Maharashtra HSC Class 12 Results नागपूर : राज्यात आज बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून नागपुरातील स्वर्ण आणि सोहम राजनकर या जुळ्या भावांनी आगळे वेगळे यश मिळवले आहे. यात या दोघांनी विज्ञान शाखेतून अनुक्रमे 93 आणि 89 टक्के गुण मिळवले असून त्यासाठी दोघांनी फक्त एकमेकांसोबतच अभ्यास केलाय. दोघांना एकमेकांची सोबत असल्यामुळे त्यांनी कुठलीही कोचिंग क्लास किंवा ट्युशन्स घेतल्या नाहीत हे विशेष. जुळ्या भावासोबत अभ्यास आणि आईचं मार्गदर्शन या जोरावरच स्वर्ण आणि सोहम यांनी बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवले आहे. दोन्ही भाऊ एकमेकांना अभ्यासात जशी मदत करत होते, तसंच दोघांमध्ये एक स्वस्थ स्पर्धाही होती आणि त्यामुळेच दोघांना कुठल्याही कोचिंग किंवा ट्युशन्सविना चांगले यश मिळाल्याची भावना दोघांनी व्यक्त केली आहे.
केवळ आईच्या मार्गदर्शनामुळे जुळ्या भावांची यशाला गवसणी
महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या बारावीचा निकाल (Maharashtra Board 12th Result) अखेर आज घोषित करण्यात आला आहे. विदर्भात एकूण 1 लाख 63 हजार 017 विद्यार्थ्यांनी बारवीची परीक्षा दिली होती. तर यात नागपूर विभागाचा 93.12 टक्के निकाल लागला आहे. तर राज्यातून सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला आहे. कोकणने विभागानं आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. कोकण विभागाचा निकाल 97.91 % तब्बल टक्के लागला आहे. तर नेहमीप्रमाणे मुलींनी निकालावर आपला वरचष्मा राखला आहे.
या निकालाच्या अनुषंगाने अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत एकहाती यश खेचून आणले आहे. अशातच नागपुरातील स्वर्ण आणि सोहम राजनकर या जुळ्या भवानी आगळे वेगळे यश मिळवले आहे. यात या दोघांनी विज्ञान शाखेतून अनुक्रमे 93 आणि 89 टक्के गुण मिळवले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही जुळ्या भावांना शिकवण्यासाठी त्यांच्या आईने विशेष मेहनत घेतली. त्यासाठी त्यांनी स्वतः बारावीच्या अभ्यासक्रमाचा नीट अभ्यास केला आणि मुलांना मार्गदर्शन करत कुठल्याही कोचिंग किंवा ट्युशन पासून दूर ठेवत मोठं यश मिळवून दिल आहे.
नागपूरच्या सिबतेनला विज्ञान शाखेतून तब्बल 96.66% गुण
असेच काहीसे यश आज जाहीर झालेल्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत सिबतेन शेख रजा या विद्यार्थ्याने मिळवले आहे. सिबतेन शेख रजा या विद्यार्थ्यांनं नागपूरातून विज्ञान शाखेतून तब्बल 96.66% गुण मिळवत मोठे यश संपादन केले आहे. सिबतेनच्या मते त्याच्या यशाचं प्रमुख कारण म्हणजे त्याने आजवर स्मार्ट फोनपासून ठेवलेलं अंतरच आहे. त्याने यशाचा सक्सेस मंत्रात सर्वाधिक महत्व हे मोबाइल फोनपासून अलिप्त राहण्याला दिले आहे. बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेतून 600 पैकी 580 गुण मिळवणाऱ्या सिबतेन प्रमाणिकपणे नियमित अभ्यास, प्रचंड मेहनत आणि जिद्दीसह मोबाईल न वापरण्याची मनाशी ठरवलेली खूणगाठ ही देखील त्याची यशाचे कारण ठरली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI