Ashadhi Wari 2022 : 147 वर्षाची परंपरा असलेला जळगावातील पिंपराळा नगरीचा श्रीराम रथ उत्सव असून आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2022) या रथ उत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. प्रतिपंढरपूर म्हणून या उसत्वाची ओळख आहे. कोरोनाच्या सावटामुळे हा रथउत्सव पाच पाऊले ओढून साजरा करण्यात येत होता. मात्र, कोरोनाचे सावट यावर्षी कमी झाल्यामुळे हा रथउत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रतिपंढरपूर म्हणून रथउत्सवाची ओळख :
अनेक भाविक या रथोत्सवाचे दर्शन घेण्यासाठी आणि नवस बोलण्यासाठी पिंपराला येथे एकत्र येत असतात. प्रतिपंढरपूर म्हणून या रथउत्सवाची ओळख असून जे लोक पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाऊ शकत नाही ते या ठिकाणी या रथ उत्सवच दर्शन घेत असतात.
ढोल ताशांच्या गजरात लेझीमच्या तालावर नृत्य करत अनेक भाविक या उत्सवात सहभागी झाले. ट्रॅक्टरवरील विठ्ठला रखुमाईच्या प्रतिकात्मक मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सोंगाचे आकर्षण :
खान्देशात या उत्सवात भवानी मातेचे विविध रूप घेऊन नवस मागण्याची प्रथा आहे. तो नवस पूर्ण व्हावा यासाठी भवानी मातेचे विविध रूप घेतलेले सोंग हे भाविकांचे मुख्य आकर्षण ठरत असतात. त्याचबरोबर या ठिकाणी पारंपिरक पद्धतीने लेझीम देखील आयोजित केली जाते. एकंदरीतच संपूर्ण पिंपराळा नगरीत आनंदाचे, उत्साहाचे वातावरण येथे या ठिकाणी पाहायला मिळते.
महत्वाच्या बातम्या :
- Ashadhi Wari 2022 : विठ्ठल हे महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या सांस्कृतिक एकतेचं प्रतिक, पाहा नेमका काय आहे इतिहास?
- Ashadhi Ekadashi 2022 : नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली विठुरायाची पूजा!
- Ashadhi Ekadashi 2022 : बीडचे नवले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी; मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
- CM Eknath Shinde : इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचं कार्य, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भुवैकुंठ प्रकल्पाचं भूमिपूजन