Maharashtra Karnataka Border Disputes : महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न  (Maharashtra Karnataka Border Disputes) अजूनही सुटला नसताना आता कर्नाटक राज्य सरकारकडून नवी कुरापत सुरू आहे. महाराष्ट्राच्या सांगली (Sangli) जिल्ह्यातील जत (Jat) तालुक्यावर कर्नाटक दावा सांगण्याचा गांभीर्यानं विचार करत असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगितलं आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळी आहे. तिथे पाण्याची तीव्र टंचाई भासते. यामुळं तेथील 40  ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे. याच ठरावावर कर्नाटक सरकार विचार करत असल्याचं बोम्मई यांनी सांगितलं.


जत तालुक्याला पाणी देण्याचा आराखडा तयार


सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटक सरकार दावा सांगण्याचा गंभीरपणे विचार करत असल्याची माहिती खुद्द कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. महाराष्ट्रातील कन्नड माध्यमांच्या शाळांना कर्नाटक सरकार अनुदान देईल तसेच शेजारील राज्यातील कन्नड स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शनही देण्यात येईल, असेही बोम्मई यांनी सांगितले आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळी आहे. त्या ठिकाणी कायमच पाण्याची तीव्र टंचाई भासत असते. त्यामुलळं तेथील 40 ग्रामपंचायतींनी कर्नाटक राज्यात सामील होण्याचा ठराव केला आहे. दरम्यान, जत तालुक्याला पाणी देण्याचा आराखडा आम्ही तयार केला असल्याची माहिती बसवराज बोम्मई यांनी दिली आहे.


महाराष्ट्रातील कन्नड स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन देण्यात येणार : बसवराज बोम्मई


कर्नाटक सीमाभाग विकास शाळांना विशेष अनुदान देण्याचा प्राधिकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कन्नड माध्यमांच्या निर्णयही आम्ही घेतला आहे. तसेच स्वातंत्र्य चळवळीत, गोवा मुक्ती चळवळीत सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील कन्नड स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे आम्ही तयार करत असल्याची माहिती देखील बोम्मई यांनी दिली. दरम्यान, सीमाप्रश्नी वकिलांसोबत चर्चाही त्यांनी केली आहे. महाराष्ट्रातील कन्नड नागरिकांचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी असल्याचे बोम्मई यांनी सांगितले.


कन्नड लोकांच्या हिताचं रक्षण करणं आमचं कर्तव्य : बसवराज बोम्मई


जत तालुका हा दुष्काळी भाग असून, तिथं  पाणी टंचाई असते. तिथं आम्ही पाणी देऊन मदत करणार असल्याचे बोम्मई म्हणाले. जत तालुक्यातील सगळ्या ग्रामपंचायतींनी कर्नाटकात राज्यात सामाविष्ट होण्यासाठी ठराव केला असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यात सौहार्दाचे वातावरण राहिले पाहिजे. पण महाराष्ट्र सौहार्दता बिघडवत असल्याचे बोम्मई यांनी म्हटलं आहे. आम्ही सगळ्या भाषिकांना चांगल्या पद्धतीने वागवतो. कन्नड लोकांची संख्या अधिक असल्यानं त्यांच्या हिताचे रक्षण करणं आमचं कर्तव्य असल्याचेही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितलं.


महत्त्वाच्या बातम्या:


Karnataka Bhavan : सीमाभागात मराठी भाषिकांची गळचेपी होत असताना महाराष्ट्रात 'कर्नाटक' नाव कशासाठी? कणेरी मठातील कर्नाटक भवनला शिवसेनेचा विरोध