ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना लवकरच शासकीय सेवेत घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी डिसेंबर 2016 मध्ये जाहीर केलं होतं. हिवाळी अधिवेशनात डिसेंबर 2016 मध्ये विधानसभेत विजय चौधरींचं अभिनंदन करण्यात आलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणा केली होती.
12-12 किलोचे डंबेल्स, गळ्यात 20 किलोची साखळी, विजय चौधरीची मेहनत
विजय चौधरींना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या सर्व बाबींची पूर्तता झाली आहे. त्यामुळे कुठल्याही शिफारशीशिवाय आठवड्याभरात विजय चौधरींनी नोकरी देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं.
मात्र अनेक महिने उलटूनही विजय चौधरींना सरकारी नोकरी मिळत नव्हती. मंत्रालयाच्या चकरा मारूनही त्यांच्या पदरी अपयश येत होतं. त्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली होती. पण आता अखेर त्यांना नोकरी मिळाली आहे.
'महाराष्ट्र केसरी' विजय चौधरीबद्दल माहिती :
- विजय चौधरी 2014 आणि 2015 साली सलग दोनवेळा महाराष्ट्र केसरी किताबासाठी खेळण्याचा आणि तो जिंकण्याचाही अनुभव होता. यावेळीही त्या अनुभवाच्या आधारे खेळत सलग तिसऱ्यांदा विजयने 'महाराष्ट्र केसरी'चा किताब आपल्या नावावर केला.
- वय - 28 वर्षे
- उंची - 6 फूट 2 इंच
- वजन - 118 किलो
- धूमछडी आखाडा आणि मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र
- प्रशिक्षक - रोहित पटेल, ज्ञानेश्वर मांगडे आणि अमोल बुचडे
- मुख्य वैशिष्ट्यं - संयम, बचाव आणि प्रतिहल्ला ही खेळाची वैशिष्ट्यं
संबंधित बातम्या :
VIDEO: माझा कट्टा : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीशी दिलखुलास गप्पा
जळगावचा विजय चौधरी सलग तिसऱ्यांदा 'महाराष्ट्र केसरी'