सर्व परीक्षा राज्यभरात एकाच दिवशी महापोर्टलमार्फत घेण्यात येणार आहेत.
31 जुलै अखेरपर्यंत कृषी आणि पदुम, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, गृह विभाग, आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, मृदा व जलसंधारण विभाग या विभागातल्या रिक्त पदांसाठी जाहिरात निघणार आहे. त्यांच्या विभागाच्या विभागप्रमुखांनी 17 जुलैपर्यंत रिक्त पदांची माहिती राज्य सरकारला कळवायची आहे. त्यानंतर महिना अखेरपर्यंत सर्व पदांच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत.
महत्त्वाचं जिल्हा परिषदेच्या सर्व परीक्षा राज्यभरात एकाच दिवशी होणार आहेत.
कशी असेल परीक्षा?
भरतीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त आणि राज्य स्तरावर त्यांच्या विभागाचे प्रमुख यांची समिती असेल.
यासाठी परीक्षा पद्धती निश्चित झाली आहे. परीक्षेसाठी त्यांच्या जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, स्थानिक बाबींवर 25 टक्के गुण असतील
गट क आणि गट ब या संवर्गातील सर्व रिक्त पदांसाठी भरती होईल. सर्व परीक्षांसाठी राज्यभरात एकाच दिवशी परीक्षा होणार.
दहा जुलैपर्यंत सर्व रिक्त जागांची माहिती राज्य सरकार संकलित करत आहे.
यंदा पहिल्या टप्प्यात भरण्यात येणाऱ्या 36 हजार पदांमध्ये ग्रामविकास विभागातील 11 हजार 5 पदे, सार्वजनिक आरोग्य विभागातील 10 हजार 568 पदे, गृह विभागातील 7 हजार 111 पदे, कृषी विभागातील 2 हजार 572 पदे, पशुसंवर्धन विभागातील 1 हजार 47 पदे, सार्वजनिक बांधकाम विभागातील 837 पदे, जलसंपदा विभागातील 827 पदे, जलसंधारण विभागातील 423 पदे, मत्स्यव्यवसाय विकास विभागातील 90 या पदांसह नगरविकास विभागातील 1 हजार 664 पदांचा समावेश आहे.
कोणत्या विभागात किती पदे भरणार?
- ग्रामविकास विभाग- 11 हजार 5 पदे
- आरोग्य विभाग- 10 हजार 568 पदे
- गृह विभाग- 7 हजार 111 पदे
- कृषी विभाग- 2 हजार 572 पदे
- पशुसंवर्धन विभाग- 1 हजार 47 पदे
- सार्वजनिक बांधकाम विभाग -837 पदे
- जलसंपदा विभाग- 827 पदे
- जलसंधारण विभाग- 423 पदे
- मत्स्यव्यवसाय विकास विभाग- 90
- नगरविकास विभाग- 1 हजार 664 पदे
यंदा पहिल्या टप्प्यात 36 हजार तर दुसऱ्या टप्प्यात पुढच्या वर्षी 36 हजार पदभरती करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या
राज्य सरकारची जम्बो भरती, 72 हजार पदं भरणार, नोकरीची सुवर्ण संधी!
36 हजार नोकर भरतीसाठी फडणवीस सरकारची नवी अट