सोलापूर : कर्नाटकमधील भाजपचे नेते जे वक्तव्य करत आहेत ते चुकीचे आहे. आम्ही त्याचा निषेध करतो, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटकातील भाजप नेत्यांवर टीका करत घरचा आहेर दिला आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना भेटून आम्ही आमचे म्हणणे मांडणार आहोत. कर्नाटकमधील भाजप नेत्यांचे आम्ही समर्थन करत नाहीत. कर्नाटकातील 842 गावांमध्ये असलेले मराठी भाषिक हे आपल्या भूभागासह महाराष्ट्रामध्ये आलेच पाहिजे, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली.


चंद्रकांत पाटील म्हणाले की, हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. मराठा आरक्षणावरुन समाजाची दिशाभूल करण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू आहे. असे म्हणत राज्य सरकारवर देखील पाटील यांनी निशाणा साधला. पक्षाच्या आढावा बैठकीसाठी चंद्रकांत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर होते.


कर्नाटकव्याप्त वादग्रस्त भाग केंद्रशासित होऊ शकतो का? घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणतात..


मनसेसोबत युती करण्याच्या चर्चेबाबत ही चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, राज ठाकरे यांची जोपर्यंत परप्रांतियांच्या बाबतची भूमिका बदलत नाही. तोपर्यंत भाजपा त्यांच्यासोबत जाणार नाही. त्यांनी हिंदुत्ववादाची जी भूमिका घेतली त्याचे स्वागतच असेल असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. अण्णा हजारेंच्या आंदोलनाबाबत बोलताना ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील म्हणाले की, अण्णा हजारे यांच्याबाबतीत सगळ्यांना आदर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी उपोषण करू नये असं आम्हाला वाटतं.


 मुंबई कर्नाटकात सामील करा- कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य
'सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत कर्नाटकव्याप्त वादग्रस्त केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा', कानडी सरकारवर हल्लाबोल करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांनी कर्नाटकातील मराठी भाषिकांना मुंबई कर्नाटकात सामील करण्याची इच्छा आहे, असं म्हटलं होतं. या भागातील लोकांसह, माझी देखील मागणी आहे की, मुंबई कर्नाटकात सामील करावी. जोपर्यंत असे होत नाही तोपर्यंत, मी केंद्र सरकारला विनंती करतो की मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावं, असं सावडी म्हणाले होते.


महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, हे कर्नाटक सरकारने विसरु नये : संजय राऊत