Maharashtra Live Blog Updates: जव्हार-डहाणू रोडवर दुचाकी- कारमध्ये भीषण अपघात, चारजण गंभीर जखमी!
Maharashtra Breaking News: मुंबईसह राज्यभरातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा.
पालघर : जव्हार-डहाणू रोडवर डेंगाची मेट येथे इको कार आणि बाईकमध्ये भीषण अपघात
अपघातात चार जण गंभीर जखमी, एका महिलेचा समावेश
जव्हारहून डहाणूकडे जात असताना घडला अपघात
दुचाकीचालकाला वाचवण्यासाठी इको कारच्या ड्रायव्हरने अचानक ब्रेक घेतल्याने अपघात
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलवली 288 विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे संपर्कप्रमुखांशी संवाद साधणार
उद्या दुपारी साडेबारा वाजता सेनाभवन येथे विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक होणार आहे
राज्यभरातील विधानसभा संपर्कप्रमुखांकडून विधानसभानिहाय आढावा उद्धव ठाकरे या बैठकीत घेतील
पुणे : पुढील 10 दिवसांत पुण्यातील पावसासंदर्भातील कामं पूर्ण झालं नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशारा सुप्रिया सुळेंनी पुणे महापालिकेला दिला आहे. त्यांनी आज पुण्यातील विविध परिसरातील पावसाच्या परिस्थितीची पाहणी केली आणि महापालिका आयुक्तांची भेट घेऊन अशी वेळ पुणेकरांवर का आली आणि ही पावसापूर्वीची कामं अजूनही पूर्ण का झाली नाहीत, असा जाब विचारला.
सोलापूर-बार्शी महामार्गांवर वैराग येथे मराठा बांधवांचा रस्ता रोको
वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाकडून आंदोलन
वैराग येथे भर पावसात मराठा बांधवांकडून आंदोलन
मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील सुरू असलेल्या आंदोलनाला वैराग येथील मराठा बांधवांनी दिला पाठिंबा
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी
सोलापूर बार्शी महामार्गावर गाड्यांच्या रांगा
महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा नाराजीनाट्य
विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये तीव्र संताप
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने परस्पर विधानपरिषदेच्या चारही जागा घोषित केल्याने नाराजी
महाविकास आघाडी असताना घोषणा करण्याच्या आधी चर्चा केली पाहिजे होती अशी काँग्रेसची भूमिका
उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्निथला आणि काँग्रेस नेते संतप्त
कोकण पदवीधर आणि नाशिकच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही
मात्र लोकसभा जागा वाटपाच्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी परस्पर उमेदवार घोषित केल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये तीव्र संताप
चंद्राबाबू नायडू यांच्या शपतविधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रण
उद्या आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी चंद्राबाबू नायडू घेणार शपथ
शपतविधीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित
उद्या सकाळी 9 वा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंध्रप्रदेशला होणाऱ्या शपतविधीसाठी मुंबईहून निघणार
वसई विरार नालासोपाऱ्यात पावसाची रिपरिप सुरु झाली आहे.
काल दिवसभर प्रचंड उष्णतेने नागरिक हैराण झाले होते
आज सकाळी साढे दहा वाजल्या पासून रिमझिमसह अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी
पावसामुळे हवेत गारवा पसरला आहे, तर ग्रामीण भागातील शेतकरीही सुखावला आहे
14 जून रोजी दुपारी महाराष्ट्र भाजपची महत्वपूर्ण बैठक
देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्या नेतृत्वात बैठक
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात रणनितीची बैठकीत चर्चा होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दादर येथील वसंतस्मृती कार्यालयात बैठक
भाजपचे जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, मुंबईतील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक
संजय राऊत यांची सत्ताधाऱ्यांवर टीका
शरद पवार भटकती आत्मा असतील तर तर केंद्र सरकारमध्ये दोन अतृप्त आत्मे आहेत
चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोन अतृप्त आत्म्यांचं तुम्ही समाधान करा
भटकती आत्मा कोणाचा पिछा सोडत नाही
नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावरून हटवत नाही तोपर्यंत आमचा आत्मा शांत होणार नाही
नरेंद्र मोदी यांना अतृप्त आत्म्यांची शांती करावी लागेल
सांगली : सांगली शहरातील संजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा खून
रात्री डोक्यात दगड घालून खून
खून झालेला 28 वर्षीय तरुण असून तो मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी
मृत सांगलीतील एका हॉस्पिटलमध्ये काम करत असल्याची माहिती
संजयनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल
एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांच्या पक्षांत जानच नाही. ओढून-ताणून हे पक्ष तयार केलेले आहेत. त्यांच्यात काय अस्वस्थता असणार. हे तिन्ही पक्ष सुपाऱ्या घेऊन तयार झालेले आहेत.एका भयातून हे पक्ष तयार झालेले आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर हल्ला करा, असं काम त्यांना देण्यात आलेलं आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. माझा बीपी कमी झाला आहे, असे डॉक्टर सांगत होते. उपचाराची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं. पण मी उपचार घेणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
लातूर जिल्ह्यातील रेणापूर मध्यम प्रकल्पात गेल्या तीन पाण्याची आवक सुरू झाली आहे
काल संध्याकाळपर्यंत या प्रकल्पाच दोन टक्के पाणीसाठा वाढला होता
रात्रभर झालेल्या तुफान पावसामुळे आवक वाढला आहे
पाणीपातळी आणखी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता
यामुळे या परिसरातील नागरिकात आनंद व्यक्त करण्यात येत आहे
रेणापूर तालुक्यात गेल्या तीन दिवसांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे रेणापूर मध्यम प्रकल्पात दोन टक्के वाढ झाली आहे.
प्रकल्पामध्ये 3.40 दलघमी जलसाठा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्याने मनसेमध्ये अस्वस्थता
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलवली बैठक
या बैठकीत निमंत्रणावरून नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता
गुरूवारी सकाळी 10.30 वाजता रंगशारदा येथे बोलावली बैठक
लोकसभेतल्या कामकाजाचा आढावा आणि विधानसभा, महानगरपालिकेच्या तयारीसाठी बोलावली बैठक
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या बदललेल्या भूमिकेनं मनसेत नाराजी
उद्याच्या बैठकीत मनसे काही वेगळा निर्णय घेणार?
वर्धा
- फॉर्च्यूनर व ऑटोचा अपघात, एक जागीच ठार
- वर्ध्याच्या हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्ग 44 वरील घटना
- हैदराबाद वरून नागपूरकडे जाणाऱ्या फॉर्च्यूनरने ऑटोला दिली धडक
- ऑटोचालक जागीच ठार, फॉर्च्यूनरमधील प्रवासी किरकोळ जखमी
- वर्धा फॉर्च्यूनरने धडक दिल्यानंतर कार दोन ते तीन वेळा उलटल्याची माहिती..
- ऑटो व फॉर्च्यूनर गाडीचे मोठे नुकसान
- अपघातानंतर काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक खोळंबली, बघ्यांची मोठी गर्दी
शरद पवार आजपासून तीन दिवस बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर
शरद पवार करणार बारामती लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी भागाचा दौरा
बारामतीत आज शरद पवारांच्या उपस्थितीत विवीध कार्यक्रमंच आयोजन
दुपारी शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार व्यापारी परिसंवाद
तर उद्या पासून शरद पवार करणार दुष्काळ पाहणी दौरा
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोली हद्दीत मोठा अपघात
पुण्यावरून मुंबईला जात असताना मालवाहू टेम्पो चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टेम्पोची धडक
अज्ञात वाहनाला धडक बसल्याने टेम्पोच्या कॅबिनचा चुराडा
यात चालक काही काळ अडकून गंभीर जखमी
चालक लोकमान्य हॉस्पिटलच्या रुग्णावाहिकेत पनवेलच्या एम . जी. एम. हॉस्पिटलला रवाना
अपघातग्रस्त वाहन बाजूला काढून तिन्ही लेन वाहतुकीस मोकळ्या
तीन वर्षांत सायबर हेल्पलाइन 1930 आणि नॅशनल सायबर-क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवरील आकडेवारीनुसार राज्यात मुंबईत सर्वाधिक 70 हजार 904 सायबर क्राइम तक्रारींची नोंद
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालये पहिल्या सहामध्ये आहेत.
2021 ते मे 2024 या कालावधीत राज्यभरात सायबर संदर्भात 2 लाख 35 हजार 443 तक्रारी प्राप्त झाल्या.
त्यापैकी 18 हजार 792 प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आली. ज्यात मुंबईतील 1 हजार 546 प्रकरणांचा सहभाग असून त्यापैकी 1 हजार 694 सोडवण्यात आले.
या प्रकरणांमध्ये सायबर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे नागरिकांचे विविध प्रकरणात नागरिकांचे 223 कोटी वाचवले
तर 3 हजार 464 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आले.
महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या या हेल्पलाईनवर दररोज 2500 ते 3000 फोन हे सायबर तक्रारींबाबत येत असतात
मात्र महाराष्ट्र सायबर पोलीस नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यात यशस्वी ठरत आहेत
आकडेवारीनुसार
मुंबई: 70 हजार 904 तक्रारी / 1546 गुन्हे दाखल
पुणे : 38 हजार 257 तक्रारी / 126 गुन्हे दाखल
ठाणे : 32 हजार 592 तक्रारी / 1 हजार 345 गुन्हे दाखल
पिंपरी चिंचवड : 30 हजार 386 तक्रारी / 63 गुन्हे दाखल
नवी मुंबई : 19 हजार 339 तक्रारी / 185 गुन्हे दाखल
मिराभाईंदर-वसई विरार: 17 हजार 148 तक्रारी / 126 गुन्हे दाखल
Nagpur Crime Gold Smuggling : नागपूरच्या विमानतळावर दोन प्रवाशांना सोने तस्करीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे.
दोन्ही प्रवाशी एअर अरेबिया फ्लाइट क्र. G9-415 ने शारजावरून नागपूरला आले होते. दोघांनी सोन्याच्या बिस्किटांसह अनेक महागडे मोबाईल लपवून आणले होते.
गोपनीय माहितीच्या आधारे दोघांची झडती घेण्यात आली त्यावेळी दोघांकडे प्रत्येकी 100 ग्रॅम सोन्याचे दोन बिस्कीट आणि मोबाईल आढळून आले आहे.
मोहम्मद तारिक शेख आणि सनी भोला यादव असे अटक करण्यात आलेल्यांची नावं असून ते दोघेही मुंबईचे रहिवासी आहेत.
ही कारवाई नागपूर सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिट आणि एअर कस्टम्स युनिटने केली आहे.
भिवंडी
भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसी येथे डायपर बनविणाऱ्या फॅक्टरीला भीषण आग
सदाशिव हायजीन प्रा. ली. या कंपनीला भीषण आग
भिवंडी, कल्याण,ठाणे येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
आगीचे कारण अजूनही अस्पष्ट आहे
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News: सध्या देशासह राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत.लोकसभा निवडणूक संपलेली असली तरी आता महाराष्ट्रातील सर्व पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. जागावाटप आणि युती, आघाड्यांचे समीकरण कसे साधता येईल यावर चर्चा केल्या जात आहेत. दुसरीकडे नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे.
देशासह राज्यातही मान्सून आला असून सर्वत्र पावसाच्या सरी बरसत आहेत. मुंबई, पुणे या ठिकाणी सध्या पाऊस पडतोय.पावसाच्या आगमनामुळे आता राज्यभरात पेरण्यांना वेग आला आहे. या घडामोडींसह इतर सर्व महत्त्वाच्या घटनांचा आढावा तुम्हाल येथे एका क्लीकवर वाचता येईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -