकार परिषद घेतली होती.
3/10
लीलावती ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी रुग्णालयात काळी जादू आणि अघोरी कर्मकांड केल्याचे त्यांनी म्हटले.
4/10
रुग्णालयातील केबिनच्या फरशीखाली 8 कलश मिळाले आहेत. या आठ मडक्यांमध्ये तांदूळ, मानवी हाडे आणि केस आढळून आली आहेत.
5/10
लीलावती रुग्णालयातील केबिनची फरशी तोडल्यानंतर या सगळ्या गोष्टी खाली लपवून ठेवल्याची माहिती समोर आली. हा प्रकार नेमका का करण्यात आला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
6/10
मात्र, मातीच्या मडक्यांमध्ये ठेवण्यात आलेली मानवी हाडे आणि केस कोणाचे आहेत, यावरुन चर्चा सुरु झाली आहे. रुग्णालयातील मृतदेहांचे अवशेष यासाठी वापरण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही.
7/10
परमबीर सिंह यांनी लीलावती रुग्णालयातील काळी जादूबाबतची तक्रार नोंदवण्यास तक्रार दिली. त्यामुळे परमबीर सिंह यांनी याबाबत न्यायालयात तक्रार दिली. त्यानंतर हा सगळा प्रकार उजेडात आला होता.
8/10
लीलावती रुग्णालय हे मुंबईतील प्रसिद्ध आणि नामांकित रुग्णालयांपैकी एक आहे. या रुग्णालयात अनेक सुप्रसिद्ध आणि श्रीमंत वर्गातील व्यक्ती उपचारासाठी येतात.
9/10
लीलावती रुग्णालयात असा प्रकार घडल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
10/10
लीलावती रुग्णालयात उघडकीस आलेल्या काळी जादू प्रकरणात आता पोलीस काय कारवाई करणार, हे बघावे लागेल.
Sponsored Links by Taboola