मुंबई : जलसंपदा नियामक मंडळाच्या बैठकीत पंप स्टोरेज क्षेत्रात तीन मोठे करार करण्यात आले आहेत. जलसंपदा विभाग आणि एसजेव्हीएन लि., मेघा इंजिनिअरिंग, जेएसडब्ल्यू निओ एनर्जी यांच्यात हे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. राज्यात एकूण 15 हजार 100 मेगावॉट इतक्या वीजनिर्मितीसाठी हे करार करण्यात आली असून त्या माध्यमातून 82 हजार 299 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
राज्यात होणाऱ्या या गुंतवणुकीमधून जवळपास 18 हजार 440 जणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 55 हजार 970 मेगावॉट वीजनिर्मितीसाठी करार करण्यात आले आहेत. ज्यात एकूण 3 लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे तर 90 हजार 390 रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यात पारंपरिक ऊर्जा क्षेत्रातून वीजनिर्मितीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.
ऊर्जा विभागाचे सामंजस्य करार
- महाजेनको आणि SJVN : लोअर वर्धा येथे ऊर्जा प्रकल्प: 3030 कोटी गुंतवणूक
1400 जणांना रोजगार मिळणार
- REC Power मुंबई : 3000 कोटींची गुंतवणूक
1663 जणांना रोजगार मिळणार
- THDCIL इंडिया लि. : ग्रीन हायड्रोजन प्रकल्प/ 29,325 कोटी गुंतवणूक
14,130 जणांना रोजगार मिळणार
- HPRGL आणि एचपीसीएल : ग्रीन हायड्रोजन : 12,000 कोटींची गुंतवणूक
1635 जणांना रोजगार मिळणार
एकूण: 47,500 कोटींची ऊर्जा विभागाच्या सामंजस्य करारांद्वारे राज्यात गुंतवणूक.
या माध्यमातून 18,000 जणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती
एकूण: 47,500 कोटींची गुंतवणूक आणि 18,000 रोजगार निर्मिती.